वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला चालतं.

किंचित संशय पोस्टर बघून आला होता पण नंतर वाटलं नाही. वेबसिरीज पोस्टर वर बरेचदा हिरो व्हिलन असतात ना त्यामुळे आलेला पण नंतर तसं नसेल असं वाटलं, ती त्याची नायिका असेल वाटलं आणि फार गोड दिसत असल्याने ही नायिकाच असेल उगाच आपलं काहीतरी हे ही वाटलं.

दिसण्यावर जाऊ नये किंवा दिसण्याला भुलू नये म्हणतात ते काही खोटं नाही.

उरलेले दोन आज बघेन.

कॅथीला बहुतेक क्राईम पॅट्रोल मधे पाहिलेय किंवा एक साऊथच्या सिनेमात ज्यात मित्र मित्र ट्रीपला जातात.
कॅथीचा चेहरा गोड आहे हे नक्की. नुसतंच सुंदर दिसण्यापेक्षा गोड दिसणारे भाव खाऊन जातात.

वेस्टर्न इंडिपेडन्स वेब सिरीज जिओ सिनेमा.. बरी आहे. मला USA प्राईमवर असणारी the english हि सिरीज बघायची आहे, पण कुठेच सापडत नाही. टेलिग्राम, पायरेट बे वगैरे सगळं झालं. इंग्लिश वेबसीरिज सर्च केल्यावर इंग्रजी भाषेतल्या सिरीज येतात, पण हि येत नाही.

स्पॉयलर्स असतील.

इन्स्पेक्टर ऋषी बघून झाली. शेवटचा भाग छान हॅपनिंग होता. मधले स्कीप करुन तोच बघितला असता तरी चाललं असतं. खरी वनराची आहे कोणीतरी असं दाखवलं ना शेवटी. ती ऋषीला आधी सोडून देते, तो जंगलाला वगैरे त्रास देणारा नसतो. सत्या आणि कंपनीचा जंगल वाचवण्याचा उद्देश चांगला असतो पण जे करतात ते चुकीचं असतं.

त्या वनराचीची अफवा (की खरं) वगैरे पसरुन इतकी वर्ष होऊन काही कोणी पोचर्स घाबरत नसतात. त्यांचं काम सुरु असतं. सत्या कॅथी सगळ्यांना पकडू शकले असते की, कायद्याने शिक्षा करु शकले असते. अर्थात वेळ लागला असता, ह्या मिशनमधे डायरेक्ट अ‍ॅक्शन.

छोटी कॅथी एका अ‍ॅडमधे आहे.

अरे वा झाली का पाहुन?
स्पॉयलर (खरंतर नाही पण तरी आहे) >>>>>
मजा म्हणजे मला सर्वात चरकायला पंख्याच्या सीनने झालं ज्याचा कथेशी संबंध नाही. त्याला दिसते ते खरं की भास?

हो झाली बघून, थँक्स. 10 एपिसोडसऐवजी 8 हवे होते, impact जास्त जाणवला असता. अनावश्यक पसारा काही ठिकाणी जास्त वाटला. त्यामुळे स्लो झालीय पण overall आवडली.

त्याला दिसत असते बहुतेक, ती कॅथि जवळ असते तेव्हा सावध करायला येते असं वाटतं. तो शेवटी परत दिसू नकोस, माझं प्रेम होतं तुझ्यावर असं सांगतो तेव्हा त्याला गुहेतून बाहेर पडायची वाट दाखवून जाते, I think so.

तो सत्या आईची कहाणी कसली खोटी सांगतो, माझ्या डोक्यात हा लहानपणापासून सस्पेन्स पिक्चर बघतो म्हणून डोक्यात काहीतरी शिजते असं आलं त्यामुळे मला तो त्या आदीवासी समुदयातला असतो दाखवलं आहे, ते actually आवडलं.

ऋषीला त्याची गफ्रे दिसत असते. चर्च मधे कॅथी त्याला आत्ता ती इथे दिसतेय का असे विचारते. बहुतेक ती त्याला चहा किंवा जेवणातून औषध देते.
त्याचं मायग्रेन आणि भास दोन्ही थांबतात.
अधून मधून बराचसा भाग मिस झाला. मालिका चालू ठेवून कामं पण चालू होती म्हणून बघून तरी झाली.

तिने चहातून वगैरे देऊन मायग्रेन जातो, भास कमी झाला असेल पण थांबत नाही , तो भास नसतो माझ्यामते, ती सावध करायलाही येते त्याला. शेवटी गुहेत असतो तेव्हा दिसते परत, तो gf ला जायची रिक्वेस्ट करतो त्यानंतर ती नाही दिसत पण जाताना गुहेतून बाहेर पडायचा मार्ग दाखवते, ती उजेडाची तिरीप येते म्हणून मार्ग सापडतो त्याला.

नुकतंच 'गॉट'वाल्या George R. R. Martin चं Nightflyers हे सायफाय पुस्तक वाचलं. नेटफ्लिक्सवर या पुस्तकावर आधारीत सिरीज आहे ती बघायला सुरुवात केलीये. पण या सिरीजवाल्यांनी मुळातलं बेसिकच बदललंय त्यामुळे वैताग आलाय. एका इंटरगॅलॅक्टिकल व्यासपीठावर घडणारी कथा यांनी पृथ्वीपासून सुरू केलीये. च्यामारी!

बघूयात अजून काय गॅलक्स्या तोडतायत!

Bodkin चालू केलीय . Mystery आहे. अजून नक्की पकड घेत नाहीये . बघेन नेटाने.

'द क्राऊन' सगळे सीझन्स बघून झाल्यावर मला वेगळं, सणसणीत काहीतरी हवं होतं.
समान आवडीनिवडी असलेल्या ओळखीपाळखीतल्या काहीजणांनी 'हाऊ टू गेट अवे विथ मर्डर' सुचवली.
ती बघायला सुरुवात केली आहे. कशी निपजते बघू.
पुढे याबद्दल कुणी बोलणार/लिहिणार असाल तर स्पॉयलर अलर्ट द्या प्लीज Proud

Bodkin - Netflix

२० वर्षांपूर्वी हॅलोवीनला गावातून ३ माणसे नाहीशी झालेली असतात. त्याच्यावर पॉडकास्ट बनवायला ३ माणसे गावात येतात. त्या ३ माणसांच्या गायब होण्यामागचे रहस्य उलगडताना गावातल्या इतर माणसांची जडण घडण पण उलगडत जाते.

रहस्य चांगले रंगवले आहे, पण कुठे धक्का बसत नाही. पण प्रत्येक माणसातली ग्रे शेड इतकी सुंदर रंगवली आहे की बघताना मजा येते. खलनायकाबद्दलही थोडी सहानुभूती वाटायला लावतो दिग्दर्शक पण त्याला खलनायकच ठेवतो.

गावात आलेली ती ३ माणसे मुख्य पात्रे आहेत. प्रेक्षकांना पात्राच्या नजरेतून प्रसंगाकडे बघायला लावणे यात त्या पात्राचे खरे यश असते आणि या मालिकेत ते साधलं आहे. कधी रहस्य तर कधी ड्रामा अशा दोन्ही अंगांनी कथा पुढे सरकर जाते. वेग किंचित कमी आहे आणि आयरीश उच्चार समजण्यात बरेच अडथळे येतात पण तरी मालिका सुंदरच आहे.

@स्वस्ति, नक्की बघा.

ललिता, तूच सांग तुला कशी वाटली. मी एकदा ट्राय करून सोडून दिली होती. चांगली असेल तर बघेन नेटाने.

>>> ललिता, तूच सांग तुला कशी वाटली. मी एकदा ट्राय करून सोडून दिली होती. चांगली असेल तर बघेन नेटाने.
सेम हिअर.

Bridgerton S3 - यावेळी Francisca चा debut आणि ती खूप सुंदर दिसते.
Kate आणि Anthony अजूनही honeymoon mood मध्येच आहेत. सासूच्या हातात हात गुंफून फिरणार्या केटला बघून डोळे पाणावले.
यावेळी मुख्य कथा Penelope भोवती फिरतेय आणि Colin .

आयपी टिव्हीवर प्रकाश संत ह्यांच्या लंपन कादंबरीवर आधारीत सिरीज आली आहे. फार मस्त आहे. लंपनचं काम केलेला मुलगा आणि बाकी सगळ्या लहान मुलांची अ‍ॅक्टिंग भारी जमली आहे. जिथलं शुटिंग आहे ते गाव, घर पण फार सुंदर.

मर्डर इन माहिम जिओ सिनेमा वर आहे. विजय राज आशुतोश राना लीड रोल मध्ये आहेत. LGQBT समाजातील लोकान्च्या एका मागोमाग एक होणार्‍या हत्यांवर आधारित आहे. वन टाईम वॉच आहे.

फारएण्ड, A Man in Full सुचवल्याबद्दल धन्यवाद. आप्रतिम सिरीज आहे.

होणारी पडझड अगदी टायटल्सपासूनच समजते - अर्थात हा वेगळेपणा दुसर्‍या भागापासून समजतो. पहिल्या भागात सगळी मुख्य पात्र पडद्यावर मांडून ठेवायचा आत्मविश्वास जबरी आहे. सहसा नाट्यमयता वाढवण्याकरता एखादे पात्र नंतर आणले जाते पण तसे काही केले नाहीये.

जेफ डॅनिअल्स भारीच आहे. Fly away home मधला आणि या मालिकेतला जेफ डॅनिअल्स यात दिसण्यात खूप फरक आहे पण अभिनय मात्र तस्साच आहे!

खूप उत्साहाने लंपन बघायला घेतली. मी काही पुस्तक वगैरे वाचलेलं नाही. इथे तिथे वर्णन वाचून एक गमत्या मुलगा एवढीच ओळख होती मला. जस्ट लाईक मालगुडी डेज सारखं काही असेल असं वाटलं. पण थोडी निराशा झाली.

तरी ते गाव, वातावरण, मांडणी, चूल घरं सगळं छान वाटतं बघायला. फार सुंदर उभं केलंय.
पण लंपनच्या आईचं त्याला आजी आजोबांकडे अचानक सोडून जाणं त्याचं कंसेंट न घेता (म्हणजे कारण कळलं नाही पुढच्या भागात असेल तर माहित नाही मी ३ बघितले.), जेव्हा नंतर ती गावी येते तेव्हा ती बिचार्‍या लंपनकडे बघत पण नाही. इतकं काय बिझी असतं का कोणी गराड्यात की पोटच्या पोराकडे लक्ष जाऊ नये आणि तो बिचारा चिमणा आई आई करत राहतो.
सॉरी पण माझ्यातल्या इमोशनल आईला ते नाही बघवलं.
त्यात अजून ती गितांजली तर अजिबात आजी वाटत नाही, शाळेत कशासाठी ओरडतायत का घरी आणून सोडलंय याचा विचार न करता काय तोंडसुख घ्यावं इवल्याशा मुलावर. ते अरेरावी करणारे कोणाचे कोण आजोबा बळंच शिकवणीसाठी काय घेऊन जातात.
दयाच आली लंपनची. तेव्हाचा काळ असाच वगैरे सगळं मान्य पण मला नाही आवडलं.

गितांजली कुलकर्णी मला कायम आजीटाईपच वाटते. तरुण नाही.
लंपनची आई त्याला गावी का आणते ह्याचं कारण मलाही कळलंच नाही. आईचा (कादंबरी कदम) अभिनय इतका मठ्ठ आहे की मला चीडच आली तिची. बाकी गावी येते तेव्हा तर तिचं त्याला जवळही न घेणं, दुर्लक्ष करणं मला झेपलंच नाही.
ज्या दिवशी मी ही सिरीज पाहिली त्याच दिवशी मी तिची मुलाखत पाहिली होती त्यामुळे मला आणखीन वैताग आला. आव तर आपण महान अ‍ॅक्ट्रेस असल्याचा आणतात.

हो ना मलाही लंपन ची आई जाम स्वार्थी वाटली. स्वतःला ३ लहान मुले झेपत नाहीत तर एकाला सोडले आ़ईकडे. ते नसेल कारण पण तिने त्याला सांगताना एवढेच म्हटलेय की आजी अजोबांजवळ कुणीतरी असावं म्हणुन तुला इथे ठेवले. बिचार्‍या लंपन चे वाईट वाटते., इतका आई आई करत असतो तर किती वेळ लक्षच देत नाही. माझेही ३ च भाग बघून झालेत.

A Man in Full - विशलिस्टला टाकली.

जेफ डॅनियल्स म्हणजे 'न्यूजरूम'मधला मॅकअव्हॉय का?

Pages