लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॅलेंट म्हणजे काय शी आहे का>>>

त्यांनी डालो केलेले विडिओ बघितल्यावर मतपरिवर्तन होईल Happy

नैसर्गिक विष मिळू शकते असं लिहिलंय>>>>>>
नैसर्गिक असल्याने कुठलेही साईड ईफेक्ट्स नाहीत असेही लिहिले असणार ना??? Lol

विरामचिन्हांबद्दलची अनास्था देखील जागतिक आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी Lynne Truss या ब्रिटिश लेखिकेने Eats, Shoots & Leaves हे पुस्तक लिहिलेले आहे. मुळात हे वाक्य पांडा नावाच्या प्राण्याचे वर्णन आहे (पांडा कोवळ्या फांद्या खातो आणि निघून जातो) आणि हे वाक्य Eats Shoots & Leaves असेच लिहिले गेले पाहिजे. परंतु पुस्तकाचे शीर्षक मुद्दाम Eats, Shoots & Leaves असे दिलेले आहे. त्यात नको असलेला स्वल्पविराम घातल्याने अनर्थ झाला आहे (पांडा खातो, गोळ्या मारतो आणि जातो).
विरामचिन्हे ही ट्रॅफिक सिग्नलसारखी असून ती नसतील तर शब्द एकमेकांवर आदळतील असे लेखिका म्हणतात.

गमतीचा भाग पुढे आहे.
या पुस्तकावर टीका करताना अमेरिकेचे Louis Menand म्हणतात की या पुस्तकात देखील विरामचिन्हांच्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत !

इथे https://www.aksharnama.com/client/article_detail/7537 असा मथळा आहे :
ही गोष्ट आहे एका ध्येयवेड्या व्यक्तीची. आकाशाला गवसणी घालूनही मातीचेच पाय असणाऱ्या ‘जीनियस जेम’ची, अर्थातच डॉ. गंगाधर मोतीराम वारके उर्फ डॉ. जीएम यांची

एका कर्तृत्ववान व्यक्तीचा परिचय करून देताना 'मातीचेच पाय' या वाक्प्रचाराचा उपयोग बरोबर वाटत नाही.

मातीचेच पाय = एखाद्या व्यक्तीच्या सामर्थ्यवान किंवा आदर्श स्वरूपामागे लपलेले अपयश, कमकुवतपणा किंवा दोष, जो कालांतराने उघड होतो.

?????
' पाय जमिनीवर असणाऱ्या" असे त्यांना म्हणायचे असावे

Lol

Screenshot_20250909_180409_WhatsApp.jpg

नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244

मातीचेच पाय Proud
हल्ली सकाळ मध्ये सलग दोन तीन दिवस मथळ्यात 'गुलदस्तात' असे होते. तर ते गुलदस्त्यात हवे ना?
मध्ये air कॅनडा च्या सर्व कर्मचाऱ्यांचा संप झाला होता तर त्यात सगळीकडे air india लिहिले होते. Proud
हल्ली अजून एक म्हणजे कुत्र्याला श्वान असे लिहितात, अगदी आत्तापर्यंत कुत्रा कुत्राच होता. भटक्या श्वानांचा प्रश्न असे असते हल्ली.
कुठल्या तरी नशेत असल्यागत वृत्तांकन असते.

सुखद अनुभव !

वरील चूक त्या संपादकांना कळवल्यावर २ दिवसात त्यांनी दखल घेऊन तिथे
मातीवरच पाय
अशी ऑनलाईन दुरुस्ती केलेली आहे. https://www.aksharnama.com/client/article_detail/7537
Happy

दखल घेउन बदल करायची तयारी दाखवली हे चांगले आहे. त्याबद्दल त्यांना क्रेडिट. पण "मातीवरच पाय" हे कृत्रिम वाटते. "पाय जमिनीवरच" किंवा असे काहीतरी जे मराठीत म्हंटले जाते तसे का नाही केले - त्याबद्दल काही सांगितले का? मातीवरच पाय हे कोठे कॉमनली वापरले जात असेल तर ठीक आहे.

* "मातीवरच पाय" हे कृत्रिम वाटते.
>>> +११
मलाही तोच प्रश्न पडला !
ही त्यांची इ-मेल :
"नमस्कार,
बरोबर आहे तुमची शंका. 'पाय जमिनीवर' असं हवं. लेखिकेचेच शब्द शीर्षक म्हणून घेतल्याने आणि घाईगडबडीत लक्षात न आल्याने ही चूक झाली. दुरुस्त करतो.
मनःपूर्वक धन्यवाद!"

असो.
. . .
लष्कराच्या नियतकालीन भाकऱ्या !
(https://www.loksatta.com/lokrang/marathi-periodicals-and-print-magazine-...)
सध्याच्या संपादकीय अनावस्थेवर परखड भाष्य करणारा लेख
“ . . . शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, संपादनाच्या व मुद्रितशोधनाच्या चुका ही सर्वसामान्य (आणि सर्वमान्य सुद्धा?) बाब झाली आहे. . . . तसेच ‘दिलगिरी’ची सौजन्य प्रथा बंद पडल्यात जमा आहे . . . “

“ . . . शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, संपादनाच्या व मुद्रितशोधनाच्या चुका ही सर्वसामान्य (आणि सर्वमान्य सुद्धा?) बाब झाली आहे. . . . तसेच ‘दिलगिरी’ची सौजन्य प्रथा बंद पडल्यात जमा आहे . . . “ > >>> आणि सर्वमान्य सुद्धा. +१

वरील सर्वसाधारण अनास्थेबाबत इंग्रजी वृत्तपत्रकारितेतला एक ठळक अपवाद म्हणजे 'द हिंदू'.

वाचकांचा संपादक नेमणारे ते भारतातील (बहुधा) एकमेव वृत्तपत्र आहे. या संदर्भातील द हिंदूंच्या मालकांपैकी एक असलेले एन राम यांची दीर्घ वाचनीय मुलाखत इथे आहे :
https://weeklysadhana.in/view_article/n-ram-on-print-media-shall-not-be-...

त्यातील हे निवडक :
" . . . वाचकांचा संपादक (रीडर्स एडिटर) नियुक्त करणारे आम्ही पहिलं भारतीय वर्तमानपत्र आहोत. या संदर्भात आमच्यावर ‘द गार्डियन’चा प्रभाव होता. ‘द गार्डियन’मध्ये ॲलन रसब्रिजर संपादक असतानाच्या (1995-2015) काळात वाचकांचा पहिला संपादक नेमण्यात आला. आम्ही त्यांचे वाचकांचे संपादक इआन मेयस आणि रसब्रिजर यांना भारतात व्याख्यानांसाठी निमंत्रित केलं होतं. चेन्नईमध्ये ही व्याख्यानं पार पडली आणि त्यानंतर आम्ही वाचकांच्या संपादकाचं पद सुरू करत असल्याची घोषणा केली. . .
. . . . वाचकांचा संपादक माहिती मागू शकतो, पण वाचकांचा संपादक कार्यालयाच्या मधोमध पूर्णतः स्वतंत्र भूमिका निभावत असतो. हा संपादक वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकाला उत्तरदायी नसतो. दैनंदिन पातळीवर दुरुस्त्या व खुलासे यांची बाजू तो सांभाळतो. दुरुस्त्या व खुलासेही रोज प्रकाशित व्हायला हवेत, हे आम्ही ‘द गार्डियन’कडून शिकलो. . . . "
. . .

‘द हिंदू’ हे भारतातलं सर्वांत महागडं वर्तमानपत्र आहे. सध्या रोजचा छापील अंक 12 रुपये तर रविवारचा पंधरा रुपये असतो. रविवारची मॅगझीन ही पुरवणी अप्रतिम असते. तिची सर अन्य प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांना नाही हा स्वानुभव.

वाचकांचा संपादक पायोनियरिंग आयडिया. 👍

.. द हिंदू ची सर अन्य प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांना नाही..

+ १ गुणिले इन्फिनिटी

King of content आहे द हिंदू आणि लाइव्ह मिंट.

भाषेचे सौंदर्य, टू द पॉइंट, नेमके, शार्प प्रस्तुतिकरण आणि बरेचसे निष्पक्ष मंथन अशा दुर्लभ-दुर्मिळ गोष्टी जमलेले, जपलेले वृत्तपत्र.

(२० + वर्षांपासूनच्या या तुच्छ वाचकाचे मत)

अनिंद्य + १११ .. .. इन्फिनिटी पर्यन्त ! Happy
त्यांच्या मॅगझीन पुरवणीतील एका पानावर असलेले वाचक-लेख देखील अतिशय दर्जेदार असतात.

आपल्या इंग्रजी शब्दकोशांच्या धाग्यासाठी मला कित्येक वैशिष्ट्यपूर्ण शब्द या वर्तमानपत्रातूनच मिळालेले आहेत त्याबद्दल कृतज्ञता !

'हिंदू' मीही गेली अनेक वर्षे वाचते. रोजचा पेपर, त्यातल्या संयत शब्दांतल्या बातम्या वाचायला अतिशय आवडतात.
पण 'मॅगझीन'बद्दल मात्र माझं मत थोडं वेगळं आहे. माझी आवड तुम्हा दोघांपेक्षा वेगळी असेल कदाचित. वाचक-लेख हा थोडा 'मुक्तपीठ' चा सोफिस्टिकेटेड अवतार वाटतो मला बऱ्याच वेळा. अर्थात मी दरवेळेस नाही वाचत. पुस्तकांवरचे लेख कधी आवडतात, कधी नाही. काही ठराविक स्तंभलेखकांचं लेखन आवडतं. क्विझ पहिल्या पहिल्यांदा आवर्जून सोडवायचे. आता नाही रस वाटत. कोविडपूर्व काळात रोजची मेट्रो प्लस पुरवणी असायची ती आवडायची. आता ती बंदच झाली. पण एकंदरीत पेपर आवडतो आणि दर्जेदार असतो याला +१००

Pages