एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर ....

Submitted by योगी९०० on 7 December, 2022 - 01:47

लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्‍या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..

जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)

मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)

१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्‍यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)

मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...

अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खुद्द आरडीनी एका मुलाखतीत सांगितले,

रहे ना रहे हम महका करेंगे
बन के कली बन के सबा बागे वफ़ा में

या गाण्याच्या चालीवर

सागर किनारे दिल ये पुकारे

देखील गाता येते.

A M I T , ही चाल खूप बॉलीवुडी गाण्यांना आहे

- यही है तमन्ना तेरे घर के सामने मेरी जान जाए
- रहें ना रहे हम
- हमें रास्तों की ज़रूरत नहीं है (नरम गरम)
- हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते
- सागर किनारे दिल ये पुकारे
- ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है रंग रूप

अजूनही आहेत पण ती खूप जुनी गाणी

त्या सगळ्या गाण्यांच्या चालींना सेम वळण आहे असं म्हण्ता येईल. स्वर थोडे वेगवेगळे आहेत.

Pages