भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
दादर च्या मध्य रेल्वेच्या
दादर च्या मध्य रेल्वेच्या स्टेशनाबद्दल "दादर टीटी" असे उल्लेख ऐकले आहेत. पण ते ही कदाचित जेथे मार्ग संपणारे प्लॅटफॉर्म असतील त्या भागाबद्दल असेल>> हो, त्याबद्दलच आहे.
आणि हडपसरवरून सुरू होणाऱ्या आणि तिथे संपणाऱ्या काही गाड्या किमान दोन वर्षांपासुन तरी सुरू झाल्या आहेत. काझीपेट हडपसर गाडीने मी दोन वर्षांपूर्वी प्रवास केला.
दादर टी टी पूर्वी ट्राम
दादर टी टी पूर्वी ट्राम होत्या त्या वेळ चे ट्राम टर्मिनस होते, अस मला लहानपणी कोणीतरी सांगितलेले. तसेच परळ टी टी पण आहे. हे टर्मिनस की टर्मिनल हे माहीत नाही. मी दादर पूर्व -परळ मध्ये हिंडायचे त्या काळातही इथून कधी काळी ट्राम जात असे यावर आश्चर्य व्यक्त करण्याचे दिवस होते.
रोचक अनुभव. चांगली चर्चा
रोचक अनुभव.
चांगली चर्चा.
. . .
रेल्वेमार्गाला आपण भारतात रेल्वे track म्हणतो. अमेरिकेत यासाठी railroad हा शब्दप्रयोग वापरात होता /आहे :
https://dictionary.cambridge.org/dictionary/essential-american-english/r...
दादर टी टी पूर्वी ट्राम
दादर टी टी पूर्वी ट्राम होत्या त्या वेळ चे ट्राम टर्मिनस होते >>> हो बरोबर. मी याबद्दलही ऐकले आहे.
हेमंतकुमार - हो अमेरिकेत रेलरोड म्हणतात. पण ट्रॅक्सना नव्हे. भारतात सर्वसाधारणपणे आपण ज्याला रेल्वे म्हणतो त्याला इथे रेलरोड म्हणतात. प्रत्यक्ष रूळांना रेलरोड ट्रॅक्सच म्हणतात. अमेरिकेत "अदर साइड ऑफ द ट्रॅक्स" असा उल्लेख काही वर्षांपूर्वीच्या पुस्तकांत, चित्रपटांत दिसतो. गावातला/शहरातला गरीब भाग अशा अर्थाने. गावातील सुखवस्तू वस्ती एका बाजूला तर गरीब कामकरी लोक दुसर्या बाजूला असे काहीतरी तेव्हा झाले असावे. आफ्रिकन अमेरिकन लोक हे मध्यवर्ती भूमिकेत असतील तर अशा पिक्चर्समधे हमखास रेल्वे ट्रॅक्स त्यांच्या जवळपास दिसतात. त्याला काहीतरी ऐतिकासिक संदर्भ असेल, जो मलाही माहिती नाही.
रेल्वेमार्ग हा मात्र "रेल्वे" हा शब्द रेल्वेगाड्यांबद्दल प्रचलित झाल्याने रूढ झाला असावा. नाहीतर त्यात द्विरूक्ती आहे - रेल-वे-मार्ग
एखाद्या देशात प्रचलित नसलेला
एखाद्या देशात प्रचलित नसलेला पण ज्या टार्गेट प्रेक्षकांकरता तो बनवला आहे त्यांच्या माहितीत असलेला शब्द चित्रपटात पेरण्याची दोन उदाहरणे.
द दार्जिलिंग लिमिटेड - वेस अॅण्डरसनच्या या चित्रपटाचे नाव व त्यातील रेल्वेचे नाव. अमेरिकेत रेल्वेगाड्यांच्या नावात "लिमिटेड" असते. भारतात नसते. पण यातील त्या गाडीचे नाव दाखवले आहे. भारतात एक्सप्रेस, पॅसेंजर, मेल ई बरीच नावे असतात पण लिमिटेड पाहिले नाही कधी. दुसरा ब्लूपर आहे तो रेल्वेफॅन्सकरता डीप आहे. लिमिटेड ट्रेन ही सहसा "निम्न स्थानकोंपरही रूकेगी" टाइप फास्ट गाडी असते. यात प्रत्यक्षात ती टॉय ट्रेन आहे असे आठवते
परदेस - यात महिमा घर सोडून पळून जाते तेव्हा अमरिश पुरी हॉलीवूडमधे राहात असताना "पोलिस कमिशनर को फोन लगाओ" म्हणून फर्मान सोडतो. अमेरिकेत भारतासारखे पोलिस कमिशनर हे पद नाही. काही सरकारी खात्यांत "कमिशनर" हे पद असते पण ते नोकरशाहीतील असते. भारतासारखे इंडियन पोलिस सर्व्हिस मधून आलेले ऑफिसर नसतात. बाकी असा कोणी असता तरी कायद्याने सज्ञान मुलगी घरातून निघून गेली आणि त्याला सापडली तो कोणत्या कायद्याने तिला घरी परत आणणार हा प्रश्न होताच
फारएण्ड,
फारएण्ड,
चांगली माहिती. धन्यवाद !
* त्यात द्विरूक्ती आहे >> +१
अमेरिकेत "अदर साइड ऑफ द
अमेरिकेत "अदर साइड ऑफ द ट्रॅक्स" असा उल्लेख काही वर्षांपूर्वीच्या पुस्तकांत, चित्रपटांत दिसतो >> हे म्हणजे अगदीच मुंबईच्या उपनगराचं नाव सांगितल्यावर ईस्ट की वेस्ट विचारतात तसं झालं. (ह. घ्या.)
हपा मलाही तेच आठवले होते
हपा
मलाही तेच आठवले होते लिहीताना 
दादर टी टी पूर्वी ट्राम
दादर टी टी पूर्वी ट्राम होत्या त्या वेळ चे ट्राम टर्मिनस होते>> हो, पण माझ्या माहितीप्रमाणे तर दादर सर्कलला(खोदादाद सर्कल) होते.
नंतर दादर सेंट्रल स्टेशनला प्लॅटफॉर्म ६-७ की ७-८ टर्मिनस होते (आता क्रमांक बदलले असतील) त्याला दादर टीटी म्हणु लागले. तिथुन सुरू होणाऱ्या गाड्यांपैकी एक सेवाग्राम एक्स्प्रेस होती. ती आता सीएसटीएम् वरून सुटते.
पैशाचे “कायम” होणार ?
पैशाचे “कायम” होणार ?
बरं, पूर्ण बातमी वाचली, त्यात काहीच क्लू सापडला नाही.
उसंडु की घोराख्यान ?
प्रश्न विसरतोय? की आगाऊ
प्रश्न विसरतोय? की आगाऊ सूचनावजा इशारा देतोय? LOL
अनिंद्य,
अनिंद्य,
टीचन किप्स टाका की.
किती दिवस झाले वाचून...
काय या शब्दाला संस्कृतमध्ये
काय या शब्दाला संस्कृतमध्ये कायम् म्हणत असावेत
काय या शब्दाला संस्कृतमध्ये
काय या शब्दाला संस्कृतमध्ये कायम् म्हणत असावेत >>

असले लेखन आता कायमचेच होऊन
असले लेखन आता कायमचेच होऊन बसले आहे !
. . .
आजच्या मटामध्ये 'खुली मुलाखत' असे एक शीर्षक आहे.
खुली ऐवजी जाहीर शब्द अधिक योग्य वाटतो.
संस्कृतमध्ये कायम्
संस्कृतमध्ये कायम् … 😁
… अनिंद्य, टीचन किप्स टाका ….
मला वाटले की रिपिटेटिव / बोअर झाले असावे लोकांना ते म्हणून शेयरत नव्हतो. अजूनही टिचन किप्स वाल्यांची भयानक चुका करण्याची consistency दाद द्यावी अशी आहे.
मासल्यासाठी डकवतो काही किप्स थोड्या वेळाने.
बरोबर, खुली मुलाखत ऐवजी जाहीर
बरोबर, खुली मुलाखत ऐवजी जाहीर मुलाखत जास्त योग्य वाटते ऐकायला. ✔
बंदिस्त स्टेडियममधे होणाऱ्या “खुल्या” स्पर्धा हेसुद्धा थोडे ऑडच वाटते पण मला अन्य शब्दपर्याय नीटपणे माहिती नाहीत.
किंवा प्रकट मुलाखत?
किंवा प्रकट मुलाखत?
खुल्या टेनिस स्पर्धा जेव्हा
खुल्या टेनिस स्पर्धा जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हौशी आणि व्यावसायिक, दोन्ही प्रकारच्या खेळाडूंसाठी खुल्या, असा असतो. या अर्थाने तो बरोबर आहे. तुम्ही वेगळ्या कुठल्या खुल्या स्पर्धा म्हणत असलात तर कल्पना नाही.
वावे, सहमत.
वावे, सहमत.
Submitted by वावे on 24
Submitted by वावे on 24 February, 2026 - 14:50>>> वावे हेच लिहायला खाली येत होतो
खुल्या = दोन्ही प्रकारच्या
खुल्या = दोन्ही प्रकारच्या खेळाडूंसाठी खुल्या
अच्छा, समजले.
आभार.
ऋतुराज आणि टिचन किप्स च्या
ऋतुराज आणि टिचन किप्स च्या अन्य चाहत्यांसाठी हा नवा स्टॉक, आधी स्वादिष्ट कासव खा 👇 :
आणि हे एक अजून 👇 👇
कासव खाऊन झाले ? आता माताजा पक्षाला चिकटणारे लाडू खा
टीचन किप्स टाका की.
टीचन किप्स टाका की.
किती दिवस झाले वाचून...>>>
त्या अकाउंट ने किचन टिप्स टाकणं बंद केलंय, सध्या सरकारी योजनांची माहिती टाकतात. अनिंद्य ने आता टाकलेल्या पोस्टी स्टॉकमधल्या शेवटच्या आहेत (शे. पो. २१ डिसेंबर ची दिसतेय). आधी लोकांची करमणूक करून करून फॉलोअर्स जमा केले, नी तेच फॉलोअर्स आणि व्ह्यूज दाखवून आता त्यांनी अकाउंट मॉनिटाईज केलंय.
#Every_publicity_is_good_publicity
बंदिस्त स्टेडियममधे होणाऱ्या
बंदिस्त स्टेडियममधे होणाऱ्या “खुल्या” स्पर्धा हेसुद्धा थोडे ऑडच वाटते >> वावे ने सांगितले ते तर योग्य आहेच,
पण खुल्या म्हणजे मला अजून एक वाटतं ते म्हणजे वयाची कोणतीही अट नसलेलं सुद्धा असेल.
किचन टिप्स भयानक आहेत.
किचन टिप्स भयानक आहेत.
'माधव तात्याराव जाधव'
'माधव तात्याराव जाधव' नावाच्या नेत्याने एखादा पक्ष फोडून 'शिवसेना उबाठा' सारखाच 'माताजा' पक्ष काढला असावा.
आता कुणीतरी 'कासव बिर्याणी' करायला घ्या रे
टटवीत कोचिचीर घालायला विसरू
काय करायचं ते करा पण टटवीत कोचिचीर घालायला विसरू नका त्या कासवाच्या डिश मधे.
टिचन किप्स वाचताना माझ्या
टिचन किप्स वाचताना माझ्या हृदयाची धडधड दरवेळी वाढते. मेंदूमधील प्रोसेसर ओव्हरस्पिन करू लागलाय हे जाणवतं.
खुल्या म्हणजे ओपन. बंधन नसलेला. वयाचे, कौशल्याचे बंधन नसलेल्या अर्थाने अनेकदा ऐकला आहे. खुली गायन स्पर्धा, खुली कॅरम स्पर्धा इ.
टिचन किप्स
टिचन किप्स
Pages