भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवि - वा. गो. मायदेव

विटीदांडूचा खेळ मजेदार
धूम चालुनिया लोटली बाहर
गुंग झालेला बाळ खेळण्यात
एक बाई मोटारितुनी पाहत

बघाया त्या गुटगुटीत बालकास
झणी थांबवी अपुल्या मोटारीस
तोच मुलगा मोटारिवर चढून
म्हणे गाडी का दिली थांबावून

तुला न्याया ही थांबाविली पाहि
झणी बाबांना विचारून येई
आई म्हणते बाबांस असे नेले
वरी देवाने त्यांस बोलविले

बरे जाऊनिया कोट तुझा आण
आई आहे शिवणार हो अजून
बरे चल तू ऐसाच मोटारीत
घरी आमुच्या देईन तुला कोट

खेळ खाऊ देईन तिथे राही
बाळ उतरे मोटारिवरुनीही
घरी आमुच्या का सांग येत नाही?
तिथे माझी असणार नाही आई!.....

शंका :
" हे माझे वैयक्तिक मत आहे " या वाक्यात माझे आणि वैयक्तिक या दोन्ही शब्दांची गरज असते का ?
का पिवळा पितांबर होतोय ?

संस्थेत पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने हे माझे वैयक्तिक मत आहे, संस्थेशी त्या मताचा संबंध नाही, असं म्हटलं तर चालावं.
इतर ठिकाणी वैयक्तिक शब्द उगाच आहे.

बरोबर, म्हणजे संयुक्त वाक्यात त्याचा वापर ठीक दिसतो.
पण माझी शंका मुळातूनच आहे.
ते दोन्ही शब्द एकाच वाक्यात असतात तेव्हा ते समानार्थी नसतात का ? दोन्ही वापरून पुनरुक्तीच होते.

" हे माझे मत आहे, संस्थेशी त्या मताचा संबंध नाही"
हे पुरेसे नाही का ?

Happy कधीकधी 'ठासून' सांगायला पण द्विरुक्ती वापरल्या जाते ना... !!

तुला किती वेळा सांगायचं...तिथे, अगदी तिथ्थेच, जाऊन कशाला खरेदी करायची?
हा माझा स्वतःचा बंगला आहे !
तसेच..
(अर्थात) हे माझे वैयक्तीक मत आहे !
त्यात तुमचे मत वेगळे आहे ...(हे मला माहिती आहे!) हे अधोरेखित होते!

आजचा शब्द कदाचित प्राचीन वाटू शकेल परंतु गेल्या पंधरवड्यात प्रकाशित झालेल्या एका लेखात तो वाचण्यात आला.
आपाततः
(आ + पत् + -पात + तः)
=
१. खोटे ठरेतोपर्यंत, खोडून टाकीतोपर्यंत टिकणारा, चालू (मुद्दा, उलगडा, अनुमान, उपपत्ति).
२. प्रथमदर्शनी; अगदी आरंभी; प्रथमच; चटकन; तत्क्षणी.
३. योगायोगाने

(.... दोन्ही घटना निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या आहेत. आपाततः सुनियोजितही असाव्यात).

दान देणाऱ्यासाठी जसा “दाता” हा सुरेख अल्पाक्षरी शब्द आहे तसा दान घेणाऱ्यासाठी अल्पाक्षरी नाही.

घेणारा किंवा प्राप्तकर्ता ही दोन नावे सुचली.
अजून काही सुचवा.

भोक्ता?
याचक असणारा/नसणारा पण दानाचा भोग घेणारा.

याचक माझ्या मनात आला होता पण तो प्रत्येक प्रसंगी बरोबर वाटेल का ?
उदाहरणार्थ, रक्तदानासंदर्भात रक्तयाचक हे बरोबर वाटते का ?

भोक्ता = उपभोग घेणारा, भोगी, ग्राहक.

ग्राहक काही प्रसंगी चांगला आहे पण त्या शब्दाला एकूणच व्यापारी छटा आहे

स्वीकारकर्ता. हा अल्पाक्षरी नाही मात्र.
‘घेता’ चालेल का?
Payeeला घेणेकरी म्हणतातच.

‘घेता’ >>>> बरोबर आहे :

घेता, घेधा = (वि). घेणारा
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
धन्स.

रक्तभोक्ता म्हणजे vampire >> Lol Lol

‘घेता’ >> माहीत नव्हता. याचक म्हणजे दान मागणारा ... त्याला दान मिळेलच असं काही नाही Wink घेता म्हणजे आजच्या भाषेत 'लाभार्थी'. कुणीसं म्हटलेलंच आहे - ऐ दिले ना दान.

दान स्वीकार करणार्‍याला स्वीकर्ता सुचवला असता, पण घेता हा सोपा शब्द आधीच असताना उगीच संस्कृतोद्भव स्वीकारायची गरज नाही.

खरं लाभार्थी म्हणजे 'लाभाची इच्छा करणारा' अशी माझी समजूत होती. पण लाभ मिलाल्यावर त्याला लाभार्थी म्हणतात म्हणे. उम्ही नक्की कुठला अर्थ घेता?

लाभार्थी म्हणजे 'लाभाची इच्छा करणारा' >>> असेच वाटते
पण ..
पोटार्थी = भोजनवादी (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%...)
तेच तत्व लाभार्थीला पण लागू होईल का ?

किनखाप = ब्रोकेड

बनारसी साड्यांच्या वर्णनात किनखापी शब्द वापरतात.

विकीपिडियातून.....

Kimkhwab (Kim-Khwab, kamkhāb, ḳamkhwāb, Kimkhwab, Hiranya, puspapata) is an ancient Indian brocade art of weaving ornate cloth with gold, silver, and silk yarns. Kinkhwab is a silk damasked cloth with an art of zar-baft (making cloth of gold),[1] The weave produces beautiful floral designs that appear embroidered on the surface of the fabric. it was also known as puspapata or cloth with woven flowers.[2][3][4][5]

Kimkhwab is a fabric of silk with leaves and branches woven in it "Kamkwabs, or kimkhwabs (Kincob), are also known as zar-baft (gold-woven), and mushajjar (having patterns)."—Yusuf Ali[6] The mushajjar is also mentioned in Ain-i-Akbari.

‘अहिमाणे, कलहसील’
याचा अर्थ काय ?

आजच्या मटामधील एका लेखातले वाक्य :
‘अहिमाणे, कलहसील’ हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण दिल्लीतही दिसणार नाही, असे कसे होईल ?

Pages