काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
वरती काही जण एकाखाली एक ओळी
वरती काही जण एकाखाली एक ओळी लिहिण्याबद्दल
उगाच तक्रार करत आहेत.
प्रत्येक ओळीत आठपेक्षा जास्त शब्द नकोत.
चितळे मास्तरांची शिकवण आहे.
Wrap text वाल्यांवर हे संस्कार झालेले नाहीत.
हे कोण मास्तर? तेच का ज्यांची
हे कोण मास्तर? तेच का ज्यांची बाकरवडी फेमस आहे?
महाराजांनी ज्याप्रमाणे
महाराजांनी ज्याप्रमाणे लांजाच्या पाटलाला शिक्षा दिली होती तशीच शिक्षा आंजाच्या तोंडपाटलांना दिली पाहिजे.
(No subject)
आताच मिळाले हे. मार्केट मे
आताच मिळाले हे. मार्केट मे ताजा है.
... म्हणून पतंजली चे फटाके
... म्हणून पतंजली चे फटाके उडवावेत. त्याच्या वासाने डास वगैरे मरतात आणि दमा कमी होतो.
महाराजांनी ज्याप्रमाणे
महाराजांनी ज्याप्रमाणे लांजाच्या पाटलाला शिक्षा दिली होती तशीच शिक्षा आंजाच्या तोंडपाटलांना दिली पाहिजे. >>>>
अशक्य धमाल सुरुये इथे
वाऊ सरकारला पाकिस्तान - चायना
वाऊ सरकारला पाकिस्तान - चायना कटाची एव्हडी डिटेल माहिती आहे पण उपाय काय तर व्हॉट्स ॲप वर "घेऊ नका हो" असे सांगणे...
(No subject)
गंभीर ना सरकार आहे ना जनता.
गंभीर ना सरकार आहे ना जनता.
त्या मुळेच अजून पण सर्व त्रासदायक गोष्टी आणि प्रथा चालू आहेत.
माझा मुलगा मोठा आहे मी माध्यम
माझा मुलगा मोठा आहे मी माध्यम वयीन आहे.
दिवाळी मध्ये फटाके माझ्या घरात तरी वाजवणारे कोणी नाही.
आता मी फटाके कसे वाईट ह्या वर भाषण देवू शकतो.
पण उद्या ग्रँड child आले तर .
मला नाही वाटत आज चे माझे विचार मी कायम राखू शकेन.
मोठे नाही पण
टिकल्या किंवा लहान फटाके नक्कीच घरात आणले जातील.
कोण शेजारी तक्रार करायला आला तर माझ्या विचाराशी पूर्ण u turn घेबून मी फटाक्यांचे समर्थन करेन.
सर्वांन बाबत हेच होते.
म्हणून फटाके उत्पादन बंद होत नाही ना घेणारे कमी होत.
थोडी रिॲलिटी पण समजून घेतली पाहिजे.
मार्केट मध्ये ह्या गोष्टी उपलब्ध च नसतील तर लोक खरेदी करूच शकत नाहीत.
पण मार्केट मध्ये आवाजाचे फटाके मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
दारू खराब जाहिराती.
बाजारात मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध आहे .
तंबाखू खराब .
बाजारात मुबलक प्रमाणात तंबाखू आहे.
प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास हानिकारक.
बाजारात मुबलक प्रमाणात plastic पिशव्या उपलब्ध आहेत.
इथे असणारे सर्व आयडी plastic bag ज्या पर्यावरणास अत्यंत हानिकारक आहेत त्या बॅग रोज वापरतात
गंभीर ना सरकार आहे ना जनता. >
गंभीर ना सरकार आहे ना जनता. >>> आपल्याकडे गंभीर फक्त गौतम आहे सर तुम्ही त्याला सांगा तुमचं म्हणणं, कदाचित ऐकेल तो
इथे सगळे नुसते टवाळ भरलेत, नुसती चेष्टा करतात
टवाळ नाही.
टवाळ नाही.
सोयी नुसार मत व्यक्त करणारे म्हणा.
किंवा फक्त मत व्यक्त करणारे पण आचरण न करणारे.
व्यक्ती नी स्वतःचेच आचरण बदलेले तर बदल सहज होवून जातो.
पण जितके सदाचारी समाज माध्यमावर असतात त्यांनी आचरण पण बदलले असते तर. त्याचा परिणाम स्पष्ट जाणवला असता .
इतकी सदाचारी लोकांची संख्या आहे.
हा माझा पॉइंट आहे
सोशल मीडिया आभासी जग आहे हो,
सोशल मीडिया आभासी जग आहे हो, प्रत्यक्ष जगात सदाचारी म्हणून मिरवणारे सोशल मीडियावर विकृत वागतात
त्यामुळे सोशल मीडियावर कोण कसे आहे यावरून काय ठरत नसतंय
दोन सर जे म्हणतील ते
दोन सर जे म्हणतील ते ब्रह्मवाक्य.
सरांच्या सदाचरण वर्गात नाव नोंदवा.
इथले आयडी बरोबर उलटे आचरण करतात.
सरांच्या लॉजिक ने प्रत्यक्षात दारूचा प्रसार कोण करत असेल हे सांगायला नकोच.
बेस 1
बेस 2
(No subject)
थले आयडी बरोबर उलटे आचरण
थले आयडी बरोबर उलटे आचरण करतात.
सरांच्या लॉजिक ने प्रत्यक्षात दारूचा प्रसार कोण
असे मी कुठेच लीहले नाही.
समाज माध्यम असे लीहले आहे.
मायबोली ची कक्षा मर्यादित आहे .
इथे सर्व प्रामाणिक लोक आहेत,समजदार आहेत,.
उगाच काही ही संबंध जोडू नका
सरांचा यू टर्नhttps://youtu
सरांचा यू टर्न
https://youtu.be/PSOXXzugnJ0?si=1IQmwpKq8GYksLjx
४:३० पासून पहा.
तोहफु कुबूल करो
नाही च्रप्स, ते पुलंचे चितळे
नाही च्रप्स, ते पुलंचे चितळे मास्तर.
इथे सर्व प्रामाणिक लोक आहेत
इथे सर्व प्रामाणिक लोक आहेत,समजदार आहेत,.>>> +++११११ प्रामाणिक समजूतदार आणि साधे भोळे. मी त्यांना लाडाने माहेरच्या साडीतली अलका कुबल बोलतो.
गंभीर ना सरकार आहे ना जनता. >
गंभीर ना सरकार आहे ना जनता. >>> आपल्याकडे गंभीर फक्त गौतम आहे Happy सर तुम्ही त्याला सांगा तुमचं म्हणणं, कदाचित ऐकेल तो
इथे सगळे नुसते टवाळ भरलेत, नुसती चेष्टा करतात
Submitted by आशुचँप on 4 October, 2023 - 12:44
अहो पण गौतम तर बुद्ध आहेत ते गंभीर पण आहेत पण ते स्थितप्रज्ञ आहेत , ते सरांना सरळ टवाळांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला / ज्ञान देतील ना
नाही हो, हे एकविसाव्या
नाही हो, हे एकविसाव्या शतकातले गौतम आहेत. ते मिडल फिंगर दाखवतात.
हेमन्त३३३ हे कुणाहाही
हेमन्त३३३ हे कुणाहाही अद्वातद्वा बोलत नाहीत. प्रत्येक वेळी लॉजीकल मुद्दा मांडतात. क्वचितच रिग्रेसिव्ह विचारसरणी असते पण दोष कुणात नसतो. त्यामुळे इथे लोकांना त्यांचे लेग पुलिंग करायला आवडते. मी त्यांची पंखा आहे.
हेमन्त३३३ हे कुणाहाही
हेमन्त३३३ हे कुणाहाही अद्वातद्वा बोलत नाहीत. प्रत्येक वेळी लॉजीकल मुद्दा मांडतात. क्वचितच रिग्रेसिव्ह विचारसरणी असते पण दोष कुणात नसतो. त्यामुळे इथे लोकांना त्यांचे लेग पुलिंग करायला आवडते. मी त्यांची पंखा आहे. Happy
नवीन Submitted by सामो on 4 October, 2023 - 17:38
>>>>
+७८६
मग ही लोक ज्यांना तळमळ आहे ती
मग ही लोक ज्यांना तळमळ आहे ती लोक .
गणेश ustav ची जी सार्वजनिक मंडळ असतात त्या कमिटी मध्ये का जात नाहीत.?
कमिटी च कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असतात.
>>>>>>>>
आमच्या भागातील बऱ्याच मंडळाचा गणेशोत्सव शांततेत पार पडला .
नंतर एका मंडळाने नवरात्रची रूपरेषा ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत तरुण मुलांच्या हाणामारी पर्यंत विषय गेला .
शेवटी त्यांच्या आई बापाने मधस्थी केल्या नंतर वातावरण निवळले .
खरं म्हणजे धार्मिक कार्यात मानपानावरून भांडणे झाली नाही पाहिजे ....
सामो, तुम्हाला ते प्रतिसाद
सामो, तुम्हाला ते प्रतिसाद लॉजिकल वाटले ?
बाकिच्यांचं आश्चर्य नाही वाटत.
सामो ??? सिरियसली???
सामो ??? सिरियसली???
ते अद्वातद्वा बोलत नाहीत इतकंच मान्य करू शकतो
लॉजिक रानोमाळ पळून गेलेलं असतं कित्येकदा त्यांचं
दुसरे सर लगेच आपला 786 वाला पंखा घेऊन हजर झालेच तेवढ्यात
कारण हे सर चिडून बोलत नाहीत अशी त्यांनी स्वतःचीच इमेज बनवून ठेवली आहे आणि त्याच्या जोरावर त्यांना बराच पाठिंबा पण मिळतो, त्यांचा खरा चेहरा ते अत्यंत हुशारीने लपवून ठेवतात
पण काय करणार माबोवरच इतकी भाबडी जनता आहे की त्यांचं चालून जातं
एखादा अद्वातद्वा बोलत नाही
एखादा अद्वातद्वा बोलत नाही म्हणजे तो रॅशनल आहे असे तुमचे म्हणणे असेल असे वाटत नाही.
अनेकदा एखाद्याची कल्पनाशक्ती एखाद्या गोठणबिंदूला थिजलेली असेल, त्या पलिकडच्या विश्वावर त्याच्याशी चर्चा करण्यात अर्थ नसतो. त्यातून जर एखाद्याचा हेका असेल कि पुस्तकात काय वाचायचे ? अपडेटस काय ठेवायचे ? मला दिसते तेव्हढेच जग... तर आपली उर्जा वाया घालवू नये.
अशा वेळी मजा घ्यावी.
>>>>>सामो, तुम्हाला ते
>>>>>सामो, तुम्हाला ते प्रतिसाद लॉजिकल वाटले ?
बाकिच्यांचं आश्चर्य नाही वाटत.
आचार्य ते प्रतिसाद प्रतिगामी होते. पण बरेचदा ते नवीन नवीन लॉजिकल मुद्दे मांडतात हो. माझं तरी असं नीरिक्षण आहे.
>>>>>सामो ??? सिरियसली???
होय! अहो खरच.
आचार्य ते प्रतिसाद प्रतिगामी
आचार्य ते प्रतिसाद प्रतिगामी होते. >> पुरोगामी / प्रतिगामी असं काहीच नसतं. तथ्य / तर्क इतकंच.
Pages