मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चला म्हणजे आपण एकटेच नव्हतो याची खात्री पटली.
आजच कार मधे ऐकताना आठवलं. अजूनही तो उच्चार तसाच ऐकू येतो.

गीतरामायणातील एक गाणे "अयोध्या मनू निर्मित नगरी"
ते शब्द तसे आहेत हे अक्षरशः काल कळले. आजवर इतकी वर्षे "अयोध्या मंदिर मीत नगरी" असे काहीसे असेल असे वाटत होते.

कैवल्याच्या चांदण्याला... गाण्यात "चंद्र भाओ पांडुरंगा" ऐकायला येत असे.

आप जैसा कोइ मेरे मेरे जिंदगी मे आये, तो बात बन जाये ये गाणे लहानपणी बरोबर कुणाला ऐकू आले त्यांनी लिहावे , ते सोपे पडेल कारण संख्या कमीच असेल.

तो बाप बन जाए प्रमाणेच "बैठा दिया पलंग पे मुझे खाट से उठा के" असं ऐकू न येता ज्यांना बरोबर ऐकु आले त्यांनी लिहावे.

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
इथे घाई च्या ऐवजी बाई/दारी/भाई/भारी असे काहीही ऐकू यायचे. अजूनही अनेकांना ते क्लिअर नाही असे जाणवते.

यातच पुढे "क्रोध अभिमान केला पायतळी" असे ऐकायला यायचे. ते शब्द गेला पावटनी असे आहेत.

मला दरदे डिस्को नेहमी 'वो हसीना बनी लखपती' ऐकू येतं. आधी वाटायचं याच्या गाण्याची सुरुवात 'अमका टमका लखपती बनला, इतक्या लोकांना महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली' अशी जाहिरातात्मक का केलीय Happy

>> मी ठायी ऐकतो.

गाण्यांची यादी बनवताना आमच्या संयोजकांनी तर "दारी" लिहीले होते. म्हणून मला जरा शंका आली आणि गुगलून बघितले.

>> बैठा दिया पलंग पे मुझे खाट से उठा के

या गाण्यातला संबंध आहे होय? Lol पट्कन कळलेच नाही.

>>'वो हसीना बनी लखपती'

महाराष्ट्र राज्य लॉटरी Lol

घाई आहे का?
मी ठायी ऐकतो >>> काठी ऐकतो, म्हणतो.

Pages