Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
How To Get Away With Murder >
How To Get Away With Murder >>> ललिता प्रत्येक वाक्याला अनुमोदन.
सगळ्या जोड्या इकडे तिकडे होऊन पूर्ण गुंता होतो.
स्टोरी टेलिंग क्राफ्ट चांगलं आहे. भूतकाळातल्या उड्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या टप्प्यांवर मारलेल्या आहेत. तरी बघताना काहीही गोंधळ झाला नाही>> +100000.
प्रेमप्रकरणांबद्दलं , wait till you see season2 .
सीझन1 चांगला आहे . नंतर story telling technique , escaping murder , affairs सगळं repeative होतं .
आता पुढचा सिझन २०२६ मध्ये
आता पुढचा सिझन २०२६ मध्ये येणारे म्हणे. सॉरीच !! राजामौली ने पण बाहुबली चा पुढचा भाग आणायला इतका वेळ घेतला नव्हता.>>> होना दोन वर्श म्हणजे जरा जास्तच होतात...मागच्या सिझनला विधायकशी एन्ड झालेली स्टोरी पुढे जाण अपेक्षित होतच...बाकी प्लॉट पण ठिक आहे..मला तरी शेवट अ आणी आ अजिबात वाटला नाही..
..
झालं पंचायत-३ बघून. ह्या वेळच
झालं पंचायत-३ बघून. ह्या वेळच स्टोरी टेलिंग फार आवडलं नाही. दोन भाग तर असे वाटले की कथा काही पुढेच सरकली नाही. शेवटचा भाग जेव्हडं वाटलं होतं तेव्हडा वाईट निघाला नाही. दुसर्या सिझनचा शेवटचा भाग जास्त विचित्र होता असं वाटलं!
एकंदरीत सिझन ठिकठाकच. पाहिला सिझन आणि दुसरा वजा शेवटचा एपिसोड ह्यांच्या सारखी मजा नाही आली.
रच्याकने ह्या मालिकेतलं अतिशय कमी इंग्रजाळलेलं हिंदी ऐकायला छान वाटतं!
दुसर्या रच्याकने, पंचायत ऑफिसमध्ये सचिवजींसाठी एखादी बाथरूम / मोरी का बांधून घेत नाहीत.. ? तिथे हँडपंपच पाणी काढून चौकातच आंघोळ करायला सुरुवात करतात..
सचिवजीला रिंकी हळुहळु आवडायला
सचिवजीला रिंकी हळुहळु आवडायला लागली आहे पण तिच्यासाठी नाही परत आला तो, ज्या प्रकारे विधायकाने गाव सोडून जायला भाग पाडलं , त्याचा इगो हर्ट केला त्यामुळे त्याला परत यायचं होतं, काम अर्ध्यात सोडून जायचे नव्हते , ते पण विधायकापुढे हारून !
रिंकी बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे पण त्याचं बाँडिंग प्रधान, प्रल्हाद, विकास या तिकडीशी जास्तं आहे
पहील्या सिझनला विधायक नसतो
पहील्या सिझनला विधायक नसतो बहुतेक, तेव्हा सचिव फुलेराला कंटाळलेला असतो आणि सोडून जायचा विचार करत असतो, तेव्हा तो त्या टाकीवर जातो आणि रिंकीला पहील्यांदा बघतो आणि खुश होतो, एकदम पॉझिटीव्ह वाटायला लागतं त्याला.
सात भाग बघून झाले. घोडा सीन भारी, कसली शक्कल लढवतात.
तो भुषण काय डोक्यावर पडलाय का, पुढे निवडून यायचं तर गावकरी महत्वाचे ना, सतत गावाविरोधात आणि विधायकाच्या मागे.
तसं बघायला गेलं तर भूषण
तसं बघायला गेलं तर भूषण टेक्निकली करेक्ट मुद्द्यांवरून भांडतो , फक्तं तो पॉलिटिकली करेक्ट वागत नाही.
प्रधान बायस्ड असतोच, त्याच्या बायस्ड नेचरचा आणि इतर विकपॉइंट्सचा मुद्दा बनवून स्वतःची संधी साधून घेतो, नथिंग राँग !
पण स्टोरी टेलिंग मधे आपल्याला काही कॅरॅक्टर्स पॉझिटिव, काही निगेटिव असा नरेटिव मांडला आहे
तो बिनोद पण भारी कॅरॅक्टर आहे, भूषणचा चमचा असला तरी व्हिलन नाही वाटत, कॉमेडी सिच्युएशन्स तयार करतो !
ललिता, धन्यवाद.
ललिता, धन्यवाद.
मी एन्जॉय केला पंचायतचा हाही सीझन.
भूषण एकदम वीक स्पॉट हेरून
भूषण एकदम वीक स्पॉट हेरून त्यावर घाव घालतो आणि आपलं प्रधानकीचं घोडं पुढे दामटतो. त्याच्या मुद्द्यात थोडाफार दम असल्याने कोणाला काही बोलता पण येत नाही
मला पण आवडला, बरेच लोक
मला पण आवडला, बरेच लोक डिसपॉइन्टेड दिसतायेत इथे पण मजा आली सिझन ३ मधेही, प्रत्येक एपिसोड सेपरेटली डिस्कस करण्या इतका आवडला !
प्रत्येक एपिसोडमधे वेगवेगळ्या गमती जमती, कधी सिरीयस गोष्टी , एकेका कॅरॅक्टरला डिटेल मधे डेव्हलप केलय टीव्हीएफ् टिमने !
मला तर बांबू , काठ्या, नारळ , पक्षी मारायची बन्दुक इ. वापरून केलेली मारामारीही बघताना मजा आली, फनी होती !
गजब बेइज्जती झालेला जावई पण एक वल्ली आहे , त्याला परत आणले बरं झालं
सगळेच मस्तं अॅक्टिंग करतात पण तो विकास सर्वात भारी अॅक्टर आहे !
तो बिनोद पण भारी कॅरॅक्टर आहे
तो बिनोद पण भारी कॅरॅक्टर आहे, भूषणचा चमचा असला तरी व्हिलन नाही वाटत, कॉमेडी सिच्युएशन्स तयार करतो ! >>> हो हो.
ते कबुतरवाल्याला मारायला पाठवलेले दोघेही फनी होते.
हो, ते विधायकाचे चमचे पण फनी
हो, ते विधायकाचे चमचे पण फनी आहेत, आधी बिडी पीत बसतात टार्गेट बरोबर , बमबहाद्दुर पळवून लावतो त्यांना
तसं बघायला गेलं तर भूषण
तसं बघायला गेलं तर भूषण टेक्निकली करेक्ट मुद्द्यांवरून भांडतो >>> हो घरवाटपाबाबत बरोबर होतं त्याचं पण विधायकच्या गुन्ह्यांकडे मात्र डोळेझाक करतो.
पहिल्या सीझन मधे भूताचे झाड,
पहिल्या सीझन मधे भूताचे झाड, तिथे झालेले भास, मार्केट मधली मारामारी अशा प्रसंगांने मालिका वेगळीच झाली होती. हे सर्व एपिसोडस स्वतंत्र पाहिले तरी मजा आणतात. मालगुडी डेज प्रमाणे होतं ते.
दुसर्या सीझनला गावाची एक कथा हळू हळू बिल्ड होऊ लागली. प्रत्येक एपिसोडसाठी वेगळी पण उत्कंठावर्धक कथा लिहीणे तसेही अवघड आहे. त्यापेक्षा मालिकेप्रमाणे हे सोपे होते. तरीही पंचायत आवडतेच. पण पहिला सीझन कायच्या काय आउट स्टँडींग होता.
आपका एक्झाम कैसा था>> होना
आपका एक्झाम कैसा था>> होना
किती काळजी त्याला अविसेक च्या पास होण्याची.
बंदुकीचा चाप ओढला तेंव्हा तर डोळ्यात पाणीच आले. इतकं कनेक्शन झालय पंचायत शी.
बस मधे गोळीबार च्या वेळी समयसुचकतेने तिकडी सचिव ला चढऊन देते, आणि मग नंतर त्याच्या मनाची घालमेल होऊ नये म्हणुन समोर बंदुकधारी उभा टाकलेला असताना पण विकास जसे त्याला कळवतो की सर्व ठीक आहे, ते बघून खूप जीवात कालवा कालव झाली. किती निस्वार्थ..
असं मागल्या वेळेस फक्त फॅमिली मॅन च्या वेळी तो सहायक मरतो, तेंव्हा वाटलेलं. पंचायत सारखीच मोस्ट अवेटेड सिरीज.
मिर्झापूर मधे सगळे एक एक करून
मिर्झापूर मधे सगळे एक एक करून मरतात तरी काही वाटलं नाही फारसं.. विक्रांत मेल्या वर माझा इंटरेस्ट संपला.
कोणाकोणाला पंचायत ची लास्ट
कोणाकोणाला पंचायत ची लास्ट फायटिंग ही बॅटल ऑफ बागपत वरून प्रेरीत वाटते? पोलीस ठाण्यातील सिन पण.
इच्छुक/Curious लोक just google battle of baghpat
हो अगदी आशु.वाईट वाटतं त्या
हो अगदी आशु.वाईट वाटतं त्या सीन ला
हे बागपत बॅटल चं माहीत नाही पण काल एका बातम्यांत वाचलं की बागपत वरून प्रेरित आहे.हा mla सॅम्पल पण कोणीतरी खऱ्या पात्रावरून असेल.
सध्या पंचायत छा गयी है न्यूज वर.आणि न्यूज उघडून वाचल्या जातात ai ने वाढते त्यामुळे अजूनच लिंक दिसणे.
न्यूज उघडून वाचल्या जातात ai
न्यूज उघडून वाचल्या जातात ai ने त्यामुळे अजूनच. >> स्मॉल लेटर्स मुळे उशिरा ट्यूब लागली. आधी वाटलं तुम्ही आईसाठी पंचायतच्या न्यूज पाठवता कि उलटा क्रम आहे ? (आईने अकबरी सारखं झालं)
गणेश च्या चैनीच्या व्याख्येची
गणेश च्या चैनीच्या व्याख्येची परिसीमा 'चांदी के वरखे वाली मिठाई' आहे हा शोध परत बघताना लागला
पहिल्या सिझन मध्ये बॉक्स मध्ये चांदी के वरखे वाली मिठाई नाही वरूनच सर्व गोंधळ चालू झाला होता ना
घोडा खूपच मस्त आहे.सिझन 4 मध्ये याचा रोल वाढवून हवा (घोड्याचा)
माझे विचार जरा घाईत वेडेवाकडे चालू असल्याने उलट सुलट लिहिलं गेलं, परत एकदा '2 खोल्यांची जागा, भर बुधवारात संडास,बाथरूम स्वतंत्र' वाली केस झालीय.
मला तर विधायकाचीही सॉफ्ट साइड
मला तर विधायकाचीही सॉफ्ट साइड दिसली शेवटच्या एपिसोडमधे , घोडा विकताना त्याला प्रेमानी कुरवाळत रडताना बघून
गणेश च्या चैनीच्या व्याख्येची
गणेश च्या चैनीच्या व्याख्येची परिसीमा 'चांदी के वरखे वाली मिठाई' आहे हा शोध परत बघताना लागला >> हो ना! तरी शिकरण, मटार-उसळ पेक्षा बरय!
https://www.youtube.com/watch?v=DaTbDpaN094&ab_channel=TheViralFever गजब बेज्जती
https://www.youtube.com/watch?v=h0t5N_jvYtM&ab_channel=TheViralFever आचार की पन्चायत
पहिल्या सिझन मध्ये बॉक्स
पहिल्या सिझन मध्ये बॉक्स मध्ये चांदी के वरखे वाली मिठाई नाही वरूनच सर्व गोंधळ चालू झाला होता ना >> अर्रे हो बरोबर. ह्या सीझन मधे गोड वाटलाय गझब बेज्जती वाल्याचा स्वॅग. मस्त अभिनय आहे.
विधायकाचीही सॉफ्ट साइड>> मी तर त्यात ही एसीपी स्टाईल कुछ तो गडबड है दया टाईप बघत होते
विधायक च्या मुलीच्या गळ्यात
विधायक च्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये, तो कबुतर उडवायला आला तेव्हा.
बहुतेक हिला आणतात परत चौथ्या सिझन ला.
धन्यवाद ललिताप्रिती
धन्यवाद ललिताप्रिती
सगळे इतके कामपिपासू का दाखवलेत काही कळत नाही >>
. मी नेटाने ३ भाग पाहिले होते तोवर कामुकता आली नव्हती पण अजुन काही रोचक पण आलं नव्हतं म्हणुन थांबवली.
किती निस्वार्थ.>>> ++११
किती निस्वार्थ.>>> ++११
गोळीबाराचा सीन मधे सचिव बसमधे चढल्यावर पण त्यांची काळजी करत लगेच फोन करतो आणि विकास म्हणतो सगळं ठिक आहे. फार मस्त बाँडींग आहे त्यांचं.
पहिल्या सिझनमधे पण सचिवला गावात आवडत नसतं तेव्हा हे तिघं येऊन त्याच्याशी मैत्री वाढवतात, पार्टीसाठी त्याला घेऊन जातात, त्यात सुख दु:ख शेअरींग, थोडी टांगखिचाई, नोकझोक मस्त वाटते बघायला. रिअल!
प्रल्हादचा एका एपि मधे म्हणतो वक्त से पेहेले कोई नही जायेगा. फार तुटलं तेव्हा.
विधायकचा घोडा जातानाचा शोक पण खरा वाटला.
बिनोदला मस्त फुटेज आहे या सिझनला. त्याची चुन्याची डब्बी पण फेमस झाली
पंचायतचा तिसरा सीझन पुरवून
पंचायतचा तिसरा सीझन पुरवून पुरवून बघितला. हा सिझन पण भारीच आहे - शेवटचा एपिसोड वगळता.
पात्रांचा अस्सलपणा हा पंचायतचा युएसपी या सिझनमध्येही चोक्कस आहे. नविन कलाकारांचे काम तसे सोपे होते कारण त्या कलाकारांचा आपल्या मनावर तसा कुठलाच ठसा नव्हता. रघुवीर यादव, नीना गुप्ता आणि जितूभैया यांच्यामागे ग्लॅमर आहे पण तरीही त्यांनी उभी केलेली पात्रे पूर्णपणे अस्सल वाटतात. रघुवीर यादव यांचा अशा भूमीकेत हातखंडा आहे. नीना गुप्ताची खानदानमधली केतकी ते पंचायतमधली सरपंच ही रेंज खरच अफाट आहे. जीतेंद्र कुमारला वगळून सचीवजीची कल्पना करणं कठीण आहे, इतका तो त्या भूमीकेत फिट्ट झालाय. नविन कलाकारांमध्ये विकास, विनोद, भूषण हे त्याच क्रमाने आवडतात.
पंचायतचा सगळा डोलारा तीच्या पात्रांवरती उभा आहे. अगदी अस्सल पात्रे आणि त्यांच्या आयुष्यातील लहान सहान प्रसंग - म्हणजे पंचायत. कथा काही फार महत्त्वाची नाहीये. सगळे प्रसंग विनोदाच्या फिल्टरमधून चित्रीत केले आहेत. या सिझनमध्ये काहीसा गंभीर विषय असल्यामुळे विनोद थोडा कमी वाटला पण ते आवश्यक होते नाहीतर मालिकेचा टोन बदलून ती फार्सच्या मार्गावर गेली असती.
इतक्या गॅपनंतर नवीन सिझन आल्यावरही कुठेही डिसकनेक्ट वाटले नाही मला तरी (ब्रोकन न्यूजचा नवीन सिझन बघताना पहिला सिझन पुन्हा थोडा बघावा लागला होता, तसे पंचायतच्या बाबतीत झाले नाही. अर्थात दोन्ही मालिका अगदी भिन्न प्रकारच्या आहेत.) अनुने म्हटल्याप्रमाणे आधी पात्रांच्या प्रेमात पाडून थोड्या गंभीर विषयाकडे वळली मालिका - आणि ते खूपच आवडलं.
कामपिपासू कुठे आहेत ? अंजली,
कामपिपासू कुठे आहेत ? अंजली, चौथ्या एपिसोडपासून बघायचं की
पंचायतबाबत पराग आणि आचार्य यांना अनुमोदन. अगदी असेच वाटले.
गोळीबाराचा सीन मधे सचिव बसमधे चढल्यावर पण त्यांची काळजी करत लगेच फोन करतो आणि विकास म्हणतो सगळं ठिक आहे. फार मस्त बाँडींग आहे त्यांचं.>>>>+1
शेवटची मारामारी जमलीय आहे. धमाल वाटली. मला प्रधानपतीवरच घातपाताचा संशय येतो आहे. विधायक खरा वाटला, राजनैतिक कपट असावं काही तरी. सगळेच मॅन्युपुलेटिव्ह आहेत या गावात. प्रह्लाद आपल्या मुलाच्या योगदानाची पैसे सारखं लुटायला बघत असतो. हुतात्म्याचे पैसे घोड्यावर घालताना थोडं अस्वस्थ वाटलं पण मुलगा गेल्याने तो विरक्त झाला आहे आणि गावासाठी त्याला काही तरी करायचं आहे. शिवाय गाववाले अपत्यशोकाची सूट देतात ते त्याला तत्त्वतः पटत नाहीये. हे फार आवडले.
(हा फक्त गेस हां)
(हा फक्त गेस हां)
विधायक ने गोळीबार ऑर्डर केलाय पण भरपूर पैसे देऊन असा जुगाड केला असेल की माणूस पकडला गेल्यावर 'प्रधानजींनी पैसे देऊन स्वतःवर गोळी चालवायला सांगितली' म्हणेल.
दुसरी शक्यता ही की प्रधान आणि बायकोने धोका पत्करून ही चाल खेळली.
प्रल्हाद च्या जीवनात मुलाचं जे स्थान होतं ते बघता त्याला 'मुलगा तर गेला, पैश्यांचं काय करू?जाऊदे मेले ते पैसे कोणाच्याही चांगल्या कामावर' वाटणं साहजिक आहे.
पंचायतचा हा सीझन मी बसून नीट
पंचायतचा हा सीझन मी बसून नीट पाहिलेला नाही. पण ते गाव, ते गावकरी, त्यांचं बोलणं वगैरे इतकं अस्सल वाटतं. सगळी पात्रं आपल्या जागी परफेक्ट बसली आहेत.
पंचायत बघून झाली.
पंचायत बघून झाली.
मला तो स्वानंद किरकिरे (हाच होता ना) फोन करतो आणि विधायकला थांबवतो. त्यानंतर पोलीस आणि दुसरे कोण असतात कलेक्टर का, ते गावकऱ्यांबरोबर जल्लोष करतात तिथे सीझन एंड करायला हवा होता असं वाटलं. जाम फनी होतं सर्व.
तो भूषण डोक्यात गेला हा माझ्या, सचिवाची टीप देतो विधायकला. जर स्वत: प्रधानने हे केलं असेल तर तोही डोक्यात जाईल, उतरेल मनातून.
Pages