लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असो . . .
मराठीच्या गौरव दिनी हे काय पहावे लागत आहे !

हमसा-हमशी रडायचे की काय ?>>>> Lol
इस्त्रायलला 'हमसा नही देखा' म्हणत असतील >> Lol
अनिंद्य,
अशी रत्ने शोधून इथे डकवल्याबद्दल धन्यवाद

…: अशी रत्ने शोधून ….

मराठी पेपर रत्नखाण झालेत. शोधावे लागतच नाही, साधे मथळे वाचले तरी भागते.

img_1_1740775135162.jpgimg_4_1740775242126.jpgimg_5_1740775402043.jpgimg_6_1740775434249.jpgimg_8_1740775557671.jpgimg_9_1740775583689.jpgimg_10_1740775618108.jpgimg_11_1740775870326.jpgimg_12_1740776179374.jpgimg_13_1740776221898.jpgimg_14_1740777278752.jpg

सर्व छायाचित्रे मिलिंद शिंत्रे यांच्या फेसबुक पेज वरुन साभार.

Rofl
चितळे, तुम्हीसुद्धा? Lol
अनिला वृद्धच केलं बिचार्‍याला.
२१ ते ३२ फेब _/\_

डोंबिवली बंगाल 'वी'कण्याचं गौडबंगाल काय आहे?

अनिंद्य
खतरनाक.
लाज विकून आलास का? याचे मूळ सापडले Lol

यातल्या अनिवृद्ध बद्दल मी आणि माझी मैत्रीण:

मैत्रीण: ज्याला कोणी रोखू शकत नाही तो अनिरुद्ध. मग जो कधी म्हातारा होणार नाही तो अनिवृद्ध म्हणायचा का? Wink
मी: हे बेस्ट आहे की!! उद्या जर कोणी च्यवनप्राशचा ब्रँड चालू केला तर आपण त्याला अनिवृद्ध च्यवनप्राश म्हणू Lol

अरे देवा! Biggrin
चिकन 'डर्म' हा कुठला अवयव आहे या कल्पनेनेही धडकी भरली! Proud

फारा वर्षांपूर्वी केरळ ट्रिपमध्ये मेनू कार्डावर 'सांबार बाथ', 'रसम बाथ' वगैरे वाचून दचकल्याचं आठवलं. पण ही निराळीच लेव्हल आहे! Lol

Lol
इस को खा डाला
फेफरे येई अंगाला

(विवाह)संबंध आंतरजातीय असू शकतो (दोन निरनिराळ्या जातींच्या व्यक्तींतला), वधू एकटीच आंतरजातीय कशी असणार? Happy

Pages