दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणितात आपण त्रैराशिक म्हणतो ना, सम-प्रमाणात वाढणारे एक गुणोत्तर माहित असेल तर दुसरे काढायला त्रैराशिक मांडतो आणि क्रॉस मल्टिप्लाय करतो, तर त्याला इंग्रजीत काही शब्द आहे का?
पोट्ट्याला मी क्रॉस मल्टिप्लाय शिकवलंय आणि तो ही तेच म्हणतो पण त्रैराशिकाला काही शब्द आहे का? जेमिनायला विचारायच्या आधी इथे विचारतोय. Happy

अरे हो मी इकडे इंजिनियरिंग दुसर्‍या तिसर्‍या वर्षातल्या मुलांना डायनॅमिक्स वगैरे विषयात गणित घालून ते सोडवून दाखवत होतो वर्गात, तर तो क्रॉस मल्टिप्लाय प्रकार बघून अर्ध्याहून अधिक वर्ग चाट पडला. जणू मी काहीतरी जादू करून उत्तर आणलं आहे असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर आणि प्रश्नांत होते. मग मी त्या ऐवजी “भाजक संख्येने दोन्ही बाजूला गुणा“ म्हटल्यावर (इंग्रजीत) त्यांना ओळखीचा प्रांत वाटला आणि ती जादू काय होती कळलं. म्हटलं (मनात) आपल्याकडे हे चौथीत शिकवतात.

हो!
बाकी भाजक आणि भाज्ज्य हे डिव्हायझर आणि डिव्हिडंड इतकेच अगम्य आहेत. मला फक्त न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हेच समजतं. वर आणि खाली. Proud

भाजक आणि भाज्ज्य हे शब्दसुद्धा आठवत नव्हते मुलीची गणितं घेताना. शुद्ध मराठीतून शालेय गणित शिकल्याने EM करताना बेसिक गोष्टीसुद्धा नव्या आहेत असं वाटायचं. मराठीत शिकून पुढे गणितात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या लोकांबद्दल मला भयंकर आदर आहे.

मी मुलाला त्रैराशिक शिकवलेले आहे. अवयव पाडा सुद्धा. मी स्वतः सुद्धा दिवसरात्र अवयव पाडलेले आहेत. शब्दशः घेतलं तर धुरंधर आठवतो. Lol

पण येथे बऱ्याच मुलांना पाढे पाठ नसतात, त्रैराशिक मांडता येत नाही. माझ्या मुलाला जरा कमी वेळात जास्त सोडवता आले त्याने. आणि मी मराठी माध्यमातली असल्याने सतत समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, चौकोन, षट्कोन, त्रिज्या, व्यास असे जलवे दाखवल्याने त्याला मराठी सुद्धा आले. Proud नंतर नंतर "आई, राहू दे. समजलं" म्हणायला लागला. गणित शिकवलं की मराठी कुणाला माहीत!

आपल्याकडे हे चौथीत शिकवतात.>>>> Lol येथे बरेचदा द्राविडी प्राणायाम करतात.‌

हो. अवयव :आय रोलः पाडायला मी पण शिकवले आहे. Lol शॉर्ट डिव्हिजन.
पाढे पाठ करायच्या मागे मी पूर्वी लागलेलो आहे. पण त्याला पाढे पाठ न करता ही पटपट गुणाकार करता येतात. रिपीटेड अ‍ॅडिशन करतो का मसल मेमरीत गेलय का काही आणखी ट्रिक वापरतो काय कोण जाणे. नॉट बॅड. त्यामुळे बारक्याच्या मागे नाही लागलो.
हल्ली मला इकडे उशिरा वगैरे शिकवतात वाटत नाही. व्यवस्थित शिकवतात असंच वाटतं. समजुन उमजून शिकवतात.

वलय, गादी वापरून वापरून वर खाली होते (सपाटपणा जातो) अशी झाली असेल तर बदलायची. मधून मधून गादी उलटी पालटी करत असते. अभ्यासाच्या गप्पा वाचून जुने दिवस आठवले Happy

मला फार आवडतात अवयव पाडायला...
आणि बाजू बदलून इकडचे ऋण तिकडे धन होते
काय concept आहे ना, खतरनाक!
त्यामुळे बीजगणित आवडायला लागलं होतं

गादीचे वापरावर आहे. आणि आपल्याला किती मऊ हवी यावरही. आणि कापसाच्या क्वालिटीवरही.
मी तीन वर्षांपूर्वी जुन्या गाद्या काढुन पिंजून त्यात भर घालून दोन कापसाच्या गाद्या केल्या आणि त्यातली एक मी वापरतोय. अद्याप परत पिंजुन घेण्याची वेळ आलेली नाही, पण वर्षभरात फार तर दोन वर्षात येईल. (मला फार मऊ लागत नाही. यासाठीच परत कापसाच्या गादीवर आलो.)

आपण अवयव पाडायचो? मला अज्जीबात आठवत नाही. पण समभुज आणि समद्विभुजला इंग्रजीत काय म्हणतात तेही आठवत नाही. आणि गणित, भूमिति आवडीचे विषय होते. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वगैरे सोपी वाटतात.

लेकीला रिपीटेड ऍडिशनच शिकवली होती शाळेत. म्हटलं १२-१५ पर्यंत ठीक आहे. १९, २३, २९ ची रिपीट एडिशन करेपर्यंत पाढा म्हणून होईल. तरी गेल्यावर्षी टीचरने प्रेमाचा सल्ला म्हणून २० पर्यंत पाढे पाठ करा सांगितलं होतं. यांच्या वर्गाचा टॉपर सोडल्यास कुणीच केले नाहीत. फक्त पालकांनी एकमेकांकडे पोरं ऐकत नाहीत म्हणून तक्रारी केल्या.

आता दररोज एक पाढा पाठ करण्यासाठी आमिष दाखवते मी. पण तिलाच मज्जा येतेय सो करू देत.

'गणितात आळशी बना' हे माझं सूत्र त्यांना शिकवलेलं आहे. कमित कमी काम करायचं, पण उत्तर आलं पाहिजे. गणित हा आळशी लोकांचा विषय आहे सांगितल्याने आवडते दोघांना. Lol आणि मला पण. Proud

हो, work smarter not harder. हाच मंत्र आहे. उलट काम कमी लागून जास्त वेळ टाईमपास करता येतो म्हणून आयडिया लढवते. Lol

लाडकी बहीण योजनेविषयी

माझ्या मदतनीस ताईंचे (बहुतेक ekyc राहिल्याने), लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर पासून अकाऊंट मध्ये जमा झालेले नाहीयेत. त्यांचे ekyc करायचा प्रयत्न केला पण send OTP केल्यावर OTP सुद्धा येत नाही की काहीच पुढे सरकत नाही. Resend OTP करून बघितले तरी काही उपयोग झाला नाही.

मी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून आणि माझ्या पीसीवरून ट्राय केले. पण काही उपयोग झाला नाही.

कोणी मदत करू शकेल का? त्यांना सध्या फार आर्थिक अडचण आहे.

मी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून आणि माझ्या पीसीवरून ट्राय केले. पण काही उपयोग झाला नाही. <<<<
पियू,
Offline KYC करायला सांगा. सेतू किंवा तहसील ऑफिस मध्ये सर्व कागदपत्र घेऊन गेले तर तिथे बायोमेट्रिक करुन व्हेरिफिकेशन करतात.

मी पण घरी हे सगळ्यांना सांगतो.

Footwear हे चांगल्यातल्या चांगल्या गुणवत्तेचे घ्या. जे काही तुमच्या बजेटमधे बसत असेल त्यातले बेस्ट घ्या. जमल्यास दुसरीकडे काटछाट करा पण footwear मधे कधीच नको.

बाकी गादी वापरणे सोडून अनेक वर्षे झाली.
चटई+सतरंजीवर झोपतोय.

Footwear हे चांगल्यातल्या चांगल्या गुणवत्तेचे घ्या. जे काही तुमच्या बजेटमधे बसत असेल त्यातले बेस्ट घ्या. >>> १००+
आणि इतर कशाहीपेक्षा कंफर्टवर भर द्या. विशेषतः बायकांना हे सांगावे लागते. लग्नाच्या रीसेप्शनसाठी सवय नसताना उंच टाचेच्या/डिझाईन आवडली म्हणून अनकंफर्टेबल चपला घालून ऐन समारंभात पाय/पाठ दुखतेय म्हणणाऱ्या कित्येक नवऱ्या पाहिल्यात.

रिबॉक या कंपनीने आपल्या अंतर्गत वापरासाठी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले होते कि ८९ टक्के स्त्रिया फॅशनेबल पण गैरसोयीची आणि त्रासदायक (UNCOMFORTABLE) पादत्राणे वापरतात.

या उलट केवळ २ % पुरुष हे अशी पादत्राणे वापरतात कारण पादत्राण निवडतांना चूक झालेली असते.

त्यात पुढे असं लिहिलेलं होतं कि फॅशनेबल आणि (COMFORTABLE)आरामदायक पादत्राणांची बाजारपेठ किती मोठी आहे ते लक्षात घ्या

स्त्रिया footwear कडे जास्त दुर्लक्ष करत असाव्यात.

त्यांच्या वेशभूषेला शोभेल असे quality footwear मिळतात का?

पंजाबी ड्रेस, साडी वर दैनंदिन आयुष्यात वापरण्यासारखे footwear कोणते?
मी बहुदा सगळ्या जणी लोकल मेड किंवा फारतर फार बाटा/ मोची चे वापरतात. त्या flats, normal heels व बंद असलेल्या चपला दिवसभर वापरायला कितपत चांगल्या? त्याला पर्याय काय?

flats, normal heels व बंद असलेल्या चपला दिवसभर वापरायला कितपत चांगल्या
>>>>> जराही हील्स नसलेल्या चपला, बूट वापरले तर आर्चेसना आधार मिळत नाही. दिवसभर वापरल्या तर पाय दुखतात. अर्धा ते पाऊण इंच हील्स जास्त कंफर्टेबल वाटतात.

बाकी क्लोज्ड/पीप टो/ओपन यापैकी काय वापरायचे ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असते.

बहुसंख्य स्त्रिया समारंभात जी हाय हील्सची पादत्राणे वापरतात ती वापरून १००-२०० मीटर पेक्षा जास्त चालल्यास पायाला आणि कमरेला त्रास होतो. यामुळे बहुसंख्य वेळेस त्यांना घरापासून लग्नाच्या हॉल पर्यंत जाण्यासाठी स्वतःची कार/ टॅक्सी वापरावी लागते.

स्पोर्ट्स शु सर्वात अराम दायक असतात किंवा डॉक्टर शॉल सारखे अतिशय आरामदायक सँडल्स आहेत पण ते बायकांच्या मॅचिंग मध्ये जात नाहीत.

हाय हील्स हा तर एक अख्ख्या लेखाचा विषय आहे. त्याची उत्पत्ती कशी झाली आणि ते कुणी कसे वापरू नयेत इ इ

त्यावर एकदा परत कधीतरी

Pages