
नमस्कार मंडळी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कविवर्य कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी या जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा साजरा करीत आहोत. शनिवार २५ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांत वेगवेगळ्या उपक्रम आणि खेळांतून मायमराठीचा जागर करणार आहोत.
१. लोप पावत चाललेल्या पत्रसंस्कृतीला उजाळा देऊया. पत्र लिहूया.
उपक्रम - स.न. वि.वि.
२. आपल्या मनात जागा करून राहिलेल्या महाराष्ट्रातील स्थळाची - गाव/शहर/ नगर / किल्ला सफर वाचकानांना घडवूया.
उपक्रम - पाउले चालती
३. आपल्याला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल लिहूया
उपक्रम : लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
४. आम्ही आपल्या बालदोस्तांना कसे विसरू? त्यांच्यासाठी कविता आणि चित्रे यांचा संगम असा उपक्रम आहे.
किलबिल किलबिल चित्रे डोलती
या व्यतिरिक्त वाचनानंदाची आणखीही दालने असतील. नेहमीप्रमाणे मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी संबंधित खेळही असतील. त्याबद्दलची माहितीही इथे नोंदविली जाईल.
उपक्रमांत लिहायला तुम्हांला पुरेसा वेळ मिळावा यासाठी त्यांची घोषणा प्रथम करत आहोत.
चला तर मग, तुमच्या स्मृतिकोशातून खास चीजा धुंडाळायला घ्या!
आणि हो! मायबोली मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमांची माहिती वेळचे वेळी मिळण्यासाठी आमचे म्हणजे संयोजक-मभागौदि-२०२३ चे चाहते व्हा.
मराठी भाषा गौरव दिन २०२३ साठी ग्रुप
२७ फेब्रुवारी
स्मरण साहित्यिकांचे
- जी ए कुलकर्णी - इस्किलार - स्वाती आंबोळे
छान उपक्रम!
छान उपक्रम!
संयोजक मंडळाला हार्दिक शुभेच्छा!
स्मरण साहित्यिकांचे - जी.ए.
स्मरण साहित्यिकांचे - जी.ए. कुलकर्णी - पिंगळावेळ - टवणे सर
संयोजक, असा व्ह्यू देता आला
संयोजक, असा व्ह्यू देता आला तर बरं होईल. धाग्यांमागे धागे वाहून जात आहेत.
सूचनेनुसार ॲडमिनना सुचवले आहे
सूचनेनुसार ॲडमिनना सुचवले आहे. धन्यवाद.
संयोजक, एक ईमेल पाठवली आहे
संयोजक, एक ईमेल पाठवली आहे मायबोली संपर्कातून. कृपया पोच देणार का?
आशूडी, ईमेल मिळाली आहे. उत्तर
आशूडी, ईमेल मिळाली आहे. उत्तर देतो.
अतिशय सुरेख चाललेला आहे हा
अतिशय सुरेख चाललेला आहे हा उपक्रम- नव्हे उत्सवच !
मराठी भाषेचा हा उत्सव गणेशोत्सवाइतकाच दणदणीत चालू आहे हे पाहून उर भरून आला आहे
सर्वांचे अभिनंदन !
आपण काही समजुती दुरूस्त करून
इथली पोस्ट मग वर हलवण्यात येत आहे.
शीघ्रकवितांच्या आनंदडोही २-
शीघ्रकवितांच्या आनंदडोही २- प्रतिबिंब
https://www.maayboli.com/node/83102
संयोजक
संयोजक
यंदा अगदी भरगच्च उपक्रम ठेवले आहेत
तुम्ही सर्वजण 24 × 5 राबत आहात त्याबद्दल कौतुक !
जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या मायबोलीकराला तुमच्यामुळे कुठल्या ना कुठल्या वेळेला नवा संच प्रथम सोडवायला मिळत आहे.
अभिनंदन
वरील प्रतिसादाला पूर्ण
वरील प्रतिसादाला पूर्ण अनुमोदन. संयोजकांचे कौतुक.
कुमार सरांना अनुमोदन. रोज
कुमार सरांना अनुमोदन. रोज नवनवीन चीजवस्तू संयोजकांच्या पोतडीतून बाहेर येत आहेत. वेळ, वैविध्य आणि रोचकता दोन्ही साधलंय. अभिनंदन.
या वेळच्या सर्वच उपक्रमांमधे
या वेळच्या सर्वच उपक्रमांमधे छान रंगत आली. संयोजकांनी जितक्या कल्पकतेने उपक्रम राबवले आहेत तितक्याच तोलामोलाची साथ सूज्ञ वाचकांनी सुद्धा दिली आहे. काही वाचकांनी लेख न देता मोलाचे प्रतिसाद दिले आहेत. सर्वच उपक्रमात अशा वाचकांनी रंगत आणली आहे. उपसंपादकांच्या डुलक्या या उपक्रमाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. हा उपक्रम
वर्षभरनियमित चालू रहावा ही सूचना.संयोजकांचे अभिनंदन! छान होते
संयोजकांचे अभिनंदन! छान होते सगळे उपक्रम, खूप मजा आली यावर्षी!
Pages