लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..
जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)
मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)
१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)
मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...
अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?
जुन्या जागी मारवाडी शेजारीण
जुन्या जागी मारवाडी शेजारीण वारली.तिच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या इतर मारवाडणी शोकाकुल गीते ,हिंदी गाण्यांच्या चालीवर म्हणत होत्या.ती देखील प्रेमगीत होती.हसू की रडू झाले होते.
हृदयनाथ मंगेशकरांची निम्मी
हृदयनाथ मंगेशकरांची निम्मी गाणी रिसायकल्डच असतात ना? >> +१. ते माबोवर असते तर ह्या धाग्यात त्यांनी स्वतःचीच शेकडो गाणी टाकली असती.
त्यांचं वितरी प्रखर आणि गगन सदन अनेकांना माहीत असेलच, रसूल अल्ला आणि दयाघना... इत्यादी. पण एक असंच सापडलेलं -
काजळ रातीनं ओढून नेला
मुझसे बाते करते रहना (माया मेमसाब)
चालीवर लिहिलं असणार >> हे
चालीवर लिहिलं असणार >> हे जनरली सबब किंवा कठीण गोष्ट म्हणून सगळे/ बरेच कवी म्हणतात. पण चालीवर म्हणजे कुठल्या तरी वृत्तात असा का नाही विचार होत? यती म्हणजे सम. बाकी अक्षरे/ मात्रा म्हणजे जो काही ठेका असेल तो. ठेक्यात जो ठेहेराव चालणार असेल तो गुरु बाकी लघु इ. इ. मला अगदीच साम्य वाटतं.
मला अनुभव नाही पण इथले पोएट्स सांगू शकतील का काही चुकत असेल तर?
मी सांगणार होतो, पण इथले
मी सांगणार होतो, पण इथले पोएट्स म्हटल्यावर मी गप्प बसलो.
हृदयनाथ मंगेशकरांची निम्मी
हृदयनाथ मंगेशकरांची निम्मी गाणी रिसायकल्डच असतात ना?
कधी कधी हाच प्रश्न मनात येतो.
मराठी जांभूळ पिकल्या झाडाखाली ह्या चालीच्या जोरावर तंतोतंत त्यांनी हिंदीत दोन वेगवेगळ्याच चित्रपटात गाणी बसवलीत
धनवान मध्ये बल्ले बल्ले रेशमी https://www.youtube.com/watch?v=WZSnv4ME8RE
आणि
मशाल मधले होली आयी होली आयी https://www.youtube.com/watch?v=6MNxrueCOCg
कधी वाटते की या माणसाकडे चालींची कमतरता होती काय? अर्थात आपण एवढे मोठे कोणी नाही टिकाटिपण्णी करायला त्यामुळे जाऊ दे. तसाही धाग्याचा विषय हा नाहीच आहे.
चाल : पल दो पल का ये सफर.. हद
चाल : पल दो पल का ये सफर.. हद कर दी अपने
बोल : कणा कविता
म्हणून बघा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कणा कविता माहित नसल्याने हा प्रकार करता आला नाही. ४-५ ओळी ह्या कवितेच्या लिहाल का?
https://www.marathimati.com
https://www.marathimati.com/2012/06/kana-marathi-kavita.html?m=1
धन्यवाद भरत.. .ही कविता माहित
धन्यवाद भरत.. .ही कविता माहित होती. पण कणा नाव होते हे लक्षात नाही आले.
हपा, सांगा हो. खरंच विचारतोय.
हपा, सांगा हो. खरंच विचारतोय.
‘निंबोनीच्या झाडा मागे‘ व ‘झु
‘निंबोनीच्या झाडा मागे‘ व ‘झु झु झु झु झु … यशोदा का न्ंद लाला.’ एकमेकांना बर्यापैकी सुट होतात या चाली.
अमित, तुझं बरोबरच आहे; वृत्त
अमित, तुझं बरोबरच आहे; वृत्त किंवा छंद सारखा असेल तर एकच चाल बसू शकते. गणिती दृष्टीने त्यात फारसं काही अवघड वाटायला नको. फक्त हे लोक जे अमुक चालीत शब्द बांधले वगैरे म्हणतात त्यात दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत.
१. पारंपरिक वृत्त आणि छंद ठराविकच आहेत. पण कित्येक चाली त्यात बसत नाहीत. अनवट चाली असल्यामुळे तेवढ्या एका लघु गुरू सिक्वेंसला वेगळ्या वृत्ताचं नाव दिलं जात नाही. शिवाय अनेक गाण्यांत सगळ्या ओळीत सारखं वृत्त असेलच असं नाही. त्यामुळे ते मिश्रवृत्त काव्य होऊन जातं. त्यात शब्द लिहिणं गणिती दृष्ट्यादेखिल अवघड आहे.
२. आता गणित सोडून भाव्यार्थ काय आहे याचाही विचार करावा लागतो. कदम कदम बढाए जा याचीच चाल अजीब दास्ता है ये ला बसत असली, तरी तो भाव प्रकट होत नाही. चालीत जो भाव आहे, त्याला चपखल जुळतील असे शब्द आणि ते ही जुळणाऱ्या वृत्तात बांधणे - ही दुहेरी कसरत आहे. किंवा सारख्याच वृत्तात असलेल्या काव्याला अर्थानुसार नवीन चाल लावणे हे तितकंच अवघड आहे. 'तुमचा बाप लावला होता का हो अशी चाल' असं कुणी रावसाहेबाने म्हणायला नको!
मला ठाऊक असलेलं एक विचित्र चालीचं उदाहरण देतो -
सावर रे सावर रे उंच उंच झुला ह्या गाण्याचे लघु गुरू, मात्रा वगैरे लिहून काढ, वेडा होशील. सावर रे - २ १ १ २ अश्या ६ मात्रा काव्यात आहेत, ज्या गाण्यात ५ मात्रांत बसवल्या आहेत. पुढे उंच उंच झुला ला ४/८ मात्रांचा केरवा चालू होतो. ध्रुवपदाच्या शेवटी सांगू कसे तुला दरम्यान एकदम त्रांझिषन होऊन पहिला ताल चालू होतो. मग 'आता आभाळ' किंवा कुठल्याही इतर कडव्यात दादरा (६ मात्रा) चालू होतो आणि त्याच्या शेवटच्या ओळीत पुन्हा त्रांझिशन होऊन पहिला ताल चालू होतो.
सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
ह्या ओळी नुसत्या गद्यात वाचून सिमेट्रिक वाटतात. हे वाचून इतकी विचित्र चाल लावावी असं वाटणं हेच चामत्कारिक आहे. असं आउट ऑफ दि बॉक्स सुचणे आणि ते ऐकताना श्रोत्याला आपण काहीतरी विचित्र ऐकतो आहोत असं न वाटता सौंदर्याची अनुभूती येणे हे व्हायला अलौकिक प्रतिभाच हवी. ह्या असल्या गोष्टींमुळे हृदयनाथ मंगेशकरांना बाकी सगळे गुन्हे माफ आहेत. ते त्यांच्याच चाली रिसायकल करतात, अरे ठीक आहे. एकाच चालीत माझ्या डोक्याला एव्हढा खुराक पुरवलात, आणखी किती ऐकू आणि किती नको! एका पूर्ण जन्मात मला सुचणार नाही अशी ही एक चाल, अश्या अनेक चाली त्यांनी दिल्या आहेत. खूप झाल्या एवढ्या आता. कशाला नवीन पाहिजेत?
सुंदर पोस्ट हपा. उत्तम माहिती
सुंदर पोस्ट हपा. उत्तम माहिती.
हरचंद पालव, छान लिहिलंत!
हरचंद पालव, छान लिहिलंत!
मला अमितव यांचा . चाली रिसायकल करण्याचा मुद्दा प्रथमदर्शनी पटला होता
. नव्या रचना करणारे अगदी शास्त्रीय संगीतकारसुद्धा कमीच. ते आधीचंच संचित आपल्यासमोर मांडत असतात. नवे राग किती कमी तयार होतात. त्यातसुद्धा नवं नेमकं काय असतं हे शोधावं लागत असावं. पूर्वीही दोन रागांच्या मिश्रणातून नवा राग, एकाच रागाची वेगवेगळी रूपे असले प्रकार होतेच.
चित्रपट संगीत करणारे बंदिशी, लोक धुन, विदेशी संगीत यातलं काय काय रिसायकल करतात. कुठे काय कसं रिसायकल करायचं ही भट्टी जमून आली तर गाणं जमतं. कौशल्य सारे रचनेत आहे.
हिंदी चित्रपटसंगीतकारांवर वसंत पोतदार यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्यात ते म्हणतात नौशाद यांनी त्यांच्या कारकीर्दीत तीनच चाली दिल्या. तेव्हा नेमका अर्थ कळला नव्हता. आता वाटतंय, ते म्हणत असावेत ओरिजिनल अशा तीनच चाली दिल्या. बाकी सगळं रिसायकल.
त्यांनी सलील चौधरींचा सृजनशील संगीतकार म्हणून उल्लेख केलाय. पण त्यांनी सुद्धा कुठून काय काय उचललेंच आहे.
हृदयनाथांनी आधीच्या काव्यरचनांना दिलेले काही साज हे त्यांनाच सुचू शकतात. रंगा येई वो साठी बांग्ला, आरती प्रभूंच्या प्रत्येक कवितेची चाल चाल कशी सुचली असेल हे कोडंच आहे.
होडी चाले.... हे गाणं फसलेलं आहे असं म्हणून शकतो. शांताबाई स्वतःच्याच पावनेर गं मायेला करू या गीताला फसलेलं म्हणतात. तेही चालीवरून लिहिलं आहे. मला त्यात कधी काही खटकलं नाही.
आहे की नाही बिनतोड प्रश्न?
.
सुंदर प्रतिसाद ह.पा. 'सावर रे
सुंदर प्रतिसाद ह.पा. 'सावर रे' प्रचंड आवडतं, पण त्यातलं शास्त्र समजत नसल्यामुळे अशी चिकित्सा मला करता येणार नाही. या चिकित्सेमुळे गाण्याचा आनंद वाढतो. काव्य (पाडगावकर), संगीत आणि आवाज यांचा सुंदर संगम आहे हे गाणं म्हणजे.
भरत, तुमचाही प्रतिसाद आवडला. 'होडी चाले' मला आवडत नाही, पण 'माजे राणी' खूप आवडतं. त्यामुळे 'होडी चाले' फसलेलं असणार हे मान्य आहे!
हपा सुंदर पोस्ट.
हपा सुंदर पोस्ट.
गदिमा सुद्धा अष्टाक्षरीतून लीलया सूट घेत. ते सहजकाव्य म्हणत. अनिल मुक्तछंद म्हणत.
सहा चार ऐवजी गरजेनुसार पाच मात्रा घेणे आणि लय किंचित द्रुत किंवा विलंबित ठेवत चाल बांधणे हे प्रकार एसडी पण करत. बंगालीतून हिंदीत रिसायकल करण्याचे रेकॉर्ड यांच्याच नावे असेल.
<सावर रे' प्रचंड आवडतं, पण
<सावर रे' प्रचंड आवडतं, पण त्यातलं शास्त्र समजत नसल्यामुळे अशी चिकित्सा मला करता येणार नाही. या चिकित्सेमुळे गाण्याचा आनंद वाढतो. >
मला हे गाण्याचं व्याकरण शिकायचंय.
इथे धमाल सुरु आहे विशेषत: ही
इथे धमाल सुरु आहे
विशेषत: ही गाणी...
१. जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
२. केशवा माधवा तेरे बिना भी क्या जीना
३. 'चेहरा है या चाँद खिला है' गाणं सवाल-जवाब लावणी
>> इथले पोएट्स म्हटल्यावर मी गप्प बसलो.
हरपा
हरपा यांची नंतरची पोस्ट खूप छान
"एकाच संगीतकाराने एकच किंवा
"एकाच संगीतकाराने एकच किंवा थोडी बदललेली चाल वापरून संगीतबद्ध केलेली वेगवेगळी गाणी" तशी खूप आहेत. पण कालच एक पोस्ट व्हाट्सपवर आली ती रोचक आहे म्हणून इथे शेअर करतोय.
किशोरकुमार यांनी गायिलेले "ए दिल ना होता बेचारा" गाणे सर्वांनीच ऐकले असेल (Jewel Thief: 1967):
https://youtu.be/FKRdfz466wE?t=36
हे गाणे रेकॉर्ड करण्याआधी तीन वर्षापूर्वी (१९६४) याच चालीवर दुसरे एक गीत अन्य एका चित्रपटासाठी ("बहारे फिर भी आयेगी") एसडी बर्मन यांनी मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतले होते. पण तब्येतीच्या कारणास्तव एसडी बर्मन यांना तो चित्रपट करता आला नाही. आणि नंतर ती चाल किशोरकुमार यांनी गायिलेल्या "ए दिल ना होता बेचारा" साठी वापरली गेली. तेच प्रसिद्ध झाले. रफींनी गायलेले गाणे गायब झाले ते झालेच. अनेक दशकांनी (जवळपास साठ वर्षांनी) काही दिवसांपूर्वी हे गाणे प्रकाशात आणले गेले. रफींच्या आवाजात "ए दिल ना होता बेचारा" सारखे गाणे ऐकायला फार मजा वाटते:
https://youtu.be/Wfe015g1u7E?t=48
काल परवा मला हे गाणे...
काल परवा मला हे गाणे...
दिस जातील,
दिस येतील,
भोग सरल
सुख येईल
हे
तुझे देखा तो,
ये जाना सनम,
प्यार होता है
दिवाना सनम
याला अगदी फिट्ट बसतंय असे लक्षात आले
स्टूल जी, नुकताच पाहिला आहे
Atul जी, नुकताच पाहिला आहे तो व्हिडिओ. योगायोगाने.
प्रतिसाद क्र 2 आणि 29 चुकून
प्रतिसाद क्र 2 आणि 29 चुकून निसटलेत कि इग्नोर केलेत कि इग्नोर केलेय हे लक्षात आणून द्यायचे होते?
हरचंद पालव, भरत, अतूल, रघू,
हरचंद पालव, भरत, अतूल, रघू, मानव - सर्वांचे प्रतिसाद छान. नवीन माहिती मिळत आहे.
दिस जातील - तुझे देखा तो - ही तर हाईट आहे.
सुंदर प्रतिसाद ह.पा. +७८६
सुंदर प्रतिसाद ह.पा. +७८६
हपा, आज कामाच्या व्यापात होतो
हपा, आज कामाच्या व्यापात होतो त्यामुळे आत्ता प्रतिसाद वाचला.
हृदयनाथ मंगेशकरांनी चाली रिसायकल केल्या आहेत खरं असलं तरी त्यांच्या बद्दल आदरच वाटतो. पूर्ण ओरिजिनल असं फार फार कमी असतं. प्रत्येक जण कुठून ना कुठून प्रेरणा घेतोच. आणि ओरिजिनल कल्पनेला ही शून्य किंमत असते. इंपलिमेंटेशन/ प्रॉडक्ट ह्यालाच माझ्यालेखी किंमत आहे कारण श्रम तिथेच करावे लागतात. वर भरतनी त्याच अर्थाचं लिहिलं आहे.
सावर रे पोस्ट मस्त. ताल बदलतो माहीत होतं आता वृत्त कसं बदलतंय ते लिहून बघतो.
असा बेभान हा वारा गाणं पूर्वी बसवलेलं. त्यात १४ स्वर आहेतच ...नाही... वरचे खालचे धरले तर अठ्ठावीस ही असतील. परत एक ठरावीक पॅटर्न लक्षात ठेवावा तर तो ही अनेकदा उलटा पालटा होतो. बरं ही गंमत कळल्यावर रस निष्पत्ती होते का? तर अजिबात नाही. हे काहीही समजलं नाही तरी हृदयात सतत काही तरी वेगवेगळं वाटत रहातं हे गाणं ऐकताना. मधले पीसेस कोणी केलेत (कदाचित अनिल / अरुण पौडवाल कोणी असतील) त्याची तर कमाल आहे.
आरती प्रभूंच्या कवितांना तर कशा चाली लावल्यात समजत नाही इतक्या त्या वाचताना अ-गेय वाटतात पण ऐकल्या की जादू झाल्यासारखा सोप्या होतात.
घनतमी शुक्र बघ राज्य करी तांब्यांचं आहे. ते ही वाचताना दम लागतो. ही सुद्धा चाल कशी लावली असेल वाटतं. त्यामुळे रिसायकल मजेतच लिहिलं होतं. ते अनअपोलजेटिकली ज्याचं श्रेय त्याला मुलाखतीत तरी देऊन कुठुन सुचलं ते सांगतात त्यामुळे आदर दुणावतोच.
'उंच उंच झुलाला' कसा ताल आहे
'उंच उंच झुलाला' कसा ताल आहे मला समजतच नाहीये... दादराच आहे ना?. 'सुखमला भिववितेला' केरवा सदृश (८ मात्रा) कळतोय. पण उंच उंच झुला नीट झेपलं नाहीये अजुन. ऑफ बीट मध्ये दादर्यातच गायलय वाटलं मला. केरवा ते दादरा ट्रांझिशन स्वच्छ आहे. पण सावर रे नंतर उंचउंच झुला आणि तिकडून सुखमला हा खेळ आहे.
सहमत. घन तमी तर भारीच आहे.
सहमत. घन तमी तर भारीच आहे. वृत्त कुठे आणि चाल कुठे!
असा बेभान हा वारा - बसवलं होतं म्हणजे गाण्यात का? की कीबोर्ड? त्यात १४ स्वर म्हणजे काय ते कळलं नाही.
तरुण आहे रात्र अजुनी - ह्यात गंधाराचा सा करून बिलासखानी तोडी आहे - हे त्यांनीच एकदा शंकर महादेवनला सांगताना एका व्हिडीओत पाहिलं तेव्हा लक्षात आलं होतं. बहुतेक इथे माझी गल्ली चुकते आहे. ही चर्चा 'गाण्यातली सौंदर्यस्थळे' धाग्यावर पुढे चालू ठेऊ शकतो.
ओ येस, उंच उंच झुलाला केरवा
ओ येस, उंच उंच झुलाला केरवा नाहीये. दादरा, शब्द ऑफ बीट घेऊनही जुळत नाहीये. खूप वेळा ऐकायला लागणार नीट.
ताल नाही कळत.
ताल नाही कळत.
पण सावर सावर झपताल असावा बहुतेक. उंच उंच झुला केरवा असेल. माहिती नाही.
हे गाणे पं बिरजू महाराजांचे नृत्य पाहताना त्यांचे एका तालातून दुसर्या तालात लीलया थिरकणे यावरून सुचले असे ऐकले आहे. खखोहृनाजा.
हो, पेटीवर बसवलेलं.
हो, पेटीवर बसवलेलं.
ते गाणं आणि पीसेस बघीतलेस तर स ग ळ्या कीज वाजतात. कोमल शुद्ध कोमल शुद्ध मागोमाग वाजतात पण ऐकताना काय भारी वाटतं!
१४ कुठून लिहिलं देव जाणे. १४ इज न्यू १२ म्हणू
Pages