लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनही माध्यमांचे गैरसमज पसरवणे चालूच :

“स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. तसंच हे प्रमाण वाढत असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा घालून झोपणे टाळलेच पाहिजे”.

https://www.loksatta.com/lifestyle/wearing-a-bra-at-night-what-actually-...
शास्त्रीय दृष्ट्या असे सिद्ध झालेले नाही.
वरील मजकुरात ' त्यामुळे' हा शब्द वापरल्याने समाजातले गैरसमज दृढ होतात.

याला म्हणतात कार्याला वाहुन घेणे. लोकांना दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम कळावे म्हणुन स्वतः तसे करून दाखवून बलिदान दिले.

>>>>>>किती छातीठोकपणे लिहिलंय
हाहाहा

>>>>>याला म्हणतात कार्याला वाहुन घेणे. लोकांना दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम कळावे म्हणुन स्वतः तसे करून दाखवून बलिदान दिले.
Happy Sad

"ठाण्यात निर्माणधीन इमारतीची उदवाहक कोसळली"

https://www.loksatta.com/thane/6-labour-killed-2-seriously-injured-in-li...
'निर्माणधीन' हा शब्द बरोबर वाटतो का ?

निर्माणावस्थेत असे बरे वाटले असते.
......
वर दिलेली बातमी कालची होती. बहुतेक त्यांनाच तो चुकीचा वाटल्यामुळे त्यांनी आज शीर्षक बदलले Happy

त्याऐवजी 'बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत' असे का म्हणत नाहीत बातमी देताना? उगीचच निर्माणधीन किंवा निर्माणावस्थेत सारखे क्लिष्ट शब्द वापरावेत कशाला?

वहन/वाहन चा अर्थ वाहुन नेण्याचे साधन असा आहे, तेव्हा उद्वाहन चा अर्थही वर वाहुन नेणारे साधन म्हणजेच लिफ्ट होणार नाही का?
उद्वाहक = liftman?

उद् / उत् = over, up, above, aloft
एक विचार म्हणून मांडतो पण मला नक्की माहित नाही :

उद्वाहचा अर्थ " निव्वळ वर जाणारे पण कोणाला बरोबर नेईलच असे नाही',
असा होईल का ?
(उदा. एखादे रॉकेट वर गेले ..)

वाहक = वाहून नेणारा/रे
हा अर्थ बघता, तो सजीव किंवा निर्जीव दोघांनाही लागू असलेला शब्द आहे

तुप', 'फुल', 'पुजा', 'कुल लूक' असे डिजिटल लेखनात तर असतेच, छापील दैनिकात -पुस्तकात सर्रास दिसते. ते तूप, फूल, पूजा, कूल लुक' असे असावे ना ?

आशीर्वाद चे आर्शिवाद / आशिर्वाद हे तर आता सुधारणेच्या पलिकडे गेले आहे.

>>>>>>>>>आशीर्वाद /आर्शिवाद / आशिर्वाद हे तर आता सुधारणेच्या पलिकडे गेले आहे.
Lol
आशीर्वाद बरोबर आहे ना?

आशीर्वाद बरोबर आहे.

आम्ही सध्या यूट्यूबवर जुने 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमाचे भाग बघतो. बाकी अगदी नक्षत्रासारखा कार्यक्रम असतो, पण श्रेयनामावलीत शुद्धलेखनाच्या चुका बघून दाताखाली खडा आल्यासारखं वाटतं.

>>>>>>आम्ही सध्या यूट्यूबवर जुने 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमाचे भाग बघतो.
सदाबहार कार्यक्रम आहे तो. मी भाऊबीजेला भारतात गेले होते एकदा तेव्हा या कार्यक्रमाच्या डिव्हिडीज, ओवाळणीत, भावाला मागून घेतल्या.

काही शब्दरूपे प्रचलित असली तरी बरोबर नाहीत असे वाटत राहते. उदा. आज्जी.

आजोबा-आजी असेच शिकलो आहे. आज्जोबा-आज्जी हे गेली १०-१२ वर्षे वाचण्यात येत आहे, त्याआधी फारसे नव्हते.

अनेक जागी 'बालदी' लिहिलेले असते, तो शब्द 'बादली' असा शिकलो आहे.

सदाबहार कार्यक्रम आहे तो. >> अगदीच.
मी तेव्हा अगदी सगळे भाग बघितले नव्हते. बरेचसे बघितले होते. दोन सीडीजही घेतल्या होत्या नंतर. आता यूट्यूबवर बरेच दिसतायत.
विशेषतः अलीकडच्या सुमार मराठी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा जुना कार्यक्रम फारच छान वाटतोय बघायला.

आज्जी >> सहमत.
पण, वेगळा अर्थ असलेले
अज्जी, अज्जीबात हे बरोबर आहेत
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%...
....

बालदी = A leathern bucket.
वझे शब्दकोशाने स्वीकारलेला दिसतोय.

बालदी हा शब्द पोर्तुगीज balde वरून कोंकणीत आणि मराठीत आला. बादली हे त्या शब्दाचे corruption आहे. कोंकणीत बालदीच म्हणतात. बालदीला बादली म्हणणं हे बाटलीला बालटी म्हणण्याइतकंच चुकीचं आहे.

Pages