लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by हेमंतकुमार on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

img_1_1764600504828.jpg

रूग्णालयात रूग्णालये? डॉ साहेबांना विशेषतः आवडेल हे Happy
"...पालिकेच्या पाच रूग्णालयात वैद्यकिय रूग्णालये उभारणार..."

यात एक "आश्वासनाचे सादरीकरण करण्यात आले" असेही एक दिसले. करणे ही कृती सादरीकरण मधे ऑलरेडी आली आहे. पिवळा पीतांबर झाला त्याचा.

Lol
यात अजुन थोडी भर:
"७०० फुटापर्यंतच्या घरांना कर माफ" हे शीर्षकात. (नंतर चौ. फुटापर्यंत लिहिले आहे.)

"विकासकामांच्या संकल्पाविषयी सादरीकरण करत"..
हे अजुन एक, किती किचकट केलंय ते पूर्ण वाक्य.

रुग्णालयात रुग्णालये Lol
सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन. म्हणजे टेक्निकली ते नाम आहे Happy
आश्वासन सादर केले असं लिहिलं तरी विचित्रच वाटेल.

ते वैद्यकीय रुग्णालयात महाविद्यालय असेल... असाच आपला माझा अंदाज. आमच्या मातुश्री सांगत होत्या सिव्हिल हॉस्पिटलात आता सरकारी कॉलेज होणार म्हणून... तसंच काहीसं. (हे कोकणातलं सांगतेय मी)

मराठी ऑनलाईन वृत्तपत्र वाचणं म्हणजे अगदी भयाण अनुभव असतो. मला ऑनलाईन मराठी लिहिताना थोडा त्रास होतो, जमत नाही म्हणून मी जास्त लिहित नाही किंवा टाळते. पण पोटापाण्याचा व्यवसाय असूनही डोक बाजूला ठेवून लिहिणारी ही मंडळी जराही लाजत नाहीत , शुद्धलेखनाचे तीनतेरा वाजलेले , अर्थहीन वाक्यरचना ,परत परत तेच तेच लिहिणे , आशय तोच , शब्द तेच( भाषांतरीत ) पण तरीही व्याकरण आणि शुद्धलेखन ची मारामारी! हिंदी ही वेगळी भाषा आहे आणि मराठीला स्वतःची शब्दसंपदा आहे याच जरा भान नाही.

ते रुग्णालयात रुग्णालय तर तुमचं तुम्ही समजूn घ्या प्रकार आहे. पालिकेच्या रुग्णालय व महाविद्यालयांचा इतिहास माहित असल्याने असा अर्थ लागतोय की जी पालिकेची सध्याची रुग्णालय आहेत तिथे संलग्न वैद्यकीय महाविद्यालय उभारणे. जसं काही वर्षांपूर्वी कूपर इस्पितळच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे medical college झालं. अर्थात फक्त ही लिंक मधली बातमी वाचून असं समजते आहे.

हिंदी ही वेगळी भाषा आहे आणि मराठीला स्वतःची शब्दसंपदा आहे याच जरा भान नाही. >>> परफेक्ट! सिरीयसली हाच प्रॉब्लेम आहे. बरीच वाक्ये हिंदीतून भाषांतरित केलेली किंवा हिंदीत विचार करून मराठीत लिहील्यासारखी वाटतात. वावे म्हणतात तसे टेक्निकली शब्द बरोबर असेल. पण मला तसा वापर कृत्रिम वाटतो. एआय ने केल्यासारखा.

मला ते पाच वॉर्डांत रूग्णालये असेल असे वाटले.

मिळाली इथे चूक वाटत नाही. पण ते पूर्ण वाक्य पूर्ण मराठी न वाटता शब्दांतरीत वाटतेय.
वस्तु भेटणे जसं खटकतं तसं 'मला कसा नवरा भेटेल कोण जाणे' हे सुद्धा खटकेल. कसा नवरा मिळेल हे बरोबर आहे.

'तू नशीबवान आहेस म्हणुन माझ्यासारखी बायको तुला मिळाली' हे मराठी वाटतं.

* शब्दांतरीत >>> +१
नदी सागराला जाऊन मिळते, तसे वाटले मला !
( "मी तुझ्यात विरघळून गेले", असं काही सुचवायचं आहे ? )

तो इन्स्पेक्टर आहे. ड्रग्जचे पॅकेटस त्याला मिळतील न मिळतील पण ही मात्र मिळाली हे त्याचे नशीब असे तिला म्हणायचे असेल.

.. 'तू नशीबवान आहेस म्हणुन माझ्यासारखी बायको तुला मिळाली' …

Exactly मानव. हे बरोबर वाटते.

म्हणूनच काहीतरी ऑफ आहे त्या शीर्षकात असे वाटले.

.. मी तुझ्यात विरघळून गेले … 😀

सार्वजनिक पाटीवरील एखादा अनधिकृत जोडशब्द सुद्धा कधी कधी रोचक आणि लक्ष्यवेधी असतो :
. .
. .
Trespooping !
trespooping.png

Happy Happy पाळीव प्राण्यांबद्दल असावे असे वाटते.

लक्ष्यवेधी वरून आठवले. अर्थ वेगळा असला तरी लक्ष्यवेधी व लक्षवेधी असे दोन्ही शब्द बरोबर आहेत का? लक्ष्याचा वेध घेणारे व लक्ष वेधून घेणारे या अर्थी? लोकसभेत की विधानसभेत एक सूचनेचा प्रकार असतो त्याला लक्ष्यवेधी म्हणतात की लक्षवेधी - ते लक्षात नाही. पण त्याबद्दल वाचले आहे.

Pages