काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
नवीन Submitted by लुटुपुटुचा
नवीन Submitted by लुटुपुटुचा खेळीया on 5 October, 2023 - 14:30 >>+१
दारुड्या माणसाने दारू वाईट
दारुड्या माणसाने दारू वाईट आहे हा सल्ला देणे चुकीचंच आहे.>>>>
अजिबात नाही. दारूची सवय लावून आयुष्य देशोधडीला लागलेल्या माणसाला दारू टाळा असा सल्ला देण्याचा हक्क नाही ? काहीही.
स्वतः मन मुराद प्लास्टिक चा वापर करून.
प्लास्टिक कसं वाईट आहे .
हे चूकच आहे.
>>> असेही काही नाही. प्लॅस्टिकचा शक्य तितका वापर कमी करणे ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जो माणूस प्लास्टिक कसे हानिकारक आहे असे म्हणतो फक्त त्यालाच पकडून त्याच्यावर प्युरीटी टेस्टिंग करणे साफ चूक आहे. प्लॅस्टिक टाळणे ही एकट्या दुकट्या व्यक्तीची जबाबदारी नाहीच आहे. आणि त्यात पण, ज्याने प्लास्टिक कसे हानिकारक आहे हे जाणून घेतले आहे आणि त्याविरुद्ध जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यालाच धरून फक्त त्याच्यावर प्युरिटी टेस्ट करणे शुद्ध दुष्टपणाचे आहे. म्हणजे मोठे भांडवलदार क्लायमेट चेंज वैगरे मानतच नाहीत, प्लास्टिक हानिकारक आहे असे मानतच नाहीत, त्यामुळे ते दुटप्पी नाहीत आणि मनाप्रमाणे वागायला मोकळे. मात्र चिंताग्रस्त व्यक्तीने प्लास्टिक म्हणले की हे त्यांनी वापरलेल्या पिशव्या काढणार ? हा sssssss ड. ह्या असल्या क्लृप्त्या मूळ विषयाला बगल देण्यासाठी नेहमी वापरल्या जातात.
मुळात, मूळ मुद्द्यावर काही न बोलता मुद्दामून विरोधी मत द्यायचे म्हणून काहीही लिहिणे चालले आहे हेमंत ह्यांचे कडून.
ते आणखी सोपं करून सांगतो असं
ते आणखी सोपं करून सांगतो असं म्हणतात ते खूपच गहिवर आणणारे असते.
येण्यासारखे आहे..... तुमच्या
येण्यासारखे आहे..... तुमच्या मता प्रमाणे या सर्वांवर कायदेशीर कडक बंधनांची अंमलबजावणी न करता वैयक्तिक वैचारिक प्रबोधनाने हा विषय निकालत काढायला हवा
कायदेशीर कडक कारवाई हा प्रकार योग्य आहे पण भारतात इतकी प्रबळ,निःपक्ष शासकीय यंत्रणा नाही .हे सत्य स्वीकार करणे सत्य स्थिती शी योग्य आहे.
मी आणि एकाध्टा राजकीय प्रभाव असणाऱ्या व्यक्ती नी एकाच तीव्रतेचा गुन्हा केला तरी .
आम्हा दोघांवर वेगवेगळी कारवाई होईल.
मला सर्व कलम लावून तुरुंगात टाकले जाईल आणि राजकीय प्रभाव असणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा दाखल झाला तरी काहीच कारवाई होणार नाही.
अशी आपल्या देशात कायद्याच्या राज्याची अवस्था आहे.
गणपती ustav मंडळातील कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते पण असतात.
तेच राजकीय पक्षांचे मोर्चे,प्रदर्शन ,प्रचार ह्या मध्ये सहभागी असतात.
संख्या कमी असली तरी राजकीय पक्षांचे उपयोगी पडणारी लोक असतात .
त्यांच्या वर कायदेशीर कारवाई होत च नाही .
कायदे मोडले तरी .
म्हणून तर इतका विरोध करून पण ustav साजरे त्यांच्या स्टाइल नीच होतात.
तुमच्या मता प्रमाणे या
तुमच्या मता प्रमाणे या सर्वांवर कायदेशीर कडक बंधनांची अंमलबजावणी न करता वैयक्तिक वैचारिक प्रबोधनाने हा विषय निकालत काढायला हवा
>>>> हे कुठून काढलेत म्हणे ? उगाच काहीही ?
काहीही बेताल काय?
काहीही बेताल काय?
तुम्ही मालेगावावर पोस्ट टाकली म्हणून मालेगावचे विषय काढला तर तुम्ही खांडववनात गेले, तिकडून झुमरीतिलैया आणि आता शेवटचं कळतंय कि चंद्रावर बसलाय.
कशाचा कशाला संबंध आहे का? मागे जा.
जिथून हा हैदोस सुरू केला तिथे तुमचा मुद्दा काय होता हे स्वतःच्या डोळ्यांनी वाचा, आताचा वाचा.
खरेतर इतक्या असंबद्धते साठी कौतुकच आहे.
हेमंत, तुम्ही (मुद्दाम करत
हेमंत, तुम्ही (मुद्दाम करत नसाल, असं समजून) लिहायचं जरा पॉझ केलं, तर विषयावर गंभीर चर्चा कदाचित होईल. विषय खरंच महत्वाचा आहे.
अर्थात सगळ्यांना आहे तसं तुम्हालाही लिहायचं स्वातंत्र्य आहे हे मान्यच आहे..
आताची कमेंट भानावर असताना
आताची कमेंट भानावर असताना लिहिली असेल तर ही भयंकर परिस्थिती असताना त्यांच्या कमिटीत जाऊन मत बदला नाहीतर अफगानिस्तान जा हे कुठल्या स्थितीत सांगितले? जे पोलिसांना बधत नाहीत ते तुम्हाला बधणार?
गणेशोत्सवाचे अर्थशास्त्र, जाहिरातींचे पैसे, फ्लेक्स लावण्याचे पैसे हे सोडून देतील?
ठीक आहे. थोडा वेळ तुम्ही म्हणता ते मान्य करू.
एखादा किती मंडळाच्या कमिट्यात जाईल? तुम्ही राहता तिथे एक. सोसायटीच्या दारात आत शिरताना दहीहंडीचे थर लागतात. ते मंडळ वेगळं. फाट्यावर कान फाटेल एव्हढी भिंत. आधीच फ्लायओव्हरने जागा कमी झाली. त्यात ही भर.
या सगळ्या कमिट्यात जायचे का?
आता गाडी भलतीकडेच नेलीय.
थोड्या वेळाने ट्रंप कसा बरोबर हे पण सांगाल.
इथं लिहिणारे आणि डीजे-डॉल्बी
इथं लिहिणारे आणि डीजे-डॉल्बी-लेझरचा बीभत्स गोंधळ घालणारे - हे दोन म्युच्युअली एक्स्क्लुझिव सेट आहेत, असं वाटतं. मात्र राजकीय इच्छाशक्तीने हा गोंधळ सहज निस्तरता येईल, आणि तशी उदाहरणे यापुर्वी घडलीही आहेत. आणि राजकीय नेते निवडणे हे इथं लिहिणार्यांसारख्या लोकांच्या काही प्रमाणात का होईना हातात आहे.
गणेशोत्सव हा आधी उत्सव होता. आता याता उत्सव हा शब्द काढून टाकला तरी चालेल, अशी अवस्था आहे. ही खूप वर्षांपूर्वीच उत्सवावरून पॅरॅलल इकॉनॉमी बनली होती, आणि आता ती संपूर्ण राजकीय व्यवस्था झाली आहे. गल्लीतल्या नेत्यापासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत या साखळीचे भाग आणि लाभार्थी होतात, तेही भक्तीच्या नावाखाली. निवडणुकांचे सेटिंग आणि हिशेब याच काळात केले जातात. १५ ते २५ वयाच्या पोरांना हाताशी धरून त्यांना गणेशोत्सव कार्यकर्ते बनवले जातात, ते खरं तर राजकीय कार्यकर्ते आणि प्रचारक असतात. या मुलांना मोफत खाणं पिणं मिळतं- हे काहीच नाही. घाऊक प्रमाणात मोटरसायकली वाटप केलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काहीही सांसारिक व्यवधानं आणि प्रश्न नसलेल्या या पोरांची एनर्जी ही अशी या पद्धतीने चॅनलाईज केली जाते.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी टॅगलाईन घेऊन भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या सध्या प्रचंद जाहिरातबाजी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून या ट्र्स्टची धुरा 'तरुण तडफदार उमेदवाराने घेतली आहे. हे साहेब पानपानभर जाहिराती करतात. गणेशोत्सवात त्यांनी २५०० मोठमोठी फ्लेक्सेस लावून अख्खं शहर गचाळ केलं. हे सारं अनधिकृत. ही तब्बल अडीच हजार फ्लेक्सेस लावायला किती पोरं कामाला लागली असतील? त्यांची अपेक्षा काय असेल? गणपती प्रसन्न व्हावा अशी? आणि या तरुण साहेबांची अपेक्षा? महापलिकेपासून ते केंद्राच्या सगळ्या निवडणुका तोंडावर आहेत, आणि खाली फोटोत बघा, त्यांच्या अपेक्षा स्पष्ट आहेत. रेल्वेच्या, कामगारांच्या संपातून काही नेते जन्मतात, तसे हे साहेब गणपतीतून जन्मणार आहेत.
त्या २५०० फ्लेक्सेसबद्दल पुणे मनपाने त्यांना सव्वा कोटी रुपये दंड केला अशी बातमी वाचली. तो दंड हे साहेब सहज भरून टाकतील, अशी स्थिती आहे. सव्वा कोटींच्या सव्वाशे पट त्यांना आधीच फायदा झाला आहे, हे खालच्या (अनेक जाहिरातींपैकी एका) जाहिरातीतून दिसतंय. फोटोत स्पष्ट दिसत नसेल तर, साहेबांसोबत आहेत- फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, बावनकुळे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, चित्रा वाघ, अमित ठाकरे, लष्करी-पोलिस-प्रशासकीय अधिकारी.
आणि हे सारे 'भक्तीभावाने' जमले आहेत.
हे माणिकचंद वाले धारिवाल
हे माणिकचंद वाले धारिवाल यांचे जावई आहेत
फक्त गणपती नव्हे तर सध्या भारतात जितक्या लीग सुरु आहेत त्यात यांच्या टिम्स आहेत आणि अनेक खेळाडूंना आर्थिक मदत पण देतात ही एक चांगलीच बाब आहे पण त्यांचा उदोउदो अति सुरू आहे हे मात्र खरे
हे कुठून काढलेत म्हणे ? उगाच
हे कुठून काढलेत म्हणे ? उगाच काहीही ?>>> hemant999 यांचे सर्व प्रतिसाद वाचून पाहिले तर निदान त्याचा तसाच मतितार्थ निघतोयं.... अर्थात माझ्याकडे उपलब्ध असलेल्या अक्कल हुशारीने.... कदाचित तुम्हाला काही वेगळा अर्थ ही प्रतीत होउ शकतो...आणि मग मी जो अर्थ काढलाय तो "उगाच काहीही" असू शकतो, ही शक्यता मी नाकारत नाही आहे.
रेल्वेच्या, कामगारांच्या
रेल्वेच्या, कामगारांच्या संपातून काही नेते जन्मतात, तसे हे साहेब गणपतीतून जन्मणार आहेत. >>> सध्याचे भाजपाचे मुंबईतील आमदार राम कदम हे असेच दहीहंडीतून जन्माला आलेले नेतृत्व आहे....फरक ईतकाच की त्यांच्याकडे आधीच बक्कळ पैसा होता....स्व. प्रमोद महाजन यांचे स्विय सचिव होते ना ते. (प्रायव्हेट वाले)
खेळिया, मला वाटले हेमंत
खेळिया, मला वाटले हेमंत ह्यांनी ते मला उद्देशून लिहिले आहे, म्हणून मी तसा प्रतिसाद दिला. माझा गैरसमज झाला.
आहेत त्यात यांच्या टिम्स आहेत
आहेत त्यात यांच्या टिम्स आहेत आणि अनेक खेळाडूंना आर्थिक मदत पण देतात ही एक चांगलीच बाब आहे पण त्यांचा उदोउदो अति सुरू आहे हे मात्र खरे>>>>>>>
पाच सहा वर्षापूर्वी भाच्याला government polytechnic Shivaji nagar मध्ये सिव्हिल डिप्लोमा ला प्रवेश मिळाला . वार्षिक फी फारतर आठ दहा हजार असावी !
पण धारीवाल फाउंडेशन ( पुणे रेल्वे स्टेशन च्या पाठीमागे मोठे कॉर्पोरेट ऑफिस आहे ) तर्फे स्कॉलरशिप मिळते समजल्यावर गेला तिथे.
अर्धा तास त्यांनी याची आर्थिक परिस्थितीची चौकशी केली आणि सांगितले की आम्ही फी चे पूर्ण पैसे प्लस संपूर्ण वर्षाचा जेवणाचा खर्च कपड्यांचा देखील खर्च देवू !
फक्त त्या साठी १५ ऑगस्ट ला सिंहगडावर धरिवाल फाऊंडेशन च्या कार्यक्रमात धारिवाल साहेबांवर छानसा निबंध लिहून आणून वाचून दाखवायचा !
मिळणारे पैसे पॉकेट मनी म्हणून वापरता येईल म्हणून तो तयार पण झाला .
पण त्याला प्रश्न पडला गुटखा बनवणाऱ्या वर काय चांगले लिहायचे ?
शेवटी जायचे कॅन्सल केले ......
पण त्याला प्रश्न पडला गुटखा
पण त्याला प्रश्न पडला गुटखा बनवणाऱ्या वर काय चांगले लिहायचे ? >> +१
महत्वाचे आहे हे. पण त्याला इतर कुणाकडूनच मदत मिळाली नाही का ?
तसे असेल तर दुर्दैव आहे. हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. तुम्ही काढू शकता,
सरकारी कॉलेज मध्ये फी कमीच
सरकारी कॉलेज मध्ये फी कमीच असते आणि ऑलरेडी त्याने ती भरली होती , पण कॉलेज म्हटलं की फालतु खर्च आलेच म्हणून तो एक्स्ट्रा पॉकेट मनी साठी स्कॉलर शिप घ्यायचा प्रयत्न करत होता .
बाय द वे !
त्याचा डिप्लोमा आणि engineering पण झाले , आणि लायसन काढून सरकारची रस्ते , बांधकामाची कॉन्ट्रॅक्ट घेवू लागला आहे .
थोडा विषय divert झालाच , आता सार्वजनिक सणाकडे वळलो तरी चालेल
ह्या यात काय अवघड आहे, मला
ह्या यात काय अवघड आहे, मला आधी भेटला असता तर दिला असता मस्त निबंध लिहून
मनाचे मोठेपणा जपणारा, समाजासाठी समरस होऊन आयुष्य वाहून घेणारा, दिन दुबळ्या ची सेवा करणारा एक राजा माणूस
धारिवाल फाउंडेशन तर्फे आज हजारो लोकांची घरे उभी राहिली आहेत, अनेक माता भगिनींचे त्यांनी अश्रू पुसले आहेत
स्कॉलरशिप मिळवायची तर हे असलं लिहून द्यायच, हाय काय नाय काय
"समाजासाठी समरस होऊन" -
"समाजासाठी समरस होऊन" - ह्यातल्या समरस वर काही श्लेष अपेक्षित आहे का?

त्या २५०० फ्लेक्सेसबद्दल पुणे
त्या २५०० फ्लेक्सेसबद्दल पुणे मनपाने त्यांना सव्वा कोटी रुपये दंड केला >> इतर काहीही केलेलं असलं तरी एवढ्या एकाच गोष्टीसाठी लोकांनी त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार केलं पाहिजे.
डीजे-डॉल्भिंती-लेझर यावर काही वृत्तपत्रं अनंतचतुर्दशीपासून मालिका चालवत आहेत. लोकांनी त्यांच्यावर हजारो पत्रांचा पाऊस पाडला आहे. पण अजूनपर्यंत एकही नेता त्यावर चकार शब्दही बोलला नाहीये. या गोष्टी, त्या चालवणारे आणि वापरणारे कार्यकर्ते त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहेत, हे स्पष्ट आहे.
नवीन पालकमंत्र्यांच्या स्वागतार्थ पुणे-पिंपरीत काल लोकांनी स्वातंत्र्य मिळाल्याच्या थाटात फटाके फोडले. कुठेकुठे डीजेवर नाचलेही असतील.
Submitted by साजिरा on 5
Submitted by साजिरा on 5 October, 2023 ->>> तुमचं पोस्ट अगदीच पटलं.
ठाण्यातही असेच लोकंनेते- उत्सव- त्यांची राजकीय शक्ती - सत्ता - पैसा अगदी exponentially वाढताना पाहिलंय. यात सगळ्या पक्षाचे लोक असतात/ आहेत.
आणि उत्सवाची लिस्ट ही वाढत जाताना पहिली आहे..
गणपती, दही हंडी, नवरात्र, संक्रांती.... गेल्या आठ वर्षांत अजून वाढले असतील.
पूर्वी देखावे, छोटे मंडप,स्थानिक लोक, लघु उद्योग, इथपर्यंत मर्यादित असलेल्या गोष्टी अक्राळ विक्राळ रूप धारण करताना बघितल्यात. आणि त्यांचे रूपांतर लाखो रुपये मानधन देऊन सेलिब्रिटी बोलावणे, अख्खा रस्ता काही दिवसांसाठी बंद करणे, भरमसाठ लायटिंग, त्यायोगे येणाऱ्या
इतर त्रासदायक गोष्टी यांबरोबरच छोट्या कार्यकर्त्यांचे मोठे ( सत्तेने आणि पैशाने) नेते झालेले बघितलेत.
"जगात गाढवांची कमी नाही,
"जगात गाढवांची कमी नाही, कुंभार थोडे. तस्मात् कुंभार हो, गाढवांस तोटा नाही" हा सल्ला काही (नको त्या )मंडळींनी ( नको तसा) मनावर घेतला असा वाटतं..
अनेक खेळाडूंना आर्थिक मदत पण
अनेक खेळाडूंना आर्थिक मदत पण देतात>>>> विषयांतर आहे पण या विषयावरील एक फार अप्रतिम युट्यूब लिंक इथं डकवतोयं
https://youtu.be/cSz6NrFy_jc?feature=shared
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/cities/mumbai/retinal-injuries-rise-exposure-intense-dj-laser-beams-experts-8966046/
गणपती मिरवणुकीत फिरवलेल्या लेझर्समुळे अनेकांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. दिव्यदृष्टीमुळे आता डोळे ह्या अवयवाची गरज नसेल.
https://policenama.com/maharashtra-police-news-ganeshotsav-visarjan15-policeman-suffered-hearing-loss-due-to-dj-sound-marathi-news/
धुळ्यात १५ पोलिसांना बहिरेपणा आला आहे.
आता तरी जागा हो एकनाथा. लोकांच्या जीवावर बेतू लागला आहे तुझा DJ
आता मी पर्यावरणाला असा हातभार
आता मी पर्यावरणाला असा हातभार लावते/ लावतो असा बीबी काढा. तो जास्त उपयोगी पडेल.
मानव ह्यांना माझे हे मत कळले
मानव ह्यांना माझे हे मत कळले आहे तरी उगाचच विरुद्ध बोलायचे म्हणून.
Co २ चे उदाहरण त्यांनी दिले आहे.
>>> हो.. उगाच टिंगल करतायत.. मुद्दा भरकटवतायत ... ये ना चालबो ...
तुम्ही लिहत जा हेमंत- आम्ही वाचतोय...
हेमंत कळकळीने लिहितात.
हेमंत कळकळीने लिहितात.
बरेच विषयांवर त्यांचा चालू घडामोडींचा अभ्यास जाणवतो.
त्यांचे मुद्दे नेहमी चर्चेत वेगळा विचार घेऊन येतात.
ते धडाधड लिहीत सुटतात हा आक्षेपाचा मुद्दा कसा असू शकतो. त्या पोस्ट अवांतर नसतात. उलट त्यांच्यावर ढिगाने ज्या पोस्ट येतं आहेत त्या अवांतर नाहीत का इथे?
चोचोमौभा
चोचोमौभा
<<मात्र राजकीय इच्छाशक्तीने
<<मात्र राजकीय इच्छाशक्तीने हा गोंधळ सहज निस्तरता येईल.>> अगदी बरोबर साजिरा.
मी असेच मत व्यक्त केले आहे.
काही लोक म्हणत आहेत प्रबोधन शक्य नाही बंद करा उत्सव. या मागची भावना समजली आहे त्यामुळे त्यावर तत्वत: काहीच आक्षेप नाही. जर साजरे करण्यात सुधारणा होणारच नसेल तर बंद करण्यास माझा वैयक्तीक आक्षेप असणार नाही.
पण प्रबोधन करणेच शक्य नाही तिथे बंद करणे प्रॅक्टिकली शक्य आहे का? काढला कायदा यावर्षापासुन उत्सव घरात साजरे करायचे सार्वजनीकरीत्या नाही, तशी परवानगी मिळणार नाही, कोणी याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल. आणि केली सुद्धा कडक अंमल बजावणी. आणि तेव्हापासुन लोकांनी उत्सव सार्वजनीकरीत्या साजरे करणे बंद केले असे होइल की याला प्रंचंड विरोध होइल?
राजकीय इच्छाशक्ती असल्यास आधी प्रबोधनाने जमेल तेवढे अनुकूल मत तयार करुन, विरोधक ( हे आताचे सत्ताधारी आणि विरोधक डोळ्यासमोर ठेवुन नव्हे - तर जेव्हा केव्हा अशी राजकीय इच्छाशक्ती जागृत होईल त्याक्षणी असे)
यावरुन रान उठवतील तिथे डिप्लोमसीचा वापर करुन त्याचा परिणाम कमीतकमी कसा राहील अशी योजना करुन, उत्सवांना दिलेल्या नको त्या वळणावरुन सुसह्य व आनंददायी मार्गावर आणणे किंवा सार्वजनिक साजरे करणे बंदच करायचे असतील तर त्या दिशेने प्रयत्न करणे शक्य आहे. सुरवात केली की यालाही काही वर्षे लागतील.
आता तरी जागा हो एकनाथा.
आता तरी जागा हो एकनाथा. लोकांच्या जीवावर बेतू लागला आहे तुझा DJ>>>>
अभी तो पार्टी शुरू हुई है
....डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे, गाना चला दे, गाना चला दे 
Covid काळात सार्वजनिक उत्सव
Covid काळात सार्वजनिक उत्सव बंद च होते.
कोणी विरोध केला नाही.
कारण उचित कारण होते.
पण कोणतेच उचित कारण लोकांना पटेल असे नसेल तर जबरदस्ती नी कायद्याचा जोरावर उत्सव बंद करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तीव्र विरोध होईल..
धार्मिक द्वेषाचे वळण त्याला दिले जाईल .
V
Pages