भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> इतरांना खटकणारं काही दिसलं की विदर्भात असं असतं असं सांगायची एक पद्धत असावी
Lol

धन्यवाद !
पुर >>> पौर याचा आणि पुरुवंशीय राजा पोरस याचा काही संबंध असावा का ?

पुरुवंशीय राजा पोरस >> मला वाटतं पुरु या शब्दाचंच ग्रीक रूप पोरस असं झालं असावं. मूळ नाव पोरस नाही.

अलेक्झांडरचं सिकंदर किंवा अलक्षेंद्र करून आपण त्याचा वचपा काढला. Wink

अलक्षेंद्र करून आपण त्याचा वचपा काढला. >>>> Lol
हर्पा+१
'सहा सोनेरी पाने' वाचलं आहे अनेक वर्षांपूर्वी. त्यात यावर विस्तृत लिहिले आहे.

तीन पुरु आहेत.
पहिला 'पुरुरवा व उर्वशी' कथेतील कुरुवंशीय सम्राट.

दुसरा त्याचाच शर्मिष्ठेपासून झालेला नातू, पुरु.
'ययाती- कांड' झाल्यावर याचा पराक्रम व त्याग बघून
यालाच हस्तिनापुराचा राजा करण्यात आले. यांचे वंशज 'पौरव' झाले आणि पौरवांचा अपभ्रंश 'कौरव' झाला. ही माहिती मात्र कुठं वाचली आठवत नाही.

तिसरा हा पोरस -पुरु.

'महापौर' हा शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिला आहे.

पुरुचा कुरु >> अच्छा! हे माहीत नव्हतं. त्याकाळीही कुठल्यातरी आनंदीबाई झाल्या असतील, ज्यांनी प चा क केला.

>>> पौरवांचा अपभ्रंश 'कौरव' झाला.
मी कुरू हा पुरूच्या वंशातला सम्राट होता असं वाचलंय. तो नोटेबल असल्यामुळे त्याचे वंशज कौरव नावाने ओळखले गेले. पुढे पंडूची मुलं कुरुवंशातलीच असूनही पांडव म्हणून ओळखली गेली तसंच.

इथे वंशावळ पाहता येईल.

अलक्षेंद्र >> हा शब्द माझा नाही. पहा - नव्वदच्या दशकात आलेली चाणक्य ही मालिका.

तो नोटेबल असल्यामुळे त्याचे वंशज >> हे शक्य आहे. कारण तशी पद्धत होती. इक्ष्वाकु कुल हे पुढे रघु कुल म्हणूनही ओळखले गेले. फक्त राम सोडून बाकी कुणाला राघव म्हटल्याचे ऐकिवात नाही. कुरू कुळातले सगळे कौरव तसे रघु कुळातले सगळे राघव असायला पाहिजेत.

वाचलं स्वाती.
मला खात्री होती कारण पुरुरवा आणि पुरुबद्द्ल वाचलं होतं आणि कुरुबद्दल वाचलं नव्हतं, पण दिसतोय कुरु. Happy

देवयानीला दोन व शर्मिष्ठेला तीन पुत्र होते. देवयानीचा मोठा मुलगा 'यदू' त्याच्यापासून यदूवंश झाला व शर्मिष्ठेच्या 'पुरु' पासून पुरुवंश झाला.

अवांतर -
महाभारत फार गुंतागुंतीचे आहे. शेवटचा 'बायॉलॉजिकल कुरु' किंवा पूर्णपणे क्षत्रिय भीष्म होता आणि नंतर सगळे व्यासवंशीय होते, म्हणून 'स्वयंघोषित' युवराज असलेल्या दुर्योधनाने गडबडीने स्वतःला 'कौरव' आणि पंडू पुत्रांना 'पांडव' म्हणून प्रचलित केले हेही वाचले होते. आपणच खरे 'कौरव' दाखवण्यासाठी आणि हे वनात जन्मलेले कुंतीपुत्र औरस नाहीयेत हे जनमानसात बिंबावं म्हणून. राजनैतिक खेळी का काय..!

'कुरु' पुरु आपलं पुरे करते.

ते बाळाचं नाव ठेवून कानात कुरर्रर करायची प्रथा कुरूच्या नावापासूनच पडली असावी. कानात नाव सांगताना इतरांना वाटलं असेल की आत्याबाई कानात कुरर्रर करतायत.

त्याचं नाव रुद्रवेद असावे आणि आत्याबाई मायबोलीकर असाव्यात. त्यांनी कानात नाव सांगताना कुमार रुद्रवेदचे कुरु केले असावे.

मंडळी,
चला, विविध मते, पुरु- कुरुची वंशावळ आणि विनोद या सर्वांमुळे मजा आली Happy

वावे Lol

वावे Rofl

वावे Lol

Pages