सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांना वाटते कायद्याने हे सर्व बंद होईल .
ज्यांना वाटत सरकार हे बंद करेल त्यांच्या साठी. >>> कुणाला उद्देशून आहे हे ? कुणी काय लिहीलेय म्हणून हे सांगत आहात ? विपर्यास करून भरकटवू नका धागा.

त्यांच्या सगळ्या राजकीय खेळींना हिरीरीने पाठींबा दिला पाहिजे किंवा त्यावर चर्चा झाल्यास समर्थन केले पाहिजे याची अजिबात गरज नाही >> बरोबर.
उलट मेजॉरिटी क्रिटिसाईझ झालीच पाहिजे. आज मायनॉरिटीत असलेले उद्या बहुमताने जिंकून सरकारात आले, तर तेही क्रिटिसाईझ झाले पाहिजेत. कारण राक्षसी बहुमत कशाकशाला जन्म देईल, ते आपल्याला माहितीच आहे, रोज पाहतो आहोत. त्यांना प्रश्न विचारता येणं हा मोठा रिसोर्स आहे, ही मोठी पॉवर आहे.

राक्षसी बहुमताने जिंकून आलेल्यांना खरंतर राजकीय इच्छाशक्ती वापरून असे कायदे करणे काहीच अवघड नाही. पण ते लोकानुनयातच अख्खी टर्म घालवतात. बघावं तेव्हा सरकार इलेक्शन मोडमध्ये असतं. बरं लोकानुनय कुणाचा? तर कायदे मोडणार्‍यांचा. वरती आशूचँप यांनी तो सव्वा कोटी दंड स्थगित झाल्याची बातमी सांगितलीच आहे. तो पुढे रद्दही होईल, आणि कुणाला कळणारही नाही. रोज वर्तमानपत्रं बोंबलताहेत- सामान्य लोकांची या भयंकर ध्वनीप्रदुषणाबद्दल हजारो पत्रं रोज येत आहेत. त्यांचा लोकानुनय का नाही करायचा? नियम बनवून अंमलबजावणी का नाही करायची?

सामान्यांनी राजकारणात उतरून निवडुन येऊन मग तिथला चिखल साफ
>> एक्झॅक्टली.
मंडळात जाऊन बसून प्रबोधन कोण करणार? या नियम मोडणार्‍यांकडे भयानक रिसोर्सेस आहेत. राजकीय आशीर्वाद आणि त्यामुळे आलेली गुर्मी, आडदांडपणा, व्यसनं, अरेरावी, पैसे, कायदे-नियम बिनदिक्कत मोडण्याची बेमुर्वतखोरी आणि व्हॉट नॉट. या रोज हजारो पत्रं पाठवणार्‍या लोकांकडे यातलं काय आहे? त्यांनी हे करायचं, तर मग कुणाला मुळात निवडूनच कशाला द्यायचं?

लोकांनी सार्वजनिक उत्सवात हजेरी च न लावणे हा उपाय आहे लोकांकडे.

लोक च सहभागी झाले नाहीत तर मला नाही वाटत .
राजकारणी लोक ह्या उत्सव कडे लक्ष देतील.
सोपा उपाय आहे.

लालबाग च राजा विषयी अनेक गोष्टी मीडिया मध्ये येतात.
तरी लोक गर्दी करतात.
अंबानी तिथे जातात, स्टार जातात.

का जात असतील.
एकाला ग्राहक हवे असतात दुसऱ्या ल फॅन.
भक्ती म्हणून कोणी जात नसेल.
भक्ती म्हणून फक्त सामान्य जनता च जाते आणि त्या जनतेकडून च फायदा असतो म्हणून बाकी स्टार जातात.
लोक च अशा ठिकाणी गेली नाहीत तर आपोआप सर्व साखळी तुटू शकते

या तो घोडा बोलो या चतुर

मागच्या काही प्रतिसादात तुम्ही सहभागी होऊन बदल घडवा म्हणत होतात
आता म्हणताय जाऊच नका

किती येडी घालाल हो लोकांना, बिनकामी आपलं

ते दुसरे सर तुमच्या डबल ढोलकी ला जी जी रं जी जी म्हणत आहेतच

एक नाथ पै म्हणून होते
>>>

असेना
शिंदे कोण आहेत..
एक नाथ की एकनाथ?
मुख्यमंत्री आहेत तर नाव चुकीचे लिहू नका इतकीच अपेक्षा Happy

की शुद्धलेखनाच्या चुका फक्त हेमंत यांच्याच काढायच्या आहेत का? Happy

Ustav मुळे लोक एकत्र येतात,एकटे पण दूर होते.
समाजात भावनिक नात निर्माण होते.
भावनिक नातं च माणसाची जगण्याची प्राथमिक गरज आहे.
भावनिक शक्ती वर अनेक आजार पण दूर जातात.
>>>

लोकांनी सार्वजनिक उत्सवात हजेरी च न लावणे हा उपाय आहे लोकांकडे.
>>>

हे दोन्ही तुम्हीच लिहिलंय ना? की त्यालाही नाही म्हणाल. Uhoh

चांगल्या मार्गाने उत्सव साजरे होतात त्याचे फायदे मी सांगितलेलं योग्य च आहेत.
चुकीच्या मार्गाने उत्सव साजरे होत असतील तर .
त्या मध्ये सहभागी होवू नका हा मार्ग पण योग्य च आहे

सहभागी होवू नका >> असं करून तुम्ही म्हणताय ते सो-कॉल्ड प्रबोधन कसं करणार?

(आचार्य, आशूचँप इत्यादींइतकी पॉवर, शक्ती, पेशंस माझ्यात आहे की नाही ते चेक करून बघतो)

Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 14:56>>> हेमंत या प्रतिसादात तुम्ही अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या निरुपयोगत्वाचे सरसकटीकरण केले आहे....आज जे कायदे आहेत त्यात पळवाटा असतील, किंवा अगदी काही प्रकरणांमध्ये, त्यांना पुर्ण पणे धाब्यावर बसवून ते निरुपयोगी भासत असल्याचे जरी समोर आले असले तरी याच कायद्यांमुळे पुर्णपणे अन्याय होत असल्याची सार्वत्रिक भावना आजूनही आपल्या देशात फोफावली नाही आहे हे ही तितकेच खरे आहे....नाहीतर देश कधीच अराजकतेच्या गर्तेत लोटला गेला असता... त्यामुळे कठोर प्रतिबंधात्मक कायदे अस्तित्वात असणे गरजेचेच आहे, त्या कायद्यांमधे राजाश्रयामुळे सवलत देता येणार नाही हे अधोरेखित असणे ही गरजेचे आहे.....१००% अंमलबजावणी नाही होणार हे मान्य...पण हा धुडगुस घालणाऱ्या एका मोठ्या वर्गावर त्याचा वचक बसेल हे नक्की.

साजिरा बरोबर तर आहे ते
उत्सवाचे फायदे आपल्या जागी आहेतच. पण जर त्याला हिडीस स्वरूप येत असेल तर त्यात सहभागी न होता बहिष्कार घालनेच योग्य.

उदाहरणार्थ,
संध्याकाळी गार्डनला मोकळ्या हवेत फिरायला जायचे फायदे आहेत. पण तिथे जाऊन पोरगा जुगार खेळत असेल किंवा दारू पीत असेल तर निदान मोकळ्या हवेत जातोय म्हणून त्याला सोडावे की घरीच बसवावे

कठोर प्रतिबंधात्मक कायदे अस्तित्वात असणे गरजेचेच आहे
>> हेच. हेच लिहिणार होतो मागच्या पानावर. अंमलबजावणी होणं ही पुढची आणि तुलनात्मक रीत्या सोपी गोष्टी आहे. मुळात नियम कायदेच नसतील तर काय करणार?

ज्यांना कायद्यांबद्दल शंका आहे, त्यांनी संविधानाबद्दल, ते कसे तयार झाले, त्यातले कायदे कलमं आर्टिकल्स कुठून कसे आले, त्यासाठी विविध देशंच्या संविधानांचा अभ्यास कसा करण्यात आला, त्यात नंतर किती दुरुस्त्या आणि का झाल्या हे जरा गुगल करून वाचायला हरकत नाही. पॉडकास्ट आणि यूट्युब व्हिडिओ देखील आहेत. व्हिडिओजमध्ये एक विकास दिव्यकिर्ती म्हणून भारी माणूस आहे, त्याचे बघा..

सध्या तर संविधान बदलायच्याच फुसकुल्या सोडल्या जातात. ते एवढं सोपं नाही. खरं तर शक्यच नाही.

संध्याकाळी गार्डनला मोकळ्या हवेत फिरायला जायचे फायदे आहेत. पण तिथे जाऊन पोरगा जुगार खेळत असेल किंवा दारू पीत असेले तर निदान मोकळ्या हवेत जातोय म्हणून त्याला सोडावे की घरीच बसवावे>> उदाहरण चुकलयं, आपल्या चर्चेच्या सुसंगत हवं तर असं असायला हवं, बघा जमतय का...
संध्याकाळी गार्डनला मोकळ्या हवेत फिरायला जायचे फायदे आहेत. पण तिथे जाऊन पोरगा तिथे जुगार खेळत असेलेल्या किंवा दारू पीत बसलेल्या टग्यांना पाहून जर त्याच्यावर वाईट संस्कार होत असतील तर एकतर पर्कात दारु पिणाऱ्या/जुगार खेळणाऱ्या त्या लोकांचे प्रबोधन करावे अथवा निमुटपणे घरी बसावे....पार्कात जाऊन दारु पिणाऱ्यांच्या/ जुगार खेळणाऱ्यांच्या हिडीस वर्तनात आपण भाग घेउ नये किवा त्यावर काही कायदे असावेत असा आग्रह ही धरु नये...जरी पार्क फिरण्यासाठी चे ठिकाण असले तरी आपण त्याची वर्तमान स्थिती ध्यानात घेऊनच आपले वर्तन करावे.

Submitted by लुटुपुटुचा खेळीया on 6 October, 2023 - 16:13
>>>

हो हे जास्त सुसंगत आहे
तेच तर ते बोलत आहेत

तेच तर ते बोलत आहेत>>> आणि माझ्यामते हे कोणत्याही नागरिकाच्या नैसर्गिक न्याय्य हक्कावर गदा आणणारे आहे.... पार्क बनवणे आणि मेंटेन करणे हे सरकार करदात्यांच्या पैशाने, जनतेच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या हितासाठी करते....त्या कारणाला जर कोणत्याही समाजघटकाद्वारे हरताळ फासला जात असेल तर अशा तत्वांना प्रतिबंध करणे आणि पार्काच्या मुळ कारणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार त्याला बांधील असायला हवे याउलट तिथे मी व्यक्तिगत पातळीवर प्रबोधन करायला हवे की नको हा माझा ऐच्छिक विषय राहील...पण सरकारने आपली बांधिलकी ओळखून त्याविषयी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी होईल हे पहाणे हे वादातीत असेल.

फुगडी खेळु गं फिरकीची
तिरक्या तिरक्या गं गिरकीची.

------
घरात तीन बाजुंनी दहा दिवस संध्याकाळ ते रात्र लाऊडस्पीकरवर गाणी लावलेली आहेत - सहभागी होऊ नका, कान बंद करा.

रस्त्यात मांडव ट्राफिक जाम - सहभागी होऊ नका दहा दिवस सुटी घेऊन घरी बसा
विसर्जनाच्या डीजे लावून मिरवणूका काही गल्ली सोडून जात आहेत, घरा पर्यन्त कर्कश आवाज - सहभागी होऊ नका कान बंद करा.

पोलीस आहात डीजे मिरवणुकी सोबत ड्यूटी आहे - सहभागी होऊ नका, सुटी घेऊन घरी बसा, नाहीतर द्या नोकरी सोडून दुसरी नोकरी शोधा.

किंवा सहभागी होऊ नका आधी सांगितल्या प्रमाणे दुसऱ्या देशात जा.

२२) कॉन्स्टेबल,सैनिक, तलाठी दहावी बारावी पास.
ना कोणाला कायद्याची माहिती,ना कोणाला आधुनिक शस्त्र ची माहिती.
ना कोणाला महसूल कायद्यांची माहिती.
३, )१८, वर्ष वय झले की मतदान करू शकतो.
ज्याला रेल्वे चा पास काढता येत नाही ॲप वर तो देशाचे राज्य करते निवडतो. >>>> बरं,मग मतदानाचं वय पासष्ठ वर्षे ठेवायचं का ?

४) २१ वर्ष वयाचा कोणी पण निवडणुकीला उभा राहू शकतो.
आहे ना हास्यास्पद. >>>>> यात काय हास्यास्पद आहे ?

५) स्त्रिया न विषयी कडक कायदे आहेत अत्याचार थांबले नाहीत मात्र गैर वापर मात्र वाढला.
कारण ज्यांना खरेच गरज आहे त्यांना त्या कायद्याचा उपयोग झीरो असतो. >>> यात कायद्यांची काय चूक ?

तुम्हाला आयपीसी, राज्यघटना, तपासयंत्रणा, न्याययंत्रणा या सगळ्यांची भेळ करून प्रतिसाद का द्यायचे असतात नेहमी ? न्यायाचं तत्त्व वगैरे काही असतं कि नाही ? कडक कायदे असून अ त्याचार थांबले नाहीत म्हणून कायदे रद्द करायचे का ? ( कारण पुढे तुम्ही तेच लिहीले आहे).

हेमंत हे शुद्ध contrarian आहेत. उगाच आपण कसे वेगळे दाखवायला म्हणून वा ट्टे ल ते लिहितात.

ते दुसरे सर त्यांच्या शेपटावर कधीतरी पाय पडला म्हणून डंख मारायसाठी " ओ सेठ, गरीब कि आबरू भी आबरू होती है, उसकी भी इज्जत होती है, सिर्फ तुम अमीरों कि ही बारू नई होती सेठ " मोड मधे मधे मधे करताना पाहून धाग्याचं मनोरंजन मूल्य वाढलंय. Lol

बाकि साजिरा टॉप गिअर मधे आहे.

२१ वर्ष वयाचा कोणी पण निवडणुकीला उभा राहू शकतो.
आहे ना हास्यास्पद. >>>>> यात काय हास्यास्पद आहे ? >>> बरोबर, तो फक्त निवणूकीला उभा रहातोय, तुमचं मत हिसकावून घेत नाही आहे की तुम्हाला त्याला मत द्यायला बळजबरी करत नाही आहे. संविधानाने त्यापासून संरक्षण दिले आहे.

खरं हास्यास्पद कुणिही निवडणूकीला उभे रहाणे हे नसून कुणाला ही पात्रता न पहाता मतदान करणे हे आहे...तुमचा अधिकार जर तुम्हाला योग्य प्रकारे वापरता येत नसेल तर त्यात संविधानाची काय चूक आहे?

खरे हास्यास्पद सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर कुणीही फेसलेस आयडी विचारवंत म्हणून मिरवू शकतो, मग त्याच्याकडे ज्ञान असो , नसो. याच्याशी वयाचा काहीही संबंध नाही. याही पेक्षा गंमत म्हणजे त्याचे फॅन्स सुद्धा असतात. Lol
आय रेस्ट माय केस मिलॉर्ड !

सार्वजनिक उत्सव साजरे करणे आणि सार्वजनिक उत्सवातला धुडगूस सहन करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वांचा आक्षेप हा दुसर्‍या गोष्टीला आहे. पण हेमंत यांच्या सारखे लोक लगेचच उत्सवावर गदा आणली म्हणून गळे काढतात, या कोल्हेकुईला ग्राहक असतोच. चार चार प्रतिसाद दिले की पान बदलतं. मग नेमका आक्षेप काय आहे हे विसरलं जातं. ज्याची कमेण्ट होती तो ही भांबावतो. तोपर्यंत हेमंत यांनी विषयच बदललेला असतो. मग आता ते उत्सवातला धुडगूस कमी करण्यासाठी त्यात शिरा असा शहाजोगपणाचा सल्ला देतात.

तो सल्ला कसा फोल आहे हे सांगितले की ते म्हणतात कायद्याने प्रश्न सुटणार आहे असे मानणारे अमूक तमूक आहेत. या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मग ते असंबद्ध उदाहरणे देऊ लागतात. चार वाक्ये जी सत्य आहेत ती टाकायची ज्यावर कुणीच आक्षेप घेतलेला नसतो. ही चार वाक्ये सत्य आहेत म्हणून कायदा गाढव आहे. आता ते उत्सवात शिरा या मुद्द्याला बगल मारून संविधान, न्याययंत्रणा यात शिरतात.

मग ब्रिटीशांच्या काळातल्या आयपीसीचे कायदे कसे चूक आहेत हे सांगून संविधान चुकीचे आहे असे सांगतात. न्यायालयातल्या खटला लढवण्याच्या वकीलाच्या कौशल्यामुळे आणि सामाजिक, आर्थिक दरीमुळे तसेच कायदेविषय अज्ञानामुळे न्याय मिळत नाही याचा संबंध ते आणखी तिसर्‍याच ठिकाणी लावतात.
वाक्याचा पहिला भाग सत्य आहे म्हणून ते कशाशीही जोडून अनर्थकारी प्रमेये मांडून ती सत्ये आहेत असा आभास करण्याच्या त्यांच्या या वेळ घालवण्याच्या खेळापायी एकही चर्चा धड होत नाही.

>>मुळात नियम कायदेच नसतील तर काय करणार? >>
इथे मायबोलीवर नियम आहेत का या हेमंत आणि ऋन्मेशला चाप लावायचे? उत्तर स्वच्छ आहे. अजिबात नाहीत.
आता आहेत त्या नियमांत राहुन वात आणला तर काय करायचं? काय करायचं आम्हाला त्रास होतोय तर? वाद घालायचा/ गप्पं बसायचं/ दुर्लक्ष करायचं/ उडी मारायची/ का अ‍ॅडमिन बनून कायदे बदलायचे? वरच्या कशाचा ही काहीही उपयोग होत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. कोडगे लोक आहेत ते. आपण आपला वेळ सत्कारणी लावावा आणि निघुन जावं केलं तरी त्यांना दरवेळी गिर्‍हाईक मिळतंच.
ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे.... या आयडींवर आणि सगळ्याच घसरगुंडीवर लोकशाहीत उपाय आज तरी नाही! दर काही वर्षांनी राखरांगोळी झाली की नवी व्यवस्था शंभर एक वर्षे ठीक चालते.. मग परत नव्याने घर जमिनदोस्त व्हायची वाट बघायची. याचा जमेल तसा युगांशी संबंध जोडून ... मरो!

सर्व अती हुशार वकिलांनी सर्व कौशल्य पणाला लावले पण ठाकरे ची सेना खरी की शिंदे ची हाच निकाल नाही लागला.
आमदार अपात्र होण्याचा निर्णय कायद्यातील सर्व रस्ते वापरून पण अजून होत नाही.
विधानसभेचा कार्यकाळ संपायची वेळ आली .
काय परिपूर्ण कायदे आहेत आपले त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तर जगात एक नंबर.
२०३० पर्यंत तरी शिंदे गटाचे आमदार पात्र की अपात्र हे समजले तरी खूप झाले.
हे रघु आचार्य साठी.
उदाहरण .

हे दुसरे सरसुद्धा चांगल्या चाललेल्या चर्चेत खोडा घालून ती डिरेल करतात आणि सगळ्यांना स्वतःभोबती फिरवतात. इथेही दुर्लक्ष करणे हाच उपाय.

एका वाक्यात .
कायदे आणि सरकार उत्सव बंद करू शकणार नाहीत.
इतकेच आहे.
काही समजत नाहीत म्हणून बाकी उदाहरणे द्यावी लागतात

शाळेत सर आले. मराठी व्याकरण शिकवायला लागले. मुलांनी प्रश्न विचारल्यावर ते इतिहासात शिरले. मुलांनी पुन्हा प्रश्न विचारले तर सर आता भूगोलात.सरते शेवटी सर म्हणाले आणि अशा रितीने २ + २ = ४ हे सिद्ध झाले.

कायदे आणि सरकार उत्सव बंद करू शकणार नाहीत.
इतकेच आहे.
>>>

जे जे वाईट आणि हानीकारक आहे ते कायदे आणि सरकार बंद करू शकले असते तर दारूबंदी केव्हाचीच झाली असती..
ड्रीम इलेव्हान आणि ऑनलाईन रमी नामक जुगार देखील खेळ आहे म्हणून चालतो.. तिथे काय बोलावे.

Pages