Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होय, हाच तो रायआवळा
होय, हाच तो रायआवळा
बरळणे
बरळणे
हा अगदी परिचित शब्द आहे. या संदर्भात काल झोपेच्या धाग्यावरील ( https://www.maayboli.com/node/84529?page=3 ) चर्चेत चावळणे हा समानार्थी शब्द ऋतुराज यांनी वापरला आणि कुतूहल चाळवले गेले.
त्याचा अधिक शोध घेतला असता त्याचे अनेक समानार्थी शब्द पुढ्यात येऊन पडले ते असे :
आरबळणे, अरंबळणे
जाबडणे, जाबणे
झळपेंवचे/ झांकचे (गोव्याकडे)
ओसळणे, ओस्णावणे
उसणणे
जळपणे (= रागाने बरळणे).
जाबडणे, जाबणे
यातील उसणणे तेवढा ऐकला आहे.
यातील उसणणे तेवढा ऐकला आहे.
ओह! नवीन शब्द कळाले.
ओह! नवीन शब्द कळाले.
आरबळणे आणि उसणणे माहीत होते
आरबळणे आणि उसणणे माहीत होते
बाकी सर्व नवीनच. धन्यवाद
पाहिले नाव काय आहे ?
पाहिले नाव काय आहे ?
आवळा का?..वेगळा दिसतोय आकार...
रायआवळाhttps://mr.wikipedia
रायआवळा
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4...
कानडी
कानडी
याचा नेहमीचा अर्थ 'कर्नाटकासंबंधी' हा आहे हेवेसांनल
त्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे :
दुर्बोध, अगम्य
(मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
लहानपणी पालक किंवा शिक्षकांनी केलेली आज्ञा आपण पाळली नाही की ते म्हणायचे, “आता मी काय कानडी बोललो का?”
त्याची आठवण झाली.
हे माहिती नव्हते . ' लॅटिन
कानडा हो विठ्ठलु
कानडा हो विठ्ठलु
ही एक मजाच आहे. मराठी लोक
ही एक मजाच आहे. मराठी लोक दुर्बोधला कानडी म्हणतात. तेलगू (आणि कदाचित कानडी लोकही) मल्याळम म्हणतात. सीरियन लोक संस्कृत म्हणतात (अजूनही म्हणतात का माहीत नाही, पूर्वी म्हणत असत).
तेलगू (आणि कदाचित कानडी लोकही
तेलगू (आणि कदाचित कानडी लोकही) मल्याळम म्हणतात. सीरियन लोक संस्कृत म्हणतात (अजूनही म्हणतात का माहीत नाही, पूर्वी म्हणत असत).>>>>>>>खरंच?
तेलगू - मल्याळम - हे एका
तेलगू - मल्याळम - हे एका तेलगू मित्राकडून ऐकलं होतं. सीरियन कुठे वाचलं होतं लक्षात नाही. कधी पुन्हा सापडला संदर्भ तर इथे देईन.
थोडक्यात काय, तर आपल्या
थोडक्यात काय, तर आपल्या शेजाऱ्याशी आपलं सहसा पटत नसते- मग ते राज्य असो किंवा देश.
मग असा प्रत्येक शेजारी दुसऱ्याच्या नावाने असे खडे फोडत असतो
इंग्लिशमध्ये नाही का वैगुण्य दाखवणाऱ्या अनेक म्हणी फ्रेंचांच्या नावाने आहेत ( फ्रेंच लिव्ह... इ.)
ते कानडी मल्याळम वगैरे
ते कानडी मल्याळम वगैरे वैगुण्य दाखविण्याच्या उद्देशाने नसावं. दुर्बोधता हेच कारण असणार. कारण तेलगू लोक कानडी किंवा तमिळ म्हणू शकले असते, पण त्या भाषांमध्ये बरंच साम्य असल्यामुळे त्यांना एकमेकांचे काही शब्द तरी कळतात. पण मल्याळम ही जास्त दुर्बोध आहे.
अच्छा ! मुद्दा समजला.
अच्छा ! मुद्दा समजला.
या निमित्ताने पुलंचा विनोद आठवला :
" पोत्यात भांडी भरून ते पोते जिन्यावरून गडगडत खाली सोडून दिल्यावर जो आवाज येतो तो"..
(चु भू दे घे))
सोपानमार्गेण करोति शब्दम् ...
सोपानमार्गेण करोति शब्दम् ....
कानडा राजा पंढरीचा आणि कानडा
कानडा राजा पंढरीचा आणि कानडा हो विट्ठलू या गीतांमधे कानडा हा शब्द ‘कळायला कठीण, अगम्य , दुर्बोध अशा अर्थाने वापरलेला आहे. *कन्नड भाषेशी किंवा कर्नाटक प्रदेशाशी त्याचा काही संबंध नाही. विठ्ठल एकदम मराठी प्रातांतलाच आहे . असे प्रतिपादन करणारे ऑन्लाइन लेख / ब्लॉग पोस्ट वाचले होते . आता पटकन नावे आठवत नाहीत ब्लॉगर्सची.
*कन्नड भाषिक लोकांना त्यांच्या भाषेचं नाव कानडी केलेलं रुचत नाही. ‘मी कानडीत सांगू का‘ वगैरे विचारल्यावर सरळ ‘ मला नाही कानडी येत‘ म्हणतात
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे।
वगैरे..
यावरून कानडा हे अगम्य अर्थाने वापरले असावे असे वाटते.
पुढे कर्नाटकु आहे, त्याचा अर्थ कर्नाटकचा असे समजत होतो.
(विठ्ठल मराठी असो की कानडी याबद्दल काहीच आक्षेप नाही.)
या ओव्यांवर स्वातींनी लेख
या ओव्यांवर स्वातींनी लेख लिहिला आहे .
तिथे कानडावर चर्चा झाली आहे.
फोनवरून लिंक देता येईना, म्हणून तो धागा वर काढला आहे.
धन्यवाद, वाचतो.
धन्यवाद, वाचतो.
उत्तम चर्चा. धन्यवाद !
उत्तम चर्चा. धन्यवाद !
निरर्गल शब्दाची व्युत्पत्ती
निरर्गल शब्दाची व्युत्पत्ती काय?
अर्गल/ला म्हणजे कडी किंवा
अर्गल/ला म्हणजे कडी किंवा अडसर.
निः + अर्गल म्हणजे बेबंद.
वॉव,,हा शब्द, अर्थ माहित
वॉव, हा शब्द, अर्थ माहित नव्हता. थँक्यु आंबटगोड, स्वाती
हिंदीत ( आणि बहुतेक कन्नड
हिंदीत ( आणि बहुतेक कन्नड भाषेत पण) अस्खलित बोलणे - अडथळा नसताना, फ्लुएंटली - अशा अर्थाने निरर्गल वापरला जातो. मराठीत मात्र बरळणे, असंबद्ध बडबड अशा अर्थाने निरर्गल वापरला जातो
अवल +१
अवल +१
बरळणे, असंबद्ध बडबड अशा
बरळणे, असंबद्ध बडबड अशा अर्थाने >>> +१
बेछूट; स्वैर; बेताल.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
थँक्यू स्वाती.
मराठी आणि कन्नड मधले अर्थ जवळपास विरुद्ध आहेत!
स्वाती आणि मेधा, सहीच!
स्वाती आणि मेधा, सहीच!
Pages