मराठी भाषा गौरव दिन २०२३

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 17 February, 2023 - 10:13

नमस्कार मंडळी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कविवर्य कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी या जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा साजरा करीत आहोत. शनिवार २५ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांत वेगवेगळ्या उपक्रम आणि खेळांतून मायमराठीचा जागर करणार आहोत.

१. लोप पावत चाललेल्या पत्रसंस्कृतीला उजाळा देऊया. पत्र लिहूया.
उपक्रम - स.न. वि.वि.

२. आपल्या मनात जागा करून राहिलेल्या महाराष्ट्रातील स्थळाची - गाव/शहर/ नगर / किल्ला सफर वाचकानांना घडवूया.
उपक्रम - पाउले चालती

३. आपल्याला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल लिहूया

उपक्रम : लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

४. आम्ही आपल्या बालदोस्तांना कसे विसरू? त्यांच्यासाठी कविता आणि चित्रे यांचा संगम असा उपक्रम आहे.

किलबिल किलबिल चित्रे डोलती

या व्यतिरिक्त वाचनानंदाची आणखीही दालने असतील. नेहमीप्रमाणे मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी संबंधित खेळही असतील. त्याबद्दलची माहितीही इथे नोंदविली जाईल.

उपक्रमांत लिहायला तुम्हांला पुरेसा वेळ मिळावा यासाठी त्यांची घोषणा प्रथम करत आहोत.

चला तर मग, तुमच्या स्मृतिकोशातून खास चीजा धुंडाळायला घ्या!

आणि हो! मायबोली मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमांची माहिती वेळचे वेळी मिळण्यासाठी आमचे म्हणजे संयोजक-मभागौदि-२०२३ चे चाहते व्हा.

मराठी भाषा गौरव दिन २०२३ साठी ग्रुप

२७ फेब्रुवारी

स्मरण साहित्यिकांचे

- जी ए कुलकर्णी - इस्किलार - स्वाती आंबोळे

. शब्दखेळ - प्रसिद्ध मराठी व्यक्तींची नावे

शीघ्रकवितांच्या आनंदडोही -

१. महाराष्ट्र गौरव गान

खेळ - म्हणींच्या भेंड्या

खेळ - शब्दशोध

स्मरण साहित्यिकांचे - जी.ए. कुलकर्णी - पिंगळावेळ - टवणे सर

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम, संयोजक.
कवितांशी संबंधित एकही उपक्रम नाही?
पत्रलेखनाचा उपक्रम याआधी एकदा झाला होता ते सहज आठवलं. Happy

चला, लिहायला घ्या मायबोलीकरांनो! चांगलंचुंगलं वाचायला मिळू दे या निमित्ताने. Happy

सर्वांचा उत्साह बघून छान वाटले. वरच्या घोषणेत कविता दिसत नसल्या तरी त्यांचा समावेश खेळांमध्ये केला आहे, काळजी नसावी. खेळांची घोषणा अजून व्हायची आहे. ती त्या त्या दिवशी केली जाईल. आपापल्या लेखण्या किंवा कळफलक सरसावून तयारीत रहा.

https://www.loksatta.com/lokrang/marathi-bhasha-diwas-article-on-marathi...
इथला लेख चांगला आहे परंतु अजूनही अशा मूलभूत चुका केल्या जात आहेत :

"मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आपण नुसताच ...."

उद्या मभा गौरव दिन आहे.
राजभाषा दिन = १ मे.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
हा उपक्रम छान आहे संयोजक. काही विस्मरणात गेलेल्या मराठी चित्रपटांबद्दल वाचायला मिळतेय यात.. धन्यवाद

आज अनेक जण मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताहेत किंवा तसा मजकूर स्टेटसला लावत आहेत. कालनिर्णय २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन असल्याचं म्हणतंय. लोकसत्तेने मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. पान तीन भरून मराठी भाषा गौरव दिनाची शासकीय जाहिरात आहे.

Pages