लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर काही लोक इंग्रजीत बोलताना 'व्हाय मीन्स'.. अशी सुरुवात करून पुढे कारण सांगतात!>>
बरेच हिंदीतही "क्यो बोले तो" करतात त्याचे आणि काही लोक मराठीत "का म्हटलं तर" असे करणारेही पाहिले आहेत.

मराठीत "का म्हटलं तर" असे करणारेही >> बऱ्याचदा महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतच्या जिल्ह्यातले असतात. तिथे कन्नडचा बराच प्रभाव आहे. तिथल्या आणि सीमेपलीकडील कन्नडावरही मराठीचा बराच प्रभाव आहे.

कन्नडात 'सुम्ने' म्हणजे >> तमिळात 'चुम्मा'

चुम्मा तोंड बंद करण्यासाठी नाही तर उगाचच उघडणाऱ्याला म्हणतात

म्हणजे वक्त्याला तर (शब्दशः) चुम्मेश्वरी दाद मिळते Lol

बहुतकरून/नक्कीच यासाठी दक्षिणभारतात compulsory/compulsorily शब्द वापरतात खूप लोक.
उदा: वो ब्रिज श्याम को कंपल्सरी जाम होता है.
यहां ऑफिस छूटने के टाइम को कंपल्सरी बारीश होता है. (लिंगाचाही घोळ असतो.)
सुरवातीला मला विचारावसं वाटायचं नाही झाला तर काय शिक्षा करतात?

Lol
या चर्चेवरुन मला 'एक डाव धोबीपछाड' ह्या सिनेमातला सुबोध भावेचा द्वयर्थी संवाद आठवला. 'ही दक्षिणेकडची लोक....

खरे आहे.
त्यांच्या मते कंपनी अगदी देखणी रोबो असावी !

शब्दशः भाषांतराचे विनोद चालूच असतात.
हे पहा.:

" पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

https://www.esakal.com/global/nato-summit-world-war-3-russia-ukraine-tel...

अरेरे....
हो ना

"तिसरे महायुद्ध जवळ आले आहे", असं त्यांनी पुढे म्हटलेच आहे.
मग काय सगळाच अंत !

देवा! Lol

शब्दशः भाषांतराचे विनोद चालूच असतात.
हे पहा.:

" पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".>>> Dead end साठी मराठीत कोणता शब्द आहे

मराठीत कोणता शब्द >>> एकच एक शब्द नाही. लाक्षणिक अर्थाने घेऊन वेगळी वाक्यरचना करावी लागेल.

(खुंटलेली प्रगती / परिस्थिती) /
चर्चेची दारे बंद झालीत.

दिग्गज >>> हा शब्द. सजीवासाठी आहे. असं काही वर दिलेल्या लिंकांमध्ये आढळलं नाही. दिग्गज हे विशेषण आहे. ते सहसा व्यक्तीसाठी (सजिवासाठी नव्हे... दिग्गज सिंह किंवा दिग्गज पिंपळ असं कधी वाचलं नाही) वापरलं जातं याचा अर्थ इतर गोष्टींसाठी वापरूच नये असं नाही. सेक्सी हे विशेषण व्यक्तीसाठी आहे पण ते ड्रेस, गाडी अशा कुठल्याही गोष्टीसाठी वापरलं जातं.
मराठीत कोणता शब्द >>> एकच एक शब्द नाही. लाक्षणिक अर्थाने घेऊन वेगळी वाक्यरचना करावी लागेल.>>> हाच मुद्दा आहे. मराठीत डेड एंड साठी शब्द नाही हे मराठीचं वैगुण्य मानता येईल. त्यासाठी त्यांनी मृत अंत शब्द कॉइन केला. एक तर प्रतिशब्द द्या नाही तर इंग्लिश शब्दाचं भाषांतर गोड मानून घ्या. कितीतरी मराठी शब्द आणि वाक्प्रचार इंग्लिशचे सहीसही भाषांतर आहेत. विकांत आणि ॲक्टांवये सारखे शब्द सुद्धा मराठीत ॲक्सेप्ट झाले आहेत. रच्याकने सारखे चक्रम शब्द चालत असतील तर मृत अंत चालायला काय हरकत आहे?
जागरूक वाचक कधीकधी जास्तच जागरूक होतात असं वाटतंय Happy

मोरोबा, 'दिग्गज'च्या बाबतीत मी सहमत आहे.

मृत अंत हा शब्द मात्र डेड एंड या शब्दाचं केवळ शब्दशः भाषांतर आहे, तो मूळ शब्दाचा अर्थ नीट पोचवत नाही, त्यामुळे तो खटकला.
प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असतोच असं नाही आणि असलाच पाहिजे असा अट्टाहासही नसला पाहिजे असं मलापण वाटतं. मूळ शब्दाचा/वाक्याचा अर्थ जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे भाषांतरात दिसायला हवा, हे खरं.

डेड एंड- कुठलाही मार्ग न दिसणे असाही शब्दप्रयोग चालेल.

वावेला अनुमोदन.

'मार्ग खुंटतो' असं काहीसं म्हणता आलं असतं या संदर्भात.

तो मूळ शब्दाचा अर्थ नीट पोचवत नाही>>> अहो पण आधी शब्द तयार होतो आणि मग त्याला अर्थछटा निर्माण होतात ना? मृत अंत हा शब्द नुकताच मराठीच्या गर्भाशयातनं बाहेर आला, तो रुळल्याशिवाय त्याच्या अर्थाचा निर्णय तुम्ही कसा करता? तो रूढ झाला तर आणखी पाच वर्षांनी तुम्हाला 'विकांत' सारखंच त्यात काही विचित्र वाटणार नाही. समजा डेड एंड हा शब्द 1775 साली लंडन मध्ये कोणीतरी पहिल्यांदा वापरला. त्यावेळी त्याची लोकांनी 'हा हा, रस्ता कधी मरतो का? इंग्लिश चा डेड एंड जवळ आला आहे', अशी टिंगल केली असती तर आपण एका चांगल्या शब्दाला मुकलो असतो. आणि गाडी चालवताना मला सगळीकडे डेड एंड ऐवजी the road is going to end further ahead अशी लांबलचक पाटी वाचावी लागली असती.
प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असतोच असं नाही आणि असलाच पाहिजे असा अट्टाहासही नसला पाहिजे>>> असलाच पाहिजे असं नाही, पण कोणी सुटसुटीत शब्द बनवत असेल तर नाकारायचंही कारण नाही.

Pages