एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर ....

Submitted by योगी९०० on 7 December, 2022 - 01:47

लहानपणीच्या काही आठवणी व तसेच मायबोलीवरील काही धागे वाचून एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर म्हणता येईल त्याची यादी करावी असे वाटले. एखाद्या गाण्याचे शब्द न बदलता त्या गाण्याची चाल जर दुसर्‍या गाण्याच्या चालीवर चपखल बसत असेल तर सांगावे..

जर दोन गाणी एकाच चालीवर बेतली असतील तर मात्र वगळावीत. उदाहरण म्हणजे "होली आयी होली आयी" हे मशाल मधले गाणे आणि "जांभूळ पिकल्या झाडाखाली" ही दोन्ही गाणी एकाच चालीवर आहेत. (संगीतकार ही एकच - पं. ह्रदयनाथ मंगेशकर)

मला माहित असलेली उदाहरणे... (दोन्ही गाणी एकमेकांच्या चालीवर म्हणता येतात)

१) वंश चित्रपटातले आके तेरी बाहोंमें हे गाणे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान च्या चालीवर चपखल बसते.
२) तु तु तु तु तु तारा (बोल राधा बोल) - दोस्त दोस्त ना रहा (संगम)
३) रसिक बलमा (चोरी चोरी ) - बाहोंमें चले आ (अनामिका) - अगदी १००% नाही पण बर्‍यापैकी...
४) राजास जी महाली - अए दिल मुझे बता दें (भाई भाई)

मायबोलीवर वाचलेली उदाहरणे
जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
येरे येरे पावसा - भोली भाली लडकी...

अजून अशी काही उदाहरणे माहित आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

डर मधले 'जादू तेरी नजर' हे गाणे 'ओम जय जगदीश हरे' ह्या आरतीच्या चालीवर

तू हा कर या ना कर
तू हा कर या ना कर
तू है मेरी किरन
बोलो
जादू तेरी नजर.

आनंदकंद वृत्तांत हजारो सिनेगीतं आहेत. एकाच वृत्तातल्या गाण्याच्या चाली एकमेकांना बसतात. सूट घेतली नसेल तर
केव्हा तरी पहाटे
राजास जी महाली
ओ रात के मुसाफिर
आरशाची गझल आहे एक इलाही जमादार यांची..

जिहालें मस्किन मुकून बरजींश - घालीन लोटांगण
>>>>

अरे हे मस्त आहे.. येत्या गणपतीला या चालीवर घेतो घालीन लोटांगण. मजा येईल. आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये नबरात्र देवीच्या आरतीच्या चालीवर घालीन लोटांगण घ्यायचे. ते मी घेतलेले यंदा तर खुश झालेली पब्लिक.

येरे येरे पावसा भोली भाली लडकी तर आमच्या दहावीच्या सरांनी सांगितलेले वर आलेच आहे.
पण तेव्हापासून मी येरे येरे पावसा त्याच चालीत गात आलोय आणि मुलांनाही तसेच शिकवले आहे. जणू मूळ चाल विसरूनच गेलो आहे Happy

रघु आचार्य म्हणताहेत ते अतिशय करेक्ट आहे. बेसिकली गाण्यामध्ये शब्द हे तालाच्या बोलांवर किंवा आघातांवर बेतलेले असतात. त्यामुळे एका वृत्तातली सर्व गाणी त्या एकमेकांच्या चालींवर म्हणता येतात.

त्यापेक्षा एक फार गमतीदार उद्योग आम्ही करत असू . ते असं , की काही गाण्यांच्या ओळी दुसऱ्या गाण्यांच्या ओळीं च्या पुढे इतक्या बेमालून जुळतात की त्या क्रमाने म्हंटल्या की तेच खरं गाणं आहे असं वाटत रहातं.
एक उदाहरण घ्या..
केशवा माधवा तेरे बिना भी क्या जीना
फुलो मे कलियो मे शोधीसी यादवा
केशवा माधवा...

टन टना टन, टन टन तारा, चलती हैं क्या नौं से बारा - कहीं दूर जब दिन ढल जायें च्या चालीवर

संधीकाली ह्या अशा - दिल में समाँ गयें सजन च्या चालीवर (किंवा Vice versa).

किताबें बहुत सी पढी होंगी तुमने - गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा

“काही गाण्यांच्या ओळी दुसऱ्या गाण्यांच्या ओळीं च्या पुढे इतक्या बेमालून जुळतात की त्या क्रमाने म्हंटल्या की तेच खरं गाणं आहे असं वाटत रहातं.” -

टिमटिम करते तारें, यह कहते हैं सारे।
आजा प्यारे, पास हमारे, काहे घबराये, काहे घबराये।

सर्वांच्या प्रतिक्रिया मस्त... काही नवीन गाणी मिळाली.

जादू तेरी नजर - ओम जय जगदिश, किताबें बहुत सी पढी होंगी तुमने - गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा, खिलोना जान कर - मुझे तुम मिल गये, संधीकाली ह्या अशा - दिल में समाँ गयें सजन ह्या गाण्यांच्या चाली एकमेकांना चपखल बसत आहेत. हे सांगितल्या बद्दल धन्यवाद.

'चेहरा है या चाँद खिला है' गाणं सवाल-जवाब लावणी (https://www.youtube.com/watch?v=yzO9-3n9VtY) चालीत पर्फेक्ट बसतं Happy

हेच गाणं (निदान पहिल्या चार ओळी) 'आओ बच्चों तुम्हे दिखाए' (https://www.youtube.com/watch?v=XiiBsKU4z6c) चालीत बसतं Proud

येई भाई येथ पाही घातली ही पाणपोई
धर्म जाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही

ही कविता सुनो गौर से दुनियावालो चालीत म्हणायची. जिथे कुठे चालीत योग्य वेळ येईल, तिथे आहे त्या शब्दावर थांबून पुढे ' हिंदुस्तानी ' म्हणायचं. इथे एक्सपलेन करणं अवघड आहे, कधी भेटलात तर दाखवीन मजा.

कधी भजनी मंडळांची गाणी ऐकली आहेत का? कितीतरी गाणी सिनेगीतांच्या चालींवर असतात. (मी हिंदीच - भजनं- ऐकली आहेत)
एका जैन मंदिरातून मेरा बलमा छैल छबिला मैं तो नाचूंगी या - रूना लैला या गाण्याच्या सुरावटीवर भजन ऐकू आलं.

कधी भजनी मंडळांची गाणी ऐकली आहेत का?>>>आई शप्पथ मला वाटलं हे फक्त मलाच ऐकू येत की काय Wink काल च दत्तजयंती निमित्ताने एक भजन ऐकायला आलं ज्याची चाल --आनेसे उसके आये बहार.... मेरी दिलरुबा अशीच होती,
मी रस्त्याने जाता जाता ऐकलं तर हसूच आवरेना...इकडे तिकडे बघते तर कुणालाही विशेष वाटलं नव्हतं .

इकडे तिकडे बघते तर कुणालाही विशेष वाटलं नव्हतं .
>>>
कारण हे खूप कॉमन आहे. आणि बरेच काळापासून
आणि त्यात काही गैर नाही. पण बोअर बाटतात मला तशी भजने

मी Twinkle, twinkle, little star,
How I wonder what you are हे नेहमीच राया तुमची घाई नका लावू गाठोडं बांधायला या चालीवर म्हणायचे Lol
Up above the world so high,
Like a diamond in the sky. हे ते सवाल जवाब मध्ये शेवटची fast ओळ असते तसे गायचे आणि शेवटी जी जी रे जी जी लावायचे Lol

भजनी मंडळाची गाणी म्हणजे मुद्दामहून कुठल्यातरी प्रसिद्ध गाण्यांच्या चालीत बसवलेली असतात. यांना यातून वगळावे

इथे ऑलरेडी दोन वेगवेगळ्या चालीची गाणी आहेत व त्यांची चाल एकमेकांना चपखल बसावी अश्या गाण्यांविषयी मी म्हणत आहे.

आळशीपणाची परमावधी आहे हे भरत!
होडी नवी दर्या जुना .... अत्याचार आहेत हे शब्द! सुधीर मोघ्यांचे आहेत खरंच? भाषांतर आहे का कसलं?
बाकी हृदयनाथ मंगेशकरांची निम्मी गाणी रिसायकल्डच असतात ना?

होडी चाले लाटेवरी कोण चालवी उमगेना >>>
'माझे राणी माझे मोगा तुजे डोळ्यात सोधता ठाव' हे ते दुसरे गाणे. तंतोतंत आहे.

चालीवर लिहिलं असणार. हे गाणं जानकी चित्रपटातलं आहे, असं दिसतं. म्हणजे हे आधीचं. फ्लॉप झालं म्हणून तीच चाल पुन्हा वापरली असेल.

निवडुंग मधलं ना मानोगे तो दुंगी तोहे गारी रे
याच चालीवर हे गाणं आहे.
मी हे लताच्या 'माझी आवडती गाणी' या अल्बममध्ये ऐकलं.

कधी भजनी मंडळांची गाणी ऐकली आहेत का?<<< कधी जैन सणांना देवांची गाणी ऐकली आहेत का? एकूण एक गाणं बॉलिवुड प्रसिद्ध गाण्यांच्या चाली ; ) पहिल्यांदा ऐकली तेव्हा फार गंमत वाटलेली
कृपया धर्मावर टिपण्णी नाही, चाली उचलण्यावर आहे

नवीन Submitted by मनिम्याऊ on 9 December, 2022 - 21:20 >>

दाटून कंठ येतो च्या चालीवर दोन्ही गाणी म्हणून पहा, आधीच्या प्रतिसादात सांगितलेले आनंदकंद वृत्त आहे हे.
लगावली : - गागालगा लगागा, गागालगा लगागा

Pages