सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

dj/ डॉल्बी पोलिस जप्त करतील..
मद्य पिऊन धिंगाणा घालणारे कार्यकर्ते असतील तर दारूबंदी करतील का?
काल २ ऑक्टोबर होता. ड्राय डे. आमच्याइथे लोकांनी हट्टाने दारू घेतली. लोकांची मानसिकताच भिन्न आहे.

हो

कोणी गंभीर नाही.
Dj/Dolby च्या जीवघेण्या आवाज विषयी.
हे आता वेगळे सिद्ध करायची गरज नाही.
मोजून 50 प्रतिसाद तरी विषयाचे गांभीर्य ची जाणिव नसणारे आहेत>>> गेल्या दोन तीन दिवसांत तुम्ही जो डीजेवाले बाबूंच्या समर्थनार्थ तुमच्या छातीचा नी युक्तिवादांचा जो काही "कोट" उभा केलाय, तो पहाता त्यावर कुणी गंभीरपणे प्रतिवाद करेल ही अपेक्षा बाळगणेच मुळात विनोदी/ पोरकटपणाचे होईल... कदाचित त्या मोजलेल्या ५० प्रतिसादांतून हे तर सिद्ध होत नाहीये ना?

तुम्ही स्वतः तिथे असताना? Happy Happy Happy Happy

सरांचं कार्यक्षेत्र मायबोलीवरच आहे, बाकी ठिकाणी ते काही बोलत नाहीत

वरचा एक प्रतिसाद वाचून समर्थाचे बोल आठवले.

जय जय रघुवीर समर्थ ||

देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ¦
ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक __ ¦¦

समतोल पना नाही .
काही आयडी फक्त कोठून कोठून बातम्या शोधून फक्त गणपती ustav ची निगेटिव्ह बाजू च दाखवत असतात.
Agenda चालवल्या सारखे.
पूर्ण महाराष्ट्रात गणेश ustavat positive गोष्टी पण घडतं असतात.
पण त्या बातम्या ह्यांना वर्ज.
ठराविक हेतू नी,ठराविक विचाराने, ,द्वेषाने लोकांची बुध्दी चालत नाही.
इथे काही आयडी ना एक पण चांगली गोष्ट ह्या गणपती ustavat दिसली नाही.
आहे ना आश्चर्य.
ह्यांचे एकच गुऱ्हाळ.
कोण मेले,किती बहिरे झले,कसे दारू पितात,कसे नाचतात .
बस शोधून शोधून फक्त ह्याच्याच लिंक द्यायच्या.
निःपक्ष पना नी विचार व्यक्त करा .निःपक्ष हेतू ठेवा .
समाज नक्की सुधारेल.
हेतू,द्वेष मनात ठेवून वागल तर .
Dj पेक्षा पण भयंकर वाद्य ठरवून वाजवली जातील.
आणि त्या मध्ये ते दोषी नसतील.

ओके
सर
तुम्ही म्हनताय
ते
सर
आंखों पर

मीसुद्धा
सरांसारखा
समतोलपणा
शिकायचा
प्रयत्न
करतोय.
आज
या
तर
उद्या
त्या
बाजूने
लिहितोय.


हा
रा
ष्ट्रा



ही


स्त



तो.

हे

वा
स्त



स्वि
का

ले

पा
हि
जे.

Dj पेक्षा पण भयंकर वाद्य ठरवून वाजवली जातील.
आणि त्या मध्ये ते दोषी नसतील.>>>

म्हणजे तुम्हाला ट्रकवर उभं करून भाषण द्यायला लावणार वाटतं Happy

:सैरावैरा पळणारे लोक: Happy

तर्कट सोडणे ते
अचकट बोलणे ते
त चा म करूनी
विचकट हासणे ते

शाळेत रसायनशास्त्राच्या सरांनी एकदा मला पुढे बोलावले आणि फॉस्फरस पेंटॉक्साईडचे रेणुसूत्र फळ्यावर लिहायला सांगितले.
मी लिहिले P2O6.

सरांनी मला खूप झापले. कालच शिकवले की P2O5 आणि penta म्हणजे 5 हे सुद्धा सांगितले तरी चुकल्यास ना गधड्या, वगैरे.

मी म्हटले सर P2O हे तिन्ही तर बरोबर आहेत ते नाही दिसले का? आणि 5 च्या जागी मी 6 लिहिले. सहा मधला खालच्या गोलाचा डावी कडच्या थोडा भाग पुसला की होतात की पाच! हे बघा, (असे म्हणुन मी ते पुसले आणि 6 चे 5 झाले.) म्हणजे मी रेणुसूत्र ९० टक्के बरोबर लिहिले तरीही तुम्हाला फक्त ती चूकच दिसली? ९०% बरोबर लिहिले याबद्दल कौतुकाचा एक शब्द नाही? सकारात्मक विचार केला की काय बरोबर आहे ते पण दिसते. पण तुम्हाला फक्त चूक दिसते माझी. केवढा हा द्वेष!

मास्तर कायमचे हिमालयात निघून गेले.

मस्करी चा विषय नाही.
गणपती ustav चालू झाला की टीका चालू होते.
1) स्पीकर चा आवाज.
२) पत्ते खेळणे गणेश जी सामोरं
३) मिरवणुकीत dj/ डॉल्बी.
४) जल प्रदूषण.
५) रस्तावर मंडप.
किती तरी वर्ष त्याच काळात टीका होते.
काही बदल झाला .
उलट दिवसेंदिवस .
वरील सर्व गोष्टी वाढत गेल्या.

का असे झले असेल?
कोणी विचार केला का?
१) सभ्य,सुशिक्षित,हुशार जी लोक स्वतःला समजतात ती सामाजिक कार्यात स्वतः कधीच भाग घेत नाहीत.
फक्त घरात बसून शहाणपण शिकवत असतात त्यांची पोर गणपती मंडळात असतात बापाला फाट्यावर मारतात.
२) सरकार ,राजकीय पक्ष ही संधी समजतात आणि आर्थिक,नैतिक,कायदेशीर सर्व ताकत ustav प्रिय लोकांच्या मागे उभी करतात.
३) घरात बसून विरोध करणारे त्या मुळे लपंगे ठरतात ते कधीच स्वतः समाज सुधारणा करण्यासाठी पिच वर नसतात.
हे सरकार आणि राजकीय पक्ष ह्यांना चांगले माहित आहे.
४) गणपती ustav दणक्यात म्हणजे हिंदू धर्म दणक्यात..
असा विचार सामान्य लोक करतात..
आणि तेच मतदार असतात.
५), कोण विचारतो मग घर कोंबडी असणाऱ्या विचार विचारवंतांना.
ते स्वतः कुठेच सहभागी नसतात.
सर्व अपेक्षा सरकार कडून,संघर्ष करणे ह्यांना जमत नाही .त्यांचे धाडस च होत नाही.
भौतिक सुखात व्यस्त असतात

तुमचे फोटो टाका कि सामाजिक कार्य करताना.
डीजे ला कान लावून, लेजर गन च्या डोळ्यात डोळे घालून पाहताना.

तुमचा पत्ता दिला तर स्वखर्चाने तुमच्या दारात 24 * 7 * 365 डीजे आणि लेजर लावू. एव्हढे सामाजिक कार्य पुरे आहे का?

मस्करी चा विषय नाही.
>>>
हेमंत, तुम्ही लिहा पोस्ट. जे मस्करीत घेतात ते म्हणजेच मायबोली नाही. वाचणारे वाचतात.

वरच्या पोस्ट मधील मुद्दे योग्य आहेत.
सगळी किड राजकारणी लोकं घेऊन आलेत. जे या सणउत्सवात आपली मतपेटी बघून उतरले आहेत. तरुणाईला भरकटवणे फार कठीण नाही या देशात. ज्यांनी त्यांना योग्य दिशा दाखवावी असे लोकही कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन असतात. हे एकूणच मूठभर लोकं आहेत. पण उपद्रवी आहेत. सामान्य लोकं आपल्याला काय म्हणून सहन करणारे आहेत. आणि हा जगभराचा नियम आहे. आपल्याला कळकळ वाटली तर आपण इतकेच करू शकतो की योग्य त्या विचारांचा प्रसार करून शक्य तितकी एकजूट होईल हे बघू शकतो.

रघु आचार्य.
तुम्हाला माझा पॉइंट अजून तुमच्या लक्षात आला नाही.
ज्यांना वाटत की गणेश ustav विकृत रूप घेत आहे.आणि समाज माध्यमावर तरी ही लोक ९९% आहेत.
मग ही लोक ज्यांना तळमळ आहे ती लोक .
गणेश ustav ची जी सार्वजनिक मंडळ असतात त्या कमिटी मध्ये का जात नाहीत.?

कमिटी च कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असतात.

फक्त हवेत गोळीबार करणाऱ्या लोकांना कोणी गंभीर पने घेत नाही
हा जगाचा नियम आहे.
आणि हे सुधारणावादी लोकांना वाटत समाज सुधारक दुसऱ्याच्या घरात जन्मावा आमच्या नाही.
कातडी बचाव ही लोक असतात.
Ustav पुढे लागून करणारे स्वतः त्या मध्ये सहभागी असतात.
त्याचे बरे वाईट परिणाम सोसायची त्यांची तयारी असते.
हा फरक आहे ना.

हेमंत सर, तुम्ही आत्ता कोण आहात?
ते दोन दिवस तुमच्या आयडीने लिहीत होते त्यांचे म्हणणे पण वाचा.

मत योग्य आहेत की अयोग्य ह्या वर व्यक्त व्हा.

मी विविध प्रकारे ही समस्या मांडली त्या मुळे वेगवेगळा विचार दिसला.
मी एकच आहे

एक ग्रुप टोकाची विरोधी मत व्यक्त करत होता.
एक ग्रुप टोकाची गणपती ustav samarthan करणारी मत व्यक्त करत होता.
सर्च समस्या, आणि गरज .
अशी समतोल मत कोणीच व्यक्त करत नव्हता..सर्व आपल्या भूमिकेवर ठाम होते.
समस्या आहे पण सोडवायची कशी.
ह्याचे उत्तर कोणी देत नव्हते.
समस्या सरकार नी सोडवावी अशी अपेक्षा.
पण त्या लोकांची स्वतः त्या क्षेत्रात उतरून समस्या सोडवण्याची इच्छा च नाही.
हे स्पष्ट जाणवत होते
म्हणून मला विविध भूमिका घ्याव्या लागल्या

बरं.
ज्यांना सर्वांचेच उत्सव घरात साजरे व्हावेत असे वाटते त्यांनी पण कमिटीवर जायचे का?

दारूबंदी, हुंडाबळी, जुगारबंदी हे कायदे बंद करून बहुमताला चुचकारून हे बंद करायचे का?
तुमच्या लॉजिक ने एकदम बंदी पण नको, एकदम जास्त पण नको. बदल घडवण्यासाठी मायबोलीवर न लिहीता दोन दोन पेग मारायचे., रोज थोडे पैसे कल्याण मटक्यावर लावायचे तरच आपल्याला बदल करायचा हक्क आहे.
दारू जुगार मटका हुंडाबळी याची चांगली बाजू सांगितली पाहिजे.
कारण हेच लोक मतदार आहेत.
घरात बसून विरोध केला तर घरी येऊन पितील.

बरोबर ना?

चालू द्या तुमचे.
तुमची संख्या एकने वाढवण्यासाठी कुणीतरी येईलच. Happy

Pages