सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही? >>>> काय ठरलं मग फाइनली ??
करावेत की नाही ?? म्हणजे त्याप्रमाणे दांडियाची टिकट्स काढायची की नाही... काढली तर डी जे नको सांगून डिसकाउंट कन्सेशन मागावे का की घरच्याघरी फिरवायच्या त्याचाही सोक्षमोक्ष लावूनच टाकूया पटकन.

आज गोकुळात रंग खेळ तो हरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. ....

त्या आधी पित्रुपक्षात करायची रबडी सारखी तांदळाची वडी, कुरकुरीत वडे व चटणी ह्यांचे पाक कृती चॅनेल्स वर व्हिडीओ आलेत. ते बघुन घ्या.
आपल्या जिवल गां चे लाड पुरवा.

गणेश उत्सवात कर्णमधुर संगीतामुळे आपापल्या भागातील कावळे पळून जिकडे गेलेत त्या त्या भागात तिकडच्या लोकांना डी जे लावायला सांगायला हवे म्हणजे पुन्हा सर्व कावळे मायदेशी मायगल्ली मायअड्डा मायकट्टा वरती परततील.

शाहरूख दहावी पास आहे / नाही ?
>>>
शाहरूख म्हटले की विषय थांबतच नाही.
मुद्दा हा होता Happy >>> तुम्ही जुलाबला समानार्थी शब्द विषय वापरता का ? Happy

मग सोडा कि त्याला आता. एव्हढे करून दोन हिट दिले त्याने.
मायबोलीवर मोहीमा राबवून नेहमीच फ्लॉप होईल असे नाही हे कळले असेलच. Happy

ओके Happy

सरांना मुद्दा सुचला नाही की ते 786 टाकतात Happy
>>>
+७८६ म्हणजे अनुमोदन
ते दिले तुमच्या पोस्टला
नको आहे का?
विरोधच हवा आहे का Happy

शाहरुख नेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा दिली असणार....
Submitted by आशुचँप on 2 October, 2023 - 16:03

मस्कारीतही असे म्हणू नका!

त्वमेव धागाकर्ता: त्वमेव अडमीन:....
Submitted by आशुचँप on 2 October, 2023 - 16:36

कृपया आरती / भजन / स्तोत्र यांचे विडंबन नको!

बाकी चालू द्या.

मी काही नाही केलं. मी निर्दोष आहे.>>> अहो फुलून त्यांचं फुलपाखरू झालं असतं तर दोष दिला नसता, पण त्यांचा तर फुलून फुलकोबी होऊन बसलायं म्हणून बोलावं लागलं हो... Lol Lol

भिंतीवर लावलेले फ्रेम थरथरतात त्यामुळे त्यांच्याआड लपलेले पाली कोळी बाहेर येतात आणि घर स्वच्छ होते. >>> Lol Lol Lol

+७८६ म्हणजे अनुमोदन
ते दिले तुमच्या पोस्टला
नको आहे का?>>> मी गरीब भाबडा माणूस आहे हो सर
तुमच्या गूढ प्रतिसादात काय दडलेलं असतं ते मला कुठून कळायला
आता तुम्ही खुलासा केलात म्हणून बरं झालं नैतर मी वेगळंच समजत होतो

विमु - ओके

कोणी गंभीर नाही.
Dj/Dolby च्या जीवघेण्या आवाज विषयी.
हे आता वेगळे सिद्ध करायची गरज नाही.
मोजून 50 प्रतिसाद तरी विषयाचे गांभीर्य ची जाणिव नसणारे आहेत

हैदराबाद येथिल विसर्जनाचे विडिओ पाहण्यात आले. भव्य मूर्ती होत्या, पण एकामागे एक अशा ट्रक्स मध्ये शिस्तबद्ध रित्या विसर्जनाची मिरवणूक चालली होती. गर्दी नाही, डीजे नाही, लेझर नाही ... त्यांना गणपती पावत नसेल का?

कृपया आरती / भजन / स्तोत्र यांचे विडंबन नको!>>>
हे बरंय. तिथे गणपती समोर DJ वर अश्लील गाणी लावून नाच होतो तेंव्हा काही नाही आणि इथे लगेच विडंबन नको म्हणून पुणेरी पाटी पुढे.
विक्षिप्त मुलांनी ह्या वर्षी DJ चा आवाज किती डेसीबलचा होता ह्याची RTI नाही का टाकली?

च्रप्स हे आय एस आयचे एजंट आहेत. भारतीय तरुणांना अंधळं आणि बहिरं करण्याचं मिशन त्यांना सोपवण्यात आलं आहे.

मुळात त्वमेव हा संस्कृत शब्द आहे. तो श्लोकात आला म्हणजे इतर कुठेही वापरायचा नाही असे म्हणणे असेल तर परत संस्कृत कशी कोण बोलत नाही असे दुःख करू नका.
आशुचॅम्प ह्यांनी विडंबन केले नव्हते. तुम्हीच अडमिन, तुम्हीच आयडी हे संस्कृतमध्ये लिहिले म्हणजे श्लोकाचे विडंबन असे म्हणणे हास्यास्पद आहे.

पुढचे, विडंबन का करायचे नाही बुवा ?

लोकसत्तेत आलेली बातमी >>>

आता ह्यावर मेरे प्यारे देश वासियो म्हणत नवीन बिझनेस आइडिया येईल स्वदेशी चालना देण्यास तरुण बेरोजगारांना नवीन संधी उपलब्ध...
लेसर पासून डोळ्यांचे रक्षण करणाऱ्या गॉगल्सची निर्मिती गुजरातमध्ये आणि होलसेल विक्री महाराष्ट्रात..

डोळ्यांच्या आणि कानाच्या डॉक्टरांना पैसा मिळून अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे, हे चांगलंच आहे.

https://www.loksatta.com/pune/eyes-of-15-injured-in-pune-due-to-laser-be...

लोकसत्तेत आलेली बातमी>>>> तसही पुण्यातल्या लोकांच्या डोळ्यात बारीक सारीक गोष्टी खुपतात...लेझर बीम्स पण खुपले त्यात नवल ते काय? Lol

गुजरात आधी चीन करेल. किंवा गुजराती उद्योजकांशी कोलॅबरेट करेल.
बाजारात Noise cancelling equipments सुद्धा आहेत.
तसंही चीनने गणेशमूर्ती, सजावटीचे सामान यांची निर्मिती आणि निर्यात कधीच सुरू केली आहे.

मग गणपती ustav चालू होण्या अगोदर शहरातील तमाम dj/ डॉल्बी पोलिस जप्त का करत नाहीत
म्हणजे आतून खूप लोकांचा dj/ डॉल्बी ला पाठिंबा असतो.
सरकार ९९.९९% लोकांच्या भावना दुखवण्याचा अव्यवहारी निर्णय कसा घेईल.1% dj/डॉल्बी प्रेमी लोकांसाठी.
पण सरकार तसा निर्णय घेते ..
म्हणजे दिसते तसे नाही.>>> किती साधी सोपी टक्केवारी काढून मोकळे झालात.... इथे १% ( जे झुंडशाहीने ज्याला शक्य होईल त्याला चिरडू इच्छितात) लोकांचे उपद्रव मुल्य ९९% ( जे नाकासमोरचे सरळ साधे आयुष्य जगू इच्छितात) लोकांपेक्षा जास्त असावे म्हणून सरकार त्यांचे लांगूलचालन करत असावे अशी शक्यता नाही आहे काय? आणि जर यातही नाका समोर चालणाऱ्यामाणसांचाच दोष दिसत असेल (ते एकता दाखवत नाहीत म्हणून) तर १% असलेल्या आणि १००% उपद्रव मूल्य असलेल्या कायद्याच्या व्याख्येत बसणाऱ्या गुन्हेगारांना ही सरकारने डोक्यावर बसवून नाकासमोर चालणाऱ्या जनतेचा पुर्णपणे नित्पात का करु नये?

परवा रात्री ते म्हणत होते की डॉल्बीचा त्रास होणारे अल्पसंख्य आहेत. त्यांना आफ्रिकेतील वाळवंटाचे विमानाचे तिकीट देऊन टाका. सरकारने किंवा गणेशभक्तांच्या वर्गणीने.

मोजून 50 प्रतिसाद तरी विषयाचे गांभीर्य ची जाणिव नसणारे आहेत>>> सर त्यातले तुमचेच 40 -45 आहेत Happy
तुमच्या दे दणदणाट भडिमारापेक्षा डीजे ऐकलेला परवडला असं म्हणत मंडळी पांगली असावीत Happy

Pages