लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय. असे अनुभव हल्ली खूप कमी येतात.
त्यामुळे अशा वाचनाने समाधान वाटतं. >> सहमत , कालच MSEB साईट वर बिल (देयक) वर "मुद्रणयोग्य आवृत्ती" (प्रिंट साठी) पाहून खूप छान वाटले !

index.jpeg

'मी कोण आहे' ह्याचं उत्तर देताना त्यांनी 'मी काय नाही' ह्याची 'न बन्धुर्न मित्रम् गुरुर्नैव शिष्य:' सारखी बरीच उदाहरणं दिली. पण त्या गडबडीत 'न च डीकॅप्रिओ' लिहायचं राहून गेलं.

Rofl
न च डीकॅप्रियो >>> जबरदस्त Lol

हे 'विश्लेषण' दोन-तीन दिवसांपासून मला दिसत आहे. आधी मथळ्यात आणि खाली बासरी Uhoh असं लिहिलं होतं. आता मथळ्यात फिडल आणि मजकुरात सारंगी आणि बासरी अशी एकूण तीन नावं आहेत! फिडल आणि बासरीचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत बसला होता ही कथा त्याच्या क्रूरपणाचा किंवा लोकांच्या दुःखाची कदर नसणं अशा स्वभावाचा दाखला म्हणून वापरण्यात येते (दंतकथा असली तरी) पण ती कथा आळशीपणाचं उदाहरण म्हणून सांगितली जाते असं म्हटलंय इथे.
Screenshot_20230128-225122.pngScreenshot_20230128-225137.png

अरेच्चा! मी वाचली तेव्हा तुम्ही म्हणता तसं मथळ्यात आणि खाली बासरी लिहिलं होतं. कदाचित कुणीतरी बासरी नव्हे, फिडल म्हणून सांगितलं असेल आणि त्यांनी अर्धवट बदल केले असतील लेखात. शिवाय त्याच लेखात 'नीरोने त्याच्या आईची हत्या केली असा आरोप त्याच्यावर केला जातो. आज तकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.' असं एक भयानक वाक्य आहे. Lol

तो बासरी - फिडल - सारंगी गोंधळ वाचून हसवा फसवी नाटकातली नाना पुंजेची वाक्यं आठवली - "अच्छा, म्हणजे त्या वाद्याला सनई म्हणतात? मला वाटलं सनई अशी वाजवायची असते" (मृदुंग वाजवायचे हातवारे करत म्हणतो)

IMG-20230131-WA0001.jpg

अधोरेखित केलेल्या शब्दाच्या जागी 'पूर्वनियोजित' असा शब्द हवा ना? की माझं काही चुकतंय? अग्रलेखात आहे आजच्या. App मध्ये आहेच, पण ई-पेपरमध्येही आहे याचा अर्थ छापील आवृत्तीतही असावा.

वर काश्मीरऐवजी काश्मी झालंय. पण अशा चुकांची आता सवय झाली आहे!!

बरोबर.
नियोजनपूर्व अयोग्य वाटतो.
"पूर्वनियोजनानुसार" असे योग्य वाटते

संवाद पूर्वनियोजित म्हणजे staged असा अर्थ निघेल का? तसं असेल तर पूर्वनियोजनानुसार हा शब्द जास्त बरोबर वाटेल.

"संवाद पूर्वनियोजित"
हा शब्दप्रयोग मला तितकासा बरोबर नाही वाटत. पण चूकही नसावा कारण:
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%...

पूर्व-नियोजित=
पूर्वकल्पित, आधीं ठरवून, प्रथम आंखल्याप्रमाणे,

हां ह.पा., नियोजनपूर्वक म्हणायचं असेल कदाचित. 'क' गळला टाईप करताना Lol
नियोजनपूर्ण हा शब्द कधी ऐकला नव्हता.

वावे बरोबर. तो शब्द वाचला तेव्हा नेहमीच खटकला त्यामुळे लक्षात राहीला.
niyojanpurn.png

बाकी नियोजनपूर्वक योग्य शब्द वाटतो, क गळला ही चूकही त्यामानाने जराशीच.

IMG-20230203-WA0000.jpg

अपेक्ष म्हणजे काय रे भाऊ? Happy

काल Türkiye ( तुर्कीये) या देशात भूकंप झालेला आहे. पूर्वी या देशाचे नाव टर्की असे होते. परंतु ते आता बदलून वर्षाहून अधिक काळ उलटला आहे.
आज महाराष्ट्रातील चार प्रमुख मराठी वृत्तपत्रे (इ आवृत्ती) पाहिली असता त्यात कुठेही या नव्या नावाचा उल्लेख नाही.
टर्की, तुर्की, तुर्कस्तान असे उल्लेख आढळले.

एका संपादकांना ईमेल केली आहे. त्यांच्या छापील अंकातही जुनेच नाव दिलेले असल्यामुळे.

Pages