लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक इंग्रजी वृत्तपत्रांनी सुद्धा जुनेच नाव वापरले आहे. बीबीसी, सी एन एन, अल जझीरा यांच्या संकेतस्थळावरही Turkey च आहे

त्या देशाने संयुक्त राष्ट्रसंघाला 31 मे 2022 रोजी नवे नाव दाखल करून घेण्याची विनंती केली होती आणि त्याला राष्ट्रसंघाने लगेच मान्यता दिलेली आहे.

त्या देशाच्या दृष्टीने जुन्या नावाचा टर्की पक्षाशी असलेला तिरस्कारयुक्त संबंध त्यांना तोडायचा होता

https://en.m.wikipedia.org/wiki/Turkey

हो. ती बातमीही पाहिली. इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्या एक्स्प्लेन्ड या सदरात याची दखल घेतली होती.

ते नामांतर झाले तेव्हा इंग्लिश वृत्तमाध्यमांमध्ये अजून एक चर्चा झाली होती.

नव्या नावातील ü हे अक्षर (उमलाऊट) बिगर युरोपीय देशांना वारंवार टंकण्यास अवघड जाणार आहे. त्यामुळे नवे नाव स्वीकारायचे नाही असा सूर होता

जर्मनी-स्वीस-तुर्कीये वगैरे युरोप भागात u चा उच्चार उ आणि u वर दोन टिम्बचा उच्चार य असा करतात. (उच्चार अ ला य
जोडल्या सारखा काहीतरी आहे.) मला वाटले Türkiye चा उच्चार त्यर्कीये असा असेल पण गुगल सर्च करून ऐकला तर तो तुर्कीयेच ऐकु येतोय.
U वर दोन टिम्ब हे सामान्य इंग्रजीत लिहिताना eu असे टंकतात. Türkiye चे असे केलेले दिसत नाही, बऱ्याच ठिकाणी Turkiye दिसते. (गुगल सर्च).
तिकडे Euro चा उच्चारही अ्यरो असा करतात.

बरोबर.
त्याचा उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो असे एकाने सांगितले होते.
ते आपल्या कळफलकावर टंकण्यासाठी
ü = Alt + 0252.
असे सेटिंग आहे असे जालावर म्हटले आहे. पण मला काही जमले नाही

युनिकोड असावा. युनिकोड चिन्ह टाकण्यासाठी आधी काही सॉफ्टवेअरमध्ये Ctrl+U दाबावे लागते. मग तो कोड (Alt+ २३२ वगैरे ) टाकावा व त्यानंतर enter दाबावे. वर्ड मध्ये कदाचित उलटी प्रक्रिया आहे. आधी Alt+ २३२ वगैरे टाकून मग alt+X दाबून तो कोड युनिकोड चिन्हात बदलेल.

त्या अक्षराचा उच्चार 'इयु' हे 2 अक्षरं जोडून म्हटल्यास जसा उच्चार येईल तसा होतो.
म्हणजे तुर्की न म्हणता 'ट्युर्कि' म्हटल्या सारखे.

जबरी उदाहरणे आहेत Lol

'न च डीकॅप्रिओ' >>> हे भारी आहे.

ब्लॅक इन ब्यूटी वाचून असा मी असामी मधल्या त्या कुशाभाऊंचे(?) इंग्रजी आठवले. ऑफिस ऑफ द डॉक्टर्/फॅमिली ऑफ माय डॉक्टर Happy

चला, एक तरी बातमी सापडली,
Türkiye हा अधिकृत उल्लेख करणारी !

https://www.who.int/emergencies/situations/Earthquake-T%C3%BCrkiye-Syria

On 6 February 2023, a series of large earthquakes hit southern Türkiye and northern Syria, followed by hundreds of aftershocks.

आज मी एफ एम गोल्ड ऐकत होते तेव्हा हिंदी आणि इंग्रजी बातम्या ऐकल्या, दोन्ही वेळी तुर्किये असाच उच्चार होता. तेव्हा या धाग्याची आठवण झाली Happy

अरे वा Happy
तुर्कियेला सावरण्यासाठी शुभेच्छा देऊयात...

नुकतेच एका सुंदर सजवलेल्या घराबद्दल हे वर्णन वाचले :-

कलेचे असे अविश्वसनीय तुकडे पांढऱ्या भिंतींची खोलाई जोडतात.

खूप विचारांती ते : These unbelievable pieces of art add depth to white walls याचे 'भाषांतर' असावे असा निष्कर्ष काढलाय Happy

Screenshot_2023-02-16-22-57-33-171_com.eterno.jpg

माने चे दुखणे असेल तर हा व्यायाम करायचा नि व्यायाम केल्यावर गर्भाशयाच्या वेदनेपासून आराम
Happy

एकदम भारी जादू न काय !
...
cervix = मान
आणि
Uterine cervix
या दोन गोष्टी भिन्न असल्याचे भान ठेवले पाहिजे !

Rofl _/\_

लो कसत्ता मुंबई आवृत्ती (छापील) पान ४ वर ओबीसी च्या जागी अ बीसी छापलंय.
काना आणि मात्रा खाल्ले.

लोकमत मधली ती बातमी - 'शिमला मिरची कापताच आवाज आला डराव डराव ... महिलेला वाटलं आता काय कराव' सगळीकडे सोमीवर फिरते आहे.

आजच्या इ-सकाळमध्ये एका बातमीचं शीर्षक आहे - "प्रकाश आंबेडकरांनी कंबर कसली? आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार!". आता ह्यात 'कसली'नंतर प्रश्नचिन्ह दिल्याने त्या 'कसली'चा अर्थच बदलून जातो.

मसाबा गुप्ताने विव रिचर्ड्स यांना दिलेल्या या मूळ शुभेच्छा - "Happy Birthday Dad. You did good. WE did so good. And I cannot wait to show you everything I will do next without any fear."

आणि लोकसत्तेच्या ई-ई-ई आवृत्तीतली त्याबद्दलची बातमी हे सांगते -
मसाबाने हा फोटो शेअर करत खास अंदाजात वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड. तू चांगलंच केलंस. आम्हीदेखील खूप चांगले केले. आता मी कोणत्याही भीतीशिवाय सर्व काही करुन दाखवू शकते आणि ते करण्यासाठी मला कोणी थांबवू देखील शकत नाही”, असे कॅप्शन मसाबाने या फोटोला दिले आहे.

Pages