स.न.वि.वि.

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 14 February, 2023 - 09:43

स.न.वि.वि.

प्रिय मायबोलीकर,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

आठवतंय का असे शब्द शेवटचे कधी लिहिले किंवा वाचले होते? खाजगी पत्र लिहिणं आता जवळपास कालबाह्य झाले आहे. कार्यालयीन कामकाजात काही पत्र लिहिली जात असतील तर तेवढीच. अगदी पेन आणि कागद किंवा कीबोर्ड वापरूनही पुन्हा पत्र लिहून पाहायचं का?
चला तर मग! मराठी भाषा गौरव दिन २०२३ च्या ' स.न.वि.वि.' या उपक्रमासाठी आपल्या मनीचे गूज शब्दांत उतरवूया.
पत्र कोणालाही लिहू शकता - व्यक्ती, वस्तू, प्राणी, निसर्ग किंवा अगदी स्वतःलाही!

तुमच्या पत्रांची वाट पाहतोय.

कळावे,

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा!

आपले नम्र,

संयोजक,
मराठी भाषा गौरव दिन २०२३.

ता.क.
१. पत्र लिहिण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन २०२३ या ग्रुप मध्ये सामील व्हा.
२. धाग्याचे शीर्षक पुढीलप्रमाणे असावे - "मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - तुमचे नाव्/सदस्यनाम"
३. लेखनाचा धागा सार्वजनिक करावा.धागा सार्वजनिक
४. आपले पत्र २५ फेब्रुवारी २०२३ ते १ मार्च २०२३ या पाच दिवसांत प्रकाशित करा.
५. पत्र अर्थात तुम्ही स्वतः लिहिलेले हवे व पूर्वप्रकाशित नसावे.
६. हा उपक्रम आहे; स्पर्धा नाही.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्ट आहे
नाव वाचताच कोणी आठवले पत्र लिहावे असे..
किंबहुना मेल करणार होतो.. आता पत्रच लिहेन..