लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by हेमंतकुमार on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादर च्या मध्य रेल्वेच्या स्टेशनाबद्दल "दादर टीटी" असे उल्लेख ऐकले आहेत. पण ते ही कदाचित जेथे मार्ग संपणारे प्लॅटफॉर्म असतील त्या भागाबद्दल असेल>> हो, त्याबद्दलच आहे.

आणि हडपसरवरून सुरू होणाऱ्या आणि तिथे संपणाऱ्या काही गाड्या किमान दोन वर्षांपासुन तरी सुरू झाल्या आहेत. काझीपेट हडपसर गाडीने मी दोन वर्षांपूर्वी प्रवास केला.

दादर टी टी पूर्वी ट्राम होत्या त्या वेळ चे ट्राम टर्मिनस होते, अस मला लहानपणी कोणीतरी सांगितलेले. तसेच परळ टी टी पण आहे. हे टर्मिनस की टर्मिनल हे माहीत नाही. मी दादर पूर्व -परळ मध्ये हिंडायचे त्या काळातही इथून कधी काळी ट्राम जात असे यावर आश्चर्य व्यक्त करण्याचे दिवस होते.

Pages