लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकसत्ता अगदीच वाचवत नाही आजकाल. काहीही बातम्या घुसडतात.

इंदापूर तालुक्यात पेरण्यांना वेग.
सटाणे नगरपालिकेत कॉग्रेस ला बहुमत.
या दोघांमध्येच 'जान्हवी कपूर चा एअरपोर्ट लूक व्हायरल, नेटकर्‍यांकडून लाईक्स चा वर्षाव'

लोकसत्ता अगदीच वाचवत नाही आजकाल. काहीही बातम्या घुसडतात.

इंदापूर तालुक्यात पेरण्यांना वेग.
सटाणे नगरपालिकेत कॉग्रेस ला बहुमत.
या दोघांमध्येच 'जान्हवी कपूर चा एअरपोर्ट लूक व्हायरल, नेटकर्‍यांकडून लाईक्स चा वर्षाव'

Hahahaha

सांडग्यांची चाळ >> बटाट्याच्या चाळीतलं शिष्टमंडळ एकदा सांडग्यांच्या चाळीत जातं. तिथे निरनिराळे उपक्रम चालू असतात. धमाल वर्णन आहे. (महिला मंडळाचं सामुदायिक न्हाणीघर म्हटल्यावर शिष्टमंडळातले सदस्य घाईघाईने आत जातात आणि 'इथे सगळ्या बाळांना सामुदायिक आंघोळी घातल्या जातात' हे वाक्य ऐकून लगेच बाहेर येतात...)
साहित्य-सुधारणा केंद्र आहे एक. बरंच काही काही आहे.

वावे
धन्यवाद !

बाळांना सामुदायिक आंघोळी
Happy

Lol सामुदायिक.
हे असे दोनदोन संडास एकत्र बांधलेले चित्र बघितले होते. त्यामुळे ते खरं असू शकेल.

Punekarnews नावाच्या एका इंग्रजी ई वृत्तपत्रात पुण्यात वारजे माळवाडी येथे बिबट्या सापडला याबद्दल बातमी आली आहे. त्यात 'Warje Malwadi, which is part of Bhar Vasti in the city, ....' असे शब्द आहेत. Lol

इथे एक अत्यंत प्रचारकी जाहिरात आहे:
https://sheopalsdiabetes.com/mr-jan-23-1/?utm_source=taboola&utm_medium=...

त्यातली अनेक वाक्ये वाचून करमणूक झाली. उपशीर्षके तर दिव्य आहेत….

"जीवन निर्माण करणाऱ्या भारतीय मधुमेहाबद्दल गैरसमज" …??????

आज इ-सकाळमध्ये एक लेख आहे - "Chaitra Navratri 2023 : अष्टमी अन् नवमी वेगवेगळ्या दिवशी का साजरी केली जाते? वाचा धार्मिक कारण".

आता हा काय प्रश्न झाला का?

मराठी बातम्या/ जाहिराती यांची शब्दरचना बोजड आणि हिंदी / इंग्रजी व्याकरणावर आधारित होत चालली आहे. हे निरीक्षण बरोबर असेल तर या समस्येवर एक सोपा उपाय आहे...

https://paraphrasetool.com/

बर्‍याचदा जाहिरातीचा इंग्रजी मसुदा गूगल ट्रान्स्लेट वापरून मराठी केला जातो. अशा वेळी खाली दिल्यासारखी मजेदार वाक्यरचना तयार होते. अशा मंडळींनी तर आवर्जून या सेवेचा लाभ घ्यावा. जाहिरात वाचली तरी जाईल.

आज बहुतेक मधुमेहावरील उपचारांचा आधार मेटफॉर्मिनवर आधारित औषधे आहेत. मात्र हा अशिक्षित रुग्ण आणि डॉक्टरांचा भ्रम आहे. तो उपचाराचा विषय नाही. जर तुम्ही टाइप मधुमेहाने तुमच्या डॉक्टरांकडे गेलात आणि त्यांनी या औषधांचा त्याच्या उपचारात समावेश केला असेल तर अशा डॉक्टरांपासून दूर राहा. ही सर्व औषधे रक्तातील इन्सुलिनची पातळी खूप वाढवतात. इन्सुलिनच्या या प्रमाणात रक्त खूप घट्ट होते. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण जास्त असल्याने त्याची मोठी हानी होते. हे यकृत मूत्रपिंड आणि इतर उत्सर्जित अवयव जवळजवळ नष्ट करते. इन्सुलिन हे पोटातील ऍसिडसारखे घट्ट होण्यास आणि कार्य करते. पोटातील ऍसिडमुळे तुमच्या अंतर्गत अवयवांना पूर आला तर काय होईल याची कल्पना करा. ते ऍसिडने जळतील.

पॅराफ्रेज वापरून साध्या शब्दात तोच मजकूर सांगितला तर आपली जाहिरात लोकांना लवकर समजेल.

मधुमेहावरील बहुतेक उपचारांमध्ये मेटफॉर्मिन-आधारित औषधांचा समावेश होतो. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुमचे डॉक्टर तुमच्या उपचाराचा भाग म्हणून मेटफॉर्मिनवर आधारित औषधे लिहून देत असतील, तर तुम्ही अशा डॉक्टरांना टाळावे. मेटफॉर्मिन-आधारित औषधे रक्त खूप घट्ट करतात आणि यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांना खूप नुकसान करतात.

मशिन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा जाहिरातदारांना फायदा झाला नाही तर उपयोग काय?

या धाग्यात मागे दिले गेलेले वाक्य आणि या मॉडेलने सुचविलेली सुधारणा खाली दिली आहे.

आज धनुष्यबाण, शिवसेना हे नाव चोरलं गेलं आहे. मात्र ज्यांची चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळीवर दगड मारला आहे.

तुम्ही वरील वाक्यच दोन - तीन वेळा सबमिट केले तर दोन तीन प्रकारे हा विचार कसा व्यक्त करता येईल तेही पाहता येईल.

आज धनुष्यबाण, शिवसेनेच्या नावाची चोरी झाली. पण नाव चोरणार्‍यांना हे कळत नाही की त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगडफेक केली आहे.

मराठी भाषा शिकणाऱ्यांना देखील ही सुविधा वापरता येईल.

आणखी एक उदाहरण. यात मशीन लर्निंग मॉडलने शब्दरचना सुधारली आहेच पण त्याचबरोबर शुद्धलेखनही!

मूळ वाक्यः
अनेकवेळा प्रशासनामधील काही आधिकाऱ्यांच्या अमानवी कृत्यमुळे त्यांच्या टीका होते. पण या जिल्हाधिकाऱ्यानं सर्वांना माणुसकी शिकवली आहे. लॉकडाउनमध्ये भाजीपाला विकून स्वत:च आणि कुटुंबाची भूक भागवणाऱ्या आजीला मदत करत जिल्हाधिकारी सध्या चर्चेत आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या या कार्याचं कौतूक होत आहे.

पॅराफ्रेजः
प्रशासनातील काही अधिकारी वाईट काम करतात, त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कठीण प्रसंगी एकमेकांना मदत करण्याची माणुसकी शिकवली आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणाऱ्या एका आजीला मदत केल्यामुळे जिल्हाधिकारी सध्या चर्चेत आहेत. या कामाचे कौतुक होत आहे.

मॉडेल नवीन आहे. सुधारणेला बराच वाव आहे. पण जे मिळतंय ते देखील काही कमी नाही. Happy

पॅराफ्रेज वापरून साध्या शब्दात तोच मजकूर >
>>>
सुविधा चांगली आहे. वाचकांना निदान सुसह्य मजकूर देता येईल
धन्यवाद !
...
अर्थात चांगल्या मराठीसाठी संपादन आवश्यक राहीलच.
हे मी तिथे प्रयोग करून पाहिले.

सुविधा भाषांतराच्या मानाने बरीच चांगली दिसते आहे. अनेक लोक जर चुकीची वाक्यरचना करत असतील तर मशीन लर्निंग मॉडेलही चुकीचेच सुचवेल काय? की त्यात व्याकरणाचे नियम कोड करून त्यांना प्राथमिकता दिली गेली आहे?

https://pudhari.news/maharashtra/pune/531952/cyclone-forming-in-bay-of-b...
इथल्या बातमीत असे वाक्य आहे :

" बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळाची निर्मिती सुरू झाली "

इथे निर्मिती शब्द चूक नसला तरी 'उत्पत्ती झाली' हे अधिक योग्य वाटते का ?

धन्स.
अजून एक विचार.
विश्वाची निर्मिती अज्ञात शक्तीने "केली"
असे म्हणण्यापेक्षा
विश्वाची उत्पत्ती .. अशा प्रकारे झाली असे म्हणणे योग्य वाटते.

Pages