लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..
जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)
मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)
१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)
मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...
अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?
हो बरोबर. तो सुरुवातीचा पीस
हो बरोबर. तो सुरुवातीचा पीस तर कोमल आणि शुद्ध ग पाठोपाठ वाजवत सुरू होतो आणि खालून वरती अतितार सप्तकात जातो. आपल्याशी या विषयावर चर्चा करायची आहे. विपूत बोलू.
छान धागा . मजा येतेय वाचायला
छान धागा . मजा येतेय वाचायला
माझ्या मुलीला गाण्याच्या क्लासमध्ये इटुकले पिटूकले मांजराचे पिल्लू छान हे गाणे शिकवले होते . गाणे छान आहे पण त्या गाण्याची चाल मला 'ए दिल है मुश्किल हे जिना यहा' सारखी वाटली.
मी छू कर मेरे मनको हे गाणे गुणगुणत होते , तर लेक म्हणते आई माझं गाणं पण या चालीत म्हणता येईल . मग तिने छू कर मेरे मनको या चालीवर या ओळी म्हणून दाखवल्या
इटुकले पिटूकले मांजराचे पिल्लू छान
गेलं पळून बिळामध्ये , दिसतील त्याचे कान
@सामी हा हा..
@सामी हा हा..
मी पण इटुकले पिटूकले गाणे दोन्ही गाण्याच्या चालीत म्हणून बघितले. फार मजेदार वाटते.
घन तमी शुक्र - ही कविता उच्च
घन तमी शुक्र - ही कविता उच्च आहे व त्याच ताकदीचे संगीत व स्वर तिला लाभलेले आहेत.
function at() { [native code] }इशय आवडते गाणे. बरेचदा रीपिट मोड!!
ये बाहेरी अंडे फोडुनी
ये बाहेरी अंडे फोडुनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढुनी
हे मला अगदीच अकाव्यात्मक वाटतं
हो, विशेषतः अंडे फोडुनी पण
हो, विशेषतः अंडे फोडुनी
पण ऐकताना त्या गूढ वातावरणात गेल्यामुळे हे शब्द फारसे टोचत नाहीत.
भरत
भरत

हे त्याचेचं प्रि-मेक ओव्हर/कायापालट पूर्व (?) हिंदी अ-काव्य व्हर्जन ...
मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा
लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा
कोई ना जाने अपना फ्युचर क्या होगा
का मरणी अमरता ही न खरी... हे
का मरणी अमरता ही न खरी... हे स्युसायडल नाही का? तसंच शेवटी पण हरी करुणा/ आई वाट पाहे इ. डार्कच होत जातं.
...
सुरुवातीला शुक्र, अंडे
आता हे असं जवळजवळ लिहिल्यावर अश्लिलही वाटेल...यात आशेचा किरण दिसतो आणि मग अमरतेचे ग्लोरीफिकेशन. का चुकतोय माझा अर्थ?सामी, किती गोड....
सामी, किती गोड....
!
अमित आणि हर्पा, अंधभक्ताच्या भक्तिभावाने वाचले तुमचे सुंदर प्रतिसाद
योगी, धागा आवडला.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/51879
मरणाचे ग्लोरिफिकेशन आहे खरे. मृत्युनंतर सर्व काही आलबेल-आई हात पसरुन उभी आहे, मृत्यु म्हणजे दार सुखाचे, ते हरिकरुणा वगैरे.
बरोबर भरत, 'अंडे' हा शब्द भयानक म्हणजे भयानक खटकतो. एकदम सुंदर कविता बेसुर, कुरुप होउन जाते.
अस्मिता धन्यवाद.
अस्मिता धन्यवाद.
पुलंचे असामी असामी मधले वडील कुठलेही गाणे सुखकर्ता दु:खहर्ताच्या चालीवर म्हणायचे या गोष्टीची आठवण लोकांनी दिलेल्या उदाहरणांमुळे आली.
पठाण या धाग्यावरच्या माझ्या
गचु. संपादित
पुलंचे असामी असामी मधले वडील
पुलंचे असामी असामी मधले वडील कुठलेही गाणे सुखकर्ता दु:खहर्ताच्या चालीवर म्हणायचे >> स्वकुलतारक सुता असो की नाथ हा माझा. आमच्या बाबांची सगळ्यांना एकच चाल, सुखकर्ता दु:खहर्ता.
आता मघाशी शोध लागला.
आता मघाशी शोध लागला.
रात्रीस खेळ चाले
या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा
हे या चालीवर गाता येते... (किंवा उलट)
ऐ दिल मुझे बता दे
तू किस पे आ गया है
वो कौन है जो आकर
ख्वाबों पे छा गया है
अरे वा...
अरे वा...
रात्रीस खेळ चाले == ऐ दिल मुझे बता दे - म्हणून पाहिले. फार छान जुळते.
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
हे राष्ट्र देवतांचे
सारे जहाँसे अच्छा
आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
ओ रात के मुसाफिर चंदा ज़रा बता दे
.
.
.
या आणि अशा कितीतरी गाणी/कवितांना ऐ दिल मुझे बता दे ची चाल चपखल बसते. लहानपणी कुठल्याही कवितेला आधी ही चाल लावून बसते का हे बघायचा एक छंद होता. ही चाल राष्ट्रीय चाल म्हणून घोषित करायला पाहिजे (किंवा गागालगालगागा - हे राष्ट्रीय वृत्त म्हणून जाहीर करा).
ही चाल राष्ट्रीय चाल म्हणून
ही चाल राष्ट्रीय चाल म्हणून घोषित करायला पाहिजे (किंवा गागालगालगागा - हे राष्ट्रीय वृत्त म्हणून जाहीर करा).
हा हा... बरोबर..!!
>> गागालगालगागा - हे
>> गागालगालगागा - हे राष्ट्रीय वृत्त
वाह!
राजास जी महाली, सौख्ये कधी
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली हे मस्त बसते, ए दिल मुझे बता दे, तु किसपे आ गया है.
म्हणून पहा...
राजास जी महाली, सौख्ये कधी
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली हे मस्त बसते, ए दिल मुझे बता दे, तु किसपे आ गया है.
@झंपी मूळ धाग्यात हेच लिहीले आहे मी...
काही म्हणा, पण 'वो कौन है जो
काही म्हणा, पण 'वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है' या ओळीच्या चालीत (विशेषतः त्या 'आ--कर---' वरती वरच्या स्वरांवर घेऊन जाणारी तान) 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' म्हणताना कसंसं होतं अगदी (मनवा मा कसक होईबे करी)!
हद्द आहे
हद्द आहे
"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" हे "सारे जहाँसे अच्छा" च्य चालीवर म्हणून बघितलं. त्यात पार्श्वभूमीवर आणि मध्ये मध्ये वाजणाऱ्या वाद्यांचे आवाज सुद्धा मनात imagine करायचे. असे वाटते कि आईविना भिकारी असल्याचे सेलिब्रेशन सुरु आहे
https://youtu.be/8HbwsAOfoRY
https://youtu.be/8HbwsAOfoRY
हे कन्नड गाणं (जोतेयल्ली)अगदी चिनी कम मधल्या 'जाने भी दो ना' सारखं आहे.
https://youtu.be/88LD0Gn_Fjc
अस्मिता, त्या गाण्याचं मूळ
अस्मिता, त्या गाण्याचं (दोन्ही) मूळ संगीत इलयाराजाचं आहे. जोतेयल्ली १९८१ चं आहे, तेच त्यांनी चीनी कमसाठी पुन्हा वापरलं आहे ऑफिशिअली. जसं हृदयनाथ मंगेशकरांनी काजळ रातीनं ओढून नेलाची चाल जशीच्या तशी माया मेमसाबमध्ये वापरली आहे - खुद से बाते करते रहना या गाण्यात.
थॅंक्स हर्पा. मला वाटलं मी
थॅंक्स हर्पा. मला वाटलं मी फारच मोठा शोध लावला आहे, आणि मिरवत घेऊन आले लिंका.
इलयाराजाचं संगीत आवडतं. चिनी कमचं हे गाणं छान आहे.
आय नो एक्झॅक्टली हाऊ इट फीलस
आय नो एक्झॅक्टली हाऊ इट फीलस लाईक. मलाही ते गाणं ऐकलं तेव्हा हेच वाटलं होतं.
हृदयनाथ मंगेशकरांनी बऱ्याच
हृदयनाथ मंगेशकरांनी बऱ्याच चाली रिसायकल केल्या आहेत अश्या. उदा: होली आयी होली आयी (जांभूळ पिकल्या झाडाखाली) किंवा मैं एक सदी से बैठी हू (सूर येती विरून जाती) वगैरे.
हो, स्वतःच्या आणि वडिलांच्या
हो, स्वतःच्या आणि वडिलांच्या दोन्ही. वितरी प्रखर - गगन सदन वगैरे
काही दिवसांपुर्वी टण टणाटण
काही दिवसांपुर्वी टण टणाटण हे गाणे "कही दुर जब दिन ढल जाये" च्या चालीवर कोणी तरी म्हणून पाठवले होते. तंतोतंत नाही पण बर्यापैकी जुळत होते.
जुळतंय खरं योगी.
जुळतंय खरं योगी.

हर्पा, खरंच.
Pages