Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विलास कोण.
विलास कोण.
विकास विकास.अभिषेक चा
विकास विकास.अभिषेक चा असिस्टंट.
पंचायत चा ४था भाग येणार आहे,
पंचायत चा ४था भाग येणार आहे, तिसऱ्या भागाच्या शेवटी घडणाऱ्या घटना पुढील भागाबद्दल सूतोवाच करतात.
भारंभार सिझन काढू नये असं
भारंभार सिझन काढू नये असं वाटतं. थोडक्यात गोडी असावी.
मात्र आवडतोच.
बघतेय. अजून एवढी ग्रिप आली नाही.
अविसेक
ज्यांनी गुल्लक पाहिली आहे त्याचा पण पुढचा सिझन येतोय जून ७ ला.
पंचायत सिझन ३ पण आवडला !
पंचायत सिझन ३ पण आवडला !
गावातल्या लोकांच्या लाइफस्टाइल मधल्यव छोट्या छोट्या गोष्टी, त्यातून होणारे कॉमेडी टायमिंग्ज, गावताली सगळीच कॅरॅक्टर्स पुन्हा एकदा जिंकून घेतात ऑडियन्सला !
रिंकीचा मठ्ठपणा ऐकताना सचिवाची एक्स्प्रेशन्स भारी आहेत
लिड अॅक्टर्स इतकेच किंवा थोडे जास्तच जगमोहन, त्याची आज्जी , बमबहादूर आणि इतर छोट्या रोल्स मधले गावकरी भारी अॅक्टिंग क्॑रतात, अगदी खरेखुरे वाटतात !
आता सिझन ४ ची वाट पहाणे आले !
डिजे,अनु +१
डिजे,अनु +१
गावातली उतरन्ड अगदी साध्या साध्या गोस्टितुन दिसुन येते.सरपन्चाच मोठ घर ते उपसरपन्च्,सहाय्यक्च पक्क पण लहान लहान होत गेलेल घर..इतर गावकर्याची अजुन लहान होत गेलेली घर... सगळ असल तरीही असलेली आपलुकी, वेळप्रसन्गी धावुन जाण्याची व्रुत्ती...तरी त्यातुनही रन्गलेल पॉलिटिक्स
मागच्या सिझनचा भुषणचा "देख रहा है ना बिनोद" इतका आवडला लोकाना की त्याचा रोल भर्पुरच वाढला या सिझनला...सगळ्यानी छान काम केली आहेत.
पंचायत मधे सगळे अस्सल वाटतात!
पंचायत मधे सगळे अस्सल वाटतात! खरंच तिथले लोकल कलाकार आहेत का महित नाही.
त्या जगमोहनच्या म्हातारी आईने पण कसलं भारी काम केलंय.
विकास विकास.अभिषेक चा
विकास विकास.अभिषेक चा असिस्टंट. >>> हाहाहा. त्यालाच मुन्ना म्हणतातना, तो सडसडीत दिसतोय.
मी खरंच विचार करायला लागले, कोण विलास.
अरे सगळे किती फास्ट बघताय.
दुसरा एपिसोड पाहिला. तो आवडला
दुसरा एपिसोड पाहिला. तो आवडला. आधीच्या सिझन्स सारखा होता. त्यातली ती म्हातारी (जगमोहनची आज्जी) भारी आहे !!
पंचायत ची गंमत अशी आहे की
पंचायत ची गंमत अशी आहे की सुरुवातीला हलकं फुलकं दाखवत एक एक सिझन ते आपल्याला खोलात, गावाच्या सिरीयस इश्युज मध्ये घेऊन गेले.आणि अगदी काही वेगळं अनैसर्गिक घडलं तरी ही पात्रं इतकी घरातली बनलीत की 'हे काय अचाट अतर्क्य दाखवतात' ऐवजी 'अरे असं का वागतायत, आजूबाजूच्यानी जरा समजवा आवरा त्यांना' असं वाटतं.
पंचायत चं खरं गाव महोदिया, सिहोर जिल्ह्यात हेही टुरिस्ट स्पॉट बनलंय.
रिंकी आता थोराड दिसायला
रिंकी आता थोराड दिसायला लागलीय आणि सचिवजीचा साइज सेमच राहिलाय
एका फ्रेम मध्ये असतात तेव्हा तो तिचा लहान भाऊ वाटायला लागलाय.
पंचायत 3 संपवली एकदाची.
पंचायत 3 संपवली एकदाची. सर्वांचा अभिनय नेहमी प्रमाणेच उत्तम पण स्टोरीलाईन पकाऊ आहे. शेवटच्या एपिसोड बद्दल काय लिहावे, इतका bizarre एपिसोड गेल्या दहा हजार वर्षांत झाला नसेल. हीरामंडीच्या फायनल एपिसोडइतका वाईट एपी कधी बनूच शकणार नाही असं वाटलेल, पण याच्यासमोर तो ऑस्कर मटेरियल आहे. पहिले दोन सिझन अप्रतिम होते. यात फक्त व्हिलेज पॉलिटिक्स, ते पण पेटा ने स्पॉन्सर केल्यासारख कुत्रा मारणे काय, कबूतर मारणे काय, घोड्यावरून राडा काय... पकलो.
आवडलेल्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या पात्रांचा अभिनय आणि पटकथेतलं detailing उदा. भूषणच्या घरातल्या खुर्चीवरचं प्लास्टिक कव्हर काढलेलं नसणे, सुरवातीला हिरवा असलेला बांबू हळूहळू सुकत जाणे ई.
सिझन 1 आणि 2 पुन्हा पुन्हा पाहिले आहेत. हा कसातरी ढकलला.
पंचायतसाठी प्राईम घ्यावं
पंचायतसाठी प्राईम घ्यावं लागेल....
अय्यो इतका वाईट आहे लास्ट
अय्यो इतका वाईट आहे लास्ट एपिसोड?मग बघायलाच हवा.हिरामंडी न पाहिल्याने समोर तुलना पट्टी नसेलच.
शेवटचा एपिसोड अचाट आणि
शेवटचा एपिसोड अचाट आणि अतर्क्य कॅटेगरीत अगदी चपखल बसेल. विधायक पण जमिनीवर इतर सगळ्यांबरोबर बसवलेला दाखवले त्यावेळी असे वाटले हा अचानक का दात आणि नखे काढलेला सिंह झाला आहे. बाकी आता फार फार तर अजून १ अथवा २ भाग येतील, त्यापेक्षा जास्त खेचता येणार नाही.
मीही बघत आहे. आऊटस्टॅन्डिग
मीही बघत आहे. आऊटस्टॅन्डिग वाटावं असं काही नाही वाटलं. पहिला सिझन उत्तम होता, दुसरा शेवटचे दोन भाग सोडून चांगला होता. आता संथ वाटायला लागली आहे. एकुण दहा एपिसोडचा सिझन असताना जगमोहनच्या आईवर दोन एपिसोड घालणं अत्यंत अव्यवहार्य वाटलं. शिवाय पहिल्या भागात काहीच झालं नाही. गमतीजमती फारच कमी झाल्या आहेत. कॉमेडी ड्रामा ऐवजी फक्त ड्रामा वर डेलीसोप एवढी कॉमेडी शिंपडली आहे. खेड्यात राहिलेल्यांच्या लक्षात येईल की फुलेरा अत्यंत स्वच्छ, सुंदर घरं, प्रशस्त रस्ते व कमी लोकसंख्या असलेलं खेडं आहे. खऱ्या खेड्यात रिकामटेकडी लोक गटागटाने उभी रस्त्यावर/घरांवर लक्ष ठेवून असतात. आदराने 'पिशवी घेऊ का ताई ?' विचारतील आणि पिशवीतील छोटीशी वस्तू लंपासही करतील. गंमत म्हणजे तो आदर आणि लबाडी दोन्ही खरी असेल.
खेड्यात भयंकर पॉलिटिक्स असते आणि प्रत्येकजण मॅन्युपुलेटिव्ह असू शकते. त्यामानाने इथं धार बरीच बोथट- एकसुरी आहे. इथे सगळे मिळून सचिवजीना आपल्या इच्छेनुसार वाकवतात आणि त्याची चिडचिड होते यात तोचतोचपणा येत आहे. कथानक चांगले आहे, कलाकार उत्तम आहेत तरीही सिझन एकपासून तयार झालेल्या हक्काच्या प्रेक्षकवर्गाला गृहित धरू नये टीमने. अजून विनोदी होऊ शकले असते. दरवेळी विचित्र ट्विस्ट देऊन नंतर दोन वर्षे वाट बघायला लावायची गरज नसते.
अगदी! अजुन तीन भाग पाहिले
अगदी! अजुन तीन भाग पाहिले आहेत. पण ती मजा येत नाहीये. जगमोहन प्रकार सगळाच नाटकी.... म्हणजे नाटकीच करायचा होता, पण तो इनसेप्शनसारखा तीन लेव्हल नाटकात नाटकात नाटक असा काही जान नसलेला वाटला.
खाट बाईकवरुन डोक्यावर आणणे, बांबूच आणणे अशा बारक्या गोष्टी आहेत, पण तितकं पुरेसं नाही.
function at() { [native code] }ई स्वच्छ बाबत ही सहमत.
इनसेप्शन
इनसेप्शन
मलाही ती म्हातारी 'शेवटी नातवाला काहीतरी देऊन प्राण जावेत असं वाटत होतं' म्हणताना तिच्याविषयी सहानुभूती न वाटता ती फक्त लोभी आणि लबाडच वाटली. तो प्रयत्न करायचा नसता, लबाडच राहू द्यायचं. यांचा हेतू म्हणजे 'वरून कितीही लबाड वाटले तरी मनाने मात्र चांगले आहेत होSS' असं दाखवण्याचा असतो. फक्त विधायक कंसिस्टंटली धूर्त..! इतर पात्रही सरळ पूर्णपणे लबाड दाखवा.
मनाने मात्र चांगले आहेत होSS'
मनाने मात्र चांगले आहेत होSS' >> हो ना!
तरी ती बुढिया परत परत मन मे कुछ अच्छा नही लग रहा चा १०८ वेळा जप करते.
लबाड आणि तरी माणुसकी दाखवणारा लाले मधला इन्पेक्टर बघा आमचा!
लाले तो शेवटचा सीन डोळ्यात
लाले तो शेवटचा सीन डोळ्यात पाणी आणणारा, youtube वर आहे, सारखा बघावासा वाटतो रवी किशनसाठी.
भूषण आणि त्याची बायको पण
भूषण आणि त्याची बायको पण कंसिस्टंटली लबाड आहेत.
मागच्या सिझनमधला तो सीसीटीव्ही आणि चप्पलचोरी एपि फार महान होता.
सचिवचं नक्की काय काम असतं लोकं त्याला रात्रीबेरात्री कशासाठी पण फोन करतात.
दुसरा भाग बघितला. रिंकी
दुसरा भाग बघितला. रिंकी पहिल्या सिझनच्या शेवटच्या भागात जास्त आवडली, निरागस गोड वाटलेली, आता थोराड वाटते. सचिवजी आहेत तसेच आहेत.
एकुण दहा एपिसोडचा सिझन असताना
एकुण दहा एपिसोडचा सिझन असताना >>> ८च आहेत ना? मी बघितल तर आठ्वा शेवटचा होता.
पोचर -अॅमेझॉन प्राईम.
पोचर -अॅमेझॉन प्राईम.
पोचर अपेक्षेपेक्षा फारच चांगली वाटली. मूळ मल्याळम आहे पण हिंदी, इंग्लिशमध्ये ऐकण्याचे ऑप्शन्स आहेत.
सरळमार्गी ममव आयुष्यात हस्तिदंती वस्तू वापरण्याचा जाऊचदे पण दिसण्याचाही प्रसंग विरळच असावा. मी फारतर म्युझियम्समध्ये हस्तिदंती वस्तू बघितल्यात की काय असं वाटतंय आता, तोपर्यंत हस्तिदंती सौंदयप्रसाधनाचा करंडा किंवा फण्या किंवा बुद्धीबळातील प्यादी वगैरे उल्लेख पुस्तकांमध्येच वाचलेले. पण पोचरमधून कळले की हत्तींची अवैध शिकार हे किती मोठ्या प्रमाणावरचं प्रकरण आहे ते.
यातील हत्तींच्या शिकारींची दृश्ये फार अस्वस्थ करतात पण त्याची गरजच आहे. हत्ती प्रत्यक्ष मारणार्या लोकांपासून हस्तिदंती वस्तूंची डिमांड असणार्या आणि ती पूर्ण करणार्या लोकांची साखळी यात कव्हर केली आहे. शेवटचे दोन-तीन एपिसोड्स तर श्वास रोधून बघितले.
कुठलेही नावजलेले कलाकार यात नाहीत (याबद्दल धन्यवाद दिग्दर्शकाचे) पण काय चोख काम केलेय सर्वांनी. निमिषा तर सर्वात बेस्ट. तसंच फॉरेस्ट डिपार्टेमेंटमधील लोकाच्या फॅमिली लाईफमधील टेन्शन्स/अडचणी योग्य तेवढ्या प्रमाणातच दाखवल्यात, त्यात आणखी अनावश्यक प्रेमप्रकरणांचे/प्रेमभंगांचे/वेबसिरीज मॅन्डेट असलेल्या समलैंगिकत्वाचे अनावश्यक कोन न जोडल्याबद्दलही दिग्दर्शकाचे खूप आभार. त्यामुळे मूळ समस्येवरील फोकस कुठेही ढळलेला नाही.
त्यासंबंधित बातम्या यानिमित्ताने शोधून वाचल्या पण त्यात कुठेही हस्तिदंती वस्तू विकत घेणार्या भारतातील ग्राहकांची नावे काही दिसली नाहीत. सिरीजमध्ये उल्लेख असल्यानुसार याचे ग्राहक परदेशातच नव्हते तर भारतातही होते(आहेत?). भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या वस्तूंचे ग्राहक असतात आणि त्यामुळेच ती नावे अजून पर्यंत दाबलेलीच असावीत.
कसं आहे ना, फार जुन्याकाळी नव्हे तर अगदी अलिकडे- २०१५ ते २०१७ दरम्यान हे सर्व घडले आणि सत्तर-पंचाहत्तर लोकांना अटक करुन जवळपास पाचशे किलोच्या आसपास १३-१४ कोटी रुपये वर्थ असणार्या हस्तिदंती वस्तू किंवा रॉ हत्तीचे दात दिल्लीत छाप्यात पकडले गेले, त्यामागे तीस (कुठेतरी मी पन्नासही वाचले) किंवा जास्तच हत्ती कर्नाटक-केरळमध्ये मारले गेले, हे सर्व तेव्हा बातम्यांमध्ये नक्कीच असणार पण आपण वाचून विसरुनही गेलेलो असतो. त्याची तीव्रता कळायला पोचरसारखी सिरीज यावी लागली याचा खेदच वाटला कुठेतरी. पण असो. बेटर लेट दॅन नेव्हर.
दुसरा भाग बघितला. रिंकी
दुसरा भाग बघितला. रिंकी पहिल्या सिझनच्या शेवटच्या भागात जास्त आवडली, निरागस गोड वाटलेली, आता थोराड वाटते.>> पहिल्या सिझनच्या शेवटच्या भागातील रिंकी वेगळी होती आणि दुसऱ्या सिझनपासून नवीन रिंकी आली, ती तिसऱ्या सिझन मध्ये पण आहे. २ वर्षे अंतर ठेवल्यावर अजून काय होणार.
पंचायत ३ बघितली . शेवटचा
पंचायत ३ बघितली . शेवटचा एपिसोड फिल्मी वळणाने गेला आहे . विधायक आणि सचिव मधल्या अँग्री यंग मॅन ची अदलाबदल झालीय . ...
हत्ती कर्नाटक-केरळमध्ये मारले
हत्ती कर्नाटक-केरळमध्ये मारले गेले, हे सर्व तेव्हा बातम्यांमध्ये नक्कीच असणार पण आपण वाचून विसरुनही गेलेलो असतो. त्याची तीव्रता कळायला पोचरसारखी सिरीज यावी लागली याचा खेदच वाटला कुठेतरी. >> तीव्रता कळूनही काय फरक पडणार आहे. ते श्रीमंत लोक घेतात त्यामुळे आपला डायरेक्ट त्याच्याशी संबंध येत नाही. पण चामड्याच्या वस्तू घेतात की लोक. तेव्हा त्या वस्तू बघून त्यासाठी कोणता तरी प्राणी मारला गेलाय हे वाटून कोणी हळहळत नाही. तेही सोडा. नॅानव्हेज खाणारी जनता (त्यात मी सुद्धा आहे) आपण जे खातोय त्यासाठी कोणीतरी एका प्राण्याचा जीव घेतलाय हे माहीत असूनही ते खातातच की.
:पॉपकॉर्न:
:पॉपकॉर्न:
अय्यो , अमुकतमुक मला वाटते ते
अय्यो , अमुकतमुक मला वाटते ते तुम्हाला वाटलेच पाहिजे असा आग्रह नाही इ. टीपीकल माबो डिस्क्लेमर वाक्ये टाकायची राहिलीच की
लोल
पंचायत३ चे पहिले दोन भाग खास वाटले नाहीयेत. तरी नेटाने बघावी म्हणतेय.
धन्यवाद डिटेल्स बद्दल वर्षा.
धन्यवाद डिटेल्स बद्दल वर्षा. मी साधारण एक भाग पाहिली आहे आत्तापर्यंत. फक्त तो दिब्येंदू भट्टाचार्य ओळखला (मिर्झापूर च्या दुसर्या सीझन मधला तो यांना मदत करणारा डॉक्टर)
Pages