एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर ....

Submitted by योगी९०० on 7 December, 2022 - 01:47

लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्‍या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..

जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)

मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)

१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्‍यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)

मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...

अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
-->
तेरी बातों में ऐसा उलझा जिया
बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया

Lol जमलं जमलं

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा...
-->
इस दिल की राहों से बहकी निगाहों से
कातिल अदाओं से तुझको है फ़साना
कुछ मीठी बातों से, कुछ झूठे वादों से
पक्के इरादों से दिल को है चुराना

(इथे दुसर्या ओळीत जरा गडबड होते ते जरा अडजस्ट करून. घ्या बाकी झकास Lol )

राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता

आणि

लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू

खरंय, कधी कधी एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात कधी घसरलो कळतही नाही Happy

वरच्या दोन्हीच्या रांगेत हे अजून एक...

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी, कुठे? मन वेडे गुंतले

हे आवडलं. केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला - हे पण बसेल. फक्त पहिल्या ओळीत मध्येच एक मात्रा कमी आहे.

यातच

आपके हसीन रुख पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है

(बहुतेक हे आधी लिहून झालंय या धाग्यावर)

शाळेत इंग्रजीत एक Abu Ben Adhem नावाची कविता होती, ती आम्ही "झणी दृष्टी लागो, तुझ्या सगुणपणा" या अभंगाच्या चालीत म्हणायचो. आषाढी तोंडावर आली आहे त्यामुळे अचानक आठवण झाली.

हे भन्नाट आहे. एका रिलवरून साभार:

ओ इस दिल में
क्या रख्खा है
तेरा हि दर्द
छुपा रख्खा है

आणि

लकड़ी की काठी
काठी पे घोड़ा
घोड़े की दुम पे जो
मारा हाथौड़ा

हा हा अतुल जी...

तुम्ही दिलेले वरचे उदाहरण मस्त आहे. चपखल बसते. आधीची उदाहरणे पण मस्त होती.

ते इंस्टा वर काय ते शिक - शाक - शो काय गाणं आहे ते म्हणता म्हणता पुढे छडी लागे छमछम गाणं जोडून टाकलं की बेमालूम मिश्रण होतंय एकदम !!

शब्दसंख्या कमी अधिक असली तरीही चाल कशी फिट्ट बसते पहा...

हमको मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद की जय करें

आणि

जीवनात हि घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचु दे

चौदहवीं का चाँद हो या अफताब हो
जो भी हो तुम खुद की कसम लाजवाब हो

आणि

हम जब सिमट के आप की बाँहों में आ गए
लाखों हसीन ख़्वाब निगाहों में आ गए

बिल्डिंगमध्ये एका मराठी कुटुंबात गणपतीची स्थापना केली आहे. काल लेडीज लोग (प्लीज नोट बायका नाहीत बरं) मिळून त्यांच्याकडे भजने करत होत्या.

जिसका पिता शंकर, उसका भी बड़ा नाम है
मोटे कानवाला गणपति बाप्पा मोरया
मेरे अंगने में गणपति बाप्पा मोरया

('दीदी तेरा देवर दीवाना'च्या चालीवर)
म्हारे देस पधारे गणपति

आता बिल्डिंगमध्ये ज्यांच्याकडे गणपती आहे तिथे स्वतःहून जाऊन भजन म्हणायच्या स्पिरीटचे कौतुक करू का कपाळ बडवू मोडमधली बाहुली

रचिल्या ऋषीमुनींनी
ज्याच्या ऋचा अनंत

च्या चालीवर

एका तळ्यात होती
बदके पिले सुरेख

दो सितारों का ज़मीन पर है मिलन आज की रात
मुस्कुराता है उम्मीदों का चमन आज की रात

आणि

ज़िन्दगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात
एक अंजान हसीना से मुलाकात की रात

बाय द वे हे अजून एक जबराट एक्स्चेंज. (या चाली एकमेकांना इतक्या फिट्ट बसतात कि चाली बदलल्यावर मूळ चाली पुन्हा आठवणे फार अवघड जाते)

चौदहवीं का चाँद हो या अफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो

आणि

बाज़ी किसी ने प्यार की जीती या हार दी
जैसे गुज़र सकी ये शब-ए-ग़म गुज़ार दी

अतुल, तुम्हाला चालबदलीचा बादशाह हा किताब देण्यात आहे.
१००% सहमत... खूप छान जोड्या शोधल्या आहेत.

लकडी की काठी आणि और इस दिल में ...फार जबरा जोडी...!!

>> चालबदलीचा बादशाह
Lol

हे अजून एक:

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

आणि

या वार्‍याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची

>> राष्ट्रीय चाल म्हणून घोषित करायला पाहिजे (किंवा गागालगालगागा - हे राष्ट्रीय वृत्त म्हणून जाहीर करा).
म्हणून मराठी गाण्यांच्या बाबतीत जरा सावधच रहायला लागतं. वरची त्यात बसत नाही हे आधी पाहून घेतलं Proud

झकास Proud मी तर म्हणतो ह्या धाग्यावरच्या सर्वांचेच एक लाईव्ह गटग व्हायला हवे

बायदवे वरच्या "या वार्‍याच्या बसुनी विमानी..." आणि हे गाणे अदलाबदल सुद्धा धमाल आहे:

रूखी सूखी रोटी तेरे हाथों से
खाके आया मजा बड़ा
ठंडा ठंडा पानी तेरे आँगन का
पिके छाया नशा बड़ा

---

(ता.क. श्रावण मासी हर्ष मानसी, या वार्‍याच्या बसुनी विमानी, रूखी सूखी रोटी इ. गाणी सवाल-जवाब च्या चालीत बसतात. आणि सवाल जवाब मध्ये "तुम पास आये यू मुस्कुराये" सुध्दा आले आहे वरच्या एका प्रतिसादात. एक वर्तुळ पूर्ण झाले Lol )

अतुलजी दंडवत स्विकारा...!!

मी तर म्हणतो ह्या धाग्यावरच्या सर्वांचेच एक लाईव्ह गटग व्हायला हवे
असे लवकर होऊ दे.

फिरत्या चाकावरती देशी
मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार

आणि

लहरी राजा प्रजा आंधळी
अधांतरी सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार

अर्र्रे हा धागा मी आधी का नाही पाहिला...
परवा आमच्या एका ग्रुपमधे अंताक्षरी चालली होती तेव्हा अचानक एकाने मेरा जीवन कोरा कागज ... कोराही रह गया हे येई हो विट्ठले च्या चालीत म्हटलं. अगदी जो लिखा था आंसूओंके.....ए ए ए ए ए... जो लिखा था आंसूओंके.. संग बेह गया.. ओ देवा.... संग बेह गया Lol यासकट!
तेव्हा डोक्यात ट्युब पेटली आपल्या या धाग्याची. श्या! आधी वाचला असता तर इथले मस्त मस्त काँबि म्हणता आले असते.
पण ठिके.. एखाद्या गॅदरींग मधे हा गेम म्हणून खेळायला हरकत नाही.

घालीन लोटांगण
टन टना टन
लकडी की काठी आणि और इस दिल में ...एकदम आवडलंय! Lol

Pages