Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बुमराह वेगळ्याच लेव्हलचा बॉलर
बुमराह वेगळ्याच लेव्हलचा बॉलर आहे...
चला कार्तिकला घेऊन वर्ल्डकपला
चला कार्तिकला घेऊन वर्ल्डकपला
धमाल खेळतोय
चला कार्तिकला घेऊन वर्ल्डकपला
चला कार्तिकला घेऊन वर्ल्डकपला >> मागच्या दोन वेळा असाच खेळल्यामूळे असेच घेऊन गेलो होतो. काय झाले होते हे आठवा.
सूर्या आला फॉर्मात.
सूर्या आला फॉर्मात.
मी गमतीने म्हटले ते.. आता
मी गमतीने म्हटले ते.. आता नाही नेणार त्याला पुन्हा.. कारण मागचे अनुभव चांगले नाहीत..
पण मग कोणाला नेणार हा प्रश्न आहे..
संजू इकडे खेळला तरी त्याला स्लो पीचवर खेळायला जमत नाही..
पंत लाडका आहे.. काही चांगल्या इनिंग खेळला तर घेऊन जातील...
ईशान नावडता झाला आहे.. चांगला खेळला तरी नेतील का शंका आहे..
तसेही तो किंवा राहुल यांना किपर म्हणून घ्यायचे झाल्यास खेळवणार कुठे.. आपल्याला असा कीपर हवा आहे जो मागे खेळायला येईल.. टॉप ऑर्डर शर्मा कोहली गिल जयस्वाल सूर्या यांनी भरली आहे..
बाई दवे
आज कार्तिक मारत होता तेव्हा रोहित शर्मा त्याचे खेचत होता... ये वर्ल्ड कप के लिए पुश कर रहा है म्हणून चिडवत होता..
सूर्या आला फॉर्मात.
सूर्या आला फॉर्मात.
,,>>>>
हा फॉरमॅट त्याचाच आहे आणि तो इकडचा सिंघम आहे..
त्यात आज मुंबई वानखेडे म्हणजे फास्ट पीच ट्र्यू बाऊन्स.. त्याच्यासाठी आयडियल कंडिशन..
चांगलेच मारले की आज! एकदम गूड
चांगलेच मारले की आज! एकदम गूड ओल इंडियन्स टीम स्टाईल. रोहित सगळ्यात स्लो होता म्हणजे बाकी कायच्या काही खेळले. आवारा पागल दिवाना सुर्या इज बॅक! अॅन्ड बॅक वित अ बँग!
होपफुली ही विन पंड्या करता टर्निंग पॉईंट ठरावी.
आज कोहली धावून आला पांड्या
आज कोहली धावून आला पांड्या मदतीला.
आज कोहलीने पब्लिकला शांत राहायचे आवाहन केले.
भारतात एका भारतीय खेळाडूला अशी वागणूक मिळतेय याने आपली इमेज एकूणच डाऊन होत आहे.
मला वाटते पुढच्या वानखेडे सामन्यात सचिनने पांड्याच्यां खांद्यावर हात टाकून एक फेरी मारावी आणि पब्लिकला समजवावे..
शर्माची क्रेझ सध्या अफाट आहे. आणि त्याच्याशी जे झाले ते चूक झाले आहे हे देखील खरे आहे. त्यामुळे लोकं सहजी ऐकणार नाहीत. माझी सुद्धा अशी इच्छा आहे की मुंबई आता हरावी. पण पांड्याला टारगेट न करता लोकांनी फक्त रोहीतला सपोर्ट द्यावा.
भारतात एका भारतीय खेळाडूला
भारतात एका भारतीय खेळाडूला अशी वागणूक मिळतेय याने आपली इमेज एकूणच डाऊन होत आहे. >>
पण मग कोणाला नेणार हा प्रश्न आहे.. >> मी, इशान नि संजू बॅकप म्हणून नेईन. इशान ओपन केल्याने खालि एक स्लॉट मोकळा होतो जेणेकरून रिंकू नि रियान दोघेही बसतील. संजू ओपनर म्हणून जास्त एफेक्टीव्ह ठरतो खाली येण्यापेक्षा म्हणून बॅकप. कोहली किंवा गिल मधला कोणि तरी एकच एका वेळी खेळेल. सूर्या फिक्स्ड आहे. पांड्या किंवा दुबे. ह्यामूले पाच बॉलर्स खेळवता येतील. इशान ला खेळवण्याचा एक अजून फाय्दा म्हणजे रोहित नि त्याची ओपनर म्हणून केमिस्ट्री चांगली आहे .
रोहित आणि कोहली चांगले प्लेयर
रोहित आणि कोहली चांगले प्लेयर आहेत पण आता वाटतं की ओवर्स्ट्रेच होईल त्यांचा टाईम. नवे, ताज्या दमाचे लोकं न्यायला हवे. सुर्या, इशान, दुबे आणि पराग असाच खेळत राहिला तर तो. पुढे जुरेल वगैरे शेवटी येऊन तुडवायला घ्यायला पाहिजेत.
असामी, मला वाटतं टी-२०
असामी, मला वाटतं टी-२० वर्ल्डकपमधे विकेटकीपरच्या रोलसाठी पंत, जितेश, जुरेल अशी पेकिंग ऑर्डर असेल. किशनला संधी असेलही कदाचित (जर बीसीसीआय बरोबर सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या असतील तर), पण संजू लाँग-शॉट वाटतो.
शर्माने परवा मुद्दाम ईशान
शर्माने परवा मुद्दाम ईशान च्या बाजूला जाऊन दिनेश कार्तिकला चिअर केले.. त्याचा परिणाम म्हणून ईशान त्वेषाने खेळला अशी चर्चा आहे
पंत हा सीजन खेळला तर त्याला नेतील कारण तो लाडका आहे..आणि ते यासाठी आहे कारण सध्या आपली नॉक्आउट सामन्यात हरणारे अशी चोकर इमेज झाली आहे. तिथे तो काउंटर अटॅक करून आपल्याला बाहेर काढू शकतो अश्या मानसिकतेचा प्लेअर आहे.
आज सुद्धा छान खेळला... आधी विकेटची पडझड होऊ न देण्याची काळजी घेतली. आणि जेव्हा गेम फसतोय की काय असे वाटले तेव्हाच योग्य वेळी मारायला सुरुवात केली. प्रत्येक सामन्यागणिक त्याचा आत्मविश्वास वाढत आहे.. दिल्ली जिंकू लागली सामने तर तो अजून रंगात येईल
असामी, तुझ्या पोस्टवर आणखी एक
असामी, तुझ्या पोस्टवर आणखी एक लिहायचं राहिलं. पंतला स्टार व्हॅल्यूवर नेतीलही कदाचित. पण व्हाईट बॉल क्रिकेट इज नॉट हिज कप ऑफ टी.
ज ब र द स्त. सामना झाला आजचा
ज ब र द स्त. सामना झाला आजचा.
जी मॅच १५ ओव्हरमध्ये संपवून
जी मॅच १५ ओव्हरमध्ये संपवून NRR वाढवायला पाहिजे होता ती मॅच अगदी नेल बायटींग फिनिश झाली!!
असो!! जिंकले हे महत्वाचे.....पण तिथे हॅटमायर होता म्हणूनच जिंकले.... काय कूल माणूस आहे राव तो
“ जी मॅच १५ ओव्हरमध्ये संपवून
“ जी मॅच १५ ओव्हरमध्ये संपवून NRR वाढवायला पाहिजे होता ” - पीच रिपोर्टपेक्षा पीच वेगळं होतं. अभिषेकचा सोडलेला कॅच आणि त्यामुळे वाढलेले १५-२० रन्स महागात जाऊ शकले असते रॉयल्सना. पण आधी पॉवेल आणि नंतर हेटमायर ह्या दोन करिबियन बॅट्समेन ने मॅच काढून दिली. रॉयल्सचे चार फर्स्ट चॉईस प्लेयर्स नसताना सुद्धा जिंकले ही त्यांच्या टीम च्या डेप्थला आणि संजू च्या कॅप्टन्सीला दाद देण्यासारखी गोष्ट आहे.
कोटीयन ओपनिंग पाठवले आणि तो
कोटीयन ओपनिंग पाठवले आणि तो निवांत खेळत राहिला म्हणून सगळा सीन झाला...
तरी अजून पुढे काही सामन्यात चेस कसे करतात हे बघायला हवे.
कलकत्ता जिंकली आज आरामात
अपेक्षेप्रमाणे ..
आणि आता मुंबई चेन्नई.. आयपीएल चा सर्वात मोठा सामना !
>>पीच रिपोर्टपेक्षा पीच वेगळं
>>पीच रिपोर्टपेक्षा पीच वेगळं होतं.
येस्स..... पण तरीही मॅच अगदी २०व्या ओव्हरपर्यंत जायला नकोच होती!!
तो कोट्टीयन जवळजवळ ३० बॉल खेळला (म्हणजे चक्क ५ ओव्हर्स) ७०-७५ च्या स्ट्राईकरेटने..... आणि काल ते कव्हर करायला नेहमीचा पिंच हिटर (अश्विन) नव्हता!!
ज्युरेल अजुन चालत नाहिये.... हॅटमायर खेळला नसता तर कालची मॅच गेलीच होती.
>>रॉयल्सचे चार फर्स्ट चॉईस प्लेयर्स नसताना सुद्धा जिंकले ही
ते आहेच पण तरीही कालचा स्कोअर बघता अजुन सफाईदारपणे जिंकायला हवे होते रे!!
“ पण तरीही कालचा स्कोअर बघता
“ पण तरीही कालचा स्कोअर बघता अजुन सफाईदारपणे जिंकायला हवे होते रे!!” - हो, हे खरंय.
केकेआर जिंकले, आता होपफुली दुसरी होमटीम सुद्धा जिंकेल.
या दुबेने जरा बोलिंग केली
या दुबेने जरा बोलिंग केली पाहिजे कामचलाऊ.. सातत्याने चांगला खेळतोय हल्ली.. कसले मस्त मारतोय. अष्टपैलू म्हणून आला तर पांड्याचा पत्ता कट करेल हा. निदान त्याची घमेंड तरी कमी होईल.
आयपीएल मधला आणि जनरलीच मॉडर्न
आयपीएल मधला आणि जनरलीच मॉडर्न क्रिकेटमधला ‘मॅच-अप‘ प्रकार कंटाळवाणा व्हायला लागलाय. क्रिकेटमधली क्रिएटीव्हिटी / आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग काढून टाकलं तर क्रिकेटचा बेसबॉल व्हायला वेळ लागणार नाही.
धोनी सिक्स सिक्स सिक्स दोन...
धोनी सिक्स सिक्स सिक्स दोन...
बदाम बदाम बदाम..
चार बॉल खेळायला आला आणि तीन सिक्स मारले..
माही मार रहा है..
४ चेंडू वीस धावा
रोहित शर्मा काढणार का मॅच?
रोहित शर्मा काढणार का मॅच?
पनवती आहे पांड्या. त्याला
पनवती आहे पांड्या. त्याला काढल्याशिवाय मुंबई जिंकू शकणार नाही.
धवन जसा परवा बाहेर बसला तसा याला बसवला पाहिजे.
आधी बोलिंग मध्ये आणि नंतर बॅटिंग मध्ये शेण खाल्ले.
शर्मा शतक आणि पांड्या पराभूत
शर्मा शतक आणि पांड्या पराभूत
दिल खुश आज
धोनी चार चेंडूत २० धावा
मुंबईचा २० धावांनी पराभव
मजा आली.
मजा आली!
मजा आली!
पांड्याने शेवटच्या over मध्ये
पांड्याने शेवटच्या over मध्ये धोनीला धुवायला दिले पद्धतशीर. स्वैर मारा नुसता.
आणि नेट रनरेट tight होत असताना 6 बॉल मध्ये 2 रन काढून आउट झाला.
त्याच्यापेक्षा तो हेड चांगला खेळत होता, तो वर यायला हवा होता.
पांड्याने शेवटच्या over मध्ये
पांड्याने शेवटच्या over मध्ये धोनीला धुवायला दिले पद्धतशीर. >>>
एरवी आखूड टप्प्यावर मारा करणार्या पंड्याने धोनीला स्लॉटमध्ये जिथून धोनी हमखास षटकार मारतो असे सलग चार चेंडू टाकले.
धोनी मैदानावर उतरण्याच्या तयारी होता दुसरा चेंडू पंड्या फेकत असताना आणि त्यावेळी सतत कॅमेरा धोनीवर होता.
एरवी आखूड टप्प्यावर मारा
एरवी आखूड टप्प्यावर मारा करणार्या पंड्याने धोनीला स्लॉटमध्ये जिथून धोनी हमखास षटकार मारतो असे सलग चार चेंडू टाकले.
>>>>>
मी सांगून सांगून थकलो आयपीएल मध्ये अशा बऱ्याच गोष्टी स्क्रिप्टेड असतात. ज्या फक्त आणि फक्त टीआरपी साठी होतात. सामने आणि पॉइंट टेबल रोचक करायला होतात.. जसे इथे धोनीने फटकेबाजी करणे यात सुद्धा खूप टीआरपी आहे..
मुद्दाम पट्ट्यात मारायला देतात. फिल्डीन भलतीकडे लावतात आणि बोल भलतीकडे टाकतात.. हातातल्या कॅच सोडतात, नो बॉल टाकतात.. बरेच गमती असतात ज्या पटकन समजतात.. आणि डिपेंड करायचे झाल्यास प्रेशर मध्ये असे होते रे म्हटले की झाले
पण यावेळी फार दिसल्या नाहीत अजून... बहुतांश सामने छान झालेत. त्यामुळे यावेळी बरे वाटत आहे.
तरी त्या दिवशी एका सामन्यात लास्ट ओवरला 29 हवे होते तेव्हा तीन कॅच सोडल्या, ज्यातल्या दोन सिक्स गेल्या आणि एका सिंगलचे डबल घेऊ दिले... तिथे जरा पाल चुकचुकली.. तरी ठिक आहे.. पण गेले दोन सीजन सारखा धडाका नाहीये यंदा..
Hardik in post match: and
Hardik in post match: and they have a man behind the stumps telling them whats working
anyone reading between the lines (rather reading beyond the lines) here?
Pages