भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चर्चा. Happy
मला पुन्हा 'एक डाव धोबीपछाड' मधला सुबोध भावेचा 'ही दक्षिणेकडची लोक...... ' संवाद आठवला.
वावे Wink

रोशनचा ‘लखलखित’ हा अर्थ सर्वपरिचित.

पण खालील अर्थ देखील वैशिष्ट्यपूर्ण वाटले :
१. विशद; स्पष्ट; श्रुत
२. सुरेख.

अह = दिवस
निव्वळ हा शब्द वापरलेला पाहिला नव्हता. (सं. अहन्)

अहर्निश (= रात्रंदिवस) हा मात्र बऱ्यापैकी वापरात असतो.

अह = दिवस>> अहोरात्र पण आहे.

कुमार जि. तुम्ही मागे कारा= ब्रम्हचारी ह्याचा रेफरन्स हवा होताना? तो नेमाड्यांच्या बिढार/ जरीला/ झूल ह्या पुस्तकात रग्गड आलेला आहे.

जरीला मध्ये एक दोन पानी ललित स्वगत फार छान आहे स्त्री म्हण जे ओल ओलावा. कार्‍या माणसाची अशी काय ओल असेल. पुढे एक्स्प्लनेशन आहे. Wink पण ओल चा मोठा परिच्छेद फार चित्रद र्शी. आहे.

अमा
चांगली माहिती. धन्यवाद !
..
सामान्य भाषेत अह नेहमी जोडशब्दातच दिसतोय.

मला आठवतंय त्याप्रमाणे गौरी देशपांडेंच्या पुस्तकात कुठेतरी 'कारा' हा शब्द 'तरुण, लग्न न झालेला' अशा अर्थाने आला आहे. शोधून सांगते इथे.

यावरून एक स्पष्ट झाले.
कारा हा शब्द त्या अर्थी (लग्न न झालेला) प्रमुख शब्दकोशांमध्ये ( बृहदकोश, शब्दरत्नाकर आणि प्र. न. जोशींचा कोश) नसला तरी तो मराठी साहित्यात त्या अर्थाने वापरलेला दिसतोय. या निमित्ताने प्रादेशिक बोलीमधील कोशही असावेत आणि असल्यास बघितले गेले पाहिजेत हे पटले.

अस्मिता Lol
मी हिंदी भाषक मुलींना 'मैं देख रहा हूँ, मैं गया था' वगैरे बोलतानाही ऐकलेलं आहे. पण हा एक अनौपचारिक, मजेत बोलण्याचा प्रकार आहे असा माझा अंदाज आहे. ते ऐकायलाही छान वाटतं.

शबलित
हा शब्द वाचल्यानंतर अर्थ पाहायला गेलो तर फक्त ' शबल' कोशात दिला असून त्याचा अर्थ गोंधळात टाकणारे,गढूळ
असा आहे.

मूळ वाक्य असे आहे :
या विधीनाट्यांची शक्तीही क्षीण व शबलित होत गेली.

“शबलित”चा नक्की कसा अर्थ घ्यावा ?

जुगुप्सा
= निंदा; निर्भर्त्सना; दोष देणे

प्रथमच वाचला :
".. त्याबद्दल त्याच्या मनात एक सूक्ष्म जुगुप्सा आहे."

'विदीर्ण' हा नेहमी वाचनात असतो.
परंतु, ' विशीर्ण
हा प्रथमच वाचला.
(.. ते झडूनझडून विशीर्ण झाले आहे).

निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे ल्यावे लालसर कानी अशी कविता आहे इंदिरा संतांची .

दीर्ण - विदीर्ण , छिन्न- विच्छिन्न , शीर्ण विशीर्ण अशा समानार्थी जोड्या मला नेहमीच बुचकळ्यात टाकतात

Interesting!
विदीर्ण म्हणजे broken in half, तर विशीर्ण म्हणजे मोडकंतोडकं, विरायला लागलेलं असं दिसतंय.
आणि जीर्ण म्हणजे जुनं.

>>> विशीर्ण वस्त्र हो, विदीर्ण पावले
परफेक्ट उदाहरण!

दीर्ण- शीर्ण - जीर्ण चर्चा उत्तम !
सर्वांना धन्यवाद.

दीर्ण व शीर्ण हे दोन्ही स्वतंत्रपणे आणि वि लावून देखील शब्द आहेत.
मात्र विजीर्ण असा काही शब्द काही कोशात नाही !

audakchaudk.jpg

काय दिसतय चित्रात ?
अर्थात पसारा !
यासाठी एक मजेदार शब्द आहे :
..
..
औडकचौडक (आवडकचवडक).

याचा दुसरा अर्थ ‘लहान मुलांचा एक खेळ’ असा असून त्यातले मजेदार गाणे बृहदकोशात वाचता येईल.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%94%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%9A%...

इतरत्र चर्चा चालू होती, तिथला प्रतिसाद वाहून जाईल म्हणून इथे चिकटवतो आहे. ऋग्वेदात हिंदू शब्दाचा उल्लेख आहे असा कुणीतरी दावा केला आणि त्यासाठी खालील श्लोक दिला होता. त्यावरून मानव यांनी त्या श्लोकाचा अर्थ काय ही विचारणा केली होती. खाली माझा तिथला प्रतिसाद -

----------

विभिन्द्रुनाम्नोराज्ञः सकाशाद्बहुधनं लब्ध्वा तदीयं दानं इदमादिकेन द्वृचेन प्रशंसति हेविभिन्दोराजन् ददत् दाता त्वं अस्मै मह्यमृषये चत्वारि अयुता अयुतानि दशसहस्राणि चत्वारिंशत्सहस्राणि शिक्ष अशिक्षः दत्तवानसि परः परस्तात् ऊर्ध्वमपि अष्टसंख्याकानि सहस्रा सहस्राणि च दत्तवानसि ॥ >> हे वाचूनच हा श्लोक नाही हे लक्षात येतं आहे. ऋग्वेद काळात मुक्तछंद नव्हता Wink

मूळ ऋचा, ऋ ८-२-४१ खालीलप्रमाणे
शिक्षा॑ विभिन्दो अस्मै च॒त्वार्य॒युता॒ दद॑त् । अ॒ष्टा प॒रः स॒हस्रा॑ ॥
हे शिक्षा (दानशूर? Liberal असा अर्थ दिला आहे) विभिंदू, तू मला (खरं म्हणजे अस्मै याचा अर्थ ह्याला असा होईल. अयम् चतुर्थी एकवचन. अस्मद् नाही. नाहीतर मह्यम् झालं असतं. पण इथे ह्याला म्हणजे स्वतःला उद्देशून ह्या पामराला टाईप म्हटलं असावं.) चार दशसहस्र (=अयुत) दिले. वर आणखीन आठ सहस्र दिले.
एवढंच आहे. वरती तुम्ही दिलेलं हे विस्तृत विवेचन असावं आणि त्यात नेहमीप्रमाणे फॉरवर्ड करणाऱ्यांनी कंस आणि विरामचिन्हे गाळली आहेत. किंवा पूर्वी लिहिलेली कुणाची टीका असल्यास त्या काळात विरामचिन्हे भारतात अस्तित्वातच नव्हती. ते कमी म्हणून की काय, पण व्याकरण गंडवलं आहे. वाचकाला नीट कळूच नये याची खबरदारी हे लोक घेतात.

विभिन्द्रुनाम्नोराज्ञः सकाशाद्बहुधनं लब्ध्वा तदीयं दानं इदमादिकेन द्वृचेन प्रशंसति >> मी इथे व्याकरण सुधारून लिहितो. विभिन्दुनाम्नो राज्ञः सकाशाद्बहुधनं लब्ध्वा तदीयं दानं इदमादिकेन द्वृचेन (= द्वि ऋचेन?) प्रशंसति.
हे वाक्य त्या मूळच्या दोन ऋचांची पार्श्वभूमी आहे, ज्याने लिहिली आहे त्याच्या अंदाजानुसार. अर्थ असा -
विभिन्दुनाम्नो राज्ञः सकाशात् - विभिंदु नावाच्या राजाच्या जवळून (सकाश म्हणजे जवळ)
बहुधनं लब्ध्वा - खूप धन मिळाल्यावर
तदीयं दानं - त्या(संबंधी) दानाची (तदीय म्हणजे त्यासंबंधी)
इदमादिकेन द्वृचेन - ह्या आणि अश्या दोन ऋचांच्या (समूहा)ने
प्रशंसति - प्रशंसा करतो आहे. (कोण करतो आहे, तर आजच्या भाषेत लाभार्थी)

हेविभिन्दोराजन् ददत् दाता त्वं अस्मै मह्यमृषये चत्वारि अयुता अयुतानि दशसहस्राणि चत्वारिंशत्सहस्राणि शिक्ष अशिक्षः दत्तवानसि परः परस्तात् ऊर्ध्वमपि अष्टसंख्याकानि सहस्रा सहस्राणि च दत्तवानसि >> व्याकरण सुधारून
हे विभिन्दो राजन्, ददत् (दाता), त्वम् अस्मै (मह्यमृषये (= मह्यम् ऋषये = ऋषी असलेल्या मला)) चत्वारि अयुता (अयुतानि/दशसहस्राणि) (चत्वारिंशत्सहस्राणि (= चाळीस हजार)) शिक्ष (अशिक्षः/दत्तवानसि (=दिलेस)); परः (परस्तात्) ऊर्ध्वमपि अष्टसंख्याकानि सहस्रा (सहस्राणि) च दत्तवानसि.
इथे वरती कंसातले शब्द हे त्याआधीच्या शब्दांचे संस्कृत अर्थ दिले आहेत. थोडक्यात elaborate केलं आहे. कंसातल्या कंसात मी लिहिलं आहे. आता वाचकांना ह्या वाक्याचा अर्थ लागेल अशी आशा आहे.

विभिन्दु = (दुष्टांना) भेदणारा/ नाश करणारा. इथे हिंदूचा काही संबंध नाही.

Pages