भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
या भागाची सुरुवात एका मनोरंजक
या भागाची सुरुवात एका मनोरंजक विषयाने...
https://hellomaharashtra.in/lets-know-the-exact-reason-behind-who-gave-t...
जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं?, कुठून झाली नक्की सुरुवात…
वाचून रंजन झाले परंतु बातमीतील एक विधान नाही पटले :
किसींगमुळे प्रतिकारशक्ती वाढते.
??
इतक्या स्वस्तात क्रूझ तयार
इतक्या स्वस्तात क्रूझ तयार झाली?
भयंकर हसते आहे ६८ रूपये वाचून
भयंकर हसते आहे ६८ रूपये वाचून.
कुठल्या पेपरात काढल्यात या झोपा?
भयंकर
भयंकर
वर अजून दोन रुपये टाकले असते
वर अजून दोन रुपये टाकले असते तर त्यात इज्राईलवरून औषध आलं असतं.
हर्पा _/\_
हर्पा _/\_
वेबसाइटच्या संपादकांना पत्र
वेबसाइटच्या संपादकांना पत्र लिहिण्यासाठी
वाचकांकडून प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक करतो. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.
userfeedback@indianexpress.com
भयंकरच हो ....
भयंकरच हो ....
कुठल्या पेपरात काढल्यात या
कुठल्या पेपरात काढल्यात या झोपा? >> लोकसत्ता app शिवाय आहेच कोण?
ह.पा.
भरत, धन्यवाद. पण या असल्या चुकांसाठी वाचकांना ईमेल लिहायची वेळ का यावी? एक नजर टाकायला काय होतं यांना प्रकाशित करण्याआधी?
मग हा धागा विरंगुळा या
मग हा धागा विरंगुळा या ग्रुपमध्ये हवा.
पहिल्या भागात या मुद्द्यावर
पहिल्या भागात या मुद्द्यावर बरीच चर्चा झालेली आहे. भरत व माझ्यासह आपल्यातील काही जण अधूनमधून संपादकांना कळवत असतात.
त्याचा उपयोग होतो का नाही हा संशोधनाचा विषय आहे. तरीही कळवत राहणे यालाच लष्करच्या भाकरी असे आपण म्हणतो !
ज्यांना इच्छा आहे आणि वेळ आहे त्यांनी कळवायला हरकत नाही.
अन्यथा हा विरंगुळा आहेच
भरत, बरोबर आहे.
भरत, बरोबर आहे.
रोज नियमितपणे असे स्क्रीनशॉट्स काढून दर आठवड्याचे एकत्र करून लोकसत्तेकडे पाठवायचे असा काही सांघिक उपक्रम राबवायचा असल्यास त्यात सहभागी होण्याची माझी तयारी आहे.
https://pudhari.news
https://pudhari.news/vishwasanchar/436461/eating-brinjal-reduces-weight/...
या लेखातून काही माहिती मिळाली पण खालचं मात्र अजिबात झेपले नाही:
वांग्याच्या सेवनाने रक्तदाब सहज नियंत्रित ठेवता येतो. सोडियमयुक्त वांगी बीपीच्या रुग्णांवर औषधाप्रमाणे काम करतात.
??
तिथे लिहिले आहे कि वांगी
तिथे लिहिले आहे कि वांगी त्वचा आणि हाडांसाठीदेखील खूप उपयुक्त आहेत >>>>>>हाडांमध्ये होत असेल फरक पण त्वचा मला तर वांगी खाल्यावर खाज उठते।काही उपाय असेल तर सुचवा।
बहुतेक हा एलर्जीचाच प्रकार
बहुतेक हा एलर्जीचाच प्रकार असावा.
त्यावर मोघम काही सांगण्यापेक्षा तज्ञाकडून चिकित्सा झालेली बरी.
वांग्याच्या जोडीला अन्य काही खाद्यपदार्थांवरही नजर ठेवली पाहिजे असे वाटते.
<<सोडियमयुक्त वांगी बीपीच्या
<<सोडियमयुक्त वांगी बीपीच्या रुग्णांवर औषधाप्रमाणे काम करतात.>>घ
क्दाचित त्यांना लो बीपीच्या रुग्णांवर म्हणायचे असेल? पण मुळात वांग्यांमध्ये सोडीयम जास्त असतं का?
असेल तरी औ़षधासारखे काम करते म्हणजे, बळेच.
एखादा पदार्थ घ्यायचा. त्यात काय काय घटक आहेत ते बघायचे. आणि अमुक घटक असला की अमक्यासाठी चांगला, अमुक आजार रोखतो असे म्हणण्याची फॅशन आहे सध्या. तो घटक किती प्रमाणात आहे, शरीराला किती प्रमाणात लागतो, त्याच्या त्या नमुद केलेल्या परिंणामासाठी सोबत इतर घटक आवश्यक आहेत का वगैरे काही ताळतंत्र नसते.
**अमुक आजार रोखतो असे
**अमुक आजार रोखतो असे म्हणण्याची फॅशन आहे सध्या>>>
अगदी अगदी ! आणि बऱ्याचदा ठोकून द्यायचं....
How much sodium is in
How much sodium is in eggplant and potassium?
As to the sodium content of eggplant, it may be stressed that there are only 5 milligrams of sodium for each pound of the vegetable.
Nutrient Amount Daily Value
Potassium 121.77 mg 3 %
Selenium 0.10 mcg 0 %
Sodium 0.99 mg 0 %
वांग्यातले सोडियम दैनंदिन आहाराच्या गरजेपेक्षा फार फार कमी प्रमाणात आहे. आपण (भारतीय ) अतिरिक्त मीठाचे सेवन करतो त्यामुळे ह्या वांग्यात काही असलं- नसलं तरी कच्चं खात नाही. वांग्यात काही पोषक गुण नसतात म्हणून बंगाली लोक याला 'बेगुना' म्हणतात, त्यावरून हे 'बैंगन' आले असावे.
अगदी अगदी ! आणि बऱ्याचदा ठोकून द्यायचं....+१
तुम्हाला न झेपलेलं वाक्य मला देखील परस्परविरोधी वाटलं.
---------
त. टि. माझ्यासाठी हा विरंगुळाच आहे. मला ईमेल करणं शक्य नाही. पण मला इथे येऊन वाचायला, हसायला व जमल्यास माहितीत भर टाकायला आवडेल.
वर अजून दोन रुपये टाकले असते
वर अजून दोन रुपये टाकले असते तर त्यात इज्राईलवरून औषध आलं असतं. >>>>> हर्पा
माहितीत भर टाकायला आवडेल
माहितीत भर टाकायला आवडेल
>>> जरुर ! आपलेही मंथन होते.
मी आज कालनिर्णय च्या मागचे
मी आज कालनिर्णय च्या मागचे लेख वाचले,एकही चूक आढळून आली नाही आणि स्वल्पविराम, पूर्णविराम पण एकदम योग्य ठिकाणी होते,
खूप छान वाटलं वाचून.
खरंय. असे अनुभव हल्ली खूप कमी
खरंय. असे अनुभव हल्ली खूप कमी येतात.
त्यामुळे अशा वाचनाने समाधान वाटतं.
>>वर अजून दोन रुपये टाकले
>>वर अजून दोन रुपये टाकले असते तर त्यात इज्राईलवरून औषध आलं असतं.
भारी!
भयंकर आणि त्याचवेळी मनोरंजक
भयंकर आणि त्याचवेळी मनोरंजक आहे हे..
मुद्राराक्षसाचा घोटाळा कि काय असं शीर्षक पूर्वी चांदोबा किंवा चंपक मध्ये वाचल्यासारखं वाटतंय.
आज कालनिर्णय च्या मागचे लेख
आज कालनिर्णय च्या मागचे लेख वाचले
यावरून बऱ्याच वर्षांपूर्वी एका लेखात आलेला विनोद आठवला तो असा:
मराठी वाचकांनी जानेवारी महिना कालनिर्णय दिनदर्शिकेच्या मागची सर्व पाने वाचण्यासाठी राखून ठेवलेला आहे. या महिन्यात ते पुस्तके वाचत नाहीत!
मुद्राराक्षसाचा घोटाळा कि काय
मुद्राराक्षसाचा घोटाळा कि काय असं शीर्षक पूर्वी चांदोबा किंवा चंपक मध्ये >> अमृत मासिकात दोन सदरं असायची. एक, उपसंपादकांच्या डुलक्या, आणि दोन, मुद्राराक्षसाचा विनोद. सध्या फेबुवर त्यावरून उसंडू आणि मुरावि अश्या नावाचं पान आहे.
(No subject)
हे तर डॉल मे कुछ काला है
हे तर डॉल मे कुछ काला है झाले.
भारीच.. !
भारीच.. !
इथल्या (https://www
इथल्या (https://www.aksharnama.com/client/article_detail/6533)
लेखात खालील वाक्यातील
"कृत्रिम अल्गोरिदमच्या आवाक्यापलीकडे माणसांमध्ये नेहमीच एक अनोखी क्षमता असेल, ही निव्वळ काल्पनिक कल्पना आहे"
'काल्पनिक कल्पना' हा शब्दप्रयोग वैशिष्ट्यपूर्ण वाटला.
इथे 'कल्पना' चा अर्थ,
मनःपटावर उमटलेलें चित्र
असा घेतला की मग मुद्दा स्पष्ट होतो.
पहिल्यांदाच असा शब्दप्रयोग वाचला. कसा वाटतो ?
Pages