
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
यकायक ह्या उर्दू आणि पारसी (
नवीन धाग्याला धावाधावीसाठी शुभेच्छा!
यकायक ह्या उर्दू आणि पारसी ( फारसी)शब्दामधून मराठीतला एकाएकी शब्द आला असावा का? दोन्हींचे अर्थ साधारण समान आहेत का?
हीरा
हीरा

इथे पहिली एकेरी धाव काढल्याबद्दल आनंद वाटला.
यकायक्>>>
होय, तसेच दिसते आहे:
एकाएकीं =
सं. एकक; तुल. फा. यकायक्
(दाते शब्दकोश)
यकायक अज़ दिल दो चश्म - ए -
यकायक अज़ दिल दो चश्म - ए - जादू
बसद फ़रेबम बबुर्द तस्किन/ तस्किं
हीरा
हीरा
त्याचे मराठीत निरूपण करा ना
नवीन धाग्याला शुभेच्छा.
नवीन धाग्याला शुभेच्छा.
ह्या ओळी
ह्या ओळी
जे हाले मिस्किन मकुन तगफुल दुराये नैना बनाए बतीयां
ह्या हजरत अमीर खुसरो ह्यांच्या सुप्रसिद्ध सूफी कवनातील आहेत.
साधारण अर्थ: अचानक त्या दोन जादूभऱ्या मोहक नयनांनी नाना ( हज्जार) युक्त्या प्रयुक्त्या वापरून माझ्या मनाची शांती ( चैन) चोरून नेली.
मला फारसी ओळी लिहिताना नुक्ता लिहिणे शक्य झालेले नाही.
बहुधा अलीकडे नुक्तेवाले उर्दू उच्चार हिंदीतून काढून टाकले आहेत . तसे ऑप्शन सुद्धा येत नाही.
अरे वा, सुंदर आहे !
अरे वा, सुंदर आहे !
मटा मधल्या एका बातमीत खालील
मटा मधल्या एका बातमीत खालील वाक्य वाचले:
“कॉपीच्या गोरखधंद्यातून संस्थाचालक दर वर्षी लाखो रुपयांची कमाई करीत होते”.
मग गोरखधंदा या शब्दाचा धांडोळा घेतला तेव्हा तो बहुढंगी असल्याचे दिसून येते:
१. मराठी शब्दकोशात गोरखधंदा हा शब्द मिळाला नाही परंतु हे पर्याय आहेत:
गोरखचाळा-सांखळी- (ल.) संबंधाची गुंतागुंत; परस्परावलंबन.
>>> माध्यमांमध्ये 'गोरखधंदा' हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. (उदा. वरील वाक्य)
२. हिंदी विकीनुसार : . गोरख धंधा
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%96_%E0%A...
गुरू गोरखनाथ नावातील 'गोरख' आणि त्यांच्या अबोध कारनाम्यासाठी 'धंदा' असे दोन शब्द एकत्रित येऊन 'गोरखधंदा' हा शब्द झाला.
३. असाही एक अर्थ:
जैव खतांचा गोरखधंदा:
पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल पराशरांनी ‘कृषी पाराशर’ या प्राचीन ग्रंथात बारकाईने सूचना केल्या आहेत.
https://www.loksatta.com/navneet/what-do-you-mean-by-biotic-fertility-ma...
>>>गोरखधंदा >>> छान माहिती.
>>>गोरखधंदा >>> छान माहिती.
>>नवीन धाग्याला शुभेच्छा.>>>> +१२३
ट्रेनच्या प्रवासात मोठ्या
ट्रेनच्या प्रवासात मोठ्या स्थानकाच्या आसपास
"उपरी उपस्कर कर्षण डिपो"
अशी पाटी अनेक वेळा पाहण्यात येते. उत्सुकता म्हणून या शब्दांचे अर्थ पाहिले.
उपस्कर म्हणजे उपकरण. (उपस्कर मराठीत पण आहे).
उपरी उपस्कर = pantograph

डेपोसाठी शब्द नाही घडवला का
डेपोसाठी शब्द नाही घडवला का त्यांनी?
डेपोसाठी शब्द…
डेपोसाठी शब्द…
बस, कार, टेबल अशा रोजच्या वापरातल्या काही शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द नाहीत का ? की मलाच माहिती नाहीत?
टेबल = मेज
टेबल = मेज
कार = (चारचाकी) गाडी?
'बस'साठी शब्द नाही माहीत.
(उपस्कर कर्षण! देवा! माझ्या प्रमस्तिष्क अनुलंब विदरात झिणझिण्या आल्या.
)
pantograph >> जेव्हा हा
pantograph >> जेव्हा हा तुटल्याची बातमी मराठी पेपरात येते तेव्हा खूपदा तो पेंटोग्राफ असा चुकीचा वापरला जातो. त्यामुळे ते काहीतरी पंचकोनाकृती असेल असा गैरसमज होतो.
(pan= universal असे ते आहे)
शहरी बस आणि लालपरी यांच्या
शहरी बस आणि लालपरी यांच्या डेपोसाठी आगार हा शब्द बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहे.
एक 'उदंचन केंद्र' असतं जे
एक 'उदंचन केंद्र' असतं जे सांडपाण्यावर शुध्दीकरण प्रक्रिया करतं. या उदंचन शब्दामागची व्युत्पत्ती काय?
त्यामुळे ते काहीतरी
त्यामुळे ते काहीतरी पंचकोनाकृती असेल असा गैरसमज होतो. >>> ते पंचकोनाकृतीच दिसतं पण.
पंचकोनाकृतीच दिसत असले तरी
पंचकोनाकृती दिसत असले तरी मूळ शब्द pantos आहे, penta नाही.
उदंचन : [सं० उद्√अञ्ज् (गति
मामी,
उदंचन : [सं० उद्√अञ्ज् (गति)+ल्युट-अन]
https://www.pustak.org/index.php/dictionary/word_meaning/%E0%A4%89%E0%A4...
छान माहिती. फक्त तिथे उद् +
छान माहिती. फक्त तिथे उत् + अञ्च् पाहिजे. अञ्ज् चा काहीतरी वेगळा अर्थ आहे. शिवाय मूळ उपसर्ग उत् आहे; त्यात पुढे अ आल्याने त चा द होतो.
उपस्कर कर्षण! देवा! माझ्या
उपस्कर कर्षण! देवा! माझ्या प्रमस्तिष्क अनुलंब विदरात झिणझिण्या आल्या >>
(No subject)
शुद्धी आणि उपसा हे दोन शब्द
शुद्धी आणि उपसा हे दोन शब्द जुळवून एक जोड शब्द घडवायला हवा होता.
उपसा आणि शुद्धी करायला "जल
उपसा आणि शुद्धी करायला "जल शुद्धीकरण केंद्र" असतं. (Water treatment plant)
नुसता उपसा करायला "उदंचन केंद्र" असतं. (Pumping station)
मग उदंचनकेंद्रसाठी उपसाकेंद्र
मग उदंचनकेंद्रसाठी उपसाकेंद्र शब्द चालला असता की.
पण मग ते सोपे झाले असते ना?
पण मग ते सोपे झाले असते ना? /s
धन्यवाद कुमारसर, हपा आणि उबो.
धन्यवाद कुमारसर, हपा आणि उबो.
उपसा आणि शुद्धी करायला "जल शुद्धीकरण केंद्र" असतं. (Water treatment plant)
नुसता उपसा करायला "उदंचन केंद्र" असतं. (Pumping station). >>>अच्छा.
मग उदंचनकेंद्रसाठी उपसाकेंद्र शब्द चालला असता की. >>> तेच की!
पण मग ते सोपे झाले असते ना? /s. >>> हो ना! मग ते सरकारी वाटलं नसतं.
वाचनात 'सुटवंग' शब्द आला. तो
वाचनात 'सुटवंग' शब्द आला. तो शब्द 'सुटवांग' असाही लिहिला होता. योग्य काय ?
आगापिछा नसलेला, एकटा असा अर्थ (मला समजलेला). अजूनही काही अर्थ आहेत काय ?
ही पहा आपल्याकडील जुनी चर्चा
ही पहा आपल्याकडील जुनी चर्चा:
https://www.maayboli.com/node/2229?page=69
'सुटवंग' म्हणजे काय ?
...मोकळाढाकळा वागणारा?
सुटसुटीत ?
Submitted by कुमार१ on 31 August, 2016 - 12:54
* सुट्वंग हा शब्द मी लिबरेटेड याअर्थी वाचलाय.
Submitted by भरत. on 31 August, 2016 - 13:34
*सुटवांग हा शब्द लहान मुलांबद्दल ऐकलाय. सुटवांग मुल म्हणजे स्वतः चालू फिरु शकणारे मुल असं.
Submitted by जिज्ञासा on 31 August, 2016 - 13:43
....
शब्दकोशात नाही सापडला
शब्दकोशात नाही सापडला तेच
शब्दकोशात नाही सापडला
तेच
Pages