सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीजेच्या आवाजापेक्षा विमानाचा आणि रेल्वेचा आवाज भयंकर.
डीजेच्या आवाजाचा त्रास होणारे अल्पसंख्य. त्यांना सरकारी खर्चाने किंवा वर्गणी काढून आफ्रिकेतील वाळवंटाचे वन वे तिकीट द्यावे.
डीजेला विरोध करणारे हिंदू विरोधी आहेत. त्यांच्या विरोधामुळे डीजेचे प्रमाण वाढेल.

लॉजिकल मुद्दे.

सार्वजनिक गणेशोत्सव हे सामाजिक कार्य आहे असे एखादा म्हणत असेल तर तिथेच् थांबलेले बरे.
त्या मंडळात जाऊन बदल करता येतो हे सांगणारा कित्येक वर्षे अशा मंडळात गेलेला नसणार. गणेशोत्सव, शिवजयंती, भीमजयंती यांचा उद्देश वेगळा आहे. दहीहंडी आणिइतर सणांचा वेगळा.

हे तिन्ही उत्सव आता अशा लोकांच्या हातात गेलेले आहेत जिथे तुम्ही बदल करा असे सांगणे हे कदाचित धोक्याचे सुद्धा ठरू शकते. शक्तीप्रदर्शन, मंडळा मंडळातली स्पर्धा आणि त्यातून राजकारणात जाण्याची स्वप्ने पडणारेच अशा कामात फुल टायमर म्हणून राबू शकतात. ज्यांनी करीयर वर फोकस केलाय त्यांनी आपली कामे सोडून अशा कमिट्यात जायचे आणि बदल सुचवायचे, सरकारने सगळी कामे का करायची अशा चीप लॉजिकने तर दंगलीत कुणी मारायला आले तर पोलिसांना कळवूच नये. आपण आपली शंभर दीडशे मुलं तयार ठेवावीत.

ज्यांच्या डोक्यात झुंडीचे मानसशास्त्र घट्ट आहे, त्यांची ही विचारसरणी आहे. त्यांना सरकार कशासाठी असते, नागरीक म्हणजे काय, त्यांचे हक्क, कर्तव्ये, लोकशाही , जबाबदार्‍या याविषयी चर्चा करणे म्हणजे कपाळबडवती योग !

नुसतं पंखा आहे पंखा आहे करा पण खरोखर काय पंखे बनू नका. मी बनलो हेमंत सरांचा पंखा. हेमंत सर अजून कोणी नाही बनलं तर टेन्शन घेऊ नका मी आर्धी पिसं त्या बाजूला लावून समतोल साधेन पण तुम्ही उंच भराऱ्या घेत रहा.

इथे असणारे सर्व आयडी plastic bag ज्या पर्यावरणास अत्यंत हानिकारक आहेत त्या बॅग रोज वापरतात>>> वॉव मस्त सरसकटीकरण.

लोकांना तुमच्या बोलण्यात लॉजीक दिसतय आणि.. काय सुदिन आलेत माबो वर Uhoh

इथे असणारे असे ते सातत्याने म्हणत आहेत आणि हटकलं कि जहांपन्हां तुस्सी ग्रेट हो, तोहफु कबूल करो Proud

सामोपचारी ताई / दादा : "भांडू नका".
धाग्यावरचा/ची आयडी : "हो ताई / दादा! युद्धाचे भीषण दुष्परिणाम पाहून थरकाप उडतो गं/रे ता/दा.

इथे असणारे सर्व आयडी उच्छ्वास करताना कार्बंडायॉक्साइड सोडतात. आणि थोडा का होईना मिथेन पण. त्यांना अधिकारच नाही प्रदूषणावर बोंलण्याचा.

मानव +१
प्लास्टिक बॅग वापरता ना ? मग आता मी नदीत सायनाईड ने होळी खेळली तरी तुम्ही बोलायचे नाही.

<< इथे असणारे सर्व आयडी उच्छ्वास करताना कार्बंडायॉक्साइड सोडतात. आणि थोडा का होईना मिथेन पण. त्यांना अधिकारच नाही प्रदूषणावर बोंबलण्याचा.
Submitted by मानव पृथ्वीकर on 4 October, 2023 - 22:49 >>

-------- हवेमधे CO2 असणे म्हणजे प्रदूषण हे समिकरण चुकीचे आहे, नकारात्मक विचार.
CO2 मधे O2 आहे हा झाला सकारात्मक विचार.

आपले सर्वांचे आदरणीय " ब्यापारी" दिमाख वाले, CO2 मधून C वेगळा करतील, त्यापासून डायमंड बनवतील, आणि मागे राहिलेला O2 रिकाम्या सिलेंडर मधे भरतील आणि दवाखन्यांना विकतील.

बंद पडलेल्या व्हेंटिलेटर्सना तेव्हढाच ऑक्सिजनचा आधार.

मी काय lihale आहे.त्या वर प्रतिक्रिया काय आहेत .
माझे मत आणि त्या वर प्रतिक्रिया काही संबंध नाही..

दारुड्या माणसाने दारू वाईट आहे हा सल्ला देणे चुकीचंच आहे.
स्वतः मन मुराद प्लास्टिक चा वापर करून.
प्लास्टिक कसं वाईट आहे .
हे चूकच आहे.
मानव ह्यांना माझे हे मत कळले आहे तरी उगाचच विरुद्ध बोलायचे म्हणून.
Co २ चे उदाहरण त्यांनी दिले आहे.

ऋदकशा च्या गळ्यात माळा लविलेस तू भस्म कपाळा.
कधी न घेवून नांगर हाती पिकवलेस माती तून मोती.
हाय अभाग्या भगवे नेसून घर सण्यासून जाशी.
मतितार्थ घ्या फक्त
शुद्ध लेखन सोडा..शब्द शह अर्थ सोडा.
दुसरा कोणी येवून सुधारणा करणार नाही.
ना सरकार करेल ना सिस्टीम.
स्वतः पहिले सुधारा बाकी गोष्टी बरोबर सुधारतील.
असा विचार प्रत्येकाचा हवा

दारुड्या माणसाने दारू वाईट आहे हा सल्ला देणे चुकीचंच आहे.
स्वतः मन मुराद प्लास्टिक चा वापर करून.
प्लास्टिक कसं वाईट आहे .>> तुलना चुकतेय... इथे ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात असणारे प्लास्टिक वापरुन त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात म्हणून त्यांनी ध्वनिप्रदूषणाबाबत बोलू नये हा मुद्दा वरवर कितीही आकर्षक वाटत असला तरी पोकळ आहे....कारण ध्वनिप्रदूषणाचे परिणाम तात्काळ दिसतात त्यामुळे त्याविरोधात आवाजही त्याच प्रमाणे लगेचच उठणार हा साधा तर्क लावायला हरकत नसावी... तुम्ही, आपण सर्वच जी तुलना इथे करत आहोत त्यावर तुम्हाला अभिप्रेत असलेले उदाहरणच द्यायचे झले तर खालील प्रमाणे देउ शकतो

दारुड्या माणसाने रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्याला, रॅश ड्रायव्हिंग करु नकोस असे सांगणे चुकीचे आहे कारण दोन्ही कृतींमुळे जीव जातो आणि दोन्ही कृतींचे परीणाम त्यांच्या कुटुंबीयांना आणि आजुबाजूच्या माणसांना भोगावे लागू शकतात...

इथे दारुडं असणं हे रॅश ड्रायव्हिंग पेक्षा केव्हाही बरं हा सांगण्याच उद्देश नाही आहे तर तुम्ही सांगत असलेली इतर उदाहरणे आणि या पोष्टीत चर्चा होत असलेली समस्या यांची तुलना कुठे चुकतेय आहे हा आहे.

देशात अनेक कायदे आहेत.
१) गुन्हेगार निवडणुकीत उभा राहू शकत नाहीत.

निवडणुकीत सर्वात जास्त गुन्हेगार च उभे असतात.
२) जातीय,भाषिक ,धार्मिक द्वेष पसरवणे गुन्हा आहे.
राजकीय नेते खुले आम् द्वेष पसरवत असतात.
३) आवाज प्रदूषणाचे कायदे आहेत.

सर्रास आवाज प्रदूषण होत असते.
४) पाणी प्रदूषणाचे कायदे आहेत.
सर्रास नद्या, समुद्र मध्ये केमिकल युक्त पाणी सोडले जाते.
यमुना गटार गंगा झाली आहे
कडक कायदे कागदावर आहेत.
अनंत कायदे आहेत,सरकार पण आहे ,सर्व यंत्रणा पण आहे.
तरी ज्या भागात लोक स्वतः सुधारित आहेत तिथे च चांगले वातावरण आहे .ज्या भागात लोक स्वतचं सुधारित नाहीत तिथे स्थिती गंभीर आहे.
कायदा,यंत्रणा मात्र सर्व भागात अस्तित्वात आहे.

ह्याचा अर्थ विचार करून लावा.
उथळ प्रतिक्रिया देवू नका
त्या मुळे आचार्य जी.
लोकशाही,कायदे,पोलिस, system .
ह्यांच्या मुळे काही बदल घडत नाही.
लोक स्वतः सुधारणारे असावे लागतात.

लोकशाही,कायदे,पोलिस, system .
ह्यांच्या मुळे काही बदल घडत नाही.
लोक स्वतः सुधारणारे असावे लागतात.>>> एक गोष्ट नक्की करा...लोकांनी स्वतः सुधरायचयं??... की ज्यांना बदल हवाय त्यांनी लोकांना सुधरवायचयं??
आणि या धाग्यावरच्या चर्चेतून जो प्रमुख प्रश्न उपस्थित झाला आहे तो हा की त्यावरही ज्यांना कोणत्याही परिस्थितीत सुधरायचचं नाहीये त्यांचं काय करायचं?

सतीप्रथा कायद्याने बदलली.
खून होऊ नयेत म्हणून प्रबोधन करणार का तुम्ही? कायद्याचा धाक कशासाठी असतो हे तुम्हाला या जगात राहून समजले नाही?

उगीच विरोध करायचा म्हणून लेंड्या पाडत बसण्याला अर्थ आहे का?
त्यातून लॉजिकल मांडणी करणाऱ्यांवरचा तुमचा राग स्पष्ट दिसतो. त्यांच्या वरची भडास काढण्यासाठी ते जे लिहितात ते करत नाहीत असे तुम्ही म्हणता.

1. तुम्ही स्वतः किती प्रत्यक्ष काम करता? पुरावे द्या.
2. जे सरसकटीकरण तुम्ही विचारवंतांचे केले आहे त्यासाठी काय सर्वे केला आहे?

माझे मत अजून सोप करून सांगतो.
Dj/डॉल्बी चा आवाज खूप मोठा असतो
त्रास दायक असतो.
स्वतः आपण आणि आपले कुटुंब नी ह्या डॉल्बी,/dj पासून दूर राहावे
आपले पाच कुटुंबाशी तरी चांगले संबंध असतात .त्यांना पण आवाज प्रदूषणाचे महत्व सांगा .
ही साखळी बनली तर च बदल होईल.
कायदे,सरकार काही करणार नाहीत.
मतचे राजकारण असते.
हेच माझे मतं आहे.
शेजारी एका कुटुंबाशी नीट संबंध नसतात आणि मोबाईल वर विश्व बंधुता विषयी लिहून काही बदल घडत नसतो.

माझे मत अजून सोप करून सांगतो.
Dj/डॉल्बी चा आवाज खूप मोठा असतो
त्रास दायक असतो.
स्वतः आपण आणि आपले कुटुंब नी ह्या डॉल्बी,/dj पासून दूर राहावे >>>आफ्रिकेतल्या वाळवंटात जावे?? किंवा कुठेतरी दूर सुटीवर जावे?? का आपल्या शांततेत रहाण्याच्या न्याय्य हक्कावर असे निमूटपणे पाणी सोडावे??

हेमंत सर
तुमची टिंगलटवाळी करण्याचा हेतू नव्हता. तुमची मांडणी विस्कळीत असते यावरही आक्षेप नाही. पण सोशल मीडियात चर्चा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे नाही तर इथे लिहू नये या असल्या अडाणचोट आणि दुराग्रही भूमिका एका पोस्ट मधे लिहून थांबत नाहीत. दुर्लक्ष करण्याला पण मर्यादा असते. एकापाठोपाठ एक चार कमेंट्स येतात. हे प्रत्येक पानावर होते. मग विषय काय चालू आहे हे नवीन माणसाला माहिती पडत नाही.

प्रत्येक पानावर चार कमेंट्स एकामागोमाग करण्या ऐवजी विचारपूर्वक एक कमेंट केली तर तिचे वजन जास्त असते. तुम्हाला सुद्धा समजेल काय सांगायचे, समोरच्याला ही समजेल तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे.

आपले पाच कुटुंबाशी तरी चांगले संबंध असतात .त्यांना पण आवाज प्रदूषणाचे महत्व सांगा>> ज्यांना कोणत्याही परिस्थितीत सुधरायचचं नाहीये त्यांचं काय करायचं?

शेजारी एका कुटुंबाशी नीट संबंध नसतात आणि मोबाईल वर विश्व बंधुता विषयी लिहून काही बदल घडत नसतो >> हे सिद्ध करा. सोशल मीडियात लिहिणारे शेजारच्यांशी संबंध नीट ठेवत नाहीत हे कशावरून? पुरावे द्या.

तुम्हाला मी फक्त पाच गणेश मंडळात घेऊन जातो. त्यांच्यात बदल घडवून दाखवा. ओपन चॅलेंज आहे. एक लाख रूपयांची पैज यावर.

रस्त्यावर एका स्कूटी वाल्याच्या दोन्ही बाजूंनी पीएमटी बस वाल्यांनी जोरात बस नेली. दोघांनीही ही त्याला चेमटला. तो भीतीने थरथर कापत होता. गाडी बस समोर आडवी लावून तो पोलिसाला घेऊन आला. तर बसमधले राजकीय पक्षाचे लोक पोलिसाला ओरडले. बस थांबवली म्हणून याच्यावरच गुन्हा दाखल करा म्हणत होते. दोघे मारायला धावले. पोलिसाने त्या माणसाला वाचवले आणि निघून जायला सांगितले. या परिस्थितीत तुम्ही कमिटीवर जाउन बदल करायला सांगताय.

तुम्ही कधी पोलीस स्टेशनची पायरी तरी चढलाय का?
तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका गावात छोट्या वर्तमानपत्रात आलेल्या प्रबोधनात्मक लेखाला भलतेच वळण दिले गेले. त्या संपादकांना मारण्यासाठी पाचशेच्या वर "कार्यकर्ते" जमा झाले होते. माझ्या भावाने डीआईजी रॅंकच्या अधिकाऱ्याला फोन करून त्याचा जीव वाचवला.

त्या लोकांचे तुम्ही मन वळणार का पुढच्या वेळी?

तुम्हाला मी फक्त पाच गणेश मंडळात घेऊन जातो. त्यांच्यात बदल घडवून दाखवा. ओपन चॅलेंज आहे. एक लाख रूपयांची पैज यावर.>>>> तुम्ही तर फारच पर्सनली घेतलं, असे त्यांच्या जिवावर ऊठू नका... Rofl

कोणी personaly घेवु नये.
ही विनंती.
सामाजिक स्थिती मी जशी व्यक्त केली आहे तशी आहे इतकेच माझे मत आहे.
येथील कोणीच पर्सनली घेवून नये. रघु आचार्य मी जेवसमजिक स्थिती च वर्णन केले आहे तसाच अनुभव तुम्हाला तुम्हीच सांगितलेल्या उदाहरणात आलेला आहे.
माझी मत विरुद्ध नसून तुमच्या अनुभव शी समांतरितच आहेत

.
सामाजिक स्थिती मी जशी व्यक्त केली आहे तशी आहे इतकेच माझे मत आहे. >> तुमचं मत स्विकारण्याची सक्ती नाही. मत मांडून शांत रहा नाहीतर सिद्ध करा.

पर्सनल प्रश्नच नाही.
त्यांच्याच प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले.
हे पाकिस्तानात पाठवत होते. तर त्यांच्याच लॉजिक ने ते स्वतः किती काम करून सोशल मीडियात लिहीतात हे त्यांनी सांगितले तर चालेल ना?
ते जर काम करत नसतील तर इथे फुसक्या सोडणे त्यांनी बंद करावे.
नाहीतर लोसांब्र आस्वठगो कंपनीचे ते संस्थापक अध्यक्ष बनतील.

माझी मत विरुद्ध नसून तुमच्या अनुभव शी समांतरितच आहेत>>>> अर्धसत्य....तुम्ही फक्त परिस्थितीशी सहमत आहात पण त्यावरच्या उपायांशी नाही एवढं तर कुणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे..... तुमच्या मता प्रमाणे या सर्वांवर कायदेशीर कडक बंधनांची अंमलबजावणी न करता वैयक्तिक वैचारिक प्रबोधनाने हा विषय निकालत काढायला हवा
आणि न जमल्यास इतर गोष्टी जशा सहन करता तशी ही पण निमूटपणे सहन करायला हवी ज्यावर इथल्या बहुतेकांचा आक्षेप दिसतो आहे

Pages