लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक उगीच म्हणतात हिंदीचे आक्रमण वगैरे. आपले पत्रकार बघा, दोन्ही भाषांची सारखीच वाट लावतात. येथे भेदभाव नाही.

786!

बातमी वाचतांना “अरे भाई कहना क्या चाहते हो?” असे फीलिंग येते Happy

IMG_7658.jpeg

बातमी लिहितांना एकूणच गाढ झोप घेतलेली दिसते आहे. स्वत:च्या जबाबदारीवर वाचा Viral Story :

https://www.esakal.com/desh/wife-kept-husband-away-from-honeymoon-for-7-...

Screenshot_2024-12-13-21-43-49-66_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12.jpg

बापरे हा धागा कधी बघितलाच नाही..
एवढी बेक्कार हसतेय मागची २-३ पाणं वाचूण
टीचन किप्स मुळे आज माझं पोट दुखतंय. Lol
क्रिस्टल कचाकच Lol क ह र

महिलांसाठी उपयुक्त असून त्यांनी मुद्दा क्र ५ नरांना उद्देशून लिहिला आहे.

मांस पेक्षा मुगात जास्त प्रोटीन्स असते >> इथे बहुतेक "माणसापेक्षा" असा शब्द पाहिजे होता.

चौथा मुद्दा वाचून कुणाच्या पंदात काय नोटतो?

अनिंद्य, भारीच
हसून हसून पुरेवाट.

चौथा मुद्दा वाचून कुणाच्या पंदात काय नोटतो?>>>>> तुम्ही त्या पंदात च्या फंदात पडू नका हरपा.

सुख, शांती, आनंद नोटांच्या स्वरूपात मिळणार आहे का? तर लगेच लवकर उठून स्वयंपाक पटात जायला तयार आहे मी Lol

ते फलोवेत जेलजे कुठे मिळतं हे एकदा कळलं की चेहया वर लावेन म्हणते. त्यानंतर आहादात मेथीचे सेवन करून नयी महिला बनायचा विचार आहे Proud

पिरियडम >> उगाच संस्कृत मध्ये काहीतरी लिहिलंय असं वाटेल कोणाला.

हसून हसून डोळ्यातून पाणी आले माझ्या.

पाचव्या मुद्द्यात कोणीतरी नरमांस खातंय असं वाटलं आणि दचकले.

Lol

Pages