नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तुम्ही तर सुरुवातीलाच स्वतःला नास्तिक असे लेबल का लावले ते कळले नाही. पहिल्या पोस्ट पासून सगळीकडे तुम्ही देव, साधू, कोण कोण महाराज, खुद्द नर्मदा नदी इ. बद्दल खूप श्रद्धाभावनेनेच लिहिताय.
तुम्ही कित्येक विलक्षण अनुभवही लिहिलेत. ज्याला चमत्कार असे सामान्य माणूस म्हणेल. एकांतवासात, त्या अवघड प्रवासात, त्या वातावरणात आणि मानसिक स्थितीत ते तसे एक्सप्लेन न करता येण्यासारखे अनुभव येतही असतील, किंवा तसे भासत असतील. पण मनात तशी श्रद्धा असल्याशिवाय "मैयानेच बोलावले, मैयाने लाड पुरवले, दिवंगत व्यक्तीशी बोललो, शंकराने दर्शन दिले " असे कसे मनात येईल?>> मै, अगदी. मला पहिल्या भागापासूनच लेखक नास्तिक असावेत अशी पुसटशी शंकाही आली नाही इतके ते भक्तीरसात न्हाऊन निघाले आहेत.

मी भाविक नाही पण या परिक्रमांबद्दल एक भटकंती म्हणून पाहतो आणि वाचतो. एक अवघड भटकंती आहे.भाव आणि श्रद्धा नसेल तर त्रास जाणवणार.

>>>मी कुठेही मी नास्तिक आहे असे लिहिलेले नसून माझा पिंड नास्तिकतेकडे झुकणारा आहे असे विधान केलेले आहे .<<< + >>>अजूनही मी घरी देवपूजा करत नाही . परंतु आता जगण्याचे कोडे बऱ्यापैकी सुटल्यासारखे वाटते हे तितकेच खरे !<<<
बहुदा तुम्हाला कर्मकांड मान्य नाहीत असे म्हणायचे असावे का?
नास्तिकते कडे "झुकणारं" असं काही नसतं. एकतर तुम्ही नास्तिक असता वा आस्तिक. हा आता आस्तिकतेच्या कोणत्या पायरीवर अहात हे वेगवेगळं असू शकतं. असं वाटतं.

बाकी लेखनशैली अतिशय प्रभावी आहे आपली, अनुभवांना शब्दबद्ध करण्याची ताकद कौतुकास्पद आहे. फक्त सगळ्याला तर्कात ओढणं पटलं नाही, पचलंही नाही.
आपल्या विचार, भावनांचा आदर.

तुम्ही नास्तिक पिंडाकडे झुकणारे असाल, हे काय इतरांनी व्हालिडेट करण्याचे किंवा तपासण्याचे कारण नाही. पण तुमचे लेखन वाचून तसे वाटत नाही. असूदे, लिखाण रोचक आहे.

बाकी, प्रश्न मात्र पडतो. जर, नर्मदा परिक्रमा, त्यातून येणाऱ्या अनुभूती, त्याभोवती असलेले लिजंड इत्यादींबाबत कसलीही माहिती नसणाऱ्या व्यक्तीने फक्त एका नदीची परिक्रमा म्हणून ही परिक्रमा केली तर त्याला पण हे अनुभव येतील का ? तुम्ही ही परिक्रमा सुरू करायच्या आधीच अत्यंत भावूक आणि अनुभूतीच्या प्रतीक्षेत होता असे तुमच्या लिखाणावरून दिसते.

एलियन हा सिनेमा आल्यापासून अनेक लोकांना त्या सिनेमातल्या प्राण्यासारखे एलियन दिसले होते, तसे काहीतरी.

तुम्ही नास्तिक पिंडाकडे झुकणारे असाल, हे काय इतरांनी व्हालिडेट करण्याचे किंवा तपासण्याचे कारण नाही. पण तुमचे लेखन वाचून तसे वाटत नाही >> दोन्ही वाक्ये परस्परविरोधी तरीही परस्परपूरक आहेत. पहिल्यात त्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेसचा, एक्स्प्रेशन आदर केला आहे. त्याच वेळी विसंगती खटकली त्याची नोंद घेतली अशा प्रकारे व्यक्त झाला आहात.

आस्तिकांची श्रद्धा त्यांच्या व्यक्तिगत जीवनापुरती मर्यादित असेल तर नास्तिकांंनी त्यांच्या घरात शिरून जाब नको विचारायला. लोक चार भिंतींच्या आत, खासगी आयुष्यात काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे.

हीच गोष्ट उलटपक्षी पण लागू होते. हेतू दुष्ट वाटत असेल, हिडन अजेंडा दिसत असेल तर नक्कीच आवाज उठवला पाहिजे, पण साप साप म्हणून भुई धोपटण्यात अर्थ नाही.

परिक्रमा किंवा अशा प्रकारच्या मोहिमा हा निव्वळ व्यक्तिगत मामला आहे. नसेल पटत तर नका वाचू. इथे बहुतेकांना नास्तिक आहे असे सांगण्यातली विसंगती खटकली जे बरोबर आहे.

> > >जर, नर्मदा परिक्रमा, त्यातून येणाऱ्या अनुभूती, त्याभोवती असलेले लिजंड इत्यादींबाबत कसलीही माहिती नसणाऱ्या व्यक्तीने फक्त एका नदीची परिक्रमा म्हणून ही परिक्रमा केली तर त्याला पण हे अनुभव येतील का ? > > >
अशाप्रकारे एक नदी म्हणून फिरायला आलेली दोन बंगाली मुले मला भेटली होती . ते देखील डाव्या चळवळीचे हाडाचे कार्यकर्ते होते . परंतु त्यांना देखील अशा अनुभूती येत गेल्या हे त्यांनीच मला सांगितले . त्यातील एकाने अनुभूती यायला लागल्यावर परिक्रमा सोडून पळ काढला तर दुसऱ्याने परिक्रमा पूर्ण केली .

> >इथे बहुतेकांना नास्तिक आहे असे सांगण्यातली विसंगती खटकली जे बरोबर आहे. > > मी स्वतः जर सांगतो आहे की मी नास्तिक होतो तर त्यात शंका घेण्यास वाव येतोच कुठे ?
बहुतेक माझा नास्तिकतेकडे झुकलेला पिंड अस्तिकतेकडे कसा व कुणामुळे झुकला याबाबत एक स्वतंत्र लेख मी लिहिला नसल्यामुळे ही गॅप लोकांना जाणवते आहे . परंतु परिक्रमा करताना भावभावना जितक्या होत्या तितकीच उत्सुकता व शुद्ध मराठीमध्ये किडा देखील होता याची कृपया नोंद घ्यावी . तो पुढे वेळोवेळी वळवळला व मैय्याने योग्य प्रकारे हाताळून शांत देखील केला ! पुढे अजून काही भयकंपित करणारे अनुभव यायचे आहेत .

मला नास्तिकतेचे स्तोम माजवायचे नाही किंवा कौतुक देखील करावयाचे नाही परंतु इथे अशा काही प्रतिक्रिया आल्या होत्या ज्यांनी वैज्ञानिकतेवर आणि सत्यासत्यतेवरच प्रश्न उठविला होता म्हणून मला सांगावे लागले होते . असो . नास्तिक म्हणजे फार मोठा वैज्ञानिक असा एक विचार आपल्या समाज मनावर ठसवला गेलेला आहे . मीही पूर्वीचा त्याच परंपरेतला होतो इतकेच सांगितले .

Narmade Har, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही आधी तुमच्या ब्लॉगवरची मालिका पूर्ण करा आणि मग सलग ते भाग इथे मायबोलीवर आणा असे सुचवेन.
मायबोलीवर भरपूर साधकबाधक चर्चा घडतात. एकदा का ब्लॉगवर मालिका पूर्ण केलीत की मग तुम्ही त्या चर्चेत सहभागी होऊ शकता! आत्ता तुमचे प्रतिसाद वाचून वाटतं की इथे लिहीण्यात वेळ घालवण्यापेक्षा यांनी आपल्या परिक्रमेचा पुढचा भाग लिहिला तर छान होईल!

इथे लिहीण्यात वेळ घालवण्यापेक्षा यांनी आपल्या परिक्रमेचा पुढचा भाग लिहिला तर छान होईल >>>+111
ब्लॉगवरच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे

>>आधी तुमच्या ब्लॉगवरची मालिका पूर्ण करा आणि मग सलग ते भाग इथे मायबोलीवर आणा असे सुचवेन. > > >

इथे जाता येता सहज उत्तर देता येते तसेच जाता येता सहज लिखाण परिक्रमेबद्दल तरी करता येत नाही . त्यासाठी सलग आणि निवांत वेळ मिळाला तरच ते शक्य होते . तसा वेळ मिळाला की नक्की पुढचे भाग लिहून काढणार आहे .
बाकी आपल्या तळमळी बद्दल आभार !

तसा वेळ मिळाला की नक्की पुढचे भाग लिहून काढणार आहे .>>>
तुम्ही सगळा वेळ प्रतिसाद देण्यात घालवत आहात. लिखाण प्रवासवर्णन/अनुभव सदरात कमी आणि मी मी मी सदरात जास्त जात आहे. असो, ब्लॉगची लिंक दिली आहेच ते उत्तम केले.

एक शंका:
इतके चांगले फोटोज कोणी काढले?बरोबरच्या कोणी चांगल्या परिचिताने बरोबर मोबाईल नेला होता का?की पूर्वीच्या काळी लोकांचे हिल स्टेशन वर फोटोग्राफर चांगले फोटो काढून पैसे घेऊन मग पोस्टाने घरी पाठवायचे, तसं या परिक्रमा मध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर्स असतात आणि मग घरी गेल्यावर आपण पैसे दिले की ते फोटो व्हॉट्सअप करतात?या प्रश्नांत कोणताही कुचकटपणा नाही.खरोखर चांगले फोटो आलेत म्हणून विचारतेय.

तू_अनु, त्यानी ब्लॉगवरच्या कुठल्यातरी भागात लिहिलंय की त्यांच्या कडे मोबाईल नव्हता पण ते दुसर्‍या कोणाला त्यांच्या मित्राच्या नंबरवर फोटो पाठवायला सांगायचे.

> > >इतके चांगले फोटोज कोणी काढले? > > >
परिक्रमेमध्ये नर्मदे खेरीज सोबत कोणीही नव्हते . परंतु काठाने चालताना तुम्हाला केवट /नावाडी , कोळी / मच्छिमार ,शेतकरी ,रिकामटेकडे लोक , तरुण , ग्रामस्थ खूप भेटतात . आजकाल सर्वांच्या खिशामध्ये स्मार्टफोन असतो . लोक कधी कधी आपण होऊन विचारायचे "बाबाजी एक फोटो लेते है ।" फोटो काढून झाला की म्हणायचे आपका मोबाईल नंबर बताओ भेज देते है । परंतु माझ्याकडे फोन नाही म्हटल्यावर त्यांना आश्चर्य वाटायचे . कारण आजकाल अगदी साधू सुद्धा फोन घेऊन फिरतात . मी फोन बंद करून ठेवला होता येण्यापूर्वी . माझ्या एका मित्राचा क्रमांक मला पाठ होता तो मी सांगायचो . त्यावर फोटो पाठवला जायचा . त्यातले बरेचसे फोटो तो पाहून डिलीट करायचा . फारसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्याचा असा समज होता की हे फोटो ऑटो सेव्ह होत आहेत . परंतु त्याला आवडलेले काही फोटो तो अन्य मित्रांना फॉरवर्ड करत असे . त्यातल्या एकाने संगतवार तारीख वगैरे टाकून फोटो सेव करून ठेवले . तुम्ही नीट पाहिलं तर प्रत्येक फोटो वेगळ्या कॅमेराने काढलेला आहे त्यामुळे रिझोल्युशन रंग क्वालिटी यात फरक आहे . काही ठिकाणी घाटावर तयार फोटो काढून देणारे फोटोग्राफर भेटायचे . ते देखील परिक्रमा वाश्यांचे मोफत फोटो काढून देतात . तसेही काही फोटो आहेत . मी घरातल्या कुणाचा क्रमांक फोटो काढणाऱ्या लोकांना देत नसे . कारण काळजीपोटी घरातले लोक त्यांना फोन करू शकतात अशी शक्यता होती . ज्या मित्राचा क्रमांक देत असे तो घरी कळवायचा माझी खुशाली . तो कधीच फोन करायचा नाही .

> > >तुम्ही सगळा वेळ प्रतिसाद देण्यात घालवत आहात. लिखाण प्रवासवर्णन/अनुभव सदरात कमी आणि मी मी मी सदरात जास्त जात आहे. असो, ब्लॉगची लिंक दिली आहेच ते उत्तम केले. > > > प्रतिसाद देण्यामध्ये वेळ वाया जात आहे असे मला वाटत नाही . तुम्ही लोक मनापासून शंका विचारत आहात त्याला उत्तर देणे माझे कर्तव्य समजतो .
लिखाणामध्ये प्रवास वर्णन आहे .अनुभव देखील आहेत . लिखाणाच्या पहिल्याच वाक्यात "मी " चा पंचनामा केलेला आहे . तरीदेखील तुम्हाला मी मी मी कुठे आढळत असेल तर संपूर्ण लिखाणात कृपया माझे नाव शोधून दाखवावे ! नर्मदे हर

नर्मदा काठ इतका सुंदर आहे की सोबत कॅमेरा अथवा स्मार्टफोन नेला असता तर दिवसरात्र फोटोच काढत बसलो असतो . परिक्रमा अर्धवटच राहिली असती ... फोन न नेण्याचा निर्णय योग्य ठरला

नर्मदा परिक्रमेविषयी खूप कुतूहल आहे. आपण छान सुरुवात केली आहे. वाचत आहे.

या परिक्रमेच्या भौगोलिक अंगविषयी पण लिहाल का कृपया. (कदाचित पुढील भागात येणार असेल) . पण ज्यांना विशेष माहिती नाही त्यांच्यासाठी ही परिक्रमा कुठून ( जिल्हा, तालुका, गाव ) सुरू होते आणि कुठे संपते, साधारण अंतर आणि मार्ग कसा आहे? परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणेसारखे जिथून सुरवात केली तिथे पुन्हा यावे लागते का ? परिक्रमेचा एकाच ठराविक मार्ग आहे का ? ह्याविषयी पण सांगा.

परिक्रमेदरम्यान तुम्ही कुटुंबियांच्या थेट संपर्कात नव्हता का ? एखाद्या तातडीच्या निरोपासाठी फोन करण्यासाठी परिक्रमा मार्गावर काय सुविधा आहेत?

तुम्ही अभियंता आहात असे लिहिले आहे, मग परिक्रमेच्या कालावधीत तुमचे व्यावसायिक काम बंद ठेवावे लागले असेल..याचा तणाव जाणवला का ? ( एक सामान्य व्यक्ती म्हणून हे प्रश्न विचारत आहे. नर्मदा परिक्रमेविषयी आपल्या श्रद्धेचा पूर्णपणे आदर व कौतुक वाटते. )

नास्तिक म्हणजे फार मोठा वैज्ञानिक असा एक विचार आपल्या समाज मनावर ठसवला गेलेला आहे . >>>
हे बरोबर नाही. सामान्य लोकांना अनुभव येतात. त्यानुसार लोक नास्तिक वा अश्रद्ध होतात.

@नर्मदे हर

आस्तिक कि नास्तिक, योग्य कि अयोग्य याबद्दलची मतं मांडण्यासाठी स्वतंत्र धागा काढू शकता. इथे तुमची परिक्रमा हा युएसपी आहे. त्याभोवतीच चर्चा राहू शकते. मायबोलीवर या विषयावर अनेक वेळा चर्चा झडलेल्या आहेत. पुन्हा कुणाला उरक असेलच तर ते या यज्ञातही उडी घेतील.

पण जिथे काही लोक आस्तिक नास्तिक कडे लक्ष न देता निव्वळ परिक्रमा या त्यांच्या अनुभवावरच लक्ष द्या असे म्हणत आहात ते लेखक स्वतःच या वादात रममाण होत असल्याने उताणे पडत आहेत. इथे चांगल्या विषयावरच्या लेखांना डोक्यावर घेतले जाते. पण तोच लेखक कमेण्टबॉक्स मधे हिरीरीने उतरला कि,

अतिपरिचयादवज्ञा भवति विशिष्टेऽपि वस्तुनि प्रायः।
लोक: प्रयागवासी नित्यं कूपे स्नानं समाचरति॥

अशी गत होऊन जाते. यापुढे तुमची मर्जी !

सगळा वेळ प्रतिसाद देण्यात घालवत आहात >>>>
काही अंशी बरोबर असेलही पण लेखकाच्या काही उत्तरांमुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. नाहीतर ब्लॉग मधील सुरुवातीचे १-२ भाग वाचून विशेष न पटल्याने सोडून देणार होते...

ब्लॉगवरचे 34 लेख वाचलेत आधीच.
सुरवातीच्या 2 लेखात background स्टोरी पसरट वाटलेली.
कोणत्या कोणत्या गुरू बद्दल लिहिलेलं तेव्हा व्यक्तिपूजा होतेय का अशी पुसटशी शंका आलीच होती.
थोडा मी मी जास्त जाणवलेलं. सुरवातीच्या 2 लेखात.
पण पुढे लेख वाचत गेलो तसे त्या त्या गुरूंच्या लिंक्स क्लिक झाल्या. नंतर मी मी हे अजिबात दिसले नाही.
पुढे वाचत गेलो तर अजून जास्त मजा येईल. त्या मागचा भाव देखील लक्षात येईल.
एक दिवसाआड एक असे भाग माबोकर देखील यायला हवेत असे वाटतेय.
प्रतिसादातून चर्चा होणे चांगलेच आहे.
आपापले व्युपॉइंट , perspective कळणे महत्वाचे.
शंका समाधान करण्यास लेखक तयार आहेत हे ही चांगलेच.
वाद विवाद होउ नयेत ह्या चांगल्या लेखमालेवर असे मनापासून वाटतेय.

Pages