Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28
'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी शाळेतून घरी आल्यावर
मी शाळेतून घरी आल्यावर आज्जीने आंघोळीसाठी पाणी लावले ओट्यावर छोट्या बादलीत हीटर अडकवून. 'खायला आज माझं मी करून घेईन आज्जी, तू जा बाहेर..' असं म्हणून मी पहिल्यांदाच एकटीने मॅगी केली. आवरुन येईपर्यन्त ती गार गोळा झालेली...
तरी बरं आपलं नातवंडं 'वांड' आहे हे माहिती असल्यामूळे आजी बाहेर व्हरांड्यातच होती आणि आवाज ऐकून धावत आत येऊ शकली..!:इश्श:
मंग अपूनने आयडिया किया...!! आम्ही हीटर घातलेल असतो म्यागीत..फ़्यूज उडून घराचे दिवे गेल्यावर पुढचं क्या सांगेंगा..!
लग्नं झालं असलं तरी अजून सगळे जमले की हा किस्सा गाजतो आमच्या घरात आणि तोंड लपवून बसायची पाळी येते..
हे मी लिहिलेले असेन काय माही
हे मी लिहिलेले असेन काय माही नाही. आमच्याकडे एक आईच्या नात्यातले आजोबा दर रविवारी न चुकता येत सकाळी, चहा वगैरे पीत व गप्पा मारत व जात. कधी कधी कामं असली तरी आईला बोलत बसायला लागायचे. आजोबा काय एकटेच होते. बोलायला कोण नसले तर आम्हा लहान मुलांच्या चौकशा, बाळा काय करतेस वगैरे वगैरे.
ह्या आजोबांना नाकात तपकीरी ओढायची सवय होती. मी बर्याचदा तिथेच खेळत असताना पाहिले की काहीतरी छोटी डब्बी काढून ब्रॉउन रंगाची पूड टाकतात मग जोरजोरात शिंकतात. आईने त्यांना कित्येकदा सांगितले ही होते की इथे तपकीरी ओढू नका कारण त्यामागे सुद्धा एक इतिहास होता तो पुढे कळेलच.. मला एकदम कुतुहल काय बरे टाकतात तरी नाकात ते... (मी जवळपास ४ वर्षाची असेन.)
एक दिवस आजोबा आत काहीतरी बोलायला गेले व त्यांची ती डबी सदर्यातून खाली सोफ्यावर पडलेलीच मिळाली.. झाले उघडून बर्यापैकी पूड नाक वर करून आत.. अर्धी तोंडात .. कारण तोंड देखील उघडलेले मी त्या अॅक्शन मध्ये.. असा गोंधळ उडलेला... डायरेक्ट हॉस्पिटल वारी चक्कर आलेली..
आश्चर्य म्हणजे हा किस्सा माझ्या मोठ्या भावाने सुद्धा केलेला होता ,फरक इतकाच त्याने नाकात घरातल्या बाल्कनीतल्या कुंडीतली माती घातलेली व त्या मातीत बर्यापैकी लहान खडा असल्याने तो नाकात गेलेला.. आहोत की नाही आम्ही कॉपीकॅट. ...
इतिहास दोहराया गया ६ साल बाद... 
आणखी एक किस्सा लहानपणी ५-६
आणखी एक किस्सा लहानपणी ५-६ वर्षाची होते मी व माझा लहान मामे भाऊ ४ वर्षाचा. आजी सगळ्यांना अंघोळ घालायची घसघसून. आता हा भाऊ सावळा आहे व त्याला अंघोळीचा कंटाळा असल्याने खूप रडायचा अंघोळीला चल म्हटले की. मग आजी सांगायची बघ आपण छान साबण लावू, तू गोरा होशील मनू सारखा.:) हे एकले की मला त्यावेळी एकदम प्रॉउड फिलींग उगाचच.
एकदा हा व आजी आमच्याकडे रहायला आलेले. एक दिवस आजी गेलेली बाहेर. जसे काही माझ्या अंगावरच ह्याला अंघोळ घालायची जबाबदारी असल्यासारखी घेतले बखोटी पकडून. बाथरूमला लावली कडी आतून मग ओतले थंडच पाणी नी लावला साबण फेस करून. आजीची स्टाईल मारत हात/पाय चोळत ओढून वगैरे साबण लावला अगदी पुर्ण अंगाला.. हा रडतच होता. त्यावेळी डोक्यात आले की चांगला साबण बर्याच वेळ लावून ठेवला की होइल गोरा.:)
सगळे बाहेर कुठली सीरियल बघत होते तेव्हा रविवारी सकाळी...मला वाटते मोगली का काय.. आठवत नाही आता.
मी आले बाहेर व मला पकडत होता तरी तिथेच आत बसवले,कडी घातली बाहेरून. हा तसाच रडतोय तर वाटले रोजचेच तर रडतो त्यात काय. बाहेर आले तर आईने मला नाश्ता ठेवला होता. ती प्लेट घेवून बाहेर हॉल मध्ये गेले व चक्क विसरले त्याला. जवळ जवळ १०-१५ मिनीटे हा आतच. अग शेखर कुठेय त्याने खाल्ले नाहीये अजून करत आई शोधत असताना बाथरूम मधून आवाज.. असा ओरडा खाल्ला ना आजीचा/आईचा. साबण सुकलेला.. व बावळटासारखा हा रडत आत बसलेला बाथरूमची कडी काढल्यावर.. तेव्हा पासून मला तो उगीच गोरा झाल्यासारखे वाटायचा... सगळे अजून हसतात.. की मनून गोरा केले ह्याला.
एकदा अशीच मी कोंबडीची लहान पिल्ले मारलेली अंघोळ घालून. पण त्यावेळी आणखी लहान होते. ३-४ वर्षाची.
दुसर्यांना अंघोळ घालायचा मला शौक होता आजीकडे पाहून. गावी गेलो की आजी आम्हा १२-१५ नातवडांना स्वःता अंघोळ घालायची. सगळे मावस,मामे भावंड आम्ही ३-१३ वर्षाच्या कॅटेगरीत होतो तरीही.
तूम्ही सगळे मोठे का रे झालात
तूम्ही सगळे मोठे का रे झालात ?
मला (बहुतेक पडोसन सिनेमा बघितल्यानंतर ) साबणाच्या फेसाचे जाम आकर्षण वाटायला लागले होते. मग मी बेसिन मधे लिक्वीड साबणाचा भरपूर फेस करायचो. मग काय वाटायचे कुणास ठाऊक, माझी खेळण्यातली छोटी विमाने त्या फेसातून उडवायचो. त्यातच शोध लागला कि त्या फेसावर फेस पावडर टाकली कि फसफस आवाज येतो आणि फेस खाली बसतो (बघा करुन.)
मग ते हि करायला लागलो. डाव्या हाताने विमान फेसातून उडवायचे आणि उजव्या हाताने त्यावर पावडर टाकायची. म्हणजे विमानाने बाँब टाकून फेसांचा डोंगर नष्ट केला, असे वाटायचे.
मी किती साबण आणि किती फेसपावडर अशी वाया घालवली असेल, ते माझे मला माहिती.
त्याचवेळी कधीतरी गंधकाच्या धुराने रंगीत फूले पांढरी होतात, असे शाळेच्या पुस्तकात वाचले.
चेंबूरच्या आर सी एफ मधे भरपुर गंधकाचे ट्रक जात असत, त्यातले गंधक बर्याचवेळा रस्त्यावर पडायचे, शाळेतून येताना ते गोळा करुन आणायचे. मग सदाफुलीची फूले गोळा करायची. आणि चांगला ठसका लागेपर्यंत हा उद्योग करायचा (या फूलांवर हा प्रयोग चांगलाच यशस्वी होतो.) मग एका दगडावर गंधक पेटवून, थेट झाडावरच्या फूलांवरच हा प्रयोग करायचो, आणि झाडांची काही फूले पांढरी करायची. आणि मग सगळ्यांना दाखवायचे दोनरंगी फूलांचे झाड !!
सल्फर डाय ऑक्साईड पासून स्ल्फ्यूरस अॅसिड आणि मग सल्फ्यूरिक अॅसिड करायचा पण प्रयत्न केला होता, (घरच्या घरी.)
सल्फर डाय ऑक्साईड पासून
सल्फर डाय ऑक्साईड पासून स्ल्फ्यूरस अॅसिड आणि मग सल्फ्यूरिक अॅसिड करायचा पण प्रयत्न केला होता >>>>>>
दिनेशदा
.
मला सल्फर कधी रस्त्यावर गोळा करायची गरज पडली नाही, विज्ञानाचे सर जेव्हा वर्गात प्रयोग दाखवण्यासाठी असं काही आणायचे, त्यातले काही पदार्थ लिटल आईनस्टाईनना स्वःताहून द्यायचे. सल्फर व्यतीरिक्त झींकची तार, फुटलेल्या थर्मामिटरचा पारा (फक्त मला), लाल-निळे लिटमस पेपर हे विद्यार्थ्याना वाढदिवस असल्यासारखे वाटायचे
<<<लग्नं झालं असलं तरी अजून
<<<लग्नं झालं असलं तरी अजून सगळे जमले की हा किस्सा गाजतो आमच्या घरात आणि तोंड लपवून बसायची पाळी येते.. >>>>
मु, तोंड लपवुन बसायची पाळी तुझ्यावर नै कै....नवर्यावर येत असेल......
(दिवा घ्या.)
LOL...त्याने माझ्यासमोर
LOL...त्याने माझ्यासमोर कधीचेच टेकलेत हात..

पण भाऊ कसा देणार ना विसरु!! कधी चुकून maggie केलेली असली की जोरात म्हणतो...आईई..तो परवा हीटर ठेवला होता तो पाहिलास का कुठेsss!!!!
मु, मनस्विनी, दिनेशदा .....
मु, मनस्विनी, दिनेशदा .....

फेस पावडर वरून आठवलं, आम्ही फेस पावडर जमिनीवर भरपूर पसरायचो आणि मग धावत जाऊन त्यातून घसरायचो. कधी कधी डोकं, पार्श्वभाग इ. गोष्टी चांगल्याच सणकून निघायच्या. शिवाय पावडर वाया घालवल्याबद्दल ओरडा बसायचा तो वेगळाच.
आणखी एक उद्योग म्हणजे, टॉवेल वर एका टोकाला एकाने बसायचे आणि दुसर्याने ओढायचे. खूप मज्जा यायची. कधी जोरात ओढले तर तोल जाऊन डोकं जोरात मागच्या मागे जमिनीवर आपटायचे.
हा टॉवेलचा खेळ आम्हाला आमच्या एका cousin ने शिकवला होता. त्याचीच एक गंमत - एकदा आम्हाला सगळ्याकरता आईने सफरचंद कापून दिले. यानी मला आणि माझ्या बहिणीला सांगितले कि तो एक जादू दाखवणार आहे. मग त्याने त्या सफरचंदाचे तुकडे हवेत उडवून direct तोंडात टाकायची जादू दाखवली. सगळं सफरचंद संपल्यावर त्याची खरी 'जादू' आमच्या लक्षात आली आणि आम्ही त्याला बुकलून काढले.
आम्ही फेस पावडर जमिनीवर भरपूर
आम्ही फेस पावडर जमिनीवर भरपूर पसरायचो आणि मग धावत जाऊन त्यातून घसरायचो. कधी कधी डोकं, पार्श्वभाग इ. गोष्टी चांगल्याच सणकून निघायच्या
आणखी एक उद्योग म्हणजे, टॉवेल वर एका टोकाला एकाने बसायचे आणि दुसर्याने ओढायचे
>>> दोन्ही बाबतीत सेम पिंच मामी.
मला वाटतं हे उद्योग लहानपणी अगदी प्रत्येकाने केले असतीलच असतील.
मी आणि माझी बहिण हे उद्योग करायचो.
१) आपल्या घरी थोडा उंच असा लाकडी स्टूल असतो ना त्याला बरोब्बर उलटा ठेवायचा (म्हणजे स्टूलाचे ४ पाय वर). मग त्या स्टूलात एकीने बसायचंआणि दुसरीने तो स्टूल जमेल तितक्या डायमेंशन्स मध्ये फिरवायचा एक एक स्टेप ने. म्हणजे आधी पाठीकडून मागे पाडायचा. मग डावीकडे, मग उजवीकडे वै.
आत बसलेल्याला ते एस्सेल वर्ड मध्ये झोपाळे पण फिरणारा आकाशपाळणा असतो ना त्यात बसल्यासारखे वाटेल अशी आमची आपली भाबडी आशा
२) उश्या एकावर एक रचायच्या. आणि त्यांना पाट जोडून घसरगुंडी बनवायची आणि आळीपाळीने त्यावरून घसरायचे. कधी कधी उश्या आणि पाट विलग होऊन बूड चांगलेच आपटायचे. पण पर्वा होती कुणाला??
३) आम्ही जिथे रहयचो त्याच मजल्यावर आम्ही आसपासच्या वयाची ७ कार्टी होतो. त्यातही मी याला सामील, तो तिला सामील असे २ विरोधी गट पडत. मग एका गटाने दुसर्या गटातील मुलां-मुलींना उद्देशून "तू मूर्ख, टकलू, बावळट" वै. शिव्या असलेली पत्रे लिहायचे आणि त्या त्या मुला/मुलीच्या घराच्या लेटरबॉक्स मधून टाकायची. कधी कधी तर त्यांच्या आई-वडीलांना उद्देशून "तुमची मुलगी महानालायक आहे." वै. लिहूनही पत्रे टाकायचो. लय भारी मज्जा यायची.
आम्ही जिथे रहयचो त्याच
आम्ही जिथे रहयचो त्याच मजल्यावर आम्ही आसपासच्या वयाची ७ कार्टी होतो. त्यातही मी याला सामील, तो तिला सामील असे २ विरोधी गट पडत. मग एका गटाने दुसर्या गटातील मुलां-मुलींना उद्देशून "तू मूर्ख, टकलू, बावळट" वै. शिव्या असलेली पत्रे लिहायचे आणि त्या त्या मुला/मुलीच्या घराच्या लेटरबॉक्स मधून टाकायची. कधी कधी तर त्यांच्या आई-वडीलांना उद्देशून "तुमची मुलगी महानालायक आहे." वै. लिहूनही पत्रे टाकायचो. लय भारी मज्जा यायची. >>>>>>>>>
मला वाटतं हे उद्योग लहानपणी
मला वाटतं हे उद्योग लहानपणी अगदी प्रत्येकाने केले असतीलच असतील
१. उलटा स्टुल... हो केलयं
२. उशीची घसरगुंडी... गावाला एक स्पजं ची मोठी उशी होती, तिच्यावर बसून लाकडी जिन्यावरून घसरत झाली यायचो... रोलर स्केटींग सारखा अनुभव यायचा.. फक्त लॅन्डींग सोडून
३. शेजाय्रानां शिव्या असलेली पत्रे कधी दिली नाही, पण माझ्या काही संवगड्यानीं त्यांच्या शेजाय्रानीं कचय्रात टाकलेली जुनी पत्रे त्याच्या पत्त्यावंर सुखरूप पोहचती केलेली आहेत
हे फारच भारी आणि युनिक आहे
हे फारच भारी आणि युनिक आहे गं. पेटंट घेऊन टाक. >>>
मामी, माझी या आधीच्या उद्योगांची जंत्री वाचलीत की नाही?? बरीच पेटंट्स घ्यावी लागतील अशी.
दिनेशदा, मानलं तुम्हाला
दिनेशदा, मानलं तुम्हाला ___/\___! लिटील सायंटीस्ट!!
तुमच्या किश्शावरुन आठवले:
बाजुचा दादा कॉलेजला ११वी-१२वी , सायन्स ला असेल! त्याने घरी केलेले प्रयोग आम्ही पाहिले होते!
घरामागच्या नालीतला एक छोटा बेडुक पकडला (याक....असा खडबडीत, ब्राऊन कलरचा होता)!
अजुन एक शेजारीण मिस्त्री लावायची, तिच्याकडुन तंबाखु घेतली. एकाने त्या बेडकाला घट्ट पकडुन त्याच्या तोंडात आम्ही (मी आणी माझे दोघे लहान भाऊ) कशी कोण जाणे तंबाखु कोंबली...तो (बेडुक) बिचारा नंतर गोल गोल फिरुन बेशुद्ध पडला. मग एका लाकडी फळीवर त्याचे चारही पाय खिळ्याने ठोकुन त्याला उताणे झोपवले. आणी घमेल्यात पाणी घेऊन त्यात ती फळी ठेवली आणी दादाची डिसेक्शन बॉक्स घेऊन त्यातल्या स्कालपेलने त्याची पोटावर आधी उभा छेद घेतला...पण ती लाकडी फळी कुठे पाण्यात बुडतेय? मग एकाने ती पाण्यात दाबुन ठेवायची, एकाने डिसेक्शन करायचे (??) असा द्राविडी प्राणायाम करत बेडकाच्या आतले अवयव पाहिले. हृदयच माहिती होतं तेव्हाही ...
बेडकाचं डिसेक्शनः मी आणि
बेडकाचं डिसेक्शनः मी आणि माझ्या ताईने ती तिसरीत असताना हा प्रयत्न केला होता. त्यासाठी शेजारी रहाणाय्रा एका मुलाने बिल्डींग मागे साचलेल्या डबक्यामधुन एक ५-६ ईंचाचा बेडून आणला. डिसेक्शन करताना एकच नियम, काहिही झाले तरी बेडूक मेला नाही पाहिजे... तरच डिसेक्शन यशस्वी. त्यासाठी दाढिच्या ब्लेडसोबत त्याला शिवण्या साठी सुईदोरा देखिल आणला होता. ताई ब्लेडने त्याचे पोट फाडायला गेली आणि त्या ब्लेडला धारच नव्हती. चार पाच वेळा ती ब्लेड स्लिप झाल्यावर त्या बेडकाचे पाय पकडणाय्रा एका मुलीची पकड सैल झाली आणि तो उभयचर टुण-टूण उड्या मारत परत डबक्याकडे गायब झाला

बिच्चारे बेडुक! त्यांच्या
बिच्चारे बेडुक!
त्यांच्या जीवाशी असा खेळ बरा नाही.
मला या सरपटणार्या आणि टुणुक टुणुक उड्या मारणार्या प्राण्यांची जाम भिती वाटते बाबा. ते डीसेक्शन वगैरे करण्याच्या भितीमुळेच मी "डीप्लोमाला अॅडमिशन ला घेऊ या का?" असं आईने विचारल्यावर चटकन होकार देऊन टाकला.
बिच्चारे बेडुक!@निंबुडा..
बिच्चारे बेडुक!@निंबुडा..
...तो बेडूक सुखरूप गेला, ब्लेडला धार नव्हती म्हणुन या पातका पासुन वाचलो
१. खूप मोठ्या जिन्यावरुन बसून
१. खूप मोठ्या जिन्यावरुन बसून खाली घसरत यायचं आणि तेव्हा तोंडातून अऽ. अऽऽ अऽऽ. असे आवाज काढायचे..
२. भाऊ झोपून just उठत असताना त्याच्या शेजारी उभं राहायचं आणि झपकन इतक्या वेगात खाली बसायचं की तो सॉलिड दचकून बाजूला वळलाच पाहिजे...
३. शेजारच्यांनी पूडीच्या दोरीचा गुंडा केला की तो एकतर अख्खा सोडून यायचा नाहीतर तो कसा जळतो ह्याचं कुतूहल शमवून यायचं.
का तर ते आजोबा बिचारे मला गणित शिकवायचा प्रयत्न करायचे...:फिदी:
मला लहान असताना आईबाबांनी
मला लहान असताना आईबाबांनी काहीही लिहायला वगैरे शिकवलं तरी त्यावर विश्वास बसत नसे.
बिच्चारी आई.... तिला अगदी शरमल्यासारखे व्हायचे.....
आईने ''श्री गणेशाय नमः'' पाटीवर लिहून दिले तर मी त्यातील सर्व अक्षरे आईने सांगितलेलीच आहेत ना ह्याची खालच्या मजल्यावर राहाणार्या आमच्या घरमालकांकडून (आम्ही त्यांना अप्पा म्हणायचो) खात्री करून घेतली!!!
त्यानंतरही आई/ बाबांनी शिकवलेले कोणतेही पाढे, अक्षरे, शब्द इत्यादींची खातरजमा मी अप्पांकडून करून घ्यायचे!!
अजून एक म्हणजे १ ते १०० आकडे लिहिताना आईने जर माझा हात पाटी/ वहीवर डावीकडे आणून ठेवला तर मी नेहमीसारखे सुलट अंक लिहायचे. पण तेच करायला जर आई विसरली, आणि माझा हात उजवीकडे असेल तर मी पटापट आरशात जसे आकडे दिसतील तसे उलट उलट व उलट्या क्रमाने आकडे काढायचे!!! आईला ते आकडे आरशात बघायला लागायचे!!!
>>>>आणि माझा हात उजवीकडे असेल
>>>>आणि माझा हात उजवीकडे असेल तर मी पटापट आरशात जसे आकडे दिसतील तसे उलट उलट व उलट्या क्रमाने आकडे काढायचे>>>
पण हे सही आहे खरच!
माझा चुलत भाऊ 'श्री गणेशा.. '
माझा चुलत भाऊ 'श्री गणेशा.. ' शिकताना...
'श्री म्हण'.... मी 'श्री' म्हणणार नाही...
'ग' म्हण'... मी 'ग' म्हणणार नाही...
'णे' म्हण'... मी 'णे' म्हणणार नाही...
'शा' म्हण'... मी 'शा' म्हणणार नाही...
असं शिकलाय...
हा हा हा.... परदेसाई....
हा हा हा.... परदेसाई.... सह्हीच!! नकारातून साकार ज्ञान!
माझ्या ओळखीच्या एका बाईंना
माझ्या ओळखीच्या एका बाईंना दोन भाऊ होते. मोठा उल्हास आणि धाकटा प्रल्हाद. त्या लहान असताना, शाळेत परीक्षेत जो म्हणी पूर्ण करा म्हणून प्रश्न असतो त्यात त्यांनी 'आधिच उल्हास __ _____ " या म्हणीची पूर्तता 'त्यात प्रल्हाद' अशी केली होती.
आईशपथ! ऐकून आम्ही जे धो धो हसलोय!

मेरे पिताजीका एक किस्सा
मेरे पिताजीका एक किस्सा (त्याचे सर्व किस्से लिहिले तर हा बाफ्भरून वाहील
)
माझे आजोबा बारडोली शुगर फॅक्टरीत असताना पप्पा चार पाच वर्षाचे होते.
तिथल्या गुजराती दुकानदाराला एकदा आजोबानी "याला बिस्कीटचा पुडाद्या" अशी चिठ्ठी देऊन पाठवले, पप्पाना गुजराती येत नव्हती.
पप्पानी ती चिठ्ठी जपून ठेवली. जेव्हा केव्हा आठवण येइल तेव्हा दुकानात जायचं चिठ्ठी दाखवायची आणि बिस्कीट खायचं. महिन्याच्या वाण्याच्या बिलात बिस्कीटाच्या पुड्याचा आकडा दिसला तेव्हा आज्जीला ही चलाखी समजली.
वडीलांनी त्यांच्या
वडीलांनी त्यांच्या जलसंशोधनाच्या कामासाठी चांगली पॉवरफुल दुर्बिण आणलेली.... ते घरी असले की मी त्यांची परवानगी घेऊन ती अवजड दुर्बिण घ्यायचे, तिचा पट्टा गळ्यात अडकवायचा व शेजार-पाजारच्या खिडक्यांमध्ये डोकवायचे!!
तेव्हा अक्कल नव्हतीच तशी, त्यामुळे आपण नक्की काय करतोय हे कळतच नव्हते..... दुर्बिण वापरून बघायची एवढेच कळायचे! मग घरातून ग्राहक पेठेचा बोर्ड दिसला की कोण तो आनंद व्हायचा! पारिजात सोसायटीचा बोर्ड.... आणि समोरच्या इमारतीतील काकू आज कढईत कोणता पदार्थ बनवत असतील हा अंदाज बांधत बसायचे त्यांच्या किचनच्या खिडकीकडे दुर्बिण रोखून! आमच्याकडे सर्व बालगोपाळ एकत्र जमले की आम्ही समोरच्या कुटुंबातील एक गृहस्थ बाल्कनीत फक्त अंडरवेअर घालून उघडेबंब उभे असायचे त्यांच्याकडे दुर्बिणीतून बघत ''अव्वा अय्या'' इत्यादी करत बसायचो!!! समोरच्या अमृततुल्य चहाच्या दुकानात दुर्बिण रोखून बसायचो.... प्रफुल्ल मेडिकल्स, महेंद्र जनरल स्टोअर्स, आयडियल हेअर सलून, नीळकंठ प्रकाशन हीदेखील आमची आवडती दुर्बिण रोखून बघायची प्रेक्षणीय स्थळे होती!!
सर्वच किस्से धमाल! अकु, एक
सर्वच किस्से धमाल!
अकु, एक प्रामाणिक प्रश्न - वरच्या पोष्टीत लिहीले आहेस तेव्हढेच पाहीलेस ना?
वत्सला.... कंट्रोल कंट्रोल...
वत्सला.... कंट्रोल कंट्रोल...

सुदैवाने अथवा दुर्दैवाने माझ्या बालमनावर वाईट परिणाम होणारे काहीच्च मला दिसले नाही!
'आधिच उल्हास __ _____ " या
'आधिच उल्हास __ _____ " या म्हणीची पूर्तता 'त्यात प्रल्हाद' अशी केली होती.
>>>>>>>>>>>>>>
मामी तुमचा तर प्रल्हाद होता......
आम्ही शाळेत असताना आम्हाला करमरकर सर इंग्रजी शिकवायचे. म्हणजे क्लास घ्यायचे. ते खूप उत्साही होते. शिकवता शिकवता कुठून कुठे जायचे.....धडा कुठेतरीच रहायचा आणि त्याच्याशी रिलेटेड इंग्रजी मूव्ही, साहित्य(लिटरेचर), करंट अफेअर्स.....अजून खूप काही...असं मस्त चालायंचं क्लासमधे. त्याचा आम्हाला खूप फायदाच झाला.
तरे ते खूप मोठ्यांदा बोलणार खूप हसणार...असं चालायंच...कधी कधी त्यांचा एक मित्र यायचा....उल्हास नावाचा.....मग दोघं मिळून खूप बडबड..हसणं...असं चालायंच....तेव्हा आम्ही एकमेकात म्हणायचो.....अधीच उल्हास आणि त्यात करमरकर सर!
अकु, एक प्रामाणिक प्रश्न -
अकु, एक प्रामाणिक प्रश्न - वरच्या पोष्टीत लिहीले आहेस तेव्हढेच पाहीलेस ना?
>>>>>>>>>>>>> हो अकू ...नक्की ना?
मानुषी
मानुषी
लहानपणीच्या खेळण्यात
लहानपणीच्या खेळण्यात बांगडीच्या काचांचा पडदा असा एक प्रकार असायचा. बांगडीच्या काचेचा तूकड्याचा मध्यभाग मेणबत्तीवर धरायचा. आणि त्याची दोन्ही टोके, आतल्या बाजूला ओढायची. थोड्या वेळाने ती जूळतात. मग असे तूकडे एकमेकांत अडकवून त्याची माळ करायची. त्याचा दरवाज्याला पडदा करायचा असा प्लान. पण इतका उत्साह कधी टिकायचा नाही. (असा पूर्ण पडदा कुणाकडे लावल्याचा आठवत पण नाही. )
पण बांगड्याचे तूकडे गोळा करणे, मेणबत्ती मिळवणे आणि ती पेटवून आणणे, हे अगदी मनापासून केले जायचे. एकमेकांत ते तूकडे अडकवताना, कधी कधी बोटं भाजायची. पण ते तूकडे पाण्यात बुडवायची सोय नसायची. ते तूटायचे.
त्यावेळी कासार घरोघर फिरायचे. ते आले म्हणजे आम्हाला पर्वणीच वाटायची. मग गोळा केलेल्या तूकड्यांचा व्यापार व्हायचा. म्हणजे माझ्याकडचा हिरवा घे आणि तूझ्याकडचा निळा दे. यावेळी पण दोन तूकडे शक्यतो सारख्या लांबीचे असावेत, याकडे कटाक्ष असायचा.
Pages