
समजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये
कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.
झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?
हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.
ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!
बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?
भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.
तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.
संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.
अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)
जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. IMDb वर 6.8 रेटिंग आहे.
लबाड लांडगं सोंग करतेय
लबाड लांडगं सोंग करतंय
याचा अर्थ
लांडगं संगीत दिग्दर्शन करतंय असा लागेल का अजकालच्या पब्लिकला?
स्वांग करतंय असे आहे ते..
स्वांग करतंय असे आहे ते.. पुणे ३० का हो तुम्ही?
चूक च्रप्स, 'लबाड लांडगं ढाँग
चूक च्रप्स, 'लबाड लांडगं ढाँग करतंय' असं गाणं आहे. साँग दुसर्या ओळीत आहे.
हो. "च्रप्स पुरनपोई खाउन
हो. "च्रप्स पुरनपोई खाउन रायले, जेवन करुन रायले." या वरुन च्रप्स जेवण करताहेत असे म्हटले तर चूक होणार नाही ना?
तुम्ही दोघेही मोठे ट्रोल आहात
तुम्ही दोघेही मोठे ट्रोल आहात… काहीतरी विनोद करुन टॉपिक भरकटवत असता… काही लोक हसतात म्हणून प्रत्येक धाग्यावर तुमची ट्रोलिंग चालू असते… विषय काहीही असो.. काहीतरी पांचट धागा सोडून कॅमेंट टाकायची..
काहीतरी पांचट धागा सोडून
काहीतरी पांचट धागा सोडून कॅमेंट टाकायची >> 'धागा सोडून काहीतरी पांचट कॉमेंट टाकायची' असं म्हणायचंय का?
सॉरी च्रप्स. पण वरची कमेंट
सॉरी च्रप्स. पण माझी वरची कमेंट सिरियस होती. यानुसार
हपा- सोरी तुम्हाला नाही..
हपा- सोरी तुम्हाला नाही.. तुम्हाला दुसरेच कोणीतरी समजलो होतो…
'धागा सोडून काहीतरी पांचट कॉमेंट टाकायची' असं म्हणायचंय का?
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 13 January, 2024 - 00:18
>>तुम्हाला ते माहित आहेच.. दर धाग्यावर हेच चालू असते…
हं. आलं लक्ष्यात काय यायचं ते
हं. आलं लक्ष्यात काय यायचं ते.
तुम्ही एक जॉली, स्वच्छंदी आयडी आहात, कधी कधी होतात मूड नुसार अथवा गमतीत कमी-अधिक कॉमेंट्स कुणाही कडुन असे समजत होतो.
असो. या विषयावर अधिक बोलु इच्छित नाही.
अरे तुम्ही ऑफेंड झाला.. माफी
अरे तुम्ही ऑफेंड झाला.. माफी असावी …
गम्मत करत होतो … टाईम पास साठी.. लोड नका घेऊ…
मी स्वतः धागा डिरेल करतो..
मी स्वतः धागा डिरेल करतो.. मला वाटलेले तुम्ही त्याबद्दल बोलाल…
सर्वांचे अभिनंदन !!
सर्वांचे अभिनंदन !!
Filmfare Awards 2024 Nominees: Animal Dominates With 19 Nods
लाजे ची गोष्ट आहे अभिनंदनाची
लाजे ची गोष्ट आहे अभिनंदनाची नाही.
च्रप्स, कोण ट्रोल आहे ते बहुतेकांना माहित आहे
छान खुसखुशीत परीक्षण
छान खुसखुशीत परीक्षण
उपेन्द्र लिमये मुलाखतीमध्ये सांगत होता की एक सीन आहे त्यात रणवीर त्याची चड्डी मागतो आणि उपेन्द्र काढून देतो, तर रणवीर ती घालतो .. अस काहीतरी..
उपेन्द्र म्हणाला मी खूप hesitate होत होतो असा कसला सीन आहे , कसा करायचा म्हणून तर म्हणे दिग्दर्शक म्हणाला, ते justify होईल नीट असा screenplay केला आहे so odd नाही वाटणार
विकृतपणाचा कळस करायचा अस ठरवलं होत वाटत सिनेमा करताना...
लाजे ची गोष्ट आहे अभिनंदनाची
लाजे ची गोष्ट आहे अभिनंदनाची नाही.
>>>>
अहो ते उपरोधाने लिहिले होते..
बाकी लाजेची गोष्ट सुद्धा नाहीये.
फिल्म फेअर हे फिल्म इंडस्ट्री वाल्यांचे खाजगी पुरस्कार आहेत. ते आपल्या मनाने हवे त्यांना नोमिनी देतात, पुरस्कार देतात... बाकीच्यांनी कश्याला त्यात लाज लज्जा आनंद अभिमान वाटून घ्यायचा...
बाकी बॉक्स ऑफिसवर चालला आणि अवॉर्ड सुद्धा मिळाले तर आता अश्या चित्रपटांची एक लाट येईल आणि जाईल.. ती झेलायला आणि त्यावर चर्चा करायला तयार राहा म्हणून ते वरचे अभिनंदन होते.
Pages