लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका व्यक्तीचे तीन चार ड्यू आयडी असणं इथे परिचित आहे, पण अनेक व्यक्तींचा एकच आयडी असणं हे नवीन आहे.

तू अनंत तुझी अनंत रूपे....
याची डोळा आज म्यां पाहिली
>>> Lol

अनेक व्यक्तींचा एकच आयडी असणं हे नवीन आहे
>>>
अजिबात नाही Happy संयोजक चमू व्यतिरिक्त सुद्धा घडतं असं माबोवर. असो!

काय राव तुम्ही !
दिलीप प्रभावळकर एकाच शो मध्ये सहा भूमिका करतात ते चालते तुम्हाला आणी इथे युगंधरा ला नावे ठेवताय !

इंग्रजीतील शुद्धलेखनाच्या बाबतीत apostrophe योग्य प्रकारे वापरण्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु याबाबत पाश्चिमात्य देशांसह जगभरातच एकंदरीत अनास्था आणि बेफिकिरी आढळते. सार्वजनिक माध्यमांमध्ये अशा झालेल्या चुकीच्या apostrophe वापराबद्दलचे अनेक फोटो इथे पाहता येतील :
https://www.apostrophe.org.uk/latest
Screenshot (43).png

अर्थात पाश्चिमात्य जगात देखील (आपल्यासारखेच) भाषेबद्दल आणि शुद्धलेखनाबद्दल कळकळ असणारे लोक असतात. त्यांनी चालू केलेला एक सुंदर उपक्रम म्हणजे Apostrophe Protection Society.
त्याची माहिती इथे आहे : https://www.apostrophe.org.uk/

>>>>>चालू केलेला एक सुंदर उपक्रम म्हणजे Apostrophe Protection Society.
अरे वा! खूप छान. लिंक वाचते. तत्पूर्वी - आय डिड कॉल्ड हर वाल्यांचेही काहीतरी करा ब्वॉ!

>>>>>>>>"The little apostrophe deserves our protection. It is indeed a threatened species!"
Happy

इंग्लिश शुद्धलेखनातील अजून काही :
वरती Apostrophe Protection Society चा उल्लेख आहेच. त्याचप्रमाणे गेल्या काही दशकांमध्ये अर्धाविरामाचा वापर झपाट्याने कमी होताना दिसतो. म्हणून त्याचे समर्थक आणि विरोधक यांनी त्याच्या वापराबाबत विविध मते मांडली आहेत.

एका अभ्यासकाने Semicolon Supporting Society असा उपक्रमही असावा असेही म्हटले आहे.

भावनांचा गू
भातासोबत युद्ध
खाजदार

😂

यांना भर चौकात उघडं करुन चाबकाचे फोडून काढायला हवं.....एकदा प्रुफ रिडींग ही करत नाही की काय??

भावनांचा गू
भातासोबत युद्ध
खाजदार
>>> Rofl

स्पेलिंग खरंच महत्त्वाचे आहे?

इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला विस्तृत सारांश नजरेखालून घातला (https://www.google.co.in/books/edition/Does_Spelling_Matter/81GLV2XHjRYC...).

त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे :
१ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली.

२. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत.

३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात.

४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही.

५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.

६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.

या महत्त्वाच्या विषयावर पुस्तक लिहून विवेचन केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन !

< Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे> बापरे, आश्चर्यच आहे !

नक्की काय म्हणायचं आहे? टॅलेंट म्हणजे काय शी आहे का?

IMG-20250726-WA0004.jpg

Pages