लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवळीकता Lol

मागे दुसरीकडे कुठेतरी अशा शब्दांवर चर्चा झाली होती. गरज नसताना ता लावलेले. माधुर्यता वगैरे. लोकांनी मग त्यावर माधुर्यत्वतापण वगैरे शब्द काढले.

राजकीय फोटो आहे. ता वरून लोकांनी ताकभात समजून घ्यावा म्हणून लिहीले असेल ते Happy

मागे दुसरीकडे कुठेतरी अशा शब्दांवर चर्चा झाली होती. गरज नसताना ता लावलेले >>> Happy हो

बटाट्याची चाळ मधे "हा फोटो आहे. याला परमनंटनेसपणा आहे..." असे वाक्य आहे चाळीतील लोकांच्या तोंडी. (पुढे "...बायकांना खुर्च्यांवर बसवून आम्ही उभे राहिलो तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या" वगैरे आहे Happy चाळीतील सर्वांचा एक फोटो काढायचे ठरते. उपस्थित लोकांपेक्षा उपलब्ध खुर्च्या कमी असतात. मग तेथे कोणी बसायचे यावरची चर्चा आहे ती)

बापता Lol

परमनंटनेसपणा Lol

अमिंद्य, अभ्यासूता म्हणायचं होतं का? Proud

… तुम्ही काढा भाग ३…..

या धाग्यावर पोस्ट करत असतांना चुकांवर हसायला येणे ही माझी पहिली reaction असे- असते. परंतु लेखनात इतक्या प्रचंड प्रमाणात इतक्या बेसिक चुका सर्वत्र होत असतांना राग, दुःख आणि सुधारणेसाठी फार काही करू न शकण्याची हतबलता अशा नकारात्मक भावना (इथे लिहिल्या नाहीत तरी) वरचढ होतात हल्ली.

म्हणून माझ्यापुरते थांबतो, भाग ३ काढण्यासाठी माझा नकार.

अर्थात तुम्ही / इतर कुणी काढला तर वाचणार.

*राग, दुःख आणि सुधारणेसाठी फार काही करू न शकण्याची हतबलता अशा नकारात्मक भावना (इथे लिहिल्या नाहीत तरी) वरचढ होतात हल्ली. >>> +1111
म्हणूनच मलाही आता उत्सुकता वाटत नाही.
असो.
. . .
काहीतरी नवी कल्पना आणि नवे शीर्षक यासह एखाद्या नव्या दमाच्या गड्याने हा कारभार हाती घ्यावा असे वाटते Happy
(अर्थात इच्छा असल्यास)

ग्राकु चा अर्थ ग्रोक ला विचारायला हवा.
अगं, ग्राकू ठेवली नाही तरी चालेल पण तिवून नक्की घे

विमानतळावर पोहता येईल Lol

अनिंद्य, गृहिणीचं कसब लिहिलंय, मला गृहिणीचा कसाब वाचायची अपेक्षा होती. छ्या!

WhatsApp Image 2025-05-20 at 4.26.38 PM.jpeg

एकाच नावाच्या सहा व्यक्तींचे फोटो शोधून ते पब्लिश करण्याचा महाराष्ट्र टाइम्सचा विक्रम. संदर्भ आजचा महाराष्ट्र टाइम्स पान क्रमांक दोन (मुंबई आवृत्ती)

>>>>>>>>एकाच नावाच्या सहा व्यक्तींचे फोटो शोधून ते पब्लिश करण्याचा महाराष्ट्र टाइम्सचा विक्रम.
Lol कमाल आहे उसंडु ची.

Pages