लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या सकाळ मध्ये अश्विनचे सामन्यात १२ विकेट असा मथळा आला आहे. ही चुकीची वाक्यरचना वाटतेय
1. एकापेक्षा जास्त असल्याने विकेट्स हवे.
2. अश्विनचे विकेट किंवा विकेट्स दोन्ही चूक. अश्विनची विकेट किंवा आश्विनच्या विकेट्स हे जास्त बरोबर वाटते.

माझ्या मते सामन्यात अश्विनच्या १२ विकेट्स हे योग्य असावे.

माबोकरांकडून मत ऐकायला आवडेल.

धन्स कुमार, मानव आणि हपा.

अवांतर: मराठी दैनिकांच्या पुरवण्यांचे नाव मात्र इंग्रजी
उदा. पुणे Today (सकाळ), हॅलो पुणे (लोकमत)

पुरवण्यांचे नाव मात्र इंग्रजी >>>
फक्त पुरवण्यांचीच नाही तर अनेक सदरांची नावे सुद्धा इंग्रजी असतात. हे सुमारे गेल्या १५-२० वर्षांपासून चालू आहे. तेव्हा त्याच्यावर भरपूर काथ्याकूट झाला होता.

आता या विषयावर नव्याने लिहिण्यासारखे माझ्याकडे काही नाही. म्हणून थांबतो.

दुसऱ्या भाषेतून घेतलेल्या शब्दाचं बहुवचन वापरायचं ऑब्लिगेशन नसतं ना? रादर वापरत नाहीतच ना?
I will have a butter chicken and two chapatya chapatis
गाईपण भारी ची दोन तिकिट्स तिकिटं द्या.

Obligation नाही तर मग विकेटचं मराठी अनेकवचन विकेट हे बरोबर कसं?

I will have two chapati vs I will have two chapatis
दोन तिकी द्या vs दोन तिकिटं द्या.

तसेच
बाईपण भारीचे दोन तिकिटं vs बाईपण भारीची दोन तिकिटं

>>>
I will have a butter chicken and two chapatya chapatis
गाईपण भारी ची दोन तिकिट्स तिकिटं द्या.
<<<
याच न्यायाने 'अश्विनच्या १२ विकेटी' म्हणावं लागेल - ज्या भाषेत बाकीचं वाक्य तिचे नियम. Happy

Absolutely.
इतकंच काय, तुम्ही
अश्विनच्या १२ विकेटी
अश्विनचे 12 विकेट
अश्विनची 12 विकेटं
यातलं काहीही म्हणू शकता.
दुसऱ्या भाषेतली लिंगं पण recognize करायला लागली तर तुम्हाला
मी ट्रक चालवलं ( इंग्लिश)
किंवा
मी ताटात केसाडिया ठेवली आणि त्यावर सल्सा ओतली ( स्पॅनिश) असं लिहायला लागेल.

भारी !
माझ्या आठवणीप्रमाणे ही बरीच जुनी बातमी असून या धाग्याच्या पहिल्या भागात हा विषय झालेला आहे.

इथला https://www.lokmat.com/editorial/sickle-cell-new-and-false-threat-of-unt... लेख डॉ. अभय बंग यांच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्याची भाषा यांत्रिक भाषांतराप्रमाणे आहे आणि काही वाक्ये तर खटकतात :

.. लोकसंख्येची आक्रमक तपासणी करणे..

... त्यांना दुसऱ्या सिकलसेलशी लग्न न करण्याचा सल्ला देणे..
( सेलशी लग्न ??? )

https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/5-best-ayurvedic...

विचित्र शीर्षक, तथ्य नसणारे दावे आणि "आयुर्वेदिक पाने", "युरीक ॲसिड हा घाणेरडा पदार्थ" असली विधाने.
त्यात कोथिंबीर मूत्रवर्धक (शब्द बरोबर आहे का?) आहे, आणि मूत्रवर्धक पदार्थां मुळे युरिक ॲसिड वाढते असा अनुभव आहे.

**युरीक ॲसिड हा घाणेरडा पदार्थ"
>>> याला अत्यंत घाणेरडे विधान म्हणता येईल !

यांत्रिक भाषांतर केलेला tp जागाभरू लेख. पुन्हा तळटीप टाकून नामानिराळे राहायचे....

मूत्रवर्धक हे diuretic चे भाषांतर ठीक वाटते.

स्पेस.कॉम वरून

NASA's New Horizons will investigate Uranus from the rear (Neptune, too). Here's how you can help
By Keith Cooper published 5 days ago
By taking part, you could help solve the mystery of Uranus' missing heat.

Lol
मुद्राराक्षसाला 'बाधा' झाली आहे.

अवघड आहे! Lol
कुठून आलं असेल हे? कशाचं भाषांतरही वाटत नाही!

Happy हो तसेच असावे. शुभमन नावावरून काहीतरी वर्ड प्ले करायचा प्रयत्न असावा.

Pages