लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..
जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)
मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)
१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)
मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...
अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/1U2TpjKMbq/?mibextid=wwXIfr
नाच रे मोरा
ऋतुराज हेच लिहायला आले होते
ऋतुराज हेच लिहायला आले होते मी. त्याचंच हे व्हर्जन खरंच छान आहे….
गणपति राया पड़ते मी पाया
गणपति राया पड़ते मी पाया
काय मागु मागन रे
तुझा दयेचा तुझा कृपेचा
आशिर्वाद राहु दे रे
हेच माझ सांगन रे देवा
आणि
पोलीसवाल्या सायकलवाल्या,
बिरेक लावून थांब
टोपी तुझी हातात माझ्या,
होईल कसं काम
जाऊ या डबल सीट, लांब लांब
हा हा...अतुलजी.. एकदम मस्त
हा हा...अतुलजी.. एकदम मस्त उदाहरण..!!
(No subject)
दिल की आवाज़ भी सुन मेरे
दिल की आवाज़ भी सुन मेरे फसाने पे न जा
मेरी नज़रों की तरफ देख ज़माने पे न जा
आणि
बड़े अरमानों से रखा है बलम तेरी कसम
प्यार की दुनिया में ये पहला कदम
मना सज्जना भक्तीपंथेची जावे.
मना सज्जना भक्तीपंथेची जावे.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमी..
आणि
लगी आज सावन कि फिर वो घडी है..
तिन्ही रचना भुजंगप्रयात वृत्तात असल्याने एकाच चालीवर म्हणता येतात.
मिशीवाले मस्त उदाहरण..
मिशीवाले मस्त उदाहरण..
यांत किताबें बहोत सी पढी होगी तुमने (बाजीगर) हे ही टाकता येईल.
अतुलजी.. तुम्ही दिलेले वरचे उदाहरण एकदम चपखल..!!
मिशीवाले मस्त उदाहरण..
मिशीवाले मस्त उदाहरण..
यांत किताबें बहोत सी पढी होगी तुमने (बाजीगर) हे ही टाकता येईल.
अतुलजी.. तुम्ही दिलेले वरचे उदाहरण एकदम चपखल..!!
मना सज्जना आणि लगी आज सावन कि
मना सज्जना आणि लगी आज सावन कि
tooo goood
मिशीवाले आणि अतुल मस्त
मिशीवाले आणि अतुल मस्त उदाहरणं
(No subject)
‘निशाणा तुला दिसला ना’च्या
‘निशाणा तुला दिसला ना’च्या चालीवर वाचा
मी निघालो तुम्ही येता का?
माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का?
रामनवमीचा सण आला हो आला
पालख्या निघाल्या आज पायी शिरडीला
धाडलं बोलावणं जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेऊन
केली त्यांनं आज्ञा मला..
मी निघालो तुम्ही येता का?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/SwarYatri/videos/2112382092585274/?mibextid=rS4...
ठंडी हवाएं लहरा के आए
रहें ना रहें हम
आर डी च्या तोंडून
’नकळता असे ऊन मागून येते’ या
’नकळता असे ऊन मागून येते’ या गाण्याच्या चालीवर
मनाचे श्लोक म्हणता येतात.
हमको मनकी शक्ती देना आणि
हमको मनकी शक्ती देना आणि मुगल ए आजम मधलं बेकस पे करम कीजिए https://www.youtube.com/watch?v=qUAMuNT4_Uo
पहाटे पहाटे मला जाग आली
पहाटे पहाटे मला जाग आली
हे गाणे
दर्शन दे रे, दे रे भगवंता
ह्या चालीवरही गाता येते.
‘अल्लाह ये अदा, कैसी हैं इन
‘अल्लाह ये अदा, कैसी हैं इन हसीनों में’च्या चालीवर नुकतंच ‘श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में’ ऐकलं. आता सुडोमि.
तेरा सराफा ऐसा है हमदम
तेरा सराफा ऐसा है हमदम
जैसे चमके धूप में शबनम
जबसे हम हैं तुमसे मिले कसम
हम रहे नहीं हम
आणि
लकड़ी की काठी काठी पे घोड़ा
घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा
दुम उठा के दौड़ा
(एका कॉमेडी शो मधून)
मैं दुनिया भुला दूँगा
मैं दुनिया भुला दूँगा
तेरी चाहत में,
ओ दुश्मन ज़माना
मुझे न भुलाना
मैं खुद को मिटा दूँगा
आणि
चाहे कोई मुझे जंगली कहे
कहने दो जी कहता रहे,
हम प्यार के
तूफानों में
घिरे हैं हम क्या करें
हे आधी येऊन गेलंय की नाही या
हे आधी येऊन गेलंय की नाही या धाग्यावर माहिती नाही.
दाटून कंठ येतो
ओठात येई गाणे,
जा आपुल्या घरी तू
जा लाडके सुखाने
अणि
लाजून हासणे अन
हासून ते पहाणे,
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
अतुलजी, वरचे उदाहरण मस्त आहे.
अतुलजी, वरचे उदाहरण मस्त आहे. आधी नव्हते ऐकले.
ही दोन्ही गाणी 'ए दिल मुझे
ही दोन्ही गाणी 'ए दिल मुझे बता दे' च्या चालीत बसतात.
गागालगा लगागा गागालगा लगागा
गागालगा लगागा गागालगा लगागा
हा मीटर आहे.
केव्हां तरी पहाटे च्या चालीत पण बसतं आणि ते गाणंही या चालीत बसतं.
फक्त उलटून मधे ऊ + ल = एक गा असं अॅडजस्ट केलंय
हा हा .. मा न व
हा हा .. मा न व
मी ही गाणी ए दिल मुझे बता दे च्या चालीवर गाऊन पाहिली.
पहला पहला प्यार है
पहला पहला प्यार है
पहली पहली बार है
आणि
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे
सुहाना सफ़र और ये मौसम हसीं
सुहाना सफ़र और ये मौसम हसीं
हमें डर है, हम खो ना जाए कहीं
आणि
बदन पे सितारे लपेटे हुए
ओ, जान-ए-तमन्ना, किधर जा रही हो?
अतुलजी तुम्हाला हे कसे काय
अतुलजी तुम्हाला हे कसे काय सुचते बरे? तुमचा संगीत विषयातला अभ्यास फार चांगला असणार...!!
अभ्यास वगैरे नाही हो कधी कधी
अभ्यास वगैरे नाही हो
कधी कधी एखाद्या गाण्याचे शब्द मनात असताना त्यांना चाल भलत्याच गाण्याची लागते (किंवा याच्या उलट सुद्धा होते). मग वाटते अरे, हि चाल कोणत्या गाण्याची? मग ते गाणे (गुगलच्या कृपेने) शोधायचे. मग युरेका! 
आता मघाशीच हे बघा काय सापडलं...
सांज ये गोकुळी सावळी सावळी
सांज ये गोकुळी सावळी सावळी
सावळ्याची जणू सावली सावली
सांज ये गोकुळी सावळी सावळी
आणि
रात भर जाम से जाम टकराएगा
रात भर जाम से जाम टकराएगा
जब नशा छाएगा तब मज़ा आएगा
रात भर जाम से जाम टकराएगा
गाण्यात “ सावळ्याची जणू सावली
गाण्यात “ सावळ्याची जणू सावली” एव्हढंच आहे ना? सावली सावली नाही
Pages