भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
सगळी झगडणारी राष्ट्रे
सगळी झगडणारी राष्ट्रे अमेरिकेच्या हातातील पोन्स तर आहेत.
सोलापूर विद्यापीठ BA मराठीची
सोलापूर विद्यापीठ BA मराठीची प्रश्नपत्रिका !
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेची पुरती वाट लावलेली दिसतेय.
हे असायला हे होते. :
दोन दिवस वाट पाहण्यात गेले
दोन दिवस दु:खात गेले
हिशेब करतो आहे आता
किती राहिले डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला
तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच
जिंदगी बर्बाद झाली
काय छापले आहे ते दिसतेच आहे
Disclaimer: विद्यापीठाने चूक झाल्याचे मान्य केलेले नाही. तक्रार आल्यास चौकशी करु म्हणाले आहेत बहुतेक.
अरेरे! वाट लावली आहे नारायण
अरेरे! वाट लावली आहे नारायण सुर्व्यांच्या कवितेची. यावर हसू न येता संताप आला. हे खरंच खरं आहे?
वरच्या प्रश्नातही पूर्णविरामाच्या जागी प्रश्नचिन्ह आहे.
* तक्रार आल्यास चौकशी करु >>
* तक्रार आल्यास चौकशी करु >>>
असो. सध्या (बहुतेक) सगळे असेच आहे . . .
प्रश्न क्रमांक १ चे उत्तर
प्रश्न क्रमांक १ चे उत्तर स्वतः तुकोबांच्या ओवीत सापडेल
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२|| तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥
आणि ह्याची आवश्यकता असल्याचा पुरावा म्हणजे प्रश्न क्रमांक २
.. हे खरंच खरं आहे?…
.. हे खरंच खरं आहे?…
Unsubstantiated सांगोवांगी गोष्टींबद्दल लिहित नाही. जालावर भरपूर दांगडो झालाय ऑलरेडी. आता दैनिक सकाळने ल़क्ष घातले / छापले म्हणून नीट समजले.
धाग्याचे शीर्षक “लष्कराच्या भाकऱ्या”च असल्याने लिहिले, लष्कर घोडदळ की पायदळ ते ठरवा
हर्पा, reference point साठी आभार. होय, पुरावा म्हणजे प्रश्न क्रमांक २
एका ठिकाणी मात्र हसू आलं.
एका ठिकाणी मात्र हसू आलं. सॉरी.
सोनाक्षीत शेकारी पोलाद काय!!!!????
फटके द्या या लोकांना.
या बातमीनुसार साडेतीन हजार
या बातमीनुसार साडेतीन हजार पैकी चार ते पाच प्रश्नपत्रिका चुकीच्या छापल्या गेल्या असे म्हटले आहे.
चार पाच मध्येच चूक कशी होऊ शकते असा प्रश्न पडला.
चार ते पाच याला काय अर्थ आहे?
चार ते पाच याला काय अर्थ आहे? चार किंवा पाच. चार ते पाच किलो, लिटर वगैरे म्हणू शकतो कारण त्यात चार आणि पाचच्या मधले आकडे पण येतात. चार ते पाच प्रश्नपत्रिका म्हणजे काय? साडेचार प्रश्नपत्रिका पण असतात का?
सोनाक्षीत शेकारी पोलाद>>
सोनाक्षीत शेकारी पोलाद
सोनाक्षीत शेकारी पोलाद
हा पेपर देउन टॉप करणारे नक्कीच मोठे लेखक होतील याठिकाणी.
Unsubstantiated सांगोवांगी
Unsubstantiated सांगोवांगी गोष्टींबद्दल लिहित नाही. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी! तसा उद्देश नव्हता. बी. ए. मराठीच्या प्रश्नपत्रिकेची ही अवस्था अविश्वसनीयरीत्या केविलवाणी वाटली म्हणून तो प्रश्न विचारला.
राग आला असेल तर सॉरी!…
राग आला असेल तर सॉरी!…
राग नाही. अविश्वास राहू नये म्हणून मी तसे clarify केले. इतक्यात मानव संबंधित बातमीची लिंकच घेउन आले.
No hard feelings whatsoever.
“मोफत कर्ज“ ❓❓
“मोफत कर्ज“ ❓❓
त्ये काय असतया? मलाबी द्या की वो.
तुम्ही राज्य आहात का?
तुम्ही राज्य आहात का?
कंसेप्ट तर समजू देत आधी.
कंसेप्ट तर समजू देत आधी. ‘मोफत कर्ज’ ने उत्सुकता फार ताणली आहे.
व्याजमुक्त आहे आहे बहुतेक.
व्याजमुक्त आहे ते बहुतेक.
“Interest free loan” चे
“Interest free loan” चे भाषांतर करण्याच्या घाईत interest गमाऊन बसलेत वाटतं
At least headlines should be read once before a newspaper/ their website publishes it ? Too much to expect ?
मी लपाछपी खेळतोय. माझ्या"वर"
मी लपाछपी खेळतोय. माझ्या"वर" राज्य आहे. त्यामुळे माझ्या"वर" मोफत कर्ज व्हायला हरकत नाही, मानव
वा राजे !
वा राजे !
राज्यांनी सांगितले की मोफत कर्ज तर तसे करू.
मनोराज्य असेल तर मोफत कर्जच
मनोराज्य असेल तर मोफत कर्जच काय हवं ते मिळेल.
(No subject)
>>> वाट लावली आहे नारायण
>>> वाट लावली आहे नारायण सुर्व्यांच्या कवितेची. यावर हसू न येता संताप आला
खरंच!
वाट लावली आहे नारायण
वाट लावली आहे नारायण सुर्व्यांच्या कवितेची. यावर हसू न येता संताप आला>> +१. यांच्याच छापील पेपरांची यांनाच उलटं टांगून धुरी द्यायला हवी!
गळा घोटला? असे मराठीत म्हणतात
गळा घोटला? असे मराठीत म्हणतात ? छापिल मराठीत आधी कधी वाचले नाही.
शीर्षकात गळा घोटला, तर बातमीत पुढे
- गळा दाबून मारले
- गळा आवळून खून केला (हे दोनदा)
असे नीट लिहिले आहे. म्हणजे योग्य शब्द माहित नाही हे कारण नाही इथे
गळा घोटणे - जीव घेणे; मारून
गळा घोटणे - जीव घेणे; मारून टाकणे
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE+
वाक्प्रचार बरोबर आहे.
चला, मग माझ्या अल्प वाचनाला
चला, मग माझ्या अल्प वाचनाला दोष. ही भाकरी परत घेतो
हल्ली कर्ता, कर्म, क्रीयापद
हल्ली कर्ता, कर्म, क्रीयापद अशा क्रमाने वाक्य वर्तमानपत्रात लिहायला किंवा टीव्हीवर बोलायला बंदी आहे का?
मानव पृथ्वीकर यांनी दिलेल्या
मानव पृथ्वीकर यांनी दिलेल्या सकाळच्या लिंकमधील बातमीनुसार सोलापूर विद्यापीठाकडे अद्याप कोणाचीही तक्रार आलेली नाही. याचे कारण बहुतेकांना ही कविता पाठ असण्याची शक्यता आहे!
टंकलेखकाला "स्पेल चेक वापरा" असा सल्ला देऊन काही उपयोग नाही. कारण बरेचसे शब्द बरोबर असले तरी चुकीच्या जागी वापरलेले दिसत आहेत. उदा.
डोळे - दोन
विशेष - हिशोब
करून - करतो
वंद - चंद्र
फुटले - फुलले
राम - रात्र
घड - धुंद
अश्रूत - अश्रूच
भिज - मित्र
साक्षीच्या - साहाय्यास
करे - कसे
स्पेल चेकने निवडलेले शब्द या चित्रात पाहता येतील.
महिनेत, शाकरीला, लाडिक्यापुढे, मजाणत, उतावलेले, हसरडी, ताळविले, अजूनी, पायळूत, हसरडी, धागेत, सोनाक्षीत, शेकारी
1) मोबाईलवर मराठीत टंकलेखन करण्यामुळे अशा चुका होत असाव्यात असा माझा अंदाज आहे. उदाहरणार्थ "मोकलाया दाहि दिश्या" ही लिंक पाहा.
https://www.misalpav.com/node/6332
2) माझा दुसरा अंदाज असा आहे की हल्लीचे टंकलेखक गूगलच्या अॅटो-कंप्लीट / सजेस्ट चा वापर करत असावेत. त्यामुळे चुका कमी होण्याऐवजी वाढत आहेत. कारण गूगल ही कंपनी मशीन लर्नींग / आर्टिफिशीअल इंटलिजन्स या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्याचे मॉडेल ज्या डेटावर बनविलेले आहे तो "रॉ डेटा" मुळात गंडलेला आहे!
3) तिसरा अंदाज असा आहे की हे टंकलेखक जे की-बोर्ड वापरतात त्यात आयट्रान्स/ इन्स्क्रिप्ट असे बरेच प्रकार / उप-प्रकार तयार झाल्यामुळे एका की-बोर्ड ची सवय असली तरी दुसराच कोणतातरी की-बोर्ड वापरावा लागला तर चुका होतात. शिवाय बरेचसे टंकलेखक नॉन - युनिकोड फाँट वापरतात आणि स्वतःचेच नुकसान करून घेतात. नारायण सुर्व्यांची ही कविता टाईप करण्याची काय गरज होती? गूगल सर्च करून कॉपी पेस्ट करता येत नव्हती का? कॉपी-पेस्ट चा सोपा पर्याय टंक-लेखकाकडे उपलब्ध नव्हता याचा अर्थ तो युनिकोडमध्ये टाईप करत नव्हता असा होतो. महाराष्ट्र सरकार (आणि केंद्र सरकार देखील) कृतिदेव या युनिकोड समर्थन नसणार्या फाँट ची सगळीकडे सक्ती करत आहे ही अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी गोष्ट आहे. युनिकोड या मानकाचा सर्वत्र शंभर टक्के स्वीकार ही निर्दोष टंकलेखनाची पहिली पायरी आहे!
बाकी प्रस्थापितांना धक्का देण्याचे तंत्र नारायण सुर्व्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर देखील सुरू ठेवलेले दिसत आहे.
https://tinyurl.com/38dhbmwy
त्यांच्या घरात "चुकून" चोरी करणार्या चोराने चोरलेला टी. व्ही. दुसर्या दिवशी परत केला. नोटमध्ये लिहीले की हे नारायण सुर्व्यांचे घर आहे हे मला माहीत नव्हते. नाहीतर मी चोरी केलीच नसती!
चांगली माहिती. धन्यवाद !
चांगली माहिती. धन्यवाद !
सुर्व्यांचा किस्सा अन्य कुठल्यातरी धाग्यावर पूर्वी लिहिलेला आहे.
सोलापूर विद्यापीठ BA मराठीची
सोलापूर विद्यापीठ BA मराठीची प्रश्नपत्रिका !
....
ubmitted by अनिंद्य on 31 January, 2025 - 22:56>>>
तेव्हढा पेपर/ प्रश्नपत्रिकेचा नमुना बघून एकंदर प्रकार
आम्हाला २ मार्काना ज्ञानेश्वर आहेत ह्याची आठवण करून देतो किंवा त्या धर्तीवर वाटतो..
Pages