झणझणीत... तिखट... तोंडाला पाणी आणेल... अशी "झटका चटणी

Submitted by कैवल्यसिंह on 3 November, 2016 - 08:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झणझणीत... तिखट... तोंडाला पाणी आणेल... अशी

"झटका चटणी"

- एक मोठा लसणाचा गड्डा
- अर्धी वाटी शेंगदाणे
- एक वाटी सुक्या लाल मिरच्या किंवा लाल तिखट
- सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
- दोन चमचे जाड पोहे
- दोन टेबलस्पून पंढरपुरी डाळं (फुटाण्याची डाळ)
- दोन टेबलस्पून बेसन पीठ
- एक चमचा जिरे
- दोन चमचे धने
- एक चमचा साखर
- ५-६ पुदिन्याची पाने (आवडत आसल्यास)
- पाव वाटी तेल
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर (आवडत आसल्यास)

क्रमवार पाककृती: 

- सोललेल्या लसूणाच्या पाकळ्या, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, पोहे, पंढरपुरी डाळं, मीठ आणि लाल मिरच्या (मिरच्यांऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल), जिरे, धने, साखर, मीठ, पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटावं.
- अर्धवट वाटून झाल्यावर त्यात डाळीचं पीठ घालून परत जाडसर होईपर्यंत फिरवून घ्यावे.
- गॅसवर एका कढाईत तेल तापत ठेवावं.
- तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कुटलेली चटणी घालावी.
- मंद आचेवर दहा-बारा मिनिटं परतावं. खमंग भाजावं.
- गार झाल्यावर चटणी बरणीत भरावी.
- ही चटणी बरेच दिवस टिकते. प्रवासातही उपयोगी पडते.
- ह्या चटणी बरोबर ज्वारीची, तांदळाची, बाजरीची भाकरी एकदम झक्कास लागते. व सोबत हाताने फोडलेला कांदा घ्यावा.

हा खुपच जुना फोटो आहे. जेव्हा लाल मिरच्या घालुन ही चटणी केली तेव्हा ती संपुन गेली व फोटो काढायचा राहीला.. त्यामुळे आधी हिच चटणी हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकुन केली होती त्याचा फोटो टाकलाय.... sorry navin photo nantar taken mi...

वाढणी/प्रमाण: 
वाढणी/प्रमाण निश्चित आसे नाही..
अधिक टिपा: 

- लाल मिरच्या किंवा लाल तिखट आपल्या आवडीनुसार व तिखटाच्या प्रमाणावर टाकावे.
- लाल मिरच्या किंवा लाल तिखट याऐवजी हिरव्या मिरच्यांचा वापर सुध्दा करु शकता.
- हि चटणी झणझणीतच चांगली लागते.
- कृपया चटणी करताना यात पाणी आजिबात वापरु नये. कारण पाणी घातल्यावर हि चटणी आणखीणच तिखट लागते.
- चटणीवर ज्यांना तेल आवडत आसेल त्यांनी तेल टाकुन हि चटणी खावी टेस्ट एकदम वेगळीच लागते.

माहितीचा स्रोत: 
जुने पदार्थ, माझी आज्जी व पणजी व आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु. प्रवासात न्यायला नक्की करणार. मला प्रवासाला गेल्यावर असलं काही खायची खुमखुमी येतेच. इथे बाहेर सगळे गुळ्मुळीत मि़ळते ना. मात्र फोटो जरा चांगला हवा होता.

बाब्बो !!
आहे तोंपासू प्रकार्...पण आमच्या सारख्यांसाठी आर. डि. एक्स. है ये | Lol Lol

जबरी टेस्टी वाटतेय .
फक्त स्कॉर्पियन मिरची टाकु नका आणि प्रवासात खाण्यापुर्वी दोनदा विचार करा Proud

बाब्बो !!
आहे तोंपासू प्रकार्...पण आमच्या सारख्यांसाठी आर. डि. एक्स. है ये | >>>> +१ Proud