
समजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये
कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.
झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?
हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.
ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!
बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?
भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.
तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.
संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.
अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)
जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. IMDb वर 6.8 रेटिंग आहे.
अमितव , हेच सुरूवातीपासून
अमितव , हेच सुरूवातीपासून म्हणत होतो. धन्यवाद.
फारएण्ड धन्यवाद.
अस्मिता , भलत्या सलत्या आयडिया देऊ नयेत. पाचच मिनिटात असा आयडी येऊ शकेल.
आणि मी इथे फारएण्ड आयडी नसुन
आणि मी इथे फारएण्ड आयडी नसुन टोकाची भूमिका या अर्थी आहे - टोकाची भूमिका, अपमान अस्मिता .असे समजलो क्षणभर.
रघु विचारप्रवर्तक मुद्दे मांडत आहात.
मानव धन्यवाद.
मानव धन्यवाद.
धागालेखक म्हणत असेल ...
कुठे नेऊन ठेवलाय अॅनिमल माझा ?
रघु विचारप्रवर्तक मुद्दे
रघु विचारप्रवर्तक मुद्दे मांडत आहात. +१
>>> वाचतेय हं
कमाल आहे! आता बिर्याणी कशी
कमाल आहे! आता बिर्याणी कशी चांगली होते किंवा होत नाही यावरुन बंदी घालायची का? हसावं का रडावं!
नवीन Submitted by अमितव on 11 January, 2024 -
हिंदू स्त्रीला काळा बुरखा घालून नमाज पढताना दाखवणं, हे केल्याने(च) तिला success मिळतो असं दाखवणं- हे तुम्हाला आवडलं असेल, अनेकांना नाही आवडलं.
(असंच आठवलं: कुछ कुछ होता है
(असंच आठवलं: कुछ कुछ होता है मध्ये पण शाहरुख ची मुलगी नमाज पढते आणि मग सलमान काजोल ची एंगेजमेंट पुढे जाते.अर्थात त्यावेळी कोणालाही 'हे काय अचाट अतर्क्य कायच्याकाय' असं 1 मिनिट वाटण्यापलीकडे काहीही झालं नाही.)
बाकी नमाज पढल्याने बिर्याणी चांगली होईल हे फारच विनोदी आहे.या न्यायाने आम्ही प्रत्येक वेळी घरी केक बेक करताना चर्च मध्ये मास करून यायचा की काय?
प्रतिसाद सगळे जरा सवडीने
प्रतिसाद सगळे जरा सवडीने वाचणार आहे. कारण बरेच विचारमंथन (brain storming) झालेले आहे
परंतु अस्मिता यांनी एक खूप महत्वाचा मुद्दा अन्यत्र मांडला होता तो त्यांनी इथे मांडलाय कि माहिती नाही. "अल्फा मेल (Alpha Male) हे प्रामुख्याने कोल्हे लांडगे यांसारख्या प्राण्यांच्यात कळपात होते/असतात. पण आदिम मानवी समूह हे कोल्हया-लांडग्यांच्या समूहाप्रमाणे नव्हते" असे अनेक संशोधकांचे दावे आहेत. त्यामुळे सिनेमा ज्यावर आधारित आहे ती थीम मुळातच दिशाभूल करणारी आहे. मानवी समुहातील अल्फा मेलच्या गुणवत्ता सुद्धा त्यांनी त्या पोस्ट मध्ये दिल्या होत्या.
सोसायटीतले एक दोन मिल्लेनियल्स सिनेमा बघून येऊन "मी अल्फा मेल आहे" म्हणून छाती फुगवून अभिमानाने सांगत होते त्यांना मी हे सांगून थोडी हवा फुस्स केली
हे तुम्हाला आवडलं असेल,
हे तुम्हाला आवडलं असेल, अनेकांना नाही आवडलं. >>>
हे आर्ग्युमेण्ट म्हणजे त्या ऑर्डर्लीसारखे "मंग पोलिस नाय तर काय चोर आहे?" सारखे आहे. मलाही आवडले नाही ते. बिनडोक सीन आहे, जर इथे वाचला आहे तसा असेल तर. पण त्यात बंदी घालण्यासारखे काय आहे?
१. काय भारी सीन आहे. चला सगळे धर्मांतर करून टाकू.
२. काय बिनडोकपणा आहे. ते सोडा. दुसरे काहीतरी बघू.
३. काय आंतरराष्ट्रीय ज्यू-मुस्लिम-कम्युनिस्ट कावा आहे. ताबडतोब बंदी घाला.
यात मोठी रेंज आहे. ३ नाही म्हणजे डायरेक्ट १आहे असे नसते.
या न्यायाने आम्ही प्रत्येक वेळी घरी केक बेक करताना चर्च मध्ये मास करून यायचा की काय? >>>
आणि श्रीखंड बनवताना स्नानसंध्या 
>>> महिलांना कस्पटासमान
>>> महिलांना कस्पटासमान वागणूक देणारे पात्र हिट असेल तर ती चिंतेची बाब आहे
ती भारतीय चित्रपटांत आणि समाजात कधी दिली जात नव्हती?! हे अतिरंजित पद्धतीने दाखवलं गेलं आहे (असं पाहणारे सांगतात) म्हणून इतकी चर्चा तरी झाली. अनंतकाळपासून कंपल्सरी क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची पोळ्यांची बाई असलं पोर्ट्रेयल गुडी गुडी पद्धतीने करणार्या आणि प्रचंड लोकप्रिय झालेल्या सिनेमांचं काय? त्यांच्यामुळे समाज प्रभावित होत नाही का? ते धोकादायक नाही का?
स्वाती, पॉईंट आहेच. पण फरक
स्वाती, पॉईंट आहेच. पण फरक परिणामांच्या गांभीर्याचा/severity चा आहे असे मला वाटते.
अनंतकाळपासून कंपल्सरी क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची पोळ्यांची बाई >>>
बाय द वे ते वाक्य फार भारी लिहीले आहे
ते अनेक वेळा समाजातील परिस्थितीचे प्रतिबिंब होते. किंवा समाजात जे स्टीरीओटाइप आहेत त्यांनाच चुचकारण्याचा प्रकार. याचे आणखी निर्लज्ज उदाहरण म्हणजे टीव्ही सिरीज मधे सगळ्या संस्कारी स्त्रिया त्यांची नावे व कपडे यातूनच सहज उभ्या केल्या जातात. याउलट सगळ्या संजना टाइप नावे असलेल्या मॉड स्त्रिया उटपटांग असतात, त्या कपडेही तशाच घालतात - असे चित्र उभे करून प्रस्थापित स्टिरीओटाइप्सना आणखी बळ देणारे.
पण अॅनिमल बद्दल जे वाचले आहे ते त्याच्यापेक्षा जास्त severe टाइपचे वाटते. बायकांना बूट चाटायला लावणे हे गृहिणी स्टीरीओटाइपइतके समाजात कॉमन (होपफुली) नसावे. मर्दानगीच्या लक्षणांत ते दाखवणे आणि पब्लिकने ते ग्लोरिफाय करणे हे गंभीर आहे.
>>> पण अॅनिमल बद्दल जे वाचले
>>> पण अॅनिमल बद्दल जे वाचले आहे ते त्याच्यापेक्षा जास्त severe टाइपचे वाटते
होय, आणि मी म्हणते आहे की ते वेळीच उपाय न केले गेल्यामुळे चिघळत गेलेल्या आजाराचं लक्षण आहे.
अब्यूजिव व्यक्ती किंवा सिस्टीमचा धीर असाच चेपत जातो. 'पदराने बूट पुसल्याचं दाखवलेलं चालतं? मग आता चाटायला लावून बघू!'
टोटली मान्य.
टोटली मान्य.
मलाही मान्य.
मलाही मान्य.
>>वेळीच उपाय न केले
>>वेळीच उपाय न केले गेल्यामुळे >> यावर उपाय काही आहे का?
शिक्षण, समाजात आदर्श, सारासार विवेक शिकवणे इ. शिवाय काही उपाय नसावा.
पण त्यात बंदी घालण्यासारखे
पण त्यात बंदी घालण्यासारखे काय आहे?
बंदी घातलेली नाहीच. लीगल स्टेप्स काहींनी घेतल्या आहेत, जो हक्क संविधान देतंच. त्याच वेळी netflix ने स्वतः चित्रपट मागे घेतला आहे. तुम्ही जी दुसरी कॅटेगरी सांगितली 'दुसरं काहीतरी बघू' वाले लोक- त्यानी घाऊक प्रमाणात नेटफलिक्सवरून दुसऱ्या ओटीटीवर शिफ्ट केलं तर काय ही भीतीही वाटली असेल. आता तोही consumers चा चॉईस आहेच.
Animal च्या बाबतीत ते वर्क झालं नाही कारण जसे हिंदुत्ववादी आणि पुरोगामी हे कंपू एकजूट आहेत तसा फेमिनिस्ट कंपू एकजूट नाही. काही वेगळं अस्तित्वही नाही.
याउलट तोंडाने शाफुआ शाफुआ जप करणाऱ्या एका पुरोगाम्याने animal ची भरभरून स्तुती केली होती आणि 'फेमिनाझी' उगाचच या चित्रपटाला नावं ठेवत आहेत असं लिहिलं होतं. तिथे समविचारी पुरोगामी लोकानी 'फेमिनिस्ट बायकांना लय माज आलाय, फोडून काढलं पाहिजे' अशा कमेंट लिहिलेल्या पाहिल्या.
दुसरीकडे villain मुस्लिम दाखवलाय म्हणून राईट विंग खुश.
स्त्रीवादी लोक हे या दोन्ही कंपूत थोडेथोडे आहेत आणि split झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा consumers म्हणून अगदी गे किंवा ट्रान्स पुरुषमंडळीइतकाही दबाव बनत नाही.
यावर उपाय काही आहे का?
यावर उपाय काही आहे का?
>>> माझ्यामते बऱ्याच जणांना आधी कबूल करावे लागेल की हा 'रोग' आहे. मग उपाय शोधता येईल. 'सेलेक्टिव' अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड delusional राहून चालणार नाही. ही काही पठाण मधली orange bikini नाही. हे गंभीर आहे.
स्वाती +१
अस्मिता +१
अस्मिता +१
>>> आधी कबूल करावे लागेल की
>>> आधी कबूल करावे लागेल की हा 'रोग' आहे.
अगदी!
एक सेकंदभर मी 'अपमान' आयडी
एक सेकंदभर मी 'अपमान' आयडी शोधत होते >>> मी पण
एक सेकंदभर मी 'अपमान' आयडी
एक सेकंदभर मी 'अपमान' आयडी शोधत होते >>> मी पण >>>>> +१ (ऑक्सफर्ड कॉमाचं महत्त्व आता पटायला लागलं आहे
)
मी पण
मी पण
'कॉमा पुरता मामा'
सगळेच 'कॉमा पुरता मामा' बनले.
अस्मिता
अस्मिता
>>> 'कॉमा पुरता मामा'
>>> 'कॉमा पुरता मामा'

आधी कबूल करावे लागेल की हा
आधी कबूल करावे लागेल की हा 'रोग' आहे. >> +१
'कॉमा पुरता मामा >>>
वेळीच उपाय न केले गेल्यामुळे >> ही भारतासारख्या देशाची खासियत आहे. कोविडकाळात आपण किती गोष्टी गृहीत धरून चालतो. शेवटच्या क्षणापर्यंत चालवून घेतो याची छान उजळणी झाली होती. अशा अनेक गोष्टींमधे आपण वेळीच उपाय करत नाही हे त्या काळात पटले होते. लॉकडाऊन संपला आणि ते विचारमंथन थांबले, पुन्हा लोक आपापल्या चक्रात गुंग झाले.
नवरा बायकोची कर्तव्ये कीर्तन, भजन, विविध पाठ अशा धार्मिक माध्यमातून बिंबवले जात असतात. प्रत्येक धर्मात होत असतं.
आमच्याकडे एक मराठीतले दिग्दर्शक येत असत. त्यांनी एकदा सांगितले होते कि उच्च स्थानावर बसून सांगितलेल्या गोष्टीचा खाली बसलेल्या व्यक्तींवर होणारा प्रभाव खोलवर असतो. थेटरमधला पडदा हा आपल्यापेक्षा उंच असतो. कीर्तनकारापेक्षा तो जास्त प्रभाव पाडतो.
अस्तित्व सारख्या चित्रपटाने विचार करायला भाग पाडले. असे चित्रपट सातत्याने बनले तर समाजाच्या विचार करण्यात बदल होत जाईल (हे माझं मत).
वेळीच उपाय करणे म्हणजे बूट
वेळीच उपाय करणे म्हणजे बूट पुसणे/ चाटणे वगैरे प्रकारा बद्दल लागलीच निषेध नोंदवणे... मला करावं लागत नाही तर मी का बोलू? ही अप्पलपोटी प्रवृत्ती झाली ना?
फारेंड पोस्ट्स +१.
उगा प्रत्येक झळ आमच्या मुलाला, >>>> तुमच्यासाठी ते "उगा" असेल, अनेकांना जेंव्हा प्रत्यक्षात स्वतःला झळ बसते तेंव्हाच प्रसंगाचं गांभिर्य कळतं..
आधी कबूल करावे लागेल की हा 'रोग' आहे. +१
'सेलेक्टिव' अभिव्यक्ती
'सेलेक्टिव' अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड delusional राहून चालणार नाही >>> १००++
फारएण्ड: पोस्ट आवडली.
'Annapoorani' असे त्या मूवी
'Annapoorani' असे त्या मूवी चे नाव आहे आणि तो बिर्याणी बनवताना नमाज अदा करतानाचा सिन पाहिला . मुस्लिम बॉयफ्रेंड वाल्मीकींच्या रामाचे उदाहरण देतो तोहि सिन पाहिला. हिरोईन 'उ अंटावा' आयटम सोंग वाली आहे का ?
चेहरा बघत जा म्हणजे कळेल ती
चेहरा बघत जा म्हणजे कळेल ती nayantara आहे.. समंथा नाही…
मी ही अपमान आय डी शोधत होते.
मी ही अपमान आय डी शोधत होते.
Pages