एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर ....

Submitted by योगी९०० on 7 December, 2022 - 01:47

लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्‍या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..

जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)

मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)

१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्‍यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)

मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...

अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

टन टना टन, टन टन तारा, चलती हैं क्या नौं से बारा - कहीं दूर जब दिन ढल जायें च्या चालीवर
ह्याच धाग्यावर फेरफटका यांनी आधीच हे लिहीले होते. मी विसरलो होतो... परत तेच टाकले.

आज सोसायटीमध्ये एका कुटुंबाने ‘माता की चौकी’चं आयोजन केलं होतं. ‘सब की मुरादे पुरा कर दे मां, हलवा बाटुंगी’ ( मेरा यार छैलछबिला च्या चालीवर वाचा) इ. भजनं ऐकून कान तृप्त झाले.

आज सोसायटीमध्ये एका कुटुंबाने ‘माता की चौकी’चं आयोजन केलं होतं. ‘सब की मुरादे पुरा कर दे मां, हलवा बाटुंगी’ ( मेरा यार छैलछबिला च्या चालीवर वाचा) इ. भजनं ऐकून कान तृप्त झाले.
हा हा... अश्या प्रकारची बरीच गाणी मुद्दामहून फेमस गाण्यांच्या चालीवर तयार केली आहेत. पण धाग्याचा विषय हा नाही.

माझेमन Lol
देऊळ सिनेमात 'तो बोलो आल ईज वेल' या गाण्याच्या चालीवर 'बोला दऽत्तऽगुरू' केलं होतं. अजूनही ते तसंच तोंडात येतं.

मैं अगर सामने आ भी जाया करूं
लाज़मी है कि तुम मुझसे पर्दा करो
अपनी शादी के दिन अब नहीं दूर हैं
मैं भी तड़पा करू तुम भी तड़पा करो

हि चाल याला फिट बसते...

तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँ ही मस्त नगमे लुटाता रहूँ
तुम मुझे देख कर मुस्कुराती रहो
मैं तुम्हें देख कर गीत गाता रहूँ

नाम चित्रपटातलं 'तू कल चला जाएगा तो मैं क्या करुंगा' हे गाणं आणि 'हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा' हे गाणं एकाच चालीवर म्हणता येतं

हो, मागे एकदा लिस्ट केली होती का नाही आठवत नाही, पण
गे मायभू तुझे मी
ओ रात के मुसाफिर
हे राष्ट्र देवतांचे
आई म्हणोनि कोणी
उघड्या पुन्हा जहाल्या
स्वप्नातल्या कळ्यांनो
ऐ दिल मुझे बता दे
सारे जहाँ से अच्छा
चरखा चला चला के

अश्या सगळ्या गाण्यांची चाल. पण जास्त मजा यावी म्हणून यातली दोन टोकाचे मूड असलेली कुठलीही गाणी निवडा आणि त्यांची चाल अदलाबदल करून बघा.

दर्शन दे रे
दे रे भगवंता
किती अंत आता
पहाशी अनंता
https://youtu.be/bgCcTaj6oRc?t=19

आणि

का रे दुरावा
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला
https://youtu.be/_yKnXPHpI64?t=27

जरा अवघड जाते सुरवातीला चालींची अदलाबदल करताना. पण एकदा जमले की फार गमतीशीर वाटते Lol

हर्पा Lol

आनंदकंद वृत्त आहे ते. (आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा).
गा गा ल गा ल गा गा x 2 असं चलन.

‘उघड्या पुन्हा’ बसत नाही यात, कारण शेवटचा एक गुरू missing आहे. ‘जखमा उरातल्या <गा>’ Happy

पण त्याबदल्यात मी ‘लाजून हासणे’ देऊ शकते. Proud
‘डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी’सुद्धा.
‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’देखील या चालींवर गाता येईल, पण ओळीतलं शेवटचं अक्षर लघु असल्यामुळे ते लांबवून गावं लागतं. Happy

पण ओळीतलं शेवटचं अक्षर लघु असल्यामुळे ते लांबवून गावं लागतं.
>>> हिमेश रेशमियाकडून गंडा बांधून घ्या. छोटेछोटे लघुही मोठमोठे गुरू होऊन जातील .

हर्पा Lol

'तुम पास आये यू मुस्कुराये' हे गाणं सवाल-जवाब लावणी चालीत पर्फेक्ट बसतं ....शेवटी कूछ कूछ होता है नंतर "जी जी र जी माझ्या राजा तू र माझ्या सर्ज्या तू र S S S ..." लावायच.

निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे...ह्या इंदिरा संतांच्या कवितेला आम्ही शाळेत "चेहरा है या चाँद खिला है" ची चाल लावली होती

हो बरोबर स्वाती.. सही पकडे हैं!
होते कुरूप वेडे बाबत - काव्यात ओळीच्या शेवटचा लघु हा गुरू होतो असा काहीतरी नियम आहे ना? अर्निकाच्या व्हिडीओत पाहिल्यासारखं वाटतं आहे.

ऋतुराज Lol

हर्पा आणि अतुल.. फार सुंदर उदाहरणे...

धागा सुरु केला याचा आनंद वाटतो. यानिमित्ताने बरीच गाणी एकमेकांच्या चालीवर बदलता येतात हे कळले आणि आनंदकंद वृत्त ही कळला.

'तुम पास आये यू मुस्कुराये' हे गाणं सवाल-जवाब लावणी चालीत पर्फेक्ट बसतं ....शेवटी कूछ कूछ होता है नंतर "जी जी र जी माझ्या राजा तू र माझ्या सर्ज्या तू र S S S ..." लावायच.

ऋतुराज ...हहपुवा... मी प्रयत्न केला तुम पास आये लावणीच्या चालीत गायचा. करण जोहरने जर माझ्या आवाजात व लावणीच्या चालीत हे गाणे ऐकले तर बहुतेक चित्रपट संन्यास घेईल

आम्ही "चेहरा है या चाँद खिला है" हे गाणे लावणीच्या चालीत गायचो. शेवटी "सागर जैसी आखोवाली, ये तो बता तेरा नाम है क्या" झाले की जी जी रे जी लावायचो.

>>> काव्यात ओळीच्या शेवटचा लघु हा गुरू होतो असा काहीतरी नियम आहे ना?
वेल - 'होतो' असं नाही, वृत्तपूर्तीसाठी तसा धरला जातो.

जसा शार्दूलविक्रीडितात ('आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिकऽ').
'शार्दूलविक्रीडित' या नावातच शेवटचा 'त' र्‍हस्व आहे. Happy

शार्दूलविक्रीडित >> तो शेवटचा त पण गुरूच आहे. त्यामुळेच तर खालील गुर्वंत ओळी त्या वृत्तात बसतात -

प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी आम्ही असू लाडके

रिम-झिम गिरे सावन,
सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में,
लगी कैसी ये अगन

ह्याची चाल ह्याला बसवून पहा...

लाजून हासणे अन्‌
हासून हे पहाणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे

अतुल Happy

सरफरोशी की तमन्ना हे गाणं आप की नजरों ने समझा च्या चालीत म्हणून पहा.

मला ते "तेरी बातोंने ऐसा उलझा दिया' ती चाल अगदी आपल्या जुन्या अभंगासारखं वाटायची म्हणजे बघा "खेळ मांडियेला वाळवंटी" !!

Pages