लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....'

बाईला बाप्यापासून मूल होतं एवढंच माहीत होतं. हे काय आता नवीन?

बरेच दिवस झाले, वॉज मिसिंग टिचन किप्स.

भाषा सोडा, आता १-२-३-४ असे क्रमांकही बरोबर देता येत नाहीत. बाकी मनोरंजन तुम्ही आपापले करून घ्यालच 😂

bd3d5f83-5e3e-46f3-b970-079269c6aa07.jpeg

४ नंबर पुन्हा (करमणूक करण्यात) चुकलाय (म्हणजे बरोबर छापला आहे Proud )

मराठीचा खून करतच होते, आता हे लोक अनुक्रमांक चुकवून गणिताचाही खून करणार वाटतं Wink

वरच्या टिप्स मध्ये आलं लसूण मिरची वगैरे गोष्टी टिकवायला एवढं काही करायची गरज नाही. त्या वस्तू न कापता न चिरता आहे तश्या कच्च्या फ्रीज मध्ये ठेवल्या तरी आठवडाभर छान टिकतात.

उद्या असंही म्हणतील की स्टीलची पातेली त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवली तर आठवडाभर छान टिकतात.

>>> स्टीलची पातेली
Lol

टिकवणं हा मुख्य उद्देश नाहीये, ‘वापरायला तयार’ स्थितीत टिकवणं हा आहे. प्रत्येक वेळी स्वयंपाक करताना चिरावं लागू नये म्हणून ठेचा/पेस्ट वगैरे. Happy

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

सध्या चर्चेत असल्याने चेकवले तर “समस्या” म्हणून चक्क अपत्यांची नावे ❗️

f9ee891f-9594-4d48-9ea4-3c73a3f537ea.jpeg

विचारांती ते issues चे भाषांतर असावे हे पटले. 🤦

देवा Lol

Lol

हमसा-हमशी >>> Lol

ते इस्त्रायलला 'हमसा नही देखा' म्हणत असतील.

IMG_8102.jpeg

.

ग्रामस्थ्यांचे ❓

समस्थ ग्रामस्थ आधी वाचले होते.

हे नवीन आहे.

मध्येच मराठी भाषा ची पोस्ट आली, मी सवयीने यात काय चुकलेत म्हणून वाचत गेलो
मग खाली कळलं ही संयोजकांची रिक्षा होती

या धाग्यावर नीट काही लिहिलेलं असलं की काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटतं Happy

Pages