नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< फ्रिक्वेन्सी आत्मसात करणारा एकमेव अवयव म्हणजे कान होय . म्हणून आपले पूर्वज उघड्यावरती झोपताना कान झाकायला सांगायचे किंवा प्रवास करताना कान झाकून घ्यायचे. कर्ण पिशाच्च वगैरे शब्द त्यातूनच आले असावेत. >>

वाह, ही माहिती तर खरंच रोचक आणि अतिशय उपयुक्त आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

शास्त्रीय माहितीला pseudoscience म्हणून हेटाळणी केल्याबद्दल जिज्ञासा आणि वावे यांचा निषेध करावा काय? असा प्रश्न पडला मला.

छान लिहित आहात.
इथल्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देत राहिलात तर मूळ लिखाण बाजूलाच पडेल. यापूर्वी सुद्धा मायबोलीवर असे खूप वेळेस घडले आहे. काही प्रतिसाद ओलांडून पुढे गेलात तर लेखमाला नक्कीच पूर्ण होईल.

मी सुरुवातीचे दोन भाग वाचले. पण त्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या बाबा/महाराजांचा उल्लेख आहे.

ती सगळी वर्णन/ पर्यायाने त्यांची जीवनशैली वाचून, तसेच (माणसातला देव बघणे ही एक गोष्ट आणि) माणसाला देवत्व देणे, व्यक्ती पूजा.. बऱ्याच गोष्टी खटकणाऱ्या वाटल्या... मतमतांतरे असूच शकतात.

कदाचित तुम्हाला परिक्रमा का केली हे सविस्तर सांगायचे असल्यामुळे हे दोन भाग तुम्ही त्यावर खर्ची केले असावेत.

> > >कुंटेनी परिक्रमा केली तेव्हा एका जंगलातून जाताना दरोडेखोर समोर आल्याचा उल्लेख आहे. त्या जंगलातून तुम्ही गेला होता काय? तुम्हाला कोणी दरोडेखोर नाही मिळाले का, की आता ते सुधरलेत? > > >

पूर्वी शूल पाणीच्या झाडीत आदिवासी लोक परिक्रमा वासींना लुटत असत . त्यांना तसा आदेश नर्मदेने दिला आहे असे ते मानत . त्यांना न सांगता तुमच्या जवळ काय आहे ते समजत असे . असे अनुभवी सांगतात . आता मात्र हेच लोक परिक्रमा वाशांची सेवा करतात . इथे येऊन एका साधूने या लोकांचे प्रबोधन केले . त्यांची समाधी देखील याच जंगलात आहे . मी लेखामध्ये टाकलेल्या एका चित्रात चार आदिवासींसोबत उभा आहे , हे तेच लोक . फार चांगले लोक आहेत . निसर्गाशी एकरूप आयुष्य जगतात .

> > >नर्मदे हर, तुम्ही जे स्पष्टीकरण लिहिले आहे ते वैज्ञानिक/शास्त्रीय भाषेत लिहीलेले एक कल्पनारंजन अथवा गृहितक आहे.
त्यापेक्षा "मला माहीत नाही" हे उत्तम वैज्ञानिक/शास्त्रीय उत्तर आहे. सर्व काही विज्ञानाच्या परिघात बसवले नाही तरी चालेल! Please do not venture into pseudoscience. > > >
I am an engineer first. I have done diploma and Engineering in electronics and telecommunication. I have guided few PHD students in the field of Antennas and transmission.या विषयावरती बोलण्याचा अनुभव सिद्ध अधिकार त्यामुळे मला प्राप्त झालेला आहे इतके आपण ध्यानात घ्यावे . सोप्या भाषेत कळावे म्हणून ते वर्णन साध्या शब्दात लिहिले आहे . तरी देखील तीन वेळा वाचून कळत नाही अशी प्रतिक्रिया आलीच. याहून अधिक टेक्निकल भाषेत लिहिले तर ते अधिक सायंटिफिक वाटेल तुम्हाला . जो आपला प्रांत नाही त्या विषयात भाष्य करायचं नाही हा नियम मी स्वतःला लागू करून घेतलेला आहे . त्यानुसारच लिहीतो आहे . काळजी नसावी . लेखमालेला वेगळे वळण लागणार नाही हे लिहून देतो . या विषयाचा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन किस पडण्याची तयारी आणि विद्वत्ता माझ्याकडे आहे . (आपल्याकडे पदवीला विद्वत्ता मानले जाते म्हणून तो शब्द वापरला ) बाकी आपल्या प्रतिक्रिया थ्रेड जागृत ठेवत आहेत त्याबद्दल धन्यवाद .

> > > सुरुवातीचे दोन भाग वाचले. पण त्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या बाबा/महाराजांचा उल्लेख आहे.

ती सगळी वर्णन/ पर्यायाने त्यांची जीवनशैली वाचून, तसेच (माणसातला देव बघणे ही एक गोष्ट आणि) माणसाला देवत्व देणे, व्यक्ती पूजा.. बऱ्याच गोष्टी खटकणाऱ्या वाटल्या... मतमतांतरे असूच शकतात. > > >

बुवा बाबा वगैरे म्हणण्यापेक्षा ते दोन-तीन असे जीव आहेत की ज्यांच्यामुळे नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा मला मिळाली म्हणून त्यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे . उदाहरणार्थ माझ्या आईने मला जन्म दिला म्हणून आज मी इथे आहे . मग ती कितीही कुरूप आणि कितीही वाईट स्त्री असली तरी तिचे मातृत्व मी नाकारू शकत नाही . तसेच हे लोक कसे का असेनात त्यांच्यामुळे मी परिक्रमा केले हे खरे आहे . त्यामुळे त्यांचा उल्लेख केल्या खेरीज मी पुढे जाऊ शकत नाही . तो उल्लेख मी मायबोली वर केलेला नसून माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर केलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी . प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल आभार .

>>>>>> या विषयाचा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन किस पडण्याची तयारी आणि विद्वत्ता माझ्याकडे आहे .
विज्ञानाला अजुन न कळलेल्या गोष्टींची किंवा स्युडोसायन्सची टवाळी इथे होणार. काही ठराविक आय डीज इथे येउन परत परत विज्ञान-विज्ञान करत बसणार. तेव्हा लेखाचा मुख्य उद्देश मागे पडेल. त्यापेक्षा (किस काढण्यापेक्षा) दुर्लक्ष करावे हे उत्तम.
सगळ्यांना सगळं पटलच पाहीजे असे नाही.

नमस्कार. नर्मदे हर!

तुमचे ब्लॉगवरचे सर्व लेख वाचले! त्यासंदर्भात आपल्याशी बोलावसं वाटलं. आपला मेल एड्रेस मिळेल का? धन्यवाद.

- निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com

> >काही ठराविक आय डीज इथे येउन परत परत विज्ञान-विज्ञान करत बसणार. तेव्हा लेखाचा मुख्य उद्देश मागे पडेल. त्यापेक्षा (किस काढण्यापेक्षा) दुर्लक्ष करावे हे उत्तम. > > मान्य . ठीक आहे . या प्रतिक्रिया वाचून इतरांची दिशाभूल होऊ नये इतकाच हेतू होता म्हणून सविस्तर उत्तरलो . आपला सल्ला योग्य आहे . धन्यवाद .

पण कुठलीही वस्तू पाहतो तेव्हा त्या वस्तूवरून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि शंक्वाकार दंडाकार पेशींवर (कोनीकल आणि सिलेंट्रीकल ) पडून एक छोटासा विद्युत प्रवाह निर्माण करतात . हा प्रवाह मेंदूमध्ये जातो आणि आपल्या मेंदूमध्ये एक प्रतिमा निर्माण करतो . ही फ्रिक्वेन्सी प्रत्येक पदार्थाची वस्तूची प्रसंगाची ठरलेली असते .त्यामुळे मी तुम्हाला अमुक एक प्रसंग आठवा किंवा अमुक एक चेहरा आठवा असे <<सांगितले तर तो पुन्हा आठवता येतो कारण मेंदू ती फ्रिक्वेन्सी री जनरेट करतो . आता एखाद्या माणसाने मला जिलेबी पोहे देण्याचे ठरविले आहे , तर त्याच्या डोक्यात जिलेबी आणि पोहे ही फ्रिक्वेन्सी निर्माण झालेली असते व ती बाहेर ट्रान्समिट अर्थात प्रक्षेपित होत असते . ज्याप्रमाणे स्थिर पाण्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे निर्विचार मनामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सी पटकन स्वीकारल्या जातात . परिक्रमा करताना मन निर्विचार असल्यामुळे अशा फ्रिक्वेन्सी ते पटकन पकडते . एरव्ही आपल्या डोक्यामध्ये हजार विचार असल्यामुळे अशा फ्रिक्वेन्सी आजूबाजूला असून देखील आपण त्या पकडू शकत नाही . परिक्रमेमध्ये ते शक्य होते इतकेच . मग मला उगाचच वाटू लागते की मला जिलेबी पोहे आठवत आहेत . परंतु प्रत्यक्षामध्ये ते माझ्यासमोर किंवा जवळपास विचार रुपाने आलेले असतात म्हणून मला आठवत असतात<<

एक्झॅक्टली... हेच विचार घोळत होते गेले कित्येक दिवस. पण शब्दात मांडता येत नव्ह्ते. फार छान विश्लेषण केलेत. धन्यवाद!

कधीतरी मनात विचार येतो... आणि ते खरे होते. पण आप्ल्या मनात विचार येण्याआधी समोरुन बाण सुटलेला असतो. आणी ती फ्रिक्वेन्सी आपल्याशी मॅच होउनच मनात विचार आलेला असतो.
ये हृदयीचे ते हृदयी कनेक्शन कसे होते ते आता समजले. मन पारदर्शी झाले पाहिजे मात्र.
आणी नर्मदेकाठी गेल्या अनेक हजार वर्षांपासुन साधना करत असलेल्या ऋषीमुनिंन्च्या शुभ स्पंदनांनी हे शक्य होते असे ऐकले होते, चितळे ताईंन्च्या व्हिडीओमधे. गहन आहे सगळे.

नर्मदे हर, तुम्ही लिहीलेले स्पष्टीकरण छद्मविज्ञानात मोडते. एखाद्या गोष्टीला वैज्ञानिक स्पष्टीकरण नसेल तर ती गोष्ट असत्य ठरत नाही. ती अजून विज्ञानाने सिद्ध झालेली नाही इतकेच. हे असे का घडते त्या विषयी तुम्ही केवळ तुमचा तर्क मांडला आहे.
ही तुमच्या अनुभवांची लेखमाला आहे. त्यातील अनुभव शास्त्रीय/वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेच पाहिजेत असा अट्टहास कशासाठी?
वाद घालण्यात मला रस नाही. लेखमालिकेसाठी शुभेच्छा!

@नर्मदे हर,
फ्रिक्वेन्सीबद्दल तुम्ही छान माहिती सांगितली जी मला माहीतच न्हवती. मला एक प्रश्न पडला आहे.
तुम्ही ब्लॉग वर लिहिले आहे, की १६५ दिवसात १५ नवे जोड पादत्राणे वापरले. माझा प्रश्न असा आहे की अश्या फ्रिक्वेन्सी फक्त जेवणाच्या बाबतीतच उत्पन्न होतात की नर्मदा मैय्या इतर आवश्यकतेनुसार पण फ्रिक्वेन्सी निर्माण करते म्हणजे आता चपलांची गरज असेल तर अश्या फ्रिक्वेन्सी मनावर पडून त्या इच्छा नर्मदा मैयाकडून लगेच पूर्ण होतात?

<< तुम्ही लिहीलेले स्पष्टीकरण छद्मविज्ञानात मोडते. >>
ज्योतिष्य, पत्रिका असल्या भंपकपणाचे आणि छद्मविज्ञानाचे असंख्य धागे इथे मायबोलीवर आवडीने चघळले जातात, त्या संदर्भात कधी बोललात का इथे? मग फक्त याच धाग्यावर स्पष्टीकरण कशाला हवे? /s तुम्ही पण थोडे नवीन ज्ञान मिळवा. Light 1

>>>>>>एखाद्या स्त्रीकडे पाहून मला आई असा अनुभव येत असतो त्याच स्त्रीकडे पाहून माझ्या वडिलांना पत्नीचा अनुभव येत असतो . जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ! नर्मदे हर !

पटले.

MIT विद्यापिठातील संशोधनाबद्दल थोडी गल्लत होतेय. अल्फा, बीटा, थीटा इ. सगळ्या लहरी ह्या एकाच मेंदुत निर्माण झालेल्या आहेत. मस्तिष्क पेशी (neurons) ह्या एकमेकींना स्पर्श करत नाहीत कधीच. दोन पेशींमध्ये सुक्ष्म अंतर असते. एका पेशीतुन स्त्रीला संदेश (neurotransmitter) हा दुसरी मध्ये सोडियम, पोटॅशियम आणि/किंवा कॅल्शियम धनभारित रेणु (ions) ह्यांचा दळणवळण नियंत्रित करतो. ज्याचा परिणाम म्हणून ती पेशी पुढील पेशीसाठी neurotransmitter सोडते आणि ही प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरू रहाते. थोडक्यात मेंदू पेशींमध्ये दळणवळण हे विजेच्या प्रवाहाप्रमाणे चालते. त्यामुळे विजेच्या प्रवाहाचे नियम तिथे लागु होतात. तुम्ही उद्ध्रृत केलेल्या MIT विद्यापिठातील संशोधनाचा मतितार्थ असा आहे की हिपोकॅंपस आणि प्रिफ्रंटल कॉर्टेक्स मधील पेशींमध्ये ही प्रक्रिया वेगवेगळ्या फ्रिक्वेंसिवर कार्यरत होते. ह्या साठी (बहुदा) तेथील पेशींची रचना (दोन पेशींमधील अंतर, त्याभोवती असणारे मआयलइन आवरण, इ.) असे अनेक घटक कारणीभूत असु शकतात.

एकाच मेंदुत वेगवेगळ्या भागातील पेशी वेगवेगळ्या फ्रिक्वेंसिवर कार्यरत आहेत ह्या वस्तुस्थिती वरुन एका व्यक्तीच्या मेंदुत निर्माण झालेले विचार (आणि त्या नुसार केली गेलेली कृती) हि दुसर्या व्यक्ती पर्यंत (दोन मेंदुतील फ्रिक्वेंसि मॅच झाल्याने) पोहोचते हे अनुमान/दावा सिद्ध होत नाही.

एका मेंदुतील तरंग दुसर्या मेंदुपर्यंत पोहोचणे (टेलिपथी) हे गृहितक अजुन निर्विवाद सिद्ध होऊ शकलेले नाही किमान अजुन माझ्या पर्यंत पोहोचले नाही. (पण हे जर सिद्ध होऊ शकले तर ती खुप मोठी बातमी असेल संशोधन क्षेत्रात त्यामुळे ती नक्कीच सगळ्यांना ताबडतोप कळेल.) त्याच्या पुढची पायरी म्हणजे टेलिपथीक दळणवळण मानवी मेंदूत होते हे सिद्ध होते. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे परिक्रमा करताना विचार आणि तत्सम बदलांमुळे परिक्रमा करणार्या व्यक्तिंना त्याचा अनुभव येतो हे संख्याशास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होणे. ह्यातले काहीही अजुन प्रत्यक्षात आलेले नसल्याने त्या स्पष्टीकरणावर जिज्ञासाने आणि इतर आयडींनी आक्षेप घेतला आहे.

> > >तुम्ही ब्लॉग वर लिहिले आहे, की १६५ दिवसात १५ नवे जोड पादत्राणे वापरले. माझा प्रश्न असा आहे की अश्या फ्रिक्वेन्सी फक्त जेवणाच्या बाबतीतच उत्पन्न होतात की नर्मदा मैय्या इतर आवश्यकतेनुसार पण फ्रिक्वेन्सी निर्माण करते म्हणजे आता चपलांची गरज असेल तर अश्या फ्रिक्वेन्सी मनावर पडून त्या इच्छा नर्मदा मैयाकडून लगेच पूर्ण होतात? >> >
अतिशय समर्पक प्रश्न . या 15 पैकी सुरुवातीची एक आणि मध्ये एखादी सोडली तर सर्व पादत्राणे मला आपोआप मिळत गेली . कुठेही काहीही विकत घ्यावे लागले नाही . दरवेळेस माझी पादत्राणे फाटली की दुसरा नवीन जोड घेऊन कोणीतरी तयार असायचे आणि माप देखील परफेक्ट ! हा अनुभव सर्वच बाबतीत आला . मला परिक्रमेसाठी झोळी मिळाली , काठी मिळाली ,आसन मिळाले ,वस्त्रे मिळाली , पादत्राणे मिळाली ,कमंडलू मिळाले , पूजा साहित्य मिळाले , अगदी नर्मदा मैयाचा शृंगार देखील मिळाला . सर्व काही जेव्हा हवे तेव्हा मिळत गेले .

> >त्याच्या पुढची पायरी म्हणजे परिक्रमा करताना विचार आणि तत्सम बदलांमुळे परिक्रमा करणार्या व्यक्तिंना त्याचा अनुभव येतो हे संख्याशास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होणे. ह्यातले काहीही अजुन प्रत्यक्षात आलेले नसल्याने > > मला आजवर भेटलेल्या शेकडो परिक्रमावस्यांपैकी कोणालाही असा अनुभव आला नाही असा मनुष्य भेटला नाही . तुम्ही अन्य कुठल्याही परिक्रमावासीला विचारून पहा . त्यांना जे हवे ते नर्मदे काठी मिळतेच मिळते हा सर्वांना येणारा सामायिक अनुभव आहे . त्यामुळे हे प्रत्यक्षात आले नाही असे म्हणणे फारच धाडसाचे विधान आहे ! तुम्ही ज्या संख्याशास्त्रीय कसोटीची इच्छा बाळगत आहात त्याची तिकडे कुणाला गरज नाही इतकेच .

पर्णीका होय मलाही कळते ते. मी फक्त तरंग आणि मेंदू ही फार-फेच्ड संकल्पना नाही हे बिंबवते आहे.
व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आणि रिसर्च शिवाय कोणताही दावा करणे हा अंधारात मारलेला बाण असतो हे मीही जाणते. विज्ञान हे सातत्याने पडताळून व डॉक्युमेन्ट करुन पोचलेल्या निष्कर्षांवरती आधारीत विधान करते.
तेव्हा अशा डॉक्युमेंटेशनविरहित दाव्यांना अर्थ नसतो हे माझेही मत आहे.
उदा - पुष्पक विमान आदि.
कालातीत, स्थलातीत, आणि परत परत केलेल्या प्रयोगांचे कन्सिस्टंट निष्कर्ष - हे विज्ञानाचे पायाभूत घटक आहेत.

>>>>मला आजवर भेटलेल्या शेकडो परिक्रमावस्यांपैकी कोणालाही असा अनुभव आला नाही असा मनुष्य भेटला नाही .
पण हा विदासंच फारच फायनाईट (सान्त) नाही का?
या आधारावरती निष्कर्ष काढता येणार नाही.
>>>>>>तुम्ही ज्या संख्याशास्त्रीय कसोटीची इच्छा बाळगत आहात त्याची तिकडे कुणाला गरज नाही इतकेच .
हे पटले.

तुम्ही च तुमच्या लिखाणात म्हंटले आहे की अनुभव सापेक्ष असतो. त्यामुळे नर्मदा परिक्रमा करणार्या व्यक्तिंना आलेल्या अनुभवांवर आधारित निष्कर्ष सर्वमान्य होण्यासाठी वरील संशोधन शिस्तीची आणि संख्याशास्त्रीय पुराव्यांची गरज आहे.

तुमचा आणि इतर अनेक परिक्रमा करणार्या व्यक्तिंचा अनुभव नाकारत नाहीये मी किंवा इतर कुणी तर त्यातुन तुम्ही काढलेले निष्कर्ष हे शास्त्राधारीत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

पुढील लेखनासाठी तुम्हाला शुभेच्छा. माझ्या साठी इथे लेखन सीमा.

<<<<मी फक्त तरंग आणि मेंदू ही फार-फेच्ड संकल्पना नाही हे बिंबवते आहे.>>>>

तरंग एकाच मेंदुत निर्माण होणे ही वस्तुस्थिती आहे, तरंग एकाच मेंदुपर्यंत दुसर्या पर्यंत जाणे हे फारफेच्ड आहे.

>>>>तरंग एकाच मेंदुत निर्माण होणे ही वस्तुस्थिती आहे, तरंग एकाच मेंदुपर्यंत दुसर्या पर्यंत जाणे हे फारफेच्ड आहे.
मान्य आहे. फारफेच्ड (in lieu of अजुन विज्ञानाने सिद्ध केलेले नाही.) तेव्हा होइल की नाही माहीत नाही पण अजुन तरी पुरावा नाही.

बागेश्वर सरकारना मी फ्रॉड समजत होतो पण आता माझे डोळे उगडले. तसेच पंडोकर बाबाच्या इथे दरबारात जायच्या आधी नदीत स्नान करावे लागते. ती नदी MRI स्कॅन प्रमाणे काम करते आणि भक्तांच्या समस्या जाणून बाबाला कळवते. त्याच्या मागचे रहस्य आता उमगले.
धन्यवाद!

Pages